निशाणी 12
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 859/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः- 11/07/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 7/8/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/06/2009
श्री हिरालाल काशीराम गुरव
वय- 80 वर्षे,धंदा- काहीनाही,
रा.राजहोळी चौक, अंमळनेर, .......... तक्रारदार
जि.जळगांव.
विरुध्द
1. मॅनेजर
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत, अंमळनेर,
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
2. सेक्रेटरी,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत, अंमळनेर,
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
3. श्री.सुरेश ग्यानचंद लोढा ( चेअरमन ),
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत, अंमळनेर,
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
4. श्री.रामचंद्र कृष्णा वाणी ( उपचेअरमन ),
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
5. श्री. रतनलाल भवरीलाल पहाडे,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर
रा. मुंबई गल्ली, अंमळनेर, जि.जळगांव.
6. श्री. शामकांत भानुदास भदाने,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
7. श्री.गोकुळ गबा पाटील,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
8. श्री.चंद्रशेखर माणीकचंद उपाध्ये,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
9. श्री.डॉ.सुनिल भागचंद चोरडीया,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
10. श्री.राजेंद्र माधवराव सुतार (पत्रकार)
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
11. श्री.प्रवीण बालुभाई जेठवा,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
12. श्री.शंतनु श्रीकांत शुक्ल,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
13. सौ.सरोज पुरुषोत्तम भावसार,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
14. सौ.रजनी पारसमल ललवाणी,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव.
15. सौ.उज्वला विजयलाल कोठारी,
प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
न्यु प्लॉट, अंमळनेर,जिल्हा जळगाव. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 23/06/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.आर.बी.कुलकर्णी वकील हजर
सामनेवाला तर्फे श्री.केशव विष्णू कुलकर्णी वकील हजर
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 004551 | 21.02.2006 | 29,000/- | 03.01.2008 |
2 | 004552 | 21.02.2006 | 29,000/- | 03.01.2008 |
3 | 006532 | 10.01.2007 | 20,000/- | 10.01.2008 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावतीची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. त्याप्रमाणे सामनेवाला क्रं. 1 ते 15 तक्रारीत हजर होऊन खुलासा दाखल करण्यास त्यांनी मुदत मागीतलेली आहे परंतु मुदतीअंती ते आपला खुलासा दाखल करु शकलेले नाहीत म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द नोसे चा आदेशा केला.
3. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तक्रारदार यांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्र दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे ञञसबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावती क्रमांक 004551, 006532 व 004552 मॅच्युअर्ड झालेली असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 23/06/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव