Maharashtra

Chandrapur

CC/22/303

Shri.Balasaheb Vasantrao Chavhan - Complainant(s)

Versus

Prince Electro world Through Proprietor - Opp.Party(s)

Y.C.Itankar

03 May 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/22/303
( Date of Filing : 15 Nov 2022 )
 
1. Shri.Balasaheb Vasantrao Chavhan
Pathanpura road,bavis chowk,Chandrapur, T.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Prince Electro world Through Proprietor
Bhartiy State bankechya samor Kasturba road,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 03 May 2023
Final Order / Judgement

:::नि का ल  प ञ   :::

         (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)

                  (पारित दिनांक ०३/०५/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षणअधिनियमाच्‍या कलम ३५ अन्‍वये  दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडून दिनांक १९/११/२०१८ रोजी ब्‍ल्‍यु स्‍टार कंपनीचा एसी/ वातानुकूलीत यंञ  विकत घेतलेले आहे. सदर वातानुकूलीत यंञाचा बॅच क्रमांक १७ए०१०५४ असा आहे. सदर वातानुकूलीत यंञासाठी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला सदर यंञाची किंमत रुपये ३२,५००/- दिलेली आहे. प्रकरणातील विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे स्‍वतःला विरुध्‍द  पक्ष क्रमांक २ चे अधिकृत विक्रेते असल्‍याचे तक्रारकर्त्‍याला सांगितले. सदर वातानुकूलीत यंञासोबत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ चीझुपर किट नावाची ४ वर्षाची वाढीव दुरुस्‍तीची हमी देय असलेली किट घेण्‍यास सांगितले. ज्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून घेत असलेल्‍या वातानुकूलीत यंञाची सदर कंपनीने दिलेली गॅरंटी संपल्‍यावर सुध्‍दा सदर यंञात बिघाड झाल्‍यास त्‍या  पुढील ४ वर्षापर्यंत दुरुस्‍तीची हमी देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची राहील. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ वर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची झुपर किट नावाची ४ वर्षाची वाढीव दुरुस्‍तीची हमी असलेली कीट रुपये ४,८००/- मध्‍ये विरुध्‍द पक्ष १ कडून घेतली. तक्रारकर्त्‍याने ब्‍ल्‍युस्‍टार कंपनीचा एसी विकत घेतल्‍यावर सन २०२२ च्‍या ऑक्‍टोबर महिण्‍यात सदर एसी बिघाड आल्‍याने एसी बंद झाला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची झुपर वॉरंटी कीटवर असलेल्‍या ग्राहक सेवा केंद्रातील टोल फ्री क्रमांकावर ग्राहक सेवा प्रतिनिधी सोबत बालेले असता त्‍या प्रतिनिधीने विरुध्‍द  पक्ष क्रमांक २ ची झुपर वॉरंटी कीट वर असणा-या सिरीयल क्रमांकाची विचारणा केली असता तेव्‍हा त्‍या प्रतिनिधीने क्रमांक १९८६०१ या क्रमांकाची कीट दुस-या व्‍यक्‍तीच्‍या नावाने नोंद असल्‍याचे तक्रारकर्त्‍याला कळविले. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍यास तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने दिलेली विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची झुपर वॉरंटी कीट ही ञुटीपूर्ण असून तक्रारकर्त्‍याने घेतलेले एसी यंञ हे रुपये ३२,५००/- चे असतांना सदर कीटवर असणारी वस्‍तुच्‍या रकमेचे प्रमाणदर हे २०००१ ते ३००००/-  पावेतो आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याला सदर एसी दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी घेण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला तर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे एसी दुरुस्‍त करण्‍याबाबत विचारणा केल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी ‘तुझा एसी दुरुस्‍त होणार नाही, जे करायचे ते करुन घे’ असे म्‍हटले.विरुध्‍द पक्षाच्‍या याच्‍याय अश्‍या वागण्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला आर्थिक, मानसिक ञास सहन करावा लागला असून विरुध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्त्‍याप्रती सेवेत न्‍युनता व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांनी विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठवून सदर एसी दुरुस्‍त करण्‍याबाबत सुचविले पंरतु विरुध्‍द पक्ष यांनी नोटीसची पुर्तता केली नाही. विरुध्‍द पक्ष यांच्‍या व्‍यापारिक अप्रमाणीकतेमुळे व न्‍यनतापूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला सदर एस यंञाचे उपयोगापासून वंचित राहावे लागले. त्‍यामुळे सदर तक्रार आयोगासमोर दाखल केलेली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याची तक्रारीतील मागणी अशी आहे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याचा एसी दुरुस्‍त करुन द्यावा व आर्थिक व मानसिक ञासापोटी रुपये ४०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
  4. तक्रार स्‍वीकृत  करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १  व २ यांना आयोगामार्फत  नोटीस पाठविण्‍यात आली.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना आयोगामार्फत दिनांक २८/११/२०२२ रोजी नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ तक्रारीत उपस्थित न झाल्‍यामुळे प्रकरण विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचे आदेश दिनांक ८/२/२०२३ रोजी पारित करण्‍यात आले.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपञ व युक्तिवादाची पुरसीस व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रारीच्‍या निकालीकामी निष्‍कर्षे आणि कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे.

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार व दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ सह दस्‍त क्रमांक १ वर ब्‍ल्‍यु स्‍टार कंपनीचा एसी व झुपर कीटचे देयक दिनांक १९/११/२०१८ चे दाखल केलेले आहे.  दस्‍त क्रमांक १५ वर झुपर एक्‍सटेंन्‍डेड वॉरंटी कार्ड दाखल केलेले असून दस्‍त क्रमांक १ वरुन ही बाब सिध्‍द होत आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे कडून दिनांक १९/११/२०१८ रोजी ब्‍ल्‍यु स्‍टार कंपनीचा एसी रुपये ३२,५००/- मध्‍ये विकत घेतला असून त्‍याचा बॅच क्रमांक १७ए०१०५४ असा आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या टॅक्‍स ईनव्‍हाइस चे अवलोकन केले असता  Description of goods मधील अनुक्रमांक २ मध्‍ये Zopper KIT 20 k to 30 k (4 Years) असा उल्‍लेख केलेला आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीप्रमाणे सदर एसी घेत असतांना विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने सदर एसी सोबत सुपर कीट नावाची ४ वर्षाची वाढीव दुरुस्‍तीची हमी देय असलेली कीट घेण्‍यास तक्रारकर्त्‍याला सुचिविले कारण एसीची गॅरंन्‍टी संपल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे सदर एसी मध्‍ये काही बिघाड आल्‍यास त्‍या पुढील चार वर्षापर्यंत दुरुस्‍तीची हमी देण्‍याची जबाबदारी राहील. तक्रारकर्त्‍यानेविरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या सांगण्‍यावर विश्‍वास ठेवून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ची ४ वर्षाची वाढीव दुरुस्‍तीची हमी असलेली कीट रुपये ४,८००/- मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून विकत घेतली, त्‍याबद्दल विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने दिलेले टॅक्‍स ईनव्‍हॉइस मध्‍ये झुपर कीट ची रक्‍कम रुपये ४,८००/- भरल्‍याची नोंद आहे. तक्रारकर्त्‍याचा एसी सन २०२२ मध्‍ये  नादुरुस्‍त झाला असल्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ च्‍या झुपर वॉरंन्‍टी  कीट वरील ग्राहक सेवा केंद्रातील टोल फ्री क्रमांकावर फोन लावून चर्चा करुन त्‍याच्‍या कीट वरील क्रमांक १९८६०१  विरुध्‍द पक्ष क्रमांक २ च्‍या ग्राहक सेवा प्रतिनिधीला सांगितला असता त्‍यांनी या सिरीयल नंबरवर दुस-या ग्राहकाचे नाव असल्‍यामुळे सदर सेवा तक्रारकर्त्‍याला मिळू शकत नसल्‍याचे कळविले, ही बाब तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना सांगून एसी दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत सांगितले असता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी टाळाटाळ केली. सबब दोन्‍ही  पक्षाविरुध्‍द तक्रारकर्ता यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगामार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्‍त होऊनही प्रकरणात उपस्थित न झाल्‍यामुळे  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश दिनांक ८/२/२०२३ रोजी पारित करण्‍यात आला.  आयोगाच्‍या मते तक्रारकर्त्‍याने प्रकरणात नमूद एसी हा दिनांक १९/११/२०१८ रोजी घेतला परंतु सदर एसी ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये खराब झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ कडून घेतलेला झुपर एक्‍सटेंन्‍डेड वॉरंन्‍टी कार्ड प्रमाणे ४ वर्षाची वॉरंन्‍टी असल्‍यामुळे त्‍याप्रकारे तक्रारकर्त्‍याने टोल फ्री क्रमांकावर चौकशी केली असता तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने सदर सीरीयल क्रमांक नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडून ती सेवा तक्रारकर्त्‍याला मिळणार नाही असे समजले, जेव्‍हा की तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍त क्रमांक अ-१५ वर झुपर एक्‍सटेंन्‍डेड वॉरंन्‍टी  वर सीरीयल क्रमांक १९८६०१ हा क्रमांक नमूद आहे त्‍यामुळे ही बाब स्‍पष्‍ट होत आहे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी दिलेल्‍या झुपर एक्‍सटेंन्‍डेड वॉरंन्‍टी  नुसार वाढीव ४ वर्षाची प्रत्‍येक प्रोडक्‍टला असूनही व तक्रारकर्त्‍याने त्‍यासाठी रुपये ४,८००/- रुपयाचा भरणा केल्‍यावरही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी सांगितल्‍याप्रमाणे व त्‍याच्‍या टॅक्‍स ईनव्‍हॉइस मध्‍ये त्‍या प्रोडक्‍टची किंमत वसूल करुनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला खराब झालेला एसी दुरुस्‍त न करुन देऊन तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत ञुटीपूर्ण व्‍यवहार करुन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला सदर प्रकरण आयोगासमोर दाखल करावे लागले परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी आयोगामार्फत नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रारीत उपस्थित होऊन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढून बचाव आयोगासमोर आणला नाही.
  2. उपरोक्‍त विवेचनावरुन आयोग या निष्‍कर्षाप्रत आले आहे की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ता यांचा एसी/वातानुकूलीत यंञ त्‍याच्‍याकडून कोणतीही रक्‍कम न घेता दुरुस्‍त करुन द्यावा तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्‍या २,०००/- विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला द्यावे. सबब प्रकरणात अंतिम आदेश खालीलप्रमाणे आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्रमांक CC/३०३/२०२२ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला एसी/वातानुकूलीत यंञ दुरुस्‍तीचा खर्च न घेता दुरुस्‍त करुन द्यावा.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च असेएकञीत रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.