निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 30/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 07/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 09/10/2013
कालावधी 05 महिने. 02 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रिती पिता अशोक कोडलवडे. अर्जदार
वय 22 वर्षे. धंदा.शिक्षण. अॅड.बी.एल.दळवे.
रा.परभणी. ता.जि.परभणी.
विरुध्द
प्राचार्य, व्ही.सी.आय.कॉम्प्युटर पॉईंन्ट. गैरअर्जदार.
(व्यावसायिक तंत्र प्रशाला ) पहिला मजला, अॅड.एस.एन.वेलणकर.
गायकवाड कॉम्प्लेक्स, स्टेडीयम जवळ, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने अर्जदारास योग्य शिक्षण न देवुन सेवेत त्रुटी दिली आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याची फि परत मागणी बद्दलची तक्रार दाखलकेलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराच्या संस्थेत सी.एम.एम.अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी रक्कम भरली होती गैरअर्जदाराने सी.एम.एम.च्या कोर्सच्या जाहिरातीसाठी पत्रके काढली व ती शहराना व आजु बाजूच्या भागात वितरीत केले अर्जदाराने सदर कोर्स प्रवेश घ्यावयाच्या उद्देशाने गैरअर्जदाराच्या संस्थेत संपर्क साधले असता गैरअर्जदाराने सी.एम.एम. कोर्सची माहिती दिली व कोर्सचा कालावधी 18 महिने असल्याचे सांगीतले व नंतर फि 24,675/- रुपये सांगीतले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने सदर फि टप्या टप्यानी देखील भरता येईल असे सांगीतल्या वरुन अर्जदाराने 08/08/2012 रोजी पहिला हप्ता 4,500/- रुपये गैरअर्जदाराकडे भरला व त्याचा पावती नंबर 000030 असा आहे. त्या दरम्यान गैरअर्जदाराने प्रवेश फॉर्म भरुन अॅडमशिन निश्चित करण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रवेश अर्ज आज पावेतो भरुन घेतले नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार याने परत गैरअर्जदाराकडे कोर्स केव्हा पासून सुरु होणार याबाबत विचारले असता त्यांनी अर्जदार यास पूर्ण फि भरण्याचे सुचित केले, अर्जदाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्या कारणाने त्याने 08/08/2012 रोजी 4500/- भरले त्यानंतर 01/10/2012 रोजी 6275/- व त्यानंतर 05/12/2012 रोजी 7200/- रुपये व 02/01/2013 रोजी 6700/- रुपये गेरअर्जदाराकडे भरले व त्याच्या रितसर पावत्या घेतल्या असे एकुण अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 24,675/- रुपये भरले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार ही गैरअर्जदार संस्थेत वेळोवेळी भेट देत गेली, परंतु गैरअर्जदाराने पूर्ण फि भरल्या शिवाय प्रवेश निश्चित होणार नाही, असे सांगीतल्या वरुन अर्जदार हिने टप्प्याने नमुद रक्कम भरली, परंतु पुर्ण रक्कम भरुनही क्लासेस होत नाही यावरुन तीने विचारणा केले व कर्मचारीकडे प्रवेश रेकॉर्ड पाहिले असता तीचे अॅडमिशन नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर अर्जदार वेळोवेळी गैरअर्जदाराकडे विचारणा करण्यासाठी गेली परंतु त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी वा प्राचार्य नसल्याचे दिसून आले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराकडून अर्जदाराचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झालेले आहे तसेच मानसिकत्रास देखील सहन करावा लागला तसेच अर्जदाराने फि साठी म्हणून 24,675/- रुपये शैक्षणिक फि 15 टक्के व्याजासह व मानसिकत्रासापोटी 50,000/- रुपयांची मागणी योग्य व संयुक्तिक आहे व 