पारीत दिनांकः- 30/11/2010 (द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असून, फी जमा केली आहे. त्यानंतर त्यांनी दुस-या महाविद्यालयात प्रवेश घेतला, व भरलेली फी परत मागितली. परंतू गैरअर्जदार यांनी फी परत दिली नाही, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने वडीलांमार्फत दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार यांच्या शिक्षण संस्थेत कॉम्प्युटर सायन्स या फॅकल्टीमध्ये 2007-2008 मध्ये बारावीच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश घेतला व या प्रवेशासाठी त्यांनी 52,750/- रुपये गैरअर्जदार यांना दिले. 2007-2008 मध्ये घेण्यात आलेल्या MH-CET परीक्षेत तिला 74.33% गुण मिळाले व त्यानंतर जवाहरलाल इंजिनिअरींग महाविद्यालयात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेत प्रवेश मिळाला. अर्जदाराने हे गैरअर्जदार यांना कळवून भरलेली रक्कम परत करण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी ही रक्कम परत देण्याचे नाकारल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने दि.24.08.2008 रोजी प्रवेश रदद करण्याबाबत त्यांना कोणतेही पत्र दिले नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने मॅनेजमेंट कोटयामधून त्यांच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असून, त्यामुळे त्यांना नियमानुसार रक्कम परत करता येत नाही. ऑगस्ट 2008 मध्ये शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरही अर्जदाराने त्यांयाकडे प्रवेश रदद केल्याबाबत पत्र दिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने प्रवेशाबाबत तयार केलेल्या नियमानुसार, अर्जदाराने प्रवेश रदद करण्याबाबत केलेला अर्ज हा विहीत मुदतीनंतर केलेला असल्यामुळे रक्कम परत करता येत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती त्यांनी मंचास केली आहे. दोन्ही बाजूंकडून मंचात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन तसे सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदार 2008-2009 मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. दि.14.07.2008 रोजी तिने गैरअर्जदार यांच्या शैक्षणिक संस्थेत कॉम्प्युटर सायन्स या शाखेत प्रवेश घेतला. हा प्रवेश मॅनेजमेंट कोटयामधून घेतला असल्याचे स्पष्ट होते. अर्जदाराने त्यानंतर MH-CET ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींग महाविद्यालयात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेत दि.25.08.2008 रोजी प्रवेश घेतला. अर्जदाराने दि.26.08.2008 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे, त्यांनी जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींगमध्ये प्रवेश घेतला असून, त्यांच्या कॉलेजमधील कॉम्प्युटर सायन्स या शाखेतील प्रवेश रदद करण्याचे पत्र दिले असल्याचा व ते गैरअर्जदार यांना मिळाल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांनी दि.26.08.2008 रोजी रक्कम परत करण्याची, केलेली मागणी मान्य करता येत नाही. महाराष्ट्र शासनाने प्रवेशाबाबत विहीत केलेल्या नियमानुसार MH-CET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व C P A Round ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश रदद करावयाचा असल्यास Cut off date च्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे. मॅनेजमेंट कोटयामधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर जागा भरली गेल्यास रक्कम परत करण्याचा नियम आहे. अर्जदाराने दि.25.08.2008 रोजी जवाहरलाल नेहरु इंजिनिअरींगमध्ये प्रवेश घेतल्यानंतर दि.15.09.2008 रोजी गैरअर्जदार यांना कळविले असून, फी परत करण्याी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाने इंजिनिअरींग शाखेच्या प्रवेशाबाबत तयार केलेल्या नियमावलीचे निरीक्षण केल्यावर अर्जदाराने मुदतीनंतर म्हणजेच Cut off date नंतर प्रवेश रदद केल्याचे व फी परत करण्याचे गैरअर्जदार यांना कळविले असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे अर्जदाराने मॅनेजमेंट कोटयामधून प्रवेश घेतला असल्यामुळे नियमानुसार त्यांना फी परत करता येत नसल्याचे मंचाचे मत आह आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |