Maharashtra

Nagpur

CC/419/2021

YASH VONOD GONDANE - Complainant(s)

Versus

PRINCIPAL, RAJEEV GANDHI ENGINEERING COLLEGE - Opp.Party(s)

ADV. ANURADHA DESHPANDE

18 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/419/2021
( Date of Filing : 03 Aug 2021 )
 
1. YASH VONOD GONDANE
R/O. PLOT NO. 603, MODEL TOWN, KAMTHI ROAD, MODEL TOWN INDORA, JARIPATKA, NAGPUR-440014
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. PRINCIPAL, RAJEEV GANDHI ENGINEERING COLLEGE
WANADONGRI HINGNA ROAD, NAGPUR-440016
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ANURADHA DESHPANDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 18 Jan 2023
Final Order / Judgement

ORDER

 

मा. सदस्या श्रीमती चंद‍्रिका बैसयांच्‍या आदेशान्‍वये

  1. तक्रारकर्ता यश गोंडाणे यांनी दिनांक 19.7.2014 रोजी वि.प.राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड रिसर्च या म‍हाविद्यालयात अभियांत्रीकीच्या शिक्षणाकरिता सन 2014-2015 या शैक्षणीक वर्षात संगणक विज्ञान या कोर्स करिता प्रवेश घेतला. तक्रारकर्ता या कॉलेजमध्‍ये शिकत असतांना प्रथम वर्षात उत्तीर्ण होऊ न शकल्याने व काही घरगुती अडचणींमूळे सदर कॉलेज सोडण्‍याचा निर्णय घेतला. तक्रारदाराने व त्यांचे आईने कॉलेजला अर्जाव्दारे विनंती केली की, त्यांचे संपूर्ण मूळ कागदपत्रे व लिव्हींग प्रमाणपत्र परत करण्‍यात यावे. कारण ही सर्व कागदपत्रे तक्रारदाराला तो करत असलेल्या नोकरीच्या ठीकाणी जमा करावयाचे होते. तक्रारदाराने दिनांक 1.7.2017 रोजी  पून्हा वि.प.ला याबाबत विनंती केली होती. त्यानंतर पून्हा  दिनांक 16.7.2019 रोजी तक्रारदाराचे आईने वि.प.ला पत्र पाठविले तरीही वि.प.ने आजतागायत तक्रारदाराला त्यांची कागदपत्रे परत केले नाही म्हणुन तक्रारदाराने राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या विद्याथी विकास विभागाकडे वि.प.विरुध्‍द तक्रार दाखल केली. सदर विभागाकडुन तक्रारदाराला पत्र प्राप्त झाल्यानंतर दिनांक 8.8.2019 रोजी विद्यापीठाच्या सभागृहात उपस्थीत राहण्‍यास सांगीतले होते. त्यानंतर दिनांक 19.8.2019 रोजी विद्या‍पीठाच्या कार्यालयाने आदेश जारी करुन  तक्रारदार व वि.प.यांना दिनांक 27.8.2019 रोजी सुनावणीकरिता बोलविले. वि.प.ने दिनांक 24.6.2019 रोजी कॉलेज सोडल्याचा दाखला तक्रारदारास दिला. त्यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला. वि.प.ने सन 2015 पासुन आजतागायत तक्रारदाराला त्याचे मूळ कागदपत्रे परत दिले नाही त्यामूळे तक्रारदाराचे मानसिक व शारिरिक, आर्थिक व शैक्षणीक,  नुकसान झाले आहे. तक्रारदाराचे शिक्षण वेळीच पूर्ण झाले असते तर त्याला भरपूर उत्पन्नाची नोकरी लागली असती. वि.प.चे उदासिनतेमूळे तक्रारदार शिक्षणापासून वंचित राहीला त्यामूळे तक्रारदाराला छोटी-मोठी नोकरी करणे भाग पडले व त्याचे आयुष्‍याचे नुकसान झाले.
  2. तक्रारदाराने सन 2014 साली कॉलेज सोडले होते परंतु वि.प.ने त्यास दिनांक 24.6.2019 कॉलेजने कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र दिले. वि.प.चे ही वर्तणुक त्रुटीपूर्ण असून व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन तक्रारदाराला मूळ कागदपत्रे जसे की,10 व्या वर्गाची मार्कलिस्ट, 12 व्या वर्गाची मार्कलिस्ट, जात वैधता प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व योग्य त्या तारखेचे कॉलेज लिव्हींग प्रमाणपत्र त्वरीत देण्‍यात यावे तसेच शारिरिक,मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी व शैक्षणीक कारर्कीदीचे नुकसानीची व तक्रारीचे खर्चाची मागणी केलेली आहे.
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प.ला नोटीस काढण्‍यात आली. नोटीस मिळूनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणून दिनांक 29.12.2021 रोजी तक्रार  त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.   
  4. तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.

                             मुद्दे                                                                      उत्तरे

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय
  3. आदेश  काय?                                                                                 अंतीम आदेशाप्रमाणे

का र  मि मां सा

  1. तक्रारकर्ता यश गोंडाणे याने दिनांक 19.7.2014 रोजी वि.प.राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड रिसर्च यांचेकडे अभियांत्रीकीच्या शिक्षणाकरिता सन 2014-2015 या शैक्षणीक वर्षात संगणक विज्ञान या अभ्‍यासक्रमाकरिता करिता प्रवेश घेतला होता. तक्रारकर्ता या कॉलेजमध्‍ये शिकत असतांना प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने सदर कॉलेज सोडल्याने तक्रारदाराने व त्यांचे आईने कॉलेजमध्‍ये अर्ज दाखल करुन संपूर्ण मूळ कागदपत्रे व लिव्हींग प्रमाणपत्र परत करण्‍यात यावे अशी विनंती केली. तक्रारदाराने दिनांक 1.7.2017 रोजी वि.प.ला याबाबत विनंती केली होती. त्यानंतर पून्हा  दिनांक 16.7.2019 रोजी तक्रारदाराचे आईने वि.प.ला पत्र पाठविले तरीही वि.प.ने आजतागायत तक्रारदाराला त्याचे कागदपत्रे परत केले नाही म्हणुन तक्रारदाराने राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या विद्याथी विकास विभागाकडे मूळ कागदपत्रे मिळण्‍याबाबत वि.प.विरुध्‍द तक्रार दाखल केली. सदर विभागाकडुन तक्रारदाराला पत्र प्राप्त झाल्यानंतर दिनांक 8.8.2019 रोजी विद्यापीठाच्या सभागृहात उपस्थीत राहण्‍यास सांगीतले होते. त्यानंतर दिनांक 19.8.2019 रोजी विद्या‍पीठाच्या कार्यालयाने आदेश जारी करुन  तक्रारदार व वि.प.यांना दिनांक 27.8.2019 रोजी सुनावणीकरिता बोलविण्‍यात आले असता वि.प.ने दिनांक 24.6.2019 रोजी कॉलेज सोडल्याचा दाखला तक्रारदारास दिला. त्यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला. वि.प.ने सन 2015 पासुन आजतागायत तक्रारदाराला त्याचे मूळ कागदपत्रे परत दिले नाही त्यामूळे तक्रारदाराचे मानसिक व शारिरिक, आर्थिक व शैक्षणीक, नुकसान झाले आहे. तक्रारदाराचे शिक्षण वेळीच पूर्ण झाले असते तर त्याला भरपूर उत्पन्नाची नोकरी लागली असती. वि.प.चे उदासिनतेमूळे तक्रारदार वंचित राहीला त्यामूळे तक्रारदाराला छोटी-मोठी नोकरी करणे भाग पडले व त्याचे आयुष्‍याचे नुकसान झाले.
  2. तक्रारदाराने सन 2014 साली कॉलेज सोडले होते परंतु वि.प.ने तक्रारदाराला दिनांक 24.6.2019 कॉलेजने कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र दिले. वि.प.ने तक्रारदारास कॉलेज सोडल्यानंतर वारंवार अर्ज करुन सुध्‍दा 5 वर्षानंतर केवळ कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र दिले व इतर मुळ कागदपत्रे मागणी करुनही परत केले ही वि.प.ची सेवेतील त्रुटी आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारदाराला त्याचे शैक्षणीक मूळ कागदपत्रे जसे की, वर्ग 10 वी ची मार्कलिस्ट, 12 व्या वर्गाची मार्कलिस्ट, जात वैधता प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व योग्य त्या तारखेचे कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र द्यावे.
  3. वि.प.ने तक्रारदाराला शारिरिक, मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी तसेच शैक्षणीक कारर्कीदीचे नुकसानीपोटी रुपये 20,000/- द्यावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- द्यावे.  
  4. सदर आदेशाचे पालन वि.प. ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.