ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1066/2009
दाखल दिनांक. 24/07/2009
अंतीम आदेश दि. 26 /03 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
सौ. नर्मदा मधुकर गढरी, तक्रारदार
उ.व. 57, वर्ष, धंदा – घरकाम, (अॅड.विकास य.बडगुजर)
रा. धुळे रोड, हॉटेल सम्राट च्या मागे,
L.I.C. कॉलनी, अमळनेर, ता.अमळनेर,जि.जळगांव.
विरुध्द
1. प्रियदर्शनी नागरी सहकारी पतपेढी मर्या.अमळनेर, सामनेवाला
अमळनेर न्यु प्लॉट अमळनेर, (कोणीही नाही)
ता.अमळनेर, जि.जळगांव.
व इतर 2
निशाणी क्र. 01 वरील आदेश
चंद्रकांत एम.येशीराव, सदस्य – प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, तक्रारदार व त्यांचे वकील दि. 18/08/2011 रोजी पासुन सतत गैरहजर आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांच्या विरुध्द नोटीस बजावणी होऊनही कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. त्या कामी नेमलेल्या प्रत्येक तारखांना ते सतत गैरहजर आहेत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे वकील यांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदारांची व त्यांचे वकीलांची सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारांना त्यांची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 26/03/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव