तक्रारदार : स्वतः वकीलासोबत हजर.
सामनेवाले : त्यांच्या प्रतिनीधी मार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर सदस्या ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणे
1. सा.वाले कला विद्यामंदीर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ही एक शिक्षण संस्था आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दि. 16.07.2008 रोजी प्रथम वर्ष डिप्लोमा (I.T) साठी प्रवेश घेतला. प्रवेश घेते वेळी तक्रारदारांनी सा.वाले यांना टयुशन शुल्कापोटी रू.20,000/-,दिले.
2. दि.27.08.2008 रोजी तक्रारदारांना दुसरीकडे इंजिनिअरींगला प्रवेश मिळत असल्याकारणाने तक्रारदारांनी सा.वाले यांना प्रवेश रद्द करण्याबाबत कळविले. व भरलेली टयुशन शुल्क रू.20,000/-,परत करण्याची मागणी केली.
3 तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांच्या वडीलांनी बराच पाठपुरावा केला. शेवटी लेखी पत्र पाठविले. त्यानंतर स्मरणपत्र पाठविले पण तरीही सा.वाले यांनी तक्रारदारांचे पैसे परत दिले नाही.
4. म्हणून तक्रारदारांनी ग्राहक मंचापूढे तक्रार दाखल करून शुल्कापोटी भरलेली रक्कम रू.20,000/-,व्याजासह परत द्यावे व तक्रारदारांच्या वडीलांना घ्याव्या लागणा-या सुट्टीमुळे झालेले नुकसान रू. 6,000/-,आणि तक्रार अर्ज खर्च रू.4,000/-,सा.वाले यांनी द्यावेत. अशी मागणी केली.
5. तक्रार अर्ज, शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केले.
6. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन सा.वाले यांना पाठविण्यात आली. नोटीशीस अनुसरून सा.वाले हजर झाले व त्यानी कैफियत दाखल केली.
7. सा.वाले यांच्या म्हणण्यानूसार दि.02.07.2008 रोजी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे शैक्षणीक वर्ष 2008/2009 मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा (I.T) साठी प्रवेश घेतला. सा.वाले यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी प्रवेशाबाबतच्या सर्व नियम वाचून प्रवेश अर्ज भरून दिला. व सोबत (under takeing) वर सही करून दिली.
8. परंतु तक्रारदारांना डिग्री इंजिनीअर प्रवेशासाठी दुसरीकडे प्रवेश घ्यावयाचे असल्याकारणाणे दि.23.08.2008 रोजी प्रवेशाच्या वेळी दाखल केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रतींची मागणी केली. त्यानूसार सा.वाले यांनी दि.26.08.2008 रोजी तक्रारदारांना कागदपत्रांच्या मूळ प्रती दिल्या व तक्रारदारांना असे सांगण्यात आले होते की, त्या पुन्हा दि. 30 ऑगष्ट पर्यत दाखल कराव्या परंतु तक्रारदारांनी आजपर्यत कागदपत्रांच्या मूळ प्रती दाखल केल्या नाहीत.
9. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, घेतलेले प्रवेश रद्द करण्याची क्रिया ही AICTE Guidelines No. AICTE/LEGAL/04(01/2007, April, 2007 व प्रवेश नियंत्रण समितीने पारीत केलेले सर्क्युलर नं 698 dated 24/08/07 प्रमाणे चालते. त्यानूसार तक्रारदाराने PROFORMA –M भरून त्याच्या दोन प्रती देणे आवश्यक होते. तसेच प्रवेशाच्या वेळी सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती देणे आवश्यक होते. तसेच प्रवेशाची संपूर्ण फी भरलेली असली पाहिजे व प्रवेश रद्द करण्याचे कारण नमूद करणे आवश्यक होते. परंतू तक्रारदारांनी वरील आवश्यक बाबीची पूर्तता केली नव्हती. व PROFFORMA-M भरून दिलेला नव्हता.
10. तक्रारदारांनी प्रवेश रद्द करण्याचा अर्ज दि. 02.09.2008 रोजी केला होता. हा अर्ज मिळताच दि.28.09.2008 रोजी तक्रारदारांना दि.30.10.2008 रोजी असणा-या मिटींगला हजर राहण्याबाबत कळविले. परंतू तक्रारदारांनी पत्र घेण्यास नाकारले. म्हणून सा.वाले यांनी तक्रारदारांशी फोन वर संपर्क साधुन त्याबाबत कळविले.
11. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफियतीस प्रतिनिवेदन दाखल करून सा.वाले यांनी तक्रारदारांशी फोन वरून संपर्क साधण्याची बाब नाकारले.
12. तक्रार अर्ज, कैफियत व दोन्ही पक्षाचे पुराव्याचे शपथपत्र तक्रारदारांचा लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले. व दोन्ही पक्षांचे तोंडीयुक्तीवाद ऐकले असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारदारांनी प्रथम वर्ष डिप्लोमासाठीचा प्रवेश रद्द केल्यानंतर प्रवेशाच्या वेळी भरलेले शुल्क रू.20,000/-,परत न देऊन सा.वाले यांनी सेवेत कसुर केली आहे काय? | होय. |
2 | तक्रारदार तक्रार अर्जात केलेल्या मागणीनूसार मागणीस पात्र आहेत काय? | होय.AICTE फी परतीच्या नियमानूसार |
3 | तक्रारदार सा.वाले यांचेकडुन तक्रार अर्ज खर्च रू.4,000/- मागु शकतात काय? | होय रू.2,000/- |
4 | अंतीम आदेश | अंशतः मान्य करण्यात येतो. |
कारण मिमांसा
13. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे डिप्लोमा प्रथम वर्ष इनफॉरमेशन टेक्नालॉजी (I.T). यासाठी प्रवेश घेतला होता. प्रवेश घेते वेळी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडुन रू.20,000/-,शुल्कापोटी भरले होते व आवश्यक ती कागदपत्रांच्या मूळ प्रती दाखल केल्या होत्या. ही गोष्ट सा.वाले यांना मान्य आहे. सा.वाले यांच्या म्हणण्यानूसार शैक्षणीक वर्ष 2008-2009 साठी कॉलेज 01.07.2008 पासून सुरू होणार होते.
14. त्यानंतर तक्रारदारांना डिग्री इंजिनीअरींग कोर्ससाठी प्रवेश मिळत असल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दि.02.09.2008 रोजी अर्ज केला होता. ही गोष्ट सा.वाले यांना मान्य आहे. परंतू सा.वाले यांचे म्हणणेनूसार तक्रारदारांनी प्रवेश रद्द करण्याबाबत असलेले आवश्यक बाबींची पूर्तता केली नव्हती. AICTE च्या नियमानूसार तक्रारदारांनी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक होते.
(1) PROFORMA-M भरूनत्याच्या दोन प्रती देणे (2)प्रवेशाच्या वेळी तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ प्रती देणे आवश्यक होते.
(3)तसेच संपूर्ण फी भरलेली असली पाहीजे.
15. याप्रमाणे तक्रारदार यांनी PROFORMA-M भरून दिलेला नव्हता व तसेच प्रवेशाच्या वेळी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिलेले कागदपत्र दि. 26.08.2008 रोजी दुसरीकडे इजिंनिअरींगसाठी प्रवेश घेण्यासाठी परत नेले ते परत आणून दिले नाही. .
16. AICTE चे प्रवेश्ा रद्द केल्यानंतर शुल्क परतीचे संपूर्ण नियम सा.वाले यांनी पृष्ट क्रं 35 व 36 वर निशाणी क्र. 6 मध्ये नमूद केलेले आहे.
17. In the event of a student/candidate withdrawing before the starting of the course, the wait listed candidates should be given admission against the vacant sheet. The entire fee collected from the student, after a deduction of the processing fee of not more than Rs. 1000-/ (Rupees one thousand only)shall be refunded and returned by the institution/university to the student/candidate withdrawing from the Programme. It would not be permissible for institution and universities to retain the school/institution leavening certificates in original. should a student leave after joining the course and if the seat consequently falling vacant has been filled by another candidate by the last date of admission, the institution must return the fee collected with proportionate deduction of monthly fee and proportionate hostel rent, where applicable.
Any violation of instruction issued by the AICTE, shall call for punitive action including withdrawal of approval and recognition of erring, institutions and universities. AICTE shall on its own or on receipt of specific compilation from those affected take all such steps as may be necessary to enforce these directions.
17. तसेच पृष्ट क्रं 36 वर प्रवेश रद्द झाल्यानंतर फी परतीचे नियम दाखल केलेले आहेत ते खालीलप्रमाणे.
cancellation of admission and refund of fees-
Refund of tuition fee, development and other fees after cancellation ofadmission, shall be as per AICTE guidelines No.AICTE/Legal/04(01)/2007, April 2007 and circular no.698 dtd 24/08/2007 issued by Pravesh Niyanatra samiti ,Mumbai.
Candidate who has been admitted may cancel admission by submitting an application in duplicate. In the prescribed PROFORMA “C M (given in admission rule broacher), may request for refund of fees. The refund of fees as applicable shall be made in due course. It is made clear that such application for cancellation will considered if and only if the admission is confirmed by paying the prescribed tuition fee and other fees in full and by submitting the original documents. Refund be made after deduction of cancellation charges as given below.
Sr.no | Situation | Refund |
1 | Request received before the date of start of academic session and seat could be filled by the institute before the cut-off date. | Entire fee lees Rs.1000/- |
2 | Request received after the start of academic session and seat could be filled by the institute before cut-off date | Entire fee less the total fee on prorata basis (Tuition ,development, other and hostel fee) |
3 | Request received before / after the start of academic session and seat could not be filled by the institute. | No refund (except security deposit) |
Note –
a. Entire amount of security /caution money deposit is to be refunded back.
b. For calculation of amount on the prorate basis, one month shall be treated as one unit e.g. if the candidate cancels the admission on third day after start of academics session and seat could be filled before the cut-off date, the cancellation charges will be higher amount of (total fees/12) or Rs. 1000/-
18. या नियमाप्रमाणे सा.वाले यांचे म्हणणेनूसार तक्रारदारांनी संपूर्ण फी भरलेली नव्हती व तसेच तक्रारदारांनी प्रवेशाच्या वेळी दाखल केलेल्या मूळ प्रती दि.31.08.2008 पर्यत पुन्हा दाखल करण्याच्या अटीवर परत दिल्या होत्या परंतू तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे कागदपत्रांच्या मूळ प्रती दि.31.08.2008 पर्यंत परत दिल्या नाहीत व तसेच तक्रारदारांनी प्रवेश रद्द करण्यासाठी आवश्यक असलेले PROFORM-M भरून दिलेला नव्हता.
19. सा.वाले यांनी विविध कोर्ससाठी लागणारी शैक्षणीक फीबाबतचा तपशिल कैफियतीसोबत पृष्ट क्र. 38 वर दाखल केलेला आहे. त्यानूसार प्रथम वर्ष डिप्लोमाइंजिनीअरींग (I.T) साठी रू.25,200/- असे दर्शविले आहे. त्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रू.25,200/-,पैकी रू.20,000/-,भरले होते व त्याची पोचपावती तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेली आहे. तसेच प्रवेश घेतेवळी सर्व मूळ प्रती दाखल केलेल्या होत्या. तक्रारदारांना प्रथम वर्ष डिप्लोमासाठी प्रवेश देण्यात आलेला होता.
20. जरी प्रवेश रद्द करण्याबाबतचे नियम नेटवर व BROCHURE जाहीर केलेले असले तरीही सा.वाले यांनी तक्रारदारांना PROFORM-M भरून देण्याबाबत सांगणे आवश्यक होते.केवळ तक्रारदारांनी प्रवेश रद्द करतांना PROFORM-M भरून दिला नाही. म्हणून त्यांनी भरलेली फी न देणे योग्य नाही. सा.वाले यांचे असेही म्हणणे नाही की, सन 2008-2009 यावर्षी तक्रारदारांनी रद्द केलेली जागा भरली गेली नाही. तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांना PROFORM-M भरून देण्यास सांगीतले होते परंतू तक्रारदारांनी त्यास नकार दिला. तसेच संपूर्ण फी रू.25,200/-, जरी तक्रारदारांनी भरलेली नसली तरी त्यापैकी बरीचशी रक्कम रू.20,000/-,तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा केलेली होती.
21. वरील परिस्थीतीत सा.वाले यांनी तक्रारदारांकडुन नियमानूसार PROFORM-M तक्रारदारांकडुन भरून घ्यावे व त्यांनी भरलेल्या फी पैकी नियमानूसार रक्कम कपात करून उरलेली रक्कम तक्रारदारांना परत करावी असे आदेश देणे मंचास उचीत वाटते.
22 तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडुन तक्रारदारांच्या वडिलांना प्रकरणात पाठपूरावा करण्यापोटी झालेला झालेल्या नुकसानाबाबत 6,000/-,रू ची मागणी केली आहे. परंतू तक्रारदारांनी त्याबाबत कोणताच पुरावा दाखल केला नाही म्हणून तक्रारदारांची ही मागणी अमान्य करण्यात येते.
23. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.4,000/- ची मागणी केली आहे परंतु मंचास ही मागणी अधिक वाटते सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रू. 2,000/- द्यावे असा आदेश देणे योग्य वाटते.
आदेश
1. तक्रार क्रमांक 398/2010 अंशतः मंजूर
करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदारांकडुन नियमानूसार PROFORM-M भरून घ्यावे व भरलेल्या रक्कमेतून नियमानूसार रक्कम कमी करून उरलेली रक्कम तक्रारदारांना परत करावी.
3 सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च रू 2,000/- द्यावे.
4 वरील आदेशाची प्रमाणीत प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत करावी अन्यथा सा.वाले यांनी दरमहा 100/-,रू. दंडात्मक रक्कम तक्रारदारांना द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.