Maharashtra

Nanded

CC/10/84

Bhagvat Govind Debdvar - Complainant(s)

Versus

Pro. Baburao Rangarao Kadam - Opp.Party(s)

Adv. G.R. Pimparkhed

13 Jul 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/84
1. Bhagvat Govind Debdvar Mukhed, Tq. Mukhed, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Pro. Baburao Rangarao Kadam Vasant Nager, Nanded.NandedMaharastra2. Pro. Baburao Maroti GaykawadBalajinivas, Naiknager, nanded.NandedMaharastra3. Manager, Pundlik Chandan Patilvasant nager, nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 13 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2010/84, 85 व 27
                          प्रकरण दाखल तारीख - 22/12/2009
                          प्रकरण निकाल तारीख 13/07/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री. सतीश सामते,                 - सदस्‍य.
1.   तक्रार क्र.2010/84
     भागवत पि. गोविंद देबडवार
     वय 50 वर्षे, धंदा व्‍यापार
     रा.मुखेड ता. मुखेड जि.नांदेड
2.   तक्रार क्र.2010/85
     कृष्‍णा पि. अशोक देबडवार
     वय, 22 वर्षे, धंदा व्‍यापार
     रा.मूखेड ता.मूखेड जि. नांदेड                           अर्जदार
3.   तक्रार क्र.2010/27
     भारत पि. पुंडलिक कोटगीरे
     वय, 50 वर्षे, धंदा व्‍यापार
     रा.बालाजी मंदिरा जवळ मूखेड ता.मूखेड
     जि. नांदेड.
विरुध्‍द
1.   प्रा.बाबूराव पि. रंगराव कदम
     मूख्‍य प्रवर्तक गजानन नगर गृहनिर्माण संस्‍था
     मर्यादित, नांदेड,
     वय सज्ञान धंदा नौकरी
     रा. जनाई निवास, वसंत नगर, नांदेड
2.   प्रा.बाबूराव पि. मारोती गायकवाड
     वय सज्ञान धंदा नौकरी
     रा. बालाजी निवास, नाईक नगर, नांदेड               गैरअर्जदार
3.   व्‍यवस्‍थापक,
     पुंडलिक पि. चंदन पाटील
     राजश्री हायस्‍कूल, वसंत नगर, नांदेड.
 
 
 
 
सर्व अर्जदारां तर्फे वकील         - अड.जी.आर पिंपरखेडे
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील      - अड.राजा वीर.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील        - कोणीही हजर नाही.
                               निकालपञ
                (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
             सर्व अर्जदारांची तक्रार ही एकच गैरअर्जदारा विरुध्‍दची सारखीच असल्‍यामूळे व ञूटीची सेवा दिली म्‍हणून सर्वाची एक सारखी मागणी असल्‍यामूळे आम्‍ही तिन्‍ही तक्रारीमध्‍ये एकञित निकाल देत आहोत. सर्व अर्जदारांनी  खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी एकञित सन 1983 मध्‍ये गजानन इंटरप्रायजेस, वसंत नगर नांदेड या नांवाने एक प्‍लॉट योजना सूरु केली. सदरची प्‍लॉट योजना ही  गैरअर्जदार यांनी मौजे असदूल्‍लाबाद, गोपाल गॅरेजच्‍या पाठीमागे नांदेड येथे स्थित असलेल्‍या सर्वे  नंबर 11 जमिनीतील प्‍लॉट बाबत होती. गैरअर्जदारांनी सदर जमिनीमध्‍ये ले-आऊट प्रमणे प्‍लॉटींग करुन लकी स्‍कीम प्‍लॉट योजना सूरु केली.  सदर योजनेमध्‍ये सभासदत्‍व घेणा-याला फिस रु.11/- होती व मासिक हप्‍ता रु.250/- इतका होता. अर्जदाराला गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सभासद   केले. सदर प्‍लॉटची साईज 30 50 फूट म्‍हणजे 1500 चौरस फूट ठेवण्‍यात आली होती. ही प्‍लॉट योजना सोडत पध्‍दतीवर करण्‍यात आली होती.  योजनप्रमाणरे प्रत्‍येक महिन्‍याला सोडत काढण्‍यात येऊन त्‍यातील एका भाग्‍यवान सभासदास एक प्‍लॉट देण्‍याचे गैरअर्जदाराने जाहीर केले होते. गैरअर्जदारांनी त्‍यांचे लकी स्‍कीमची पहिली सोडत दि.29.09.1983 रोजी केली.  अर्जदाराने वरील प्‍लॉट योजनेमधील सर्व हप्‍ते भरलेले आहेत. तसेच दि.11.09.1983 ते 15.06.1987 या कालावधीत अर्जदाराने एकूण 30 हप्‍ते भरलेले आहेत.  अर्जदाराने सर्व हप्‍ते भरल्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास प्‍लॉट  वाटप केला.  अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना सदर प्‍लॉटची रजिस्‍ट्री करुन देण्‍याची व त्‍यांचा कब्‍जा देण्‍याची वारंवार विनंती केली परंतु गैरअर्जदारांनी त्‍या बाबत चालढकल केली. सदर प्‍लॉटची रजिस्‍ट्री करुन देण्‍यास गैरअर्जदार हे टाळाटाळ करीत राहीले. दि.01.09.2009 रोजी अर्जदार हा मूखेड येथील काही प्रतिष्‍ठीत लोकांना घेऊन गैरअर्जदाराकडे गेलस असता आणि सदर प्‍लॉअची रजिस्‍ट्री करुन ताबा दयावा अशी विनंती केली परंतु नेहमी प्रमाणे त्‍यांनी रजिस्‍ट्री करुन देऊ असे सांगितले पण शेवटपर्यत
 
 
गैरअर्जदारांनी अर्जदारास रजिस्‍ट्री करुन दिली नाही. अर्जदाराने दि.02.02.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस दिली व नोटीस मिळाल्‍यापासून 15 दिवसांच्‍या आंत सदर प्‍लॉट नंबर 50 चा कब्‍जा व रजिस्‍ट्री करुन देण्‍याची विनंती केली. सर्व गैरअर्जदार हे प्रतिष्‍ठीत , सूशिक्षीत असल्‍याने विश्‍वास ठेऊन सव प्‍लॉट योजनेतील सभासदांना विश्‍वास असल्‍याने अर्जदार यांना खरेदीखत आज करुन देतील, उद्या करुन देतील या भावनेतून वाट बघत होते. सन 1983 पासून ते आजतागायत अर्जदाराने जवळपास 200 ते 250 वेळा गैरअर्जदारांशी संपर्क केला व खरेदी खत करुन देण्‍याची विनंती केली पण गैरअर्जदारांनी सदर प्‍लॉटचे खरेदी खत करुन दिले नाही व कब्‍जा ही दिला नाही. गैरअर्जदारांनी अर्जदारास विनाकारण सदर प्‍लॉटची रजिस्‍ट्री करुन देण्‍यास वारंवार टाळाटाळ केली आहे व असे करुन त्‍यांनी सेवेतील ञूटी दिली आहे. म्‍हणून अर्जदारांनी सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, सदर प्‍लॉट संदर्भात कायदेशीर खरेदी खत करुन देण्‍याचे आदेश करावेत अन्‍यथा सदरची प्‍लॉटची किंमत प्रत्‍येकी रु.3,00,000/- गैरअर्जदारांनी दयावेत, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,5000/- देण्‍याचे आदेश करावेत.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार यांचे परिच्‍छेद क्र.1 मधील मजकूर वादग्रस्‍त नाही. गैरअर्जदार यांनी सन 1983 मध्‍ये गजानन इंटरप्रायजेस वसंत नगर नांदेड या नावाने एक प्‍लॉट योजना सूरु केली होती तसेच पूंडलीक चंदर पाटील या नावांने कोणताही व्‍यवस्‍थापक गजानन इंटरप्रायजेस या कार्यालयात नौकरीत नव्‍हता. परिच्‍छेद क्र.4 मधील काही मजकूर बरोबर असून काही मजकूर वादग्रस्‍त आहे. परिच्‍छेद क्र.5 मधील मजकूर गैरअर्जदार यांना मान्‍य नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे असे म्‍हणणे आहे की, गजानन इंटरप्रायजेस ही फर्म दि.10.03.1986 रोजी रितसर बंद करण्‍यात आली होती (योजना पूर्ण झाल्‍यानंतर). सदर जागेवर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सर्व सभासदाना विश्‍वासात घेऊन व सदर प्‍लॉटवर त्‍वरीत घर बांधण्‍याचा विचार करुन गजानन नगर सहकारी गृहनिर्माण संस्‍था म. असदूल्‍लाबाद नांदेड संस्‍थेची स्‍थापना केली जिचा नोंदणी क्र.एनएनडी/एनएनडी/एचएसजी/टी.ओ (340) दि.09.02.1988 आहे. त्‍यानंतर प्‍लॉट धारकांना संस्‍थेचे नियमाप्रमाणे सभासद करुन त्‍यांना प्‍लॉटचे मालकी हक्‍क प्रमाणपञ देऊन प्‍लॉटचा ताबा दिला. गैरअर्जदार यांनी दि.05.04.1988 रोजी प्‍लॉट  साईज 30 बाय 50 ज्‍यांचे एकूण क्षेञफळ
 
 
1500 चौ. फूटाचा प्‍लॉट वाटप करुन त्‍यासंबंधी अलाटमेंट प्रमाणपञ देऊन प्‍लॉटचा ताबा दिला होता. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे म्‍हणणे असे की, अर्जदार यांना दि.05.04.1988 रोजी मालकी हक्‍क प्रमाणपञ व ताबा देऊनही त्‍यांनी बांधकाम केले नाही त्‍यामूळे संस्‍थेने वेळोवेळी संचालक मंडळ ठराव दि.31.03.1999, 30,06,1999 व दि.30.09.1999 ठरावाद्वारे अर्जदार यांना दि.12.04.1999, 20.07.1999, 11.10.1999 रोजी लेखी नोटीसीद्वारे (यूपीसी द्वारे) कळवूनसर्व प्‍लॉट  वर त्‍वरीत बांधकाम करावे अशी विनंती केली होती.  अर्जदार यांनी प्‍लॉटवर बांधकाम न केल्‍यामूळे संस्‍थेची उपवीधी मधील तरतूद फ 2-8 (4) नुसार 10 वर्षाच्‍या आंत बांधकाम न केल्‍यामूळे प्‍लॉटची मालकी संस्‍थेकडे जाईल या तरतूदी अन्‍वये संस्‍थेची संचालक मंडळाची सभा दि.31.12.1999 रोजी मधील ठराव क्रं.3 अन्‍वये तिन्‍ही अर्जदार यांचे सभासदत्‍व व प्‍लॉट रदद केला. त्‍याप्रमाणे संस्‍थेने अर्जदार यांना दि.07.01.2000 रोजी (यूपीसी द्वारे) पञान्‍वये कळविलेले होते. त्‍यामूळे अर्जदार यांना सभासदत्‍व रदद केल्‍या बाबतची माहीती आहे. परंतु अर्जदार यांनी जाणूनबूजून लिमिटेशनचा मूददा उपस्थित होईल म्‍हणून मांडलेले नाही. सदर तक्रार अर्ज हा कायदयाप्रमाणे मूदतीत नसल्‍यामूळे अर्जदार यांची तक्रार लिमिटेशनयच्‍या मूददयावर फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. संस्‍थेने प्‍लॉट  हा गरजू सभासद नामे श्री.मनदिपसिंघ चरणसिंघ सरदार यांना वाटप करुन त्‍या बाबतचे मालकी हक्‍क प्रमाणपञ व ताबा देण्‍यात आला होता. त्‍यामूळे सदर सभासद त्‍या प्‍लॉटवर घराचे बांधकाम करुन त्‍यात स्‍वतः राहत आहेत. अर्जदार यांनी सदर तक्रारीमध्‍ये संस्‍थेला व प्‍लॉट  चे मालक यांनाही पार्टी केलेले नाही. परिच्‍छेद क्र.8, 9 व 10 मधील मजकूर मान्‍य नाही.  अर्जदार यांचा प्‍लॉट दि.31.12.1999 रोजी रदद केला व अर्जदार यांना दि.07.01.2000 रोजी पञाअन्‍वये कळविलेले आहे. गजानन इंटरप्रायजेचा सभासद नामे बालाप्रसाद अग्रवाल यांनी यांच न्‍यायालयामध्‍ये तक्रार क्र.126/2008 या मूददयावर दाखल केली होती परंतु सदर तक्रार मा. न्‍यायालयाने प्‍लॉटच्‍या अनुंषगाने फेटाळलेली आहे. म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.3 यांना मंचाने नोटीस पाठवून ती तामील झाली नाही, या बाबत अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.3 बाबत स्‍टेप्‍स घेण्‍यासाठी संधी देण्‍यात आली परंतु त्‍यांनी स्‍टेप्‍स घेतली नाही म्‍हणून मंचाने आदेश दिले की, अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द तक्रार तक्रार चालवावयाची नाही म्‍हणून अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द स्‍टेप्‍स न घेतल्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात आली असे आदेश करण्‍यात आले.
 
                  अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2   यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.   तक्रारदार यांचा अर्ज मूदतीत येतो काय ?               नाही
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              सर्व अर्जदार यांचे तक्रार अर्जा प्रमाणे दि.8.9.1983 रोजी त्‍यंानी  गजानन इंटरप्रायजेस या गैरअर्जदार यांच्‍या लक्‍की स्‍कीम मध्‍ये सभासदत्‍व घेतले व त्‍यानंतर दर महिन्‍याला रु.250/- प्रमाणे तिस हप्‍ते भरावयाचे होते. त्‍यांचे लक्‍की क्रमांक न नीघाल्‍यामूळे त्‍यांनी पूर्ण  हप्‍ते भरले. यानंतर 1988 ला गैरअर्जदार यांनी या गजानन इंटरप्रायजेस ही फर्म रदद केली. ही फर्म रदद केल्‍याबददल गैरअर्जदार यांनी त्‍यांचे प्रोफेशन टॅक्‍स चे रजिस्‍ट्रेशन रदद करुन घेतले. त्‍यांची प्रत त्‍यांनी दाखल केली आहे. यानंतर गैरअर्जदार यांनी गजानन नगर सहकारी गृह निर्माण संस्‍था नांदेड रजिस्‍ट्रर नंबर एनएनडी/एनएनडी/एचएसजी/टी.ओ (340) दि.09.02.1988ही सहकारी संस्‍था म्‍हणून रजिस्‍ट्रर केली व यांच संस्‍थेत अर्जदार यांना दि.5.4.1988 रोजी प्‍लॉट चे अलाऊटमेंट लेटर दिले ते अर्जदाराने स्‍वतः या प्रकरणात दाखल केलेले आहे. इथपर्यत अर्जदार यांना कोणताही आक्षेप नव्‍हता. यानंतर गैरअर्जदार यांनी त्‍यांना दि.12.4.1999 रोजी एक नोटीस पाठविली. यात असे स्‍पष्‍ट लिहीले की आपण दि.5.4.1999 पासून प्‍लॉटचे  सभासद आहे परंतु आपण त्‍यावर बांधकाम केलेले नाही त्‍यामूळे ठराव क्र.3 दि.31.3.1999 नुसार प्रत्‍येक सभासद प्‍लॉट धारकास बांधकाम करणे आवश्‍यक आहे. आपण त्‍वरीत बांधकाम न केल्‍यास आपले सभासदत्‍व रदद करण्‍यात येईल अशा प्रकारची नोटीस व अशा आशयाचा मजकूर मिटींग मध्‍ये पास झाल्‍या बददल दि.31.3.1999 रोजी प्रोसिंडींग बूक  ठराव व ते पञ तसेच हे पञ यूपीसी क्षरे दि.12.4.1999 रोजी अर्जदार यांचे नांवे पोस्‍ट केल्‍याबददलचा पूरावा म्‍हणून यूपीसी ची प्रत देखील दाखल केली आहे. यानंतर परत दि.30.06.1999 रोजी सोसायटीच्‍या सभेत जे ठराव झाले त्‍या ठरावाची प्रत व या सोबत दि.20.07.1999 रोजीला परत एक स्‍मरणपञ देऊन आपण दि.12.4.1999 च्‍या नोटीसच्‍या अनुषंगाने प्‍लॉटवर बांधकाम केले नाही म्‍हणून आपले सभासदत्‍व का रदद करण्‍यात
 
 
येऊ नये अशी नोटीस यूपीसी द्वारे दिली व त्‍यांची प्रत दाखल केलेली आहे. यास देखील अर्जदार यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. यानंतर दि.30.03.1999 रोजी परत सहकारी संस्‍थेची मिटींग झाली व या मिटींग मध्‍ये ठराव घेऊन ज्‍या प्‍लॉट धारकांनी प्‍लॉटवर बांधकाम केले नाही अशा लोकांना परत दि.1.1.10.1999 रोजी नोटीस नंबर 3 पाठवून आपल्‍याला सतत नोटीस पाठवून व पाठपूरावा करुन देखील आपण 10 वर्षात प्‍लॉटवर बांधकाम करु शकले नाहीत म्‍हणून आपला प्‍लॉट रदद करण्‍यात येत आहे असे पञ दिले. असा ठराव, पञ पोस्‍टाचा तपशीत दाखल करण्‍यात आलेला आहे. यानंतर परत दि.07.01.2000 रोजी तक्रारदाराच्‍या नांवाने पञ लिहून  त्‍यांचा प्‍लॉट चा ताबा घेऊन दूस-या गरजू सभासदाला प्‍लॉट वाटप करण्‍यात आलेला आहे व आपले सभासदत्‍व रदद केलेले आहे असे कळवलेले आहे हे पण पञ पाठविल्‍याचा यूपीसी चा तपशील दाखल केलेला आहे. गैरअर्जदारांनी गृह निर्माण उपवीधी नियम नंबर 4 या प्रकरणात दाखल केलेला असून या नियमाप्रमाणे सभासदाला दिलेला प्‍लॉट हस्‍तांतरीत करता येणार नाही व 10 वर्षात घर न बांधल्‍यास प्‍लॉटची मालकी संस्‍थेकडे जाईल असे स्‍पष्‍ट नमूद केलेले आहे व गैरअर्जदारांनी या नियमाचे अनूषंगाने कारवाई केलेली आहे व एक शपथपञ दाखल करुन दि.2.4.2009 रोजी पावती क्रमांक 253 द्वारे सूशिलाबाई हतागळे यांना रु.250/- चे शेअर्स देऊन व रककम स्विकारुन शेअर्स प्रमाणपञ व प्‍लॉट अलाऊटमेंट पञ दिलेले आहे. हा प्‍लॉट नंबर 36 वर  सौ.सूशिलाबाई हतागळे यांना, तसेच प्‍लॉट नंबर 50 वर मंदिपसिंघ चरणसिंघ सरदार यांना व प्‍लॉट नंबर 51 वर संतोष बापूराव जाधव यांना कब्‍जा मिळालेला असून त्‍यावर त्‍यांनी बांधकाम करुन आज तीथे राहत आहेत म्‍हणून त्‍यांनी तिन्‍ही तक्रारीमध्‍ये तीघांचे शपथपञही दाखल केलेले आहे.यांत गैरअर्जदार यांचेकडून सेवेत ञूटी झालेचे दिसत नाही.
              गैरअर्जदाराने केलेली कृती ही संस्‍था उपवीधी नियमास धरुन आहे. ज्‍याअर्थी अर्जदाराने सहकारी संस्‍थेचे अलाऊटमेंट लेटर स्विकारले आहे त्‍याअर्थी त्‍यांना आता गजानन इंटरप्रायजेस या फर्मकडून प्‍लॉट घेतला होता असा आक्षेप घेता येणार नाही. एखादी सहकारी संस्‍थेचे अलाऊमेट प्रमाणपञ स्विकारल्‍यानंतर त्‍या सहकारी संस्‍थेचे नियम त्‍यांचेवर बंधनकारक आहेत. अर्जदार म्‍हणतात की, प्‍लॉटवर त्‍यांचा ताबा आहे तर मग सूशीलाबाई घर बांधून तेथे राहतात कशा ? असा प्रश्‍न निर्माण होतो. गैरअर्जदारांनी जेव्‍हा यूपीसी च्‍या द्वारे 4 ते 5 नोटीस पाठविल्‍या  त्‍यातील एकही नोटीस अर्जदारास मिळाली नाही हे म्‍हणणे खरे वाटण्‍याजोगे नाही म्‍हणून या नोटीसचे वर्ष 1999 ते 2000 अशा गृहीत धरल्‍यास यानंतर तक्रारदाराने
 
 
आपला तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे लिमिटेशन याप्रमाणे दोन वर्षाचे आंत दाखल करणे आवश्‍यक होते. आज अर्जदार 10 वर्षानंतर तक्रार दाखल करतात म्‍हणजे त्‍यांचा दावा मूदतीत नाही. तक्रार दाखल  करताना हा मूददा मंचाने उपस्थित केला होता व दि.29.01.2010 रोजी यावर आदेश करुन कंन्‍टीन्‍यूअस कॉज ऑफ अक्‍शन हा अर्जदाराचा यूक्‍तीवाद गृहीत धरुन दावा पूढे चालविला जरी येत असला तरी गैरअर्जदार हजर झाल्‍यावर व त्‍यांनी आवश्‍यक ते कागदपञे दाखल केल्‍यावर गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार  मेरिट बघून या मूददयावर पूर्नविचार करण्‍यासाठी हा मूददा खूला ठेवलेला होता असे आदेश केलेले होते. आज आम्‍ही या सर्व बाबीचा विचार करुन अंतिम निकालास आलो आहोत की, अर्जदाराचा तक्रार अर्ज हा मूदतबाहय आहे. म्‍हणून यांच मूददयावर तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतो.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                         आदेश
1.                                         सर्व अर्जदारांचे तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतात.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
4.                                         एकञित निकालांची मूळ प्रत प्रकरण क्र.27/2010 मध्‍ये ठेवण्‍यात येते.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                           श्रीमती सुवर्णा देशमूख                             श्री. सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                               सदस्‍या                                                सदस्‍य
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक.