Maharashtra

Nanded

CC/13/135

Miss. Pornima Anandarao Kosanbe - Complainant(s)

Versus

Principle, SGGS Institute of Technology. - Opp.Party(s)

Adv. Bhalake

12 Feb 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/13/135
 
1. Miss. Pornima Anandarao Kosanbe
R/o. Kushawadi, Tq. Degalur
Nanded
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Principle, SGGS Institute of Technology.
Vishnupuri, Nanded
Nanded
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                 निकालपत्र                                   

(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्‍य)

 

1.     अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

      अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.    अर्जदार, पोर्णिमा पिता आनंदराव कोसंबे  ही एक गरीब शेतकरी कुटूंबातील व्‍यक्‍ती आहे. अर्जदाराने सन 2012-13 च्‍या शैक्षणीक वर्षासाठी गैरअर्जदार क्र. 1 (ARC Centre) यांचकडे फी भरुन प्रवेश निश्चिती केली.  तदनंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना त्‍याचेकडे प्रवेश देणेसाठी विनंती केली व दिनांक 06.08.2012 रोजी Information Technology    शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेतला.  अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे शैक्षणीक फी म्‍हणून रक्‍कम रु.74,070/- व इतर रक्‍कम रु.335/-, लायब्ररी फी1000/- रुपये व होस्‍टेल फी18,250/- रुपये भरले आहेत. ज्‍याचे पावती क्रमांक E/C1/12/2314, E/C1/12/2315, E/C1/12/2316 व E/C1/12/681 असे आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे घेतलेला प्रवेश कट ऑफ डेट पुर्वीच रद्द केला व भरलेली फीची रक्‍कम परत मागीतली.   परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास नियमानुसार फी परत केलेली नाही.  दिनांक 21.08.2012 रोजी Proforma –´’ O ’’ सह डिक्‍लेरेशन फॉर्मनुसार फी अर्जदारास परत  केलेली नाही. अर्जदाराने दिनांक 21.11.2012 रोजी पोस्‍टाव्‍दारे विनंती अर्ज सादर केला. नंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास नोटीसीव्‍दारे फौजदारी करण्‍याची धमकी दिली व सदरील फी देण्‍यास दिनांक 06.12.2012 रोजी नकार दिला.  अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 21.08.2012,  23.10.2012,  21.11.2012 व दिनांक 06.12.2012 रोजी विनंती केली.  परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्‍यास उत्‍तर दिलेले नाही.  अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदारास अर्जदाराची घेतलेली फी रक्‍कम रु.74,070/- परत देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच सेवेत त्रुटी दिल्‍याबद्दल रक्‍कम रु.5000/- मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5000/- व दावा खर्च रु.5,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्‍दारे केलेली आहे.

3.          गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र  दाखल केलेले आहे.

            गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

4.          तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य,मुंबई यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचे (ARC Centre)  निवड केलेली होती.  त्‍याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 यांनी उमेदवाराला भरलेला अर्ज व त्‍याचे संबंधीत प्रमाणपत्र,गुणपत्रीका व इतर आवश्‍यक कागदपत्रांची तपासणी करुन त्‍यांचा अर्ज संगणकामार्फत ऑनलाईन निश्चित केला जातो व त्‍याबद्दलची पावती उमेदवारास दिल्‍या जाते.  नंतर तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य,मुंबई मार्फत गुणवत्‍ता यादी प्रकाशीत केली जाते.  त्‍यानंतर ऑप्‍शन फॉर्म ऑनलाईन भरुन तो फॉर्म ARC Centre मार्फत confirm  करुन त्‍याची पावती उमेदवारास दिली जाते. अर्जदाराने Cap Process     मध्‍ये allot झालेल्‍या कॉलेजमध्‍ये म्‍हणजे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पुर्ण फी भरुन प्रवेश निश्चित केलेला आहे.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली नाही. 

            गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

5.          गैरअर्जदार क्र. 2 हे नांदेडच्‍या कार्यक्षेत्राबाहेरचे असल्‍यामुळे या मंचास सदर तक्रार चालविणेचा अधिकार नाही म्‍हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्‍यात यावा.  गैरअर्जदार हे Cap Process    प्रमाणे विद्यार्थ्‍यांना प्रवेश देतात. अर्जदाराचा वर्ष 2012-2013  प्रवेश Cap व्‍दारा confirm  झालेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्र. 4,5,6,7,8,9 व 10 मधील कथन खोटे असलचे म्‍हटले आहे व अमान्‍य केलेले आहे.  गैरअर्जदार यांनी D.T.E. च्‍या नियमाप्रमाणे अर्जदारास रक्‍कम परत केलेली नाही हे अर्जदाराचे म्‍हणणे अमान्‍य केलेले आहे. गैरअर्जदार यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की,  गैरअर्जदाराने D.T.E. च्‍या refund            च्‍या नियमाप्रमाणे अर्जदारास दिलेली रक्‍कम  स्विकारलेली आहे आणि त्‍यानंतर दहा महिन्‍यानंतर अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे.  यावरुन अर्जदारास तक्रार करण्‍याचे नंतर सुचल्‍याचे दिसते. तसेच अर्जदाराने त्‍याच्‍या परिच्‍छेद क्रमांक 3,6,7,8, 9आणि 12 मधील केलेल्‍या मागण्‍या हया बेकायदेशीर आहे म्‍हणून मंचास त्‍या मान्‍य करता येणार नाहीत.  अर्जदाराने गैरअर्जदाराकडे इंजिनिअरींगच्‍या Information Technology    च्‍या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता.  गैरअर्जदाराने अर्जदाराने अंतरीम फी रु.74,070/- दिनांक 06.08.2012 रोजी भरल्‍यानंतर अर्जदाराचा प्रवेश confirm केला. त्‍यानंतर अर्जदाराने दिनांक 21.08.2012 रोजी स्‍वइच्‍छेने Proforma –´’ O ’’ भरुन देऊन प्रवेश रद्द करण्‍याची विनंती केली होती.  त्‍याच दिवशी अर्जदाराचा सदरचा अर्ज  ऑनलाईन मंजूर करण्‍यात आला आणि अर्जदाराने प्रवेश रद्द केल्‍याच्‍या पावतीवर सही केली.  नंतर D.T.E.            च्‍या नियमाप्रमाणे अर्जदारास रक्‍कम रु.1000/- परत करण्‍यात आले.  D.T.E.     च्‍या सन 2012 च्‍या पुस्तिकेतील rule No.8.9  clause No. 3 प्रमाणे अर्जदारास रक्‍कम परत केलेली आहे हे अर्जदारास मान्‍य असुन देखील अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून बेकायदेशीर रक्‍कम उकळण्‍यासाठी मंचात तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज रक्‍कम रु.10,000/- च्‍या खर्चासह फेटाळण्‍यात यावा.

6.         अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला.  दोन्‍ही बाजूंनी दाखल  केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात. 

7.          अर्जदार पोर्णिमा पिता आनंदराव कोसंबे हीने गैरअर्जदार यांचेंकडे Information Technology    इंजिनिअरींगच्‍या प्रथम वर्षात  कॅप राऊंडव्‍दारे प्रवेश घेतला होता व सदर प्रवेश गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार हीने दिनांक 06.8.2012 रोजी अंतरीम फी रु.74,070/- भरल्‍यानंतर तो ऑनलाईन confirm  केला.  हे अर्जदार व गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. अर्जदाराने दिनांक 21.08.2012 रोजी Proforma –´’ O ’’ भरुन देऊन प्रवेश रद्यद करण्‍याची विनंती केली हे देखील अर्जदार व गैरअर्जदार यांना मान्‍य आहे.

            अर्जदार यांनी दिनांक 21.08.2012 रोजी आपला प्रवेश रद्द केलेला आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पावत्‍यावरुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे इंटेरीम फी रक्‍कम रु.74,070/- तसेच †ò›üमीशन इतर रक्‍कम रु.335/-, लायब्ररी फी 1000/- रुपये व होस्‍टेल फी 18,250/- रुपये अशी एकूण फी जमा केली असल्‍याचे कागदपत्रावरुन दिसून येते.  अर्जदार हीने गैरअर्जदार यांचे संस्‍थेमधील प्रवेश रद्द केलेला आहे.  अर्जदार हीने तक्रारीसोबत †ò›üमीशनच्‍या कट ऑफ डेटचे संबंधीत D.T.E. चे कागदपत्रे दाखल केलेले आहे.  त्‍यामधील कॉलम न. 23 मध्‍ये cut off date all type admission for the academic year 2012-13  ही दिनांक 25.08.2012 अशी नमुद केलेली आहे व कॉलम  नं.24 मध्‍ये वेबसाईटवरुन प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांची कट ऑफ डेट दिनांक 31.08.2012 अशी नमूद केलेली आहे. अर्जदार हीने आपला प्रवेश हा कट ऑफ डेट पुर्वीच म्‍हणजेच सुमारे 10 दिवस आधीच रद्द केलेला आहे. 

            गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या लेखी जबाबातील परिच्‍छेद क्र. 3 मध्‍ये अर्जदाराची फी ही ब्राऊचरच्‍या rule No.8.9  हया नियमानुसार परत केली असल्‍याचे नमुद केले आहे.  अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या ब्राऊचरच्‍या 8.9 या नियमाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे चार्ट दिलेला आहे.

Sr.No.

SITUATION

REFUND AMOUNT

1

Request for cancellation of admission is received before the date of start of academic session and the seat could be filed by the Institute before the cutoff date

Entire fee less Rs.1000/-

2

Request for cancellation of admission is received after the start of academic session and the seat could be filled by the institute before the cutoff date

Entire fee less the total fees (i.e. Tuition, Development & Hostel Fees) on pro-rata basis

 

3

Request for cancellation of admission is received before/after start of the academic session and the seat could not be filled by the Institute

No refund(except the security deposit)

 

Pro- rata basis

 

Note:-

1.Entire amount of security/caution Money Deposit is to be refunded to candidate.

2.For the calculation of amount on the pro-rata basis, one month shall be treated as one unit  e.g. if the candidate cancels the admission on third day after start of the academic session and the seat is filled on/before the cutoff date, then cancellation amount will be, total fees/12 or Rs.1000/- whichever is higher.

3.The candidate who has secured admission under reserve category and has not paid any fee, shall pay Rs.1000/- as cancellation charges.

 

वरील चार्टनुसार अर्जदाराचा प्रवेश कट ऑफ डेट पुर्वी परंतु शैक्षणीक वर्ष सुरु झाल्‍यानंतर रद्द केलेला असल्‍याने चार्ट मधील 2 नंबर व नोट मधील 2 नंबर ही परिस्थिती फी परत करण्‍यास लागु होते. त्‍यामुळे गैरअर्जदार यांनी याप्रमाणे हिशोब करुन अर्जदारास फी परत करणे बंधनकारक होते.  परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून टयूशन फी म्‍हणुन किती रक्‍कम स्विकारलेली आहे याचा उल्‍लेख केलेला नाही. तसेच नियम 8.9 नुसार योग्‍य तो हिशोब करुन अर्जदारास रु.1000/- परत दिलेले असल्‍या संदर्भातील कुठलाही पुरावा/हिशोब मंचासमोर दिलेला नाही. गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या संस्‍थेमधील अर्जदाराने प्रवेश रद्द केल्‍यामुळे एक सीट भरली गेली नाही याबाबतचा पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदार यांनी 8.9 मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांकडून शैक्षणीक वर्षासाठी गैरअर्जदार एकूण फी म्‍हणून किती रक्‍कम स्विकारतात. त्‍यामध्‍ये टयुशन फी, लायब्ररी फी, हॉस्‍टेल फी व इतर अशी कोणकोणती फी घेतली जाते याचा कुठलाही तपशिल मंचासमोर दिलेला नाही व गैरअर्जदार यांनी अर्जदारास परत केलेले रु.1000/- हे नियम 8.9 नुसार कशा पध्‍दतीने परत केले याचा त्‍यांचे लेखी जबाबामध्‍ये तपशिलवार हिशोब दिलेला नाही.   8.9 नुसार एकूण फी मधून (टोटल फी ÷ 12)  ही वजा करुन अर्जदारास रक्‍कम परत करणे आवश्‍यक होते. परंतु गैरअर्जदाराने तसे न करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून एंटायर(entire) फीस म्‍हणूनतसेच टयूशन फीस म्‍हणून किती स्विकारलेली आहे हे सांगितलेले नाही.  अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीमध्‍ये फक्‍त रु.74,070/- एवढी रक्‍कम परत मागीतलेली आहे. अर्जदार यांनी रक्‍कम रु.74,070/- शिवाय इतर रक्‍कम रु.335/-, लायब्ररी फी1000/- रुपये व होस्‍टेल फी18,250/- रुपये इतकी फी गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहे.  परंतु अर्जदाराने फक्‍त रक्‍कम रु.74,070/- परत मागीतलेले असल्‍याचे मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास रक्‍कम रु.74,070/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्‍या आत द्यावेत.

3.    गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्‍याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2000/- आदेश कळाल्‍यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

4.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात.

5.    वरील आदेशाच्‍या  पुर्ततेचा अहवाल दोन्‍ही पक्षकारांनी निकालाच्‍या तारखेपासून  45 दिवसांच्‍या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर   आदेशाच्‍या पुर्ततेसाठी ठेवण्‍यात यावे.

 

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.