ग्राहक तक्रार क्रमांकः-369/2008 तक्रार दाखल दिनांकः-01/09/2008 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-01वर्ष09महिने01दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.देवानंद गोटूसिंग परमार (गिरासे) रा.वाडी,ता.शिंदखेडा.जि.धुळे पत्र व्यवहाराचा पत्ताः- ह.मु. शिंदखेडा,देसलेवाडा,गांधीचौक, जिल्हा धुळे. ...तक्रारकर्ता विरुध्द 1)म.प्रिन्सीपॉल, रेयॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड मॅनेजमेंट सेंट जोसेफ हायस्कूल,सेक्टर 5, कळंबोली, नवी मुंबई. ...वि.प.1 2)म.प्रिन्सीपॉल, कॉलेज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँन्ड इंजिनिअरींग ठाणे,एन.के.टी,कॉलेजमध्ये, कलेक्टर ऑफीस जवळ,ठाणे. ... वि.प.2
उपस्थितीः-तक्रारकर्ताः-स्वतः विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.जितेंद्र सोळंकी गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेविरुध्द तक्रार दाखल करुन मागणी केली आहे की, तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार कॉलेजमध्ये प्रवेश घेतांना भरलेली रक्कम रुपये10,200/- व्याजासह व मानसिक त्रास, नुकसानीसह परत मिळावी व इतर अनुषंगीक दाद मिळावी. नि.1वर सविस्तर अर्ज दाखल आहे. 2/- 2)विरुध्दपक्षकार यांना मंचामार्फत नोटीस मिळाल्याने नि.12 प्रमाणे दिनांक17/12/2008रोजी लेखी जबाब दाखल केले आहेत. त्यांचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणे. तक्रारदार यांची तक्रार खोटी,चुकीची व दिशाभुल करणारी आहे. विरुध्दपक्षकार यांना मान्य व कबुल नाही. म्हणून त्यांच मुद्दयावर तक्रार रद्द करणेत यावी. अर्जास कोणतेही सबळ कारण घडलेले नाही, ग्राहक नाही. विरुध्दपक्षकार यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. जून2006 मध्ये डिप्लोमा कोर्स करीता प्रवेश घेण्यात आला, त्यावेळी तक्रारदार यांनी कॉलेजमध्ये सल्ला समितीचे मार्गदर्शन घेतले होते. तक्रारदार यांची एकुण 32,000/- रुपये फी होती. फक्त अँडव्हान्स फी म्हणून 10,000/- रुपये जमा केली होती व कॉलेज जून2006मध्ये सुरु होणार होते. फी,अटी व नियमाप्रमाणे स्विकारलेली होती व ती परत देता येत नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी 13/06/2006 रोजी कोणतीही रक्कम मागणीची नोटीस दिलेली नाही व विरुध्दपक्षकार यांना मिळालेली नाही. म्हणून 10,200/- रुपये परत देण्याचे वचन देण्याचा प्रश्नच येत नाही. दिनांक23/02/2008 चे लेखी उत्तर खरे व बरोबर आहे. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांची सीट राखीव वर्षभर ठेवली होती. त्यामुळे आर्थिक नुकसान,झळ सोसावी लागत आहे. म्हणून विरुध्दपक्षकार यांनाच50,000/- रुपये नुकसान भरपाई व 20,000/- रुपये अर्जाचा खर्च मिळणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचा अर्ज नामंजुर करावा असे नमुद केले आहे. 3)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज. विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब, उभयंताची कागदपत्रे,प्रतिज्ञालेख, तक्रारदार यांचे लेखी युक्तीवाद व विरुध्दपक्षकार यांची पुरसीस यांचे सुक्ष्मपणे पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व आदेश पारीत करण्यात आले. 3.1)तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचे कॉलेजमध्ये 2वर्षाचा कॉम्प्युटर डिप्लोमा करण्यसाठी 06/07/2008 रोजी प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल केला. एकुण 32,000/-रुपये या फी पैकी10,200/- ही रक्कम दिनांक 13/06/2006 इसवी रोजी अर्ज देवून प्रवेश रद्द करणेची विनंती केली. म्हणून हयाच अर्जाची विरुध्दपक्षकार यांनी दखल घेतली. पण रक्कम परत देता येत नाही हया कारणाने रक्कम देण्यास पाठविले. तक्रारदार यांनी अनेक वेळा रक्कम मागणी केली असे नमुद केले आहे. एकदा भरणा करुन घेतलेली रक्कम परत करता येत नाही. म्हणून परत केली नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी रक्कम मागणीचा प्रयत्न केला. तथापी न दिल्याने व उडवाउडवीची 3/- उत्तरे दिली. म्हणून सदर तक्रार अर्ज मंचात दाखल करणे भाग पडले आहे. व मुळ रक्कम व नुकसान भरपाई मिळणे करीता तक्रारअर्ज दाखल केला आहे. व वास्तविकरित्या विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना जरी कॉलेजमध्ये प्रवेश दिला असला तरी दिनांक06/07/2008रोजी 10,000/- रुपये व 200/- रुपये लायब्ररी फी भरणा केली आहे व कॉलेज सुरु होण्यापुर्वीच व 1महिना आधी तक्रारदार यांनी प्रवेश रद्द होण्याचा अर्ज दाखल केला होता. तो दाखल आहे. तदनंतर दिनांक28/11/2007,04/01/2008,05/08/2008 व वकीलामार्फत दिनांक23/02/2008 रोजी नोटीस पाठविली. तरीही रक्कम दिली नाही. त्यास विरुध्दपक्षकार यांनीही म्हणणे दाखल करुन नमुद केले आहे. व पावतीवरही स्पष्ट नमुद केलेले आहे की,''एकदा भरणा केलेली रक्कम परत करता येणार नाही.'' यांच मुद्दयाची दखल घेतली असाता, विरुध्दपक्षकार यांनी जर विद्यार्थ्याना शिक्षणच दिले नसेल, विद्यार्थी त्या कॉलेजमध्येच प्रवेश रद्द करुन अन्यत्र अँडमिशन/प्रवेश मिळवला असेल तर विरुध्दपक्षकार यांनी अशी भरणा करुन घेतलेली रक्कम परत करणे न्यायोचित,विधीयुक्त व संयुक्तीक आहे. फक्त विरुध्दपक्षकार यांनी त्यांची यंत्रणा प्रवेश देण्यासाठी व रद्द करणेसाठी जो खर्च आला तो वजा करुन उर्वरीत रक्कम परत करणे आवश्यक आहे व गरजेचे आहे. विरुध्दपक्षकार यांनी विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केल्यानंतर रक्कम परत न केलेने सेवेत त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला आहे हे मान्य व गृहीत धरणे आवश्यक आहे. म्हणून आदेश. -आदेश - 1)तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांची 06/07/2009 रोजी स्विकारलेली एकुण रक्कम रुपये 10,200/-(रुपये दहा हजार दोनशे फक्त) रुपये पैकी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) झालेल्या खर्चाकरीता वजा/वळते करावे व उर्वरीत रक्कम रुपये 9,200/-(रु.नऊ हजार दोनशे फक्त) परत करावे. 3)विरुध्दपक्षकार यांनी प्रवेश रद्द केला, पण रक्कम परत न केल्याने सेवेत त्रुटी, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केलेला आहे हे गृहीत धरणेत आलेले आहे. म्हणून सदर आलेला खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) नुकसान भरपाई म्हणून दयावी. अशा आदेशाचे पालन विरूध्दपक्ष यांनी आदेशांची सही शिक्क्याची प्रत मिळालेपासून 30 दिवसात पुर्णपणे एकरकमी परस्पर (डायरेक्ट) देय करण्याचे आहे. असे विहीत मुदतीत न घडल्यास मुदती नंतर रक्कम फिटेपर्यंत सर्व रक्कमेवर द.सा.द.शे 10% व्याज दराने दंडात्मक व्याज (पिनल इंट्रेस्ट) 4/- म्हणुन रक्कम देण्यास पात्र व जबाबदार व कायदेशिररीत्या बंधनकारक आहेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे (श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|