Maharashtra

Nagpur

CC/12/238

Smt. Sushila Shivshankar Yadav - Complainant(s)

Versus

President/Secretary/ Manager, Dobinagar Co-op. Housing Society Ltd., Nagpur, Through Shri Ajij Khan - Opp.Party(s)

Adv. R.B. Nikule

10 Dec 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/238
 
1. Smt. Sushila Shivshankar Yadav
Parvati Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. President/Secretary/ Manager, Dobinagar Co-op. Housing Society Ltd., Nagpur, Through Shri Ajij Khan Rashid Khan
141, Dattatraya Nagar
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती रोहीणी कुंडले, अध्‍यक्षा यांचे आदेशांन्‍वये.
 
-आदेश-
 (पारित दिनांक :  10.12.2012)
 
            तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीचे वकील हजर. वि.प.दि.13.09.2012 च्‍या आदेशांन्‍वये एकतर्फी.
 
1.           तक्रार प्‍लॉटचे खरेदीखत करुन मिळण्‍याबद्दल आहे. तक्रारकर्तीने दि.21.12.1999 रोजी वि.प. हाऊसिंग सोसायटीकडून मौजा – बाबुळखेडा, ख.क्र.57/3 मधील लेआऊट प्‍लॉट क्र. 33, क्षेत्रफळ 705, चौ.फुटाचा प्‍लॉट किंमती रु.60,000/- बुक केला.
 
2.                     दि.29.12.1999 रोजी उपरोक्‍त प्‍लॉटची संपूर्ण किंमत वि.प.ला दिली. म्‍हणून याचदिवशी वि.प.ने विक्रीचा रजिस्‍टर्ड करारनामा तक्रारकर्त्‍याला करुन दिला व प्‍लॉटचा ताबा दिला. जमिनीचे अकृषक रुपांतर झाल्‍यानंतर विक्री करण्‍याचे ठरले होते.
3.          तक्रारकर्तीने अनेकवेळा प्‍लॉटची विक्री करुन देण्‍याची मागणी वि.प.कडे केली. परंतू अकृषक झाले नाही या सबबीखाली त्‍यांनी ते करुन दिले नाही.
 
4.          तक्रारकर्तीला समजले की, दि.11.06.2010 रोजी याच मंचाने याच वि.प.विरुध्‍द आदेश देऊन गिरधारीलाल तिवारी या तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र करुन देण्‍याचा आदेश पारित केला व त्‍याप्रमाणे वि.प.ने जानेवारी 2012 मध्‍ये तक्रारकर्त्‍याला रजिस्‍टर्ड खरेदीखत करुन दिले.
 
5.          म्‍हणून तक्रारकर्तीने तिला विक्रीपत्र करुन मिळावे, म्‍हणून दि.21.01.2012 रोजी वि.प.ला नोटीस देऊन विक्रीपत्राची मागणी केली. ती त्‍यांना दि.23.01.2012 रोजी प्राप्‍त झाली. त्‍याचे उत्‍तर वि.प.ने दिले नाही, विक्रीपत्रही करुन दिले नाही. म्‍हणून मंचात तक्रार दाखल आहे.
 
6.          वि.प.ने अनेक वर्षे तक्रारकर्तीला खोटया आश्‍वासनावर झुलत ठेवले व पूर्ण किंमत अदा करुनही विक्रीपत्र करुन दिले नाही ही वि.प.च्‍या सेवेतील त्रुटी ठरते असे तक्रारकर्ती म्‍हणते.
 
7.          तक्रारीसोबत तक्रारकर्तीने, प्‍लॉट बुकिंगची पावती, रजिस्‍टर्ड करारनामा, मंचाचा आदेश, वि.प.ला पाठविलेली नोटीस व त्‍याची पोच असे 5 दस्‍त दाखल केले. तक्रारकर्तीची प्रार्थना -
A)        तक्रारकर्तीला प्‍लॉटचे खरेदीखत करुन मिळावे. त्‍याचा खर्च वि.प.ने करावा.
B)    शारिरीक मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी.
8.          वि.प.ला मंचाने नोटीस पाठविली. ती त्‍यांना प्राप्‍त झाल्‍याची पोच पावती रेकॉर्डवर आहे. ते हजर झाले नाही. त्‍यांनी उत्‍तरही दाखल केले नाही, म्‍हणून त्‍यांच्‍याविरुध्‍द 15.09.2012 रोजी मंचाने एकतर्फी आदेश पारित केला.
9.          तक्रारकर्तीची तक्रार, युक्‍तीवाद/लेखी युक्‍तीवाद व रेकॉर्डवर तिने दाखल केलेले सर्व दस्‍त मंचाने तपासले, त्‍यावरुन मंचाची निरीक्षणे व निष्‍कर्ष.
 
निरीक्षणे व निष्‍कर्ष
 
10          तक्रारकर्तीच्‍या संपूर्ण तक्रारीत व कागदपत्रात मंचाला तथ्‍य वाटते, म्‍हणून ते सर्व ग्राह्य धरुन वि.प.ने प्‍लॉटची संपूर्ण किंमत दि.29.12.1999 रु.60,000/- घेऊनही आजपर्यंत खोटी कारणे देऊन खरेदीखत करुन देण्‍याचे टाळले ही वि.प.च्‍या सेवेतील त्रुटी ठरते असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब आदेश-
-आदेश-
 
 
1)    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
2)    वि.प.ने तक्रारकर्तीला कराराप्रमाणे मौजा – बाबुळखेडा, ख.क्र.57/3, मधील      लेआऊट मधील प्‍लॉट क्र. 33, क्षेत्रफळ 705 चौ.फु. या वर्णनाच्‍या प्‍लॉटची विक्री     करुन द्यावी.
3)    विक्रीसाठी येणारा खर्च तक्रारकर्तीने वहन करावा.
4)    तक्रारकर्तीला झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्‍हणून      वि.प.ने तक्रारकर्तीला रु.5,000/- (रु.पाच हजार) द्यावे.
5)    तक्रार खर्च रु.5,000/- (रु.पाच हजार) वि.प.ने तक्रारकर्तीला द्यावा.    
6)    आदेशाचे पालन वि.प.ला तक्रारीची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत वि.प.ने      करावे.
7)    प्रबंधकांनी वि.प.ला आदेशाची प्रत रजिस्‍टर्ड पोस्‍टाने त्‍वरित पाठवावी.
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.