1. तक्रारकर्त्याने दि. 19.02.2015 रोजी वि.प. क्र. 1 यांचेकडून जिएसएम मोबाईल अॅक्वा एक्स्ट्र्रीम (रेड)डयुएल सिम हा मोबाईल रु. 11,500/- ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 911415700285883 हा आहे. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर काही कालावधीनंतर मोबाईलमध्ये ब्लुटूथ अॅन्ड डाटा ट्रांस्फरींग चा दोष निर्माण झाला. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प. क्र. 1 यांचेकडे दाखलविला असता त्यांनी सदर मोबाईल दुरूस्तीकरीता वि.प. क्र. 2 यांचेकडे जावे लागेल असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर मोबाईल घेवून वि.प.क्र. 2 कडे गेला असता त्यांनी तक्रारकर्त्याला, तुम्ही ज्या दुकानातून मोबाईल घेतला त्यांनाच का दाखविला नाही असे उध्दटपणे बोलून वि.प.क्र.1 कडे जाण्यांस सांगितले. त्यानंतरही तक्रारकर्त्याने महिनाभरात वि.प.क्र.2 ला पुन्हा मोबाईलची समस्या सांगितली. शेवटी तक्रारकर्त्याने घडलेला सर्व प्रकार वि.प.क्र.1 यांना सांगितला असता त्यांनी वि.प.क्र.2 सोबत बोलणी केली व त्यांना सदर मोबाईल दुरूस्त करून देण्यांस सांगितले. 2. तक्रारकर्त्याने दिनांक 13.6.2015 रोजी सदर मोबाईल वि.प.क्र.2 यांना दुरुस्तीला देवून ब्लुटूथ अॅन्ड डाटा ट्रांस्फरींगची समस्या दुर करण्यांस सांगितले असता वि.प.क्र.2 ने तक्रारकर्त्यास 506135495004T1001 नंबरची जॉबशिट देवून 1 आठवडयानंतर मोबाईल परत घेवून जाण्यांस सांगितले. परंतु तक्रारकर्ता 1 आठवडयानंतर मोबाईल घेण्यासाठी गेला असता त्यांनी मोबाईल दुरूस्त करून परत दिला नाही. तक्रारकर्ता हा पुन्हा ऑगस्ट 2015 मध्ये वि.प.क्र.2 कडे सदर मोबाईल आणण्याकरीता गेला असता त्यांनी तक्रारकर्त्याला ‘’ तुला जे करायचे ते कर,तुला दुरूस्त मोबाईल देऊ शकत नाही’’ अशी अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 16/9/2015 रोजी अधिवक्ता श्री.भडके यांचेमार्फत वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीस पाठवून मोबाईल दुरूस्त करून देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु वि.प.यांनी सदर नोटीसची पुर्तता केली नाही. वि.प. यांनी तक्रारकर्त्यास मोबाईल दुरूस्त करून न देवून सेवेत त्रृटी दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, तक्रारकर्त्याला वि.प. क्र. 1 ते 3 यांनी मोबाईल किंमत रक्कम रु. 11,500/- परत करावी व त्यावर 18 टक्के व्याज व मूल ते चंद्रपूर जाण्या येण्याचा बसचा खर्च रू.100/- आणि इतर किरकोळ खर्च रू.100/- नोटीस खर्च रू.2000/- आणि तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 30,000/- देण्याची विनंती केली. 3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. क्र. 1 यांनी तक्रारीत हजर होवून आपले लेखी कथन दाखल केले असून त्यामध्ये वि.प. क्र. 2 हे वि.प. क्र. 3 कंपनीचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असून त्यांचे नियंत्रणाखाली काम करते हया बाबी मान्य केल्या असून तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबुल करून पुढे विशेष कथनामध्ये नमूद केले की तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांना मोबाईल विकत घेतल्यानंतर काही दिवसातच सदर मोबाईलमध्ये ब्लुटूथ अॅन्ड डाटा ट्रांस्फरींग चा बिघाड/दोष असल्याचे सांगितले असता सदर मोबाईल दुरूस्तीकरीता वि.प. क्र. 2 यांचेकडे जावे लागेल असे सांगितले.वि.प.क्र.2 हे केअर सेंटर असून मोबाईलमध्ये कोणताही बिघाड झाल्यांस मुख्य मोबाईल कंपनीने प्रत्येक जिल्हयात कंपनीचे केअर सेंटर उघडलेले आहे. वि.प.क्र.1 हे फक्त मोबाईल विक्रेता असून मोबाईलमध्ये कोणताही आंतरीक व निर्माणाधीन बिघाड आल्यास त्यास वि.प.