74,675/- रुपये नुकसान भरपाई मागत आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदारास वकिला मार्फत 21/03/2013 रोजी नोटीस पाठविली व त्या नंतर गैरअर्जदाराने 16/04/2013 रोजी सदर नोटीसचे उत्तर पाठविले व फि परत करण्याचे अमान्य केले व त्यांनी सेवेत दिलेल्या त्रुटी अमान्य केल्या म्हणून सदरची तक्रार दाखल करणे अर्जदारास भाग पडले. अर्जदार हिस संभाव्य नोकरी मिळण्याची शक्यता होती व सदरचा कोर्स हा गैरअर्जदार यांच्या संस्थेच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण होवु शकला नाही. त्यामुळे अर्जदारास अपेक्षित नोकरी मिळण्याची शक्यता होती ती पूर्ण होवु शकली नाही. त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक शैक्षणिक नुकसान झाले त्यामुळे अर्जदार हिने एकत्रित मागणी 50,000/- रुपये केली आहे ती योग्य आहे व गैरअर्जदार यांच्या कारभारास पूढील विदर्थ्यांचे नुकसान होवु नये व गैरअर्जदार यांची मनमानी कारभारास वाचा फुटावी म्हणून अर्जदाराचा अर्ज मंजूर होणे आवश्यक आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज खर्चासह मंजूर करुन गैरअर्जदारां विरुध्द आदेश पारीत करावा की, गैरअर्जदाराने अर्जदारास 24,675/- रुपये 15 टक्के व्याजासह परत द्यावेत व मानसिकत्रासापोटी 50,000/- रुपये गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावेत. अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.त्यामध्ये पावती क्रमांक 000030 दिनांक 08/08/2012 रोजी, दिनांक 01/10/2012 रोजीची पावती 000036, 05/12/2012 रोजीची पावती क्रमांक 000046, 02/01/2013 रोजीची पावती क्रमांक 000047, नोटीसची नक्कल, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले नोटीसीचे उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना त्यांचे लेखी म्हणणे सादर करणेसाठी नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यांत त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नसून काही काल्पनिक गोष्टी तयार करुन येणकेन प्रकारे स्वतःच आपले अॅडमशिन रद्द केलेले असतांना फि परत मिळवण्याचा खोटा प्रयत्न अर्जदाराने केलेला आहे. म्हणून सदरची तक्रार फेटाळणे योग्य आहे तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदर संस्थेच्या प्राचार्या विरुध्द फक्त तक्रार दाखल केलेली आहे व संस्था चालकांना यात पक्षकार केलेले नाही. वस्तुतः संस्था व संस्था चालक यांना पक्षकार करणे आवश्यक होते म्हणून Non Joinder of necessary partiesया कारणास्तव तक्रार फेटाळणे योग्य आहे. तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्याच्या संस्थामध्ये एम.इ.पी. (Multimidia Employement program) कोर्स करीता प्रवेश घेतला होता व नंतर सी.एम.एम.( Comprehensive Multi media) असा कोर्स करण्याचे ठरविले व त्या प्रमाणे हजर होवुन तो पूर्ण केला व नंतर स्वतःच वैयक्तिक कारणास्तव आपला अॅडमशिन रद्द करुन घेतला, त्यामुळे घेतलेली फी चा योग्य मोबदला शिक्षणाच्या रुपाने तिला मिळालेला असल्यामुळे व गैरअर्जदाराने कोणतीही चुकीची सेवा दिलेली नसल्याने ग्राहक या नात्याने या मंचासमोर दाद मागण्याचा अधिकार अर्जदारास होत नाही व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराची संस्था ही Xplora Designe skool या A.K.Patel House opposite crossword navrangpura Ahemadabad येथील संस्थेची franchisee आहे. व त्या व्दारे वेगवेगळया कोर्स चालवले जातात गैरअर्जदाराने सी.एम.एम. कोर्सची अशी कोणतीही पत्रके शहरांना वितरीत केली नव्हती वा 18 महिन्याच्या कोर्सची फि 24,675/- असल्याचे सांगीतले नव्हते व अर्जदाराने असे कोणतेही पत्रक मंचासमोर दाखल केलेले नाही वस्तुस्थिती ही आहे की, अर्जदाराने दिनांक 23/08/2011 रोजी एम.इ.पी. या एका वर्षाच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता व त्याकरीता फि म्हणून 30,000/- रुपये नमुद केली होती नंतर अर्जदाराने स्वतःचा कोर्स बदलून सी.एम.एम. हा दिड वर्षासाठी कोर्स पूर्ण केला, परंतु फि देखील पूर्ण भरली नाही पण हे सत्य दडवून ठेवून जेवढे पैसे भरले होते तेवढीच फि सांगीतली होती असे खोटे निवेदन केलेले आहे. तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरची फि अर्जदारास टप्प्या टप्प्याने भरता येईल हि गोष्ट सत्य होती, परंतु ईतर सर्व मजकूर चुकीचा असल्याने सत्य हे आहे की, अर्जदाराने दिनांक 23/08/2011 रोजी एम.इ.पी. कोर्स करीता एक वर्षाचा प्रवेश घेतला होता व त्याकरीता 30,000/- रुपये फि सांगीतली होती अर्जदाराने पहिला हप्ता 4500/- रुपये दिनांक 08/08/2012 रोजी भरला होता व तसेच हे म्हणणे की, प्रवेश अर्ज आजपर्यंत भरुन घेतला नाही हे म्हणणे अर्जदाराचे चुकीचे आहे अर्जदाराने 23/08/2011 रोजी प्रवेश घेतला त्यावेळेसच फोटो लावून प्रवेश अर्ज एम.ई.पी.कोर्ससाठी भरुन घेतला होता अर्जदाराने 23/11/2011 पहिल्यांदा 3,000/- रुपये नंतर 16/01/2012 रोजी 3,000/- व 25/05/2012 रोजी 1200/- रुपये असे एकूण 7200/- रुपये भरले होते त्यानंतर 08/08/2012 रोजी 4500/- पावती भरली होती.
गैरअर्जदारारचे असे म्हणणे आहे की, अर्जदार आपला कोर्स करीत असतांना फावल्या वेळात संस्थेत जॉबवर्क करीत होता व म्हणूनच मे 2012 ते सप्टेंबर 2012 या कालावधीत केलेल्या जॉबवर्कचा पगार 6275/- रुपये तीने तीचे कोर्सच्या फि पोटी जमा करण्यास सांगीतले त्या प्रमाणे 1/10/2012 रोजी 6275/- रुपयांची पावती दिली. तसेच 05/12/2012 रोजी 7200/- रु भरले हे म्हणणे अर्जदाराचे चुकीचे आहे वस्तुतः अर्जदाराने दिनांक 23/11/2011 16/01/2012, 25/05/2012 या तारखांना अनुक्रमे पावती क्रमांक 344, 911, 973 अन्वये अनुक्रमे 3,000/-, 3,000/-, 1200/- असे एकूण 7200/- रुपये भरले होते, गैरअर्जदाराचे परत एकदा असे म्हणणे आहे की, अर्जदाराने स्वतःच दिनांक 10/02/2013 रोजी तीची सी.एम.एम. चा अॅडमशिन वैयक्तिक कारणास्तव रद्द करुन फि परत द्यावी अशी मागणी केली होती. व त्यातच Softwear, illestreter, photoshop व HTML इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे नमुद केले अर्जदाराने अभ्यासक्रम केला असल्याने फि परत मिळत नाही असे सांगीतल्यावर अर्जदाराने स्वतःहून अभ्यासक्रम सोडून दिला. म्हणून त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने नि.क्रमांक 9 वर आपला शपथपत्र दाखल केलेला आहे व नि.क्रमांक 11 वर 5 कागदपत्रांच्या यादी सह 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये अर्जदाराचा प्रवेश अर्ज, अर्जदाराच्या फिचा हिशोब, संस्थेने घेतलेल्या परिक्षा मधील उत्तर पत्रिका, अर्जदाराच्या कोर्सच्या हजेरी पटातील नमुने दाखल, अर्जदाराने कोर्सचे अॅडमशिनची रद्द करण्याकरीता दिलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. व तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 13 वर 3 कागदपत्रांच्या यादीसह 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये अर्जदारास गैरअर्जदाराने दिलेली 3,000/- रुपयांची पावीत, 3,000/- रुपयांची पावती, 1200/- रुपयांची पावती तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 17 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये अर्जदाराची Xplora Design & Skool चे अॅडमशिन कार्ड, Xplora संस्थेमध्ये अर्जदाराचे नावे अपॉईंटमेंट लेटर, अर्जदाराने गैरअर्जदाराच्या संस्थेत दिलेल्या परिक्षाचा पेपर, मल्टीमिडीया एज्युकेशन ऑफ एक्सप्लोराचे प्रमाणपत्र, विरेंद्र सतीषराव मानवतकर यांचे हॉल तिकेट, निकेत अरुणराव पाटील यांचे हॅाल तिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारासयोग्य शिक्षण न देवुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदार संस्थेचा ग्राहक होता ही बाब अर्जदाराने नि.क्रमांक 5 वर दाखल केलेल्या फि भरलेल्या पावत्या वरुन सिध्द होते. अर्जदाराने एकुण 24,675/- रुपये फि भरली होती हे तीने दाखल केलेल्या पावती क्रमांक 30 दिनांक 08/08/2012, 36 दिनांक 01/10/2012, 46 दिनांक 05/12/2012 व 47 दिनांक 02/01/2013 या वरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, कोर्स मध्ये कांही शिकवले नाही यांत तथ्य वाटते. कारण गैरअर्जदाराने सदरच्या कोर्सचे Syllabus काय होते तसेच ते शिकवन्यासाठी कोणते अध्यापक होते, स्वतः प्राचार्य यांनी कोणता Syllabus शिकवला या बाबत आपल्या लेखी म्हणण्यांत कांहीही म्हंटले नाही व तसेच सदर संस्थेकडे शिकवण्यासाठी अध्यापक होते या बद्दल कसलाही पुरावा मंचासमोर आणला नाही.
सदर संस्था कोठल्या प्रकारची होती तीचे Registration कोणत्या Authority कडे झालेली होती या बद्दल देखील गैरअर्जदाराने कांहीही म्हंटले नाही. व त्या बद्दलचा कसलाही पुरावा मंचासमोर आणला नाही.
गैरअर्जदाराने दाखल केलेले हजेरीपट पाहता तारीख व वार Match होत नाहीत. ऊदाः दिनांक 19/08/2011 ला गुरुवार व 20/08/2011 ला शुक्रवार दाखवलेले आहे जेव्हा की, 20/08/2011 शनीवार होता तसेच 22/08/2011 ला शनीवार दाखवला आहे, जेव्हा की, 22/08/2011 ला सोमवार होता यावरुन सदरच्या रजिस्टर मधील नोंदी विश्वासार्ह वाटत नाही. तसेच अर्जदाराच्या फि च्या हिशोबचे अर्जदाराने दाखल केलेला पुरावा नि.क्रमांक 11 वर आहे. ज्यामध्ये एकुण 23,675/- रुपये दाखवलेली आहे जेव्हा की, त्याची एकुण 24,675/- रुपये एवढी येते तसेच फि ची नोंद एका साध्या रजिष्टर मध्ये केलेली दिसते व संस्थेचे Ledger Maintain केलेले दिसत नाही.
गैरअर्जदार यांनी नि.क्रमांक 16 वर दाखल केलेल्या Multimedia Education Ahmedabad च्या Business Associate च्या प्रमाणपत्रात Mr.Sudhakar S.Joshi असे नाव दिलेले आहे. त्यामुळे Sudhakar S.Joshi हेच संस्थेचे प्राचार्य व चालक होते. असेच सिध्द होते.
वरील सर्व कारणांवरुन असे दिसते की, संस्थेने या कोर्स बद्दल कांही शिकवले असेल असे वाटत नाही व फि घेवुन अर्जदाराला शिकवलेले दिसत नाही व निश्चितच सेवेत त्रुटी दिलेली आहे हे सिध्द होत आहे. व म्हणून अर्जदार ही गैरअर्जदार यांच्या कडून तिने भरलेली फि परत मिळण्यास पात्र आहे व तसेच तिचे 6 ते 7 महिने वाया गेलेले आहेत व तीला निश्चितच मानसिक त्रासाला समोर जावे लागले, म्हणून अर्जदार ही गैरअर्जदार यांच्याकडून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत रु.24,675/-
फक्त ( अक्षरी रु.चोवीसहजार सहाशे पंच्याहत्तर फक्त) द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिकत्रासापोटी रु. 5,000/- फक्त
(अक्षरी रु.पाचहजार फक्त ) तसेच तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु. 2,000/-
फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.