जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 176/2011 तक्रार दाखल तारीख – 01/12/2011
तक्रार निकाल तारीख– 20/02/2013
श्री.योगेश पिता विजयकुमार देशपांडे,
रा.सुभाष रोड, बीड, ता.जि.बीड ... अर्जदार
विरुध्द
1) “मायक्रोमॅक्स इन्फॉर्टमॅटिक्स लि.”
प्लॉट नं.21/14, ब्लॉक अ, नारायणा
इंडस्ट्रीयल एरिया, फेज-
न्यु दिल्ली 110 028.
2) “मायक्रोमॅक्स” मोबाईल सर्व्हिस सेंटर/चेक
पॉईंट, हिना हॉटेल बिल्डींगमध्ये, जालना
रोड, बीड ता.जि.बीड.
3) प्रो.प्रा.फारुक मोबाईल शॉपी,
अतहर बाबर कॉम्प्लेक्स, गाळा नं.11,
बशीरगंज, बीड, ता.जि.बीड. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अड.एन.एम.कुलकर्णी,
गैरअर्जदार क्र.1, 2 गैरहजर.
गैरअर्जदार क्र. 3, तर्फे अड.इस्माईल जी.सय्यद,.
---------------------------------------------------------------------------------------
निकाल
दिनांक- 15.02.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
(2) त.क्र.176/11
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून गैरअर्जदार क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल हॅन्डसेट रक्कम रु.2300/- रोख देवून विकत घेतला. मोबाईल खरेदी केल्यानंतर व्यवस्थित चालत नव्हता, हॅन्डसेट नेहमी हँग होणे, मधून मधून न दिसणे वगैरे तक्रारी चालू होत्या. त्यामुळे तक्रारदारांनी दि.07.07.11 रोजी गैरअर्जदार क्र.2 मायक्रोमॅक्स कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला याबाबतचे जॉब कार्ड भरुन दिल्यानंतर 15 दिवसात हॅन्डसेटची दुरुस्ती होईल असे सांगितले. अद्याप पर्यंत गैरअर्जदार क्र.2 यांनी हॅन्डसेट दुरुस्त केला नाही, तसेच हॅन्डसेट परत दिला नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द “एकतर्फा” आदेश दि.10.04.12 रोजी घेण्यात आला.
गैरअर्जदार क्र.3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार त्यांची जबाबदारी फक्त डिलरकडून मोबाईल हॅन्डसेट घेवून ग्राहकांना विक्री करण्याची असून दुरुस्ती बाबतची जबाबदारी ही कंपनीच्या सर्व्हिस सेंटरची आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार क्र.3 यांचा लेखी जबाब, याचे सुक्ष्म निरीक्षण केले. तसेच तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.एन.एम.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून दि.06.01.11 रोजी रक्कम रु.2300/- एवढया किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट विकत घेतल्याचे पावतीवरुन दिसून येते. तसेच दि.07.07.11 रोजी गैरअर्जदार क्र.2 सर्व्हिस सेंटर यांचेकडे दुरुस्तीसाठी दिल्याचे कस्टमर जॉब कार्डवरुन दिसून येते. सदर जॉब कार्डनुसार मोबाईल Restart Reboot वगैरे दोष असल्याबाबत नमुद केले आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन दिला नाही.सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 हजर नाहीत. त्यामुळे त्यांनी मोबाईल दुरुस्ती का केली नाही? अथवा दुरुस्ती होणे शक्य नसल्यास गैरअर्जदार क्र.1 उत्पादक कंपनीकडे मोबाईल पाठवला किंवा काय? याबाबत खुलासा होत नाही. सदर मोबाईल वॉरंटीच्या कालावधीत नादुरुस्त झाल्याचे गैरअर्जदार क्र.2 यांनी जॉब कार्डवर नमुद केले आहे. अशा
(3) त.क्र.176/11
परिस्थितीत तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटीच्या कालावधीत नादुरुस्त होवूनही गैरअर्जदार क्र.2 यांनी दुरुस्त केला नाही हे स्पष्ट होते. तक्रारदारांचा मोबाईल सदरचा मोबाईल खरेदी केल्यानंतर अल्पावधीतच नादुरुस्त झालेला असून गैरअर्जदार क्र.2 यांनी दुरुस्त करुन परत दिला नाही, यावरुन सदर मोबाईलमध्ये उत्पादकिय दोष असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊ शकत नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 कंपनीने सदर मोबाईलची किंमत रु.2300/- तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र.1 उत्पादक कंपनीला आदेश देण्यात येतो की,
तक्रारदारांना रु.2,300/- (अक्षरी रु. दोन हजार, तिनशे) आदेश
मिळाल्यापासून 30 दिवसात द्यावी.
3) विहीत मुदतीत वरील रक्कम अदा न केल्यास 9 टक्के
व्याजदरासहीत द्यावी.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड