मे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत.
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता. पाटणकर
*************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक: एपिडिएफ/236/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 15/02/2005
तक्रार निकाल दिनांक : 05/12/2011
श्री. बंडूसिंग बाबूसिंग गौड ...)
रा. संतनगर, लोहगांव, शुभमंगल कार्यालय जवळ ...)
पुणे – 47. ...) तक्रारदार.
विरुध्द
प्रिमियर अटोमोबाईल्स लि. ...)
लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला, मुंबई – 10. ...)
दि प्रिमियर गॅरेज ...)
लॉयडस् ब्रीज, पुणे 5. ...) जाबदार.
********************************************************************
द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// निशाणी –1 वरील आदेश //
सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पिडिएफ/51/2006 असा नोंदणिकृत नंबर देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपिडिएफ/236/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2006 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांनी नोटीस काढली असता तक्रारदारांची नोटिस ‘लेप-ट’ या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजी अभावी काढून टाकण्यात येत आहे.
( श्रीमती प्रणाली सावंत)
अध्यक्ष
(श्रीमती सुजाता पाटणकर)
सदस्य
दिनांक: 05/12/2011
पुणे.