क्र.1 जबाबदार रहात नाहीत. आंतरीक वा निर्माणाधीन दोष मोबाईलमध्ये आढळल्यास सदर दोष हा निर्माता कंपनीचा असतो. मोबाईलमध्ये बिघाड आल्यांस तो दुरूस्त करून देण्याची जबाबदारी ही केअर सेंटरची असते. वि.प.क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास मार्गदर्शन करून योग्य ती सेवासुध्दा दिली असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार वि.प.क्र.1 यांचेविरूध्द खारीज होण्यास पात्र आहे. 4. वि.प. क्र. 2 व 3 हे प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध दि.06.01.2018 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आले. 5. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, तक्रारीतील कथनच शपथपत्र समजण्यांत यावे अशी दिनांक 14/3/2018 रोजी पुरसीस दाखल, व वि.प. क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र, तसेच तक्रारकर्ता व वि. प क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. वि.प. क्र. 1 ते 3 यांनी मोबाईल विक्री व दुरुस्ती कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 2. आदेश काय ? अंशत: मान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 6. वि. प. क्र. 3 हि मोबाईल उत्पादक कंपनी असून विरुद्ध पक्ष क. 1 हे मोबाईल विक्रेता व वि.प.क्र.2 हे वि.प.क्र. 3 चे अधिकृत दुरुस्ती केंद्र आहे. तक्रारकर्त्याने दि. 19.2.2015 रोजी वि.प.क्र.3 चा निर्मित जिएसएम मोबाईल अॅक्वा एक्स्ट्र्रीम (रेड)डयुएल सिम हा मोबाईल वि.प.क्र. 1 कडून रु. 11,500/- ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 911415700285883 हा होता हे नि.क्र.2 वर दाखल पावतीवरून सिद्ध होते. सदर मोबाईल विकत घेतल्यानंतर काही कालावधीनंतर मोबाईलमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे सदर मोबाईल वि.प क्र. 3 यांचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असलेल्या वि.प क्र. 2 यांचेकडे दि. 13.6.2015 रोजी दुरुस्तीला दिला हि बाब वि. प. क्र. 1 यांनी आपले लेखी उत्तरामध्ये नमूद केली आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्या संदर्भात नि.क्र.2 वर JOBSHEET सुद्धा दाखल केली आहे. सदर JOBSHEET मध्ये Bluetooth not working, in warranty असे नमूद आहे. सदर दस्तावेजावरून उपरोक्त मोबाईलमध्ये दोष निर्माण झाला व तो वि.प.क्र.2 कडे वॉरंटी कालावधीमध्ये दुरूस्तीला दिला होता हे सिद्ध होते. परंतु वि. प. क्र. 2 यांनी सदर मोबाईल दुरुस्त करून दिला नाही व त्यांचेकडेच पडून आहे, हे तक्रारकर्त्याचे कथन वि.प.क्र.2 ने खोडून न काढल्याने ग्राहय धरण्यायोग्य आहे. सदर मोबाईल मध्ये बिघाड झाल्याने तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने तक्रारकर्ता हे वि.प. कडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी योग्य ती सेवा न दिल्याने ते तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 7. मुद्दा क्र. 1 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतिम आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 232/2015 अंशतः मान्य करण्यात येते. 2. विरुद्ध पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, कराराप्रमाणे, सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. 3. वि. प. क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्याचा जिएसएम मोबाईल अॅक्वा एक्स्ट्र्रीम (रेड)डयुएल सिम, आय एम ई आय क्र. 911415700285883 हा मोबाईल विनामुल्य दुरूस्त करून दोषरहीत करून द्यावा. 4. वि. प. क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास मानसीक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रू.2,000/- व तक्रार खर्च रू.1,000/- अदा करावी. 5 . उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. चंद्रपूर दिनांक – 21/08/2018 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |