::: आ दे श :::
( पारित दिनांक : १७/०१/२०१३ )
आदरणीय प्रभारी अध्यक्ष श्री. एस. जी. देशमुख यांचे अनुसार : -
1. सदर फीर्याद प्रकरणात, या न्याय मंचाने यापुर्वीचे तक्रार प्रकरण क्रमांक 49/2010 यात दि 24/11/2010 रोजी आदेश पारित केलेला असून, सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्ष यांनी न केल्याचे कारणास्तव तक्रारकर्ता यांनी सदर फीर्याद प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम-27 नुसार दाखल केलेले आहे.
सदर फीर्याद प्रकरणात उभय पक्ष यांनी, दिनांक ३१/१२/२०१२ रोजी, लेखी पुरसिस, रेकॉर्डवर सादर केलेली आहे. त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय येणेप्रमाणे ः
सदर प्रकरणात अर्जदार व विरुध्द पक्ष यांच्यात आपसी समझोता झालेला असुन, त्यानुसार अर्जदार / तक्रारकर्ता - विश्वनाथ किसन खानझोडे हयाला वि. मंचाने प्र.क्र. ४९/२०१० मध्ये केलेल्या आदेशानुसार रक्कम रु. ४,००,०००/- मिळाले आहेत. करिता अर्जदार / तक्रारकर्ता हयाची वि.प. / आरोपी विरुध्द कोणतीही तक्रार राहिलेली नाही. करिता सदरहु प्रकरण अर्जदार मागे घेत आहे.
वि. मंचाच्या आदेशाविरुध्द वि.प. / आरोपी - शिवाजीराव दत्तात्रय पाटील हयांनी मा. राज्य आयोग, नागपूर येथे अपील दाखल केलेली असुन, सदर अपील मध्ये जमा केलेली संपूर्ण रक्कम वि.प. शिवाजीराव दत्तात्रय पाटील, रा. येलुर, ता. वाळवा, जि. सांगली यांना परत देण्यात यावी, अशी विनंती पुरसिसमध्ये करण्यात आलेली आहे.
अशास्थितीत, सदर फीर्याद प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर फीर्याद प्रकरण, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर फीर्याद प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
( श्री.एस.जी.देशमुख ) ( सौ. नंदा लारोकार )
प्रभारी अध्यक्ष, सदस्या.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम, (महाराष्ट्र).