Maharashtra

Nagpur

CC/333/2017

Shri Pradeep Govindrao Kawale - Complainant(s)

Versus

President/Secretary/Manager, The Nirmal Sahakari Gruh Nirman Sanstha Maryadit, Nagpur, Shri Yogesh J - Opp.Party(s)

Adv. Ravi Nikule

25 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/333/2017
( Date of Filing : 05 Aug 2017 )
 
1. Shri Pradeep Govindrao Kawale
R/o. New Nandanvan, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. President/Secretary/Manager, The Nirmal Sahakari Gruh Nirman Sanstha Maryadit, Nagpur, Shri Yogesh J. Borkar
R/o. Executive Engineer, Gramin Water Suppliy Department, Zilla Parishad, Civil Lines, Nagpur 440001
Nagpur
Maharashtra
2. Secretary, The Nirmal Sahakari Gruh Nirman Sanstha Maryadit, Through Shri. Mahendra Jairam Borkar
R/O. 51, Nirmal Colony, Nara Road, Nagpur-14
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 25 Aug 2021
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्दाराश्रीमती चंद्रिका बैसमा. सदस्‍या)

1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे.

तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष दी निर्मल गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर, रजि. क्रमांक एन.जी.पी./एच एस जी/‍टिओ/७२९/१९८५-८६, यांचेकडून दिनांक ६/११/१९९० रोजी त्‍यांच्‍या कार्यालयात जावून या संस्‍थेच्‍या नावे मौजा इसासनी, प.ह. क्रमांक ४६, तहसिल जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक ३२,३३ मध्‍ये पाडलेल्‍या लेआऊट मधील भूखंड क्रमांक ७९, ज्‍याचे एकूण क्षेञफळ १५०० चौरस फुट, विकत घेण्‍याचा सौदा विरुध्‍दपक्षासोबत केला. त्‍याअनुषंगाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास बयाणापोटी रक्‍कम रुपये २,०००/- नगदी दिले. या व्‍यवहारात भूखंडाची एकूण रक्‍कम रुपये १०,५००/- इतकी ठरविण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास ठरल्‍याप्रमाणे वेळोवेळी नगदी पैसे दिले व विरुध्‍दपक्षाकडून रितसर पावत्‍या सुद्धा घेतल्‍या. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास उपरोक्‍त नमुद भूखंड क्रमांक ७९ चे ठरल्‍याप्रमाणे संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त होवून सुद्धा सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास नोंदणीकृत विक्रीपञ करुन देण्‍याकरिता वारंवार विनंती केली. परंतु विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे विनंतीकडे दुर्लक्ष केले व सदरच्‍या लेआऊट चा एन.ए. होणे बाकी आहे असे सांगून वारंवार उडवाउडवीचे उत्‍तर दिले. विरुध्‍द पक्षाने सदर भूखंडाचे आजतागायत नोंदणीकृत विक्रीपञ करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास दिनांक १७/६/२०१७ रोजी विरुध्‍द पक्षास वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविले. विरुध्‍द पक्षास दिनांक २१/६/२०१७ रोजी सदरची नोटीस प्राप्‍त होवून सुध्‍दा  विरुध्‍द पक्षाने त्‍याची नोंद घेतली नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हा संपूर्ण संस्‍थेचे व्‍यवहार करीत होता व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावर/पावत्‍यांवर विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांची स्‍वाक्ष-या आहेत. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ने सुद्धा सेवेत ञुटी केली असल्‍यामुळे संबंधीत आयोगाने त्‍यांच्‍या विरुध्‍द सुद्धा कार्यवाही करावी. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक १७/६/२०१७ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही. सबब तक्रारकर्त्‍यास  नागपूर जिल्‍हा ग्राहक आयोग येथे धाव घ्‍यावी लागली.

तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या तक्रारीत खालिलप्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.

  1. विरुध्‍द पक्ष यांनी उपरोक्‍त भूखंड क्रमांक ७९, एकूण क्षेञफळ १५०० चौरस फुट याचे नोंदणीकृत विक्रीपञ तक्रारकर्त्‍याचे नावे करुन द्यावे व सदरच्‍या जागेची मोजनी करुन जागेचा प्रत्‍यक्ष ताबा द्यावा.
  2. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासाकरिता रुपये ५०,०००/- ची भरपाई देण्‍यात यावी.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १- श्री योगेश बोरकर यांनी आपल्‍या लेखी जबाबात नमुद केले आहे की, त्‍यांचा तक्रारकर्त्‍याशी कुठलाही संबंध नाही. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त भूखंड क्रमांक ७९ खरेदी करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षासोबत कधीही सौदा केलेला नाही. तसेच सदरचा भूखंडाचा बयाणापञ सुद्धा केलेला नाही व तक्रारकर्त्‍याकडून बयाणादाखल रुपये २,०००/- सुद्धा स्विकारले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा  विरुध्‍द पक्षाचा ग्राहक या संज्ञेत येत नाही. सदरची तक्रार ही तक्रारकर्त्‍याने न्‍यायमंचाची दिशाभूल करण्‍याकरिता दाखल केली आहे. या तक्रारीस जवळपास २७ वर्षे विलंब झाला असल्‍यामुळे ग्राहक आयोगाने सदरची तक्रार दाखल करणे योग्‍य नाही. सबब तक्रारकर्त्‍याची ही तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं.1- योगेश बोरकर यांनी निर्मल गृहनिर्माण संस्‍थेचे सचिव श्री महेंद्र जयराम बोरकर यांनी श्री कृष्‍णाजी झारोंडे, श्री शुध्‍दोधन झारोंडे, श्री सुनिल झारोंडे व श्रीमती हिराबाई गणपतराव झारोंडे यांच्‍या विरुध्‍द  दिवाणी न्‍यायालयात दाखल असलेले प्रकरण क्रमांक स्‍पेशल सिविल सुट क्रमांक ६७६/२०१३ दाखल केली आहे. या प्रकरणात नमुद विरुध्‍द पक्ष श्री महेंद्र बोरकर हे पक्षकार आहे. या दिवाणी न्यायालयात प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक-१,योगेश बोरकर हे पक्षकार नाही. तसेच श्री योगेश जयराम बोरकर यांनी दिनांक १५/६/२०१७ रोजीचे निर्मल सहकारी गृहनिर्माण संस्‍था  मर्या. यांच्‍या लेटरहेड वर असलेले प्रमाणपञ दाखल केले आहे. त्‍यात नमुद आहे की, श्री योगेश जयराम बोरकर हे या संस्‍थेमध्‍ये कुठल्‍याही पदावर रुजू नसून त्‍यांना या संस्‍थेचे कोणतेही पदभार/कार्यभार सोपविलेला नाही. या संस्‍थेत त्‍यांची भूमिका केवळ सभासद म्‍हणून आहे. त्‍यामुळे सदरच्‍या तक्रारीतून त्‍यांचे नाव कमी करण्‍यात यावे. या अर्जावर दिनांक ६/५/२०१९ रोजी आदेश पारीत करण्‍यात आला. त्‍यानुसार सदरच्‍या  तक्रारीतून श्री योगेश जयराम बोरकर यांचे नाव कमी करावे तसेच अध्‍यक्ष/सचिव/व्‍यवस्‍थापक अशा तिन्‍ही पदांसाठी केवळ एकच पक्षकार करु नये. व त्‍याप्रमाणे निशानी क्रमांक १ मध्‍ये दुरूस्‍ती करावी. या आदेशाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ सचिव निर्मल सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्‍था यांचेतर्फे श्री महेंद्र जयराम बोरकर  यांना पक्षकार बनविले आहे.
  5. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, प्रतिउत्‍तर, लेखी जबाब आणि उभयपक्षाचे लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे  खालिलप्रमाणे नोंदविले आहेत.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                   निष्‍कर्ष

                               I.            तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   नाही

                            II.            विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        नाही

                         III.            काय आदेश ?                                                                 अंतिम आदेशाप्रमाणे

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून दिनांक ६/११/१९९० रोजी संस्‍थेच्‍या नावे असलेले लेआऊट, मौजा इसासनी, प.ह. क्रमांक ४६, तहसिल जिल्‍हा  नागपूर येथील खसरा क्रमांक ३२,३३ मध्‍ये पाडलेल्‍या लेआऊट मधील भूखंड क्रमांक ७९, ज्‍याचे एकूण क्षेञफळ १५०० चौरस फुट, विकत घेण्‍याचा सौदा विरुध्‍दपक्षासोबत केला. त्‍याअनुषंगाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास बयाणापोटी रक्‍कम रुपये २,०००/- नगदी दिले. या व्‍यवहारात भूखंडाची एकूण रक्‍कम रुपये १०,५००/- इतकी ठरविण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास ठरल्‍याप्रमाणे वेळोवेळी नगदी पैसे दिले व विरुध्‍दपक्षाकडून रितसर पावत्‍या सुद्धा घेतल्‍या. परंतु सदरच्या सदस्तावेतांवर वि.प.तर्फे कुणाची स्वाक्षरी आहे हे स्पष्‍ट नमुद नाही. तक्रारदाराचे म्हणण्‍याप्रमाणे वि.प.क्रं.1 ची सही आहे परंतु वि.प.क्रं.1 यांच्या उत्तराप्रमाणे त्यांनी दाखल केलेल्या दस्तवेज दिनांक 15.6.2017 चे दि निर्मल सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादीत. नागपूर यांचे प्रमाणपत्रानुसार वि.प.क्रं.1-योगेश जयराम बोरकर हे सदरच्या संस्थेमधे कुठल्याही पदावर रुजु नसुन त्यांना या संस्थेचे कोणताही पदभार/कार्यभार सोपविलेला नाही. संस्थेत त्यांची भुमिका केवळ सभासद म्हणुन आहे अशा आशयाचे प्रमाणपत्र दाखल केल्यामूळे योगेश बोरकर यांना संस्थेच्या कोणत्याही व्यवहाराकरिता जबाबदार धरता येणार नाही. त्यामूळे सदरची तक्रार त्यांचे विरुध्‍द खारीज होण्‍यास पात्र आहे असे या आयोगाचे मत आहे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं.1- योगेश बोरकर यांनी निर्मल गृहनिर्माण संस्‍थेचे सचिव श्री महेंद्र जयराम बोरकर यांनी श्री कृष्‍णाजी झारोंडे, श्री शुध्‍दोधन झारोंडे, श्री सुनिल झारोंडे व श्रीमती हिराबाई गणपतराव झारोंडे यांच्‍या विरुध्‍द  दिवाणी न्‍यायालयात दाखल असलेले प्रकरण क्रमांक स्‍पेशल सिविल सुट क्रमांक ६७६/२०१३ दाखल केली आहे. या प्रकरणात नमुद विरुध्‍द पक्ष श्री महेंद्र बोरकर हे पक्षकार आहे. या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक-१,योगेश बोरकर हे पक्षकार नाही. तसेच श्री योगेश जयराम बोरकर यांनी दिनांक १५/६/२०१७ रोजीचे निर्मल सहकारी गृहनिर्माण संस्‍था  मर्या. यांच्‍या लेटरहेड वर असलेले प्रमाणपञ दाखल केले आहे. त्‍यात नमुद आहे की, श्री योगेश जयराम बोरकर हे या संस्‍थेमध्‍ये कुठल्‍याही पदावर रुजू नसून त्‍यांना या संस्‍थेचे कोणतेही पदभार/कार्यभार सोपविलेला नाही. या संस्‍थेत त्‍यांची भूमिका केवळ सभासद म्‍हणून आहे. त्‍यामुळे सदरच्‍या तक्रारीतून त्‍यांचे नाव कमी करण्‍यात यावे. या अर्जावर दिनांक ६/५/२०१९ रोजी आदेश पारीत करण्‍यात आला. त्‍यानुसार सदरच्‍या  तक्रारीतून श्री योगेश जयराम बोरकर यांचे नाव कमी करावे. तसेच अध्‍यक्ष/सचिव/व्‍यवस्‍थापक अशा तिन्‍ही पदांसाठी केवळ एकच पक्षकार करु नये. व त्‍याप्रमाणे निशानी क्रमांक १ मध्‍ये दुरूस्‍ती करावी. या आदेशाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ सचिव निर्मल सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्‍था यांचेतर्फे श्री महेंद्र जयराम बोरकर  यांना पक्षकार बनविले आहे.
  2. विरुध्‍द पक्षाने Special Civil Suit No. 676/2013 आणि Writ Petition No. 266/2013 प्रमाणे निर्मल गृह निर्माण संस्‍थेतर्फे श्री महेंद्र जयराम बोरकर यांनी श्री कृष्‍णाजी गणपतराव झारोंडे व इतर यांचे विरुध्‍द दिवानी दावा दाखल केला होता. त्यानुसार तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा महेंद्र जयराम बोरकर यांना सुद्धा यात पक्षकार क्रं.2 बनविले आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे वकील श्री चिंचबनकर यांनी सदरच्‍या प्रकरणात संबंधीत तक्रारीचे दस्‍तावेज मिळाले नसल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारदाराने आजतागायत वि.प.क्रं.2 यांचे वकील श्री चिचबनकर यांना तक्रारी संबंधीचे दस्तऐवज पुरविले नाही. त्यामूळे वि.प.क्रं.2 हे सदरच्या तक्रारीस लेखी उत्तर दाखल करु शकले नाही. त्याकरिता त्यांना सदरचे प्रकरणात जबाबदार धरता येणार नाही सबब सदर तक्रार वि.प.क्रं.2 यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी असे आयोगाचे मत आहे.
  3. खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार वि.प.क्रं.1 व 2 विरुध्‍द खारीज करण्‍यात येते.
  2. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.  
  3.  उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारदाराला तक्रारीतील ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.