-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-17 डिसेंबर, 2016)
01. उपरोक्त नमुद तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, दर्शन कॉलिनी, नागपूर या सहकारी संस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02 तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष भवानी माता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नागपूर ही एक
सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-(1) चंद्रभान रघुनाथ आपतूरकर हे तिचे अध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.पुष्पा शरद रायपूरकर हया सदर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-(3) हे महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागातील अधिकारी असून त्यांची संस्थेवर आता प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट नं. 159, दर्शन कॉलिनी, दत्त मेडीकल जवळ, नागपूर या सहकारी पतसंस्थे मध्ये मुदतीठेवी पावत्यांव्दारे “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे खालील प्रमाणे रक्कम गुंतवली-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | तक्रार क्रमांक (RBT/ CC/No.) | तक्रारकर्तीचे नाव | मुदती ठेव पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | मुदत ठेवीचा गुंतवणूक कालावधी | व्याजाचा नमुद वार्षिक दर | मुदती ठेवीच्या कालावधी नंतर परिपक्वता तिथी 20/03/2011 रोजी देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 |
1 | 12/783 | Sou.Lakshmibai Ratiram Gajbhiye. | 2758 | 20/09/2005 | 1,00,000/- | Not Mentioned. | 13% | 2,00,000/- |
| | | | | | | | |
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, परिपक्वता तिथी नंतर तिला मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक केलेली देय रक्कम विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी, नागपूर यांचे कडून परत मिळणे अपेक्षीत होते परंतु तिने वारंवार मागणी करुनही तिला मुदतीठेवीची देय रक्कम परत मिळालेली नाही. तक्रारकर्तीने रक्कम मिळण्या बाबत दिनांक-19/11/2011 रोजी लेखी अर्ज विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये सादर केला व पोच प्राप्त केली परंतु प्रतिसाद न मिळाल्याने अधिवक्ता यांचे मार्फतीने दिनांक-25/07/2012 रोजी विरुध्दपक्ष सहकारी संस्थेला कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्दपक्ष संस्थेने दिनांक-02/08/2012 रोजी सदर नोटीस घेण्यास नकार दिला. विरुध्दपक्ष सहकारी संस्थेच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष संस्थेच्या कारभारातील अनियमिततेमुळे संस्थेवर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तक्रारकर्तीची मुख्य तक्रार अशी आहे की, तिने विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये मुदतठेव मध्ये
गुंतवलेली रक्कम त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही ती रक्कम परत करण्यात आली नाही. विरुध्दपक्षानीं तिला मुदतीठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून तिने विरुध्दपक्ष यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, तक्रारकर्तीने मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक केलेली आणि परिवक्वता तिथीला देय होणारी रक्कम, परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह परत मिळावी तसेच नोटीस खर्च म्हणून रुपये-1000/- आणि शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- तक्रारकर्तीला देण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित नागपूर तर्फे- विरुध्दपक्ष क्रं-(1)अध्यक्ष,चंद्रभान रघुनाथ आपतूरकर आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.पुष्पा शरद रायपूरकर, व्यवस्थापक यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांनी तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष संस्थे मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम नाकबुल केली. त्यांचे लेखी उत्तरा नुसार विरुध्दपक्ष क्रं-(2) यांचा, विरुध्दपक्ष क्रं-(1) संस्थेशी कोणताही संबध नसून त्यांना विनाकारण/चुकीने प्रतिपक्ष केलेले आहे.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 2 शी कुठलाही व्यवहार केलेला नाही आणि ती विरुध्दपक्ष क्रं 2 ची ग्राहक होत नाही. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षांना कोणतीही नोटीस पाठविलेली नाही वा त्यांनी नोटीस घेण्यास नकारही दिलेला नाही. तक्रारीतील त्यांचे विरुध्दची सर्व विपरीत विधाने अमान्य केलीत. विरुध्दपक्ष संस्थेवर आता प्रशासकाची नियुक्ती झालेली असल्याने तक्रारकर्तीची रक्कम परत करण्यास त्यांनाच योग्य ते आदेश देणे योग्य राहिल असे नमुद केले.
04. तक्रारकर्तीने दस्तऐवजाच्या यादी प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये मुदतीठेव पावती प्रत, दिनांक-09/12/2011 रोजी विरुध्दपक्ष संस्थेत केलेला रक्कम मागणी अर्ज व त्यावरील पोच, विरुध्दपक्ष संस्थेला दिनांक-25/07/2012 रोजी पाठविलेली नोटीसची प्रत आणि दिनांक-08/08/2012 रोजी परत आलेला नोटीस लिफाफा झेरॉक्स प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
05. तक्रारकर्तीची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, तक्रारकर्तीचा प्रतिज्ञालेखावरील पुरावा, तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती आणि तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, दर्शन कॉलिनी, नागपूर ही एक सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदती ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने मुदती ठेव पावतीची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे, सदर मुदतीठेवीची पावती विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेली असून पावतीवर विरुध्दपक्ष सहकारी संस्था ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, दर्शन कॉलिनी, नागपूर या सहकारी संस्थेत परिशिष्ट- अ प्रमाणे रक्कम मुदतठेवी मध्ये गुंतवली.
“परिशिष्ट-अ”
अक्रं | तक्रार क्रमांक (RBT/ CC/No.) | तक्रारकर्तीचे नाव | मुदती ठेव पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | मुदत ठेवीचा गुंतवणूक कालावधी | व्याजाचा नमुद वार्षिक दर | मुदती ठेवीच्या कालावधी नंतर परिपक्वता तिथी 20/03/2011 रोजी देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 |
1 | 12/783 | Sou.Lakshmibai Ratiram Gajbhiye. | 2758 | 20/09/2005 | 1,00,000/- | Not Mentioned. | 13% | 2,00,000/- |
| | | | | | | | |
07. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये मुदती ठेवी मधील रक्कम परत मिळण्यासाठी दिनांक-09/12/2011 रोजी सादर केलेला अर्ज व तो अर्ज मिळाल्या बद्दल विरुध्दपक्ष सहकारी संस्थेची पोच पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेला आहे. तसेच विरुध्दपक्ष सहकारी संस्थेला दिनांक-25/07/2012 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसची प्रत आणि दिनांक-08/08/2012 रोजी नोटीस न स्विकारता परत आलेल्या लिफाफयाची प्रत पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेली आहे. अशाप्रकारे तक्रारकर्तीची मुदतीठेव परिपक्व झाल्या नंतरही व तिने मागणी करुनही विरुध्दपक्ष संस्थेनी तिला मुदतीठेवीची रक्कम त्यातील देयलाभांसह परत केलेली नाही ही त्यांची दोषपूर्ण सेवा आहे आणि यामुळे तक्रारकर्तीला निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
08. सर्वसाधारणपणे सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्थेच्या व्यवहारात काही अनियमितता आढळल्यास राज्य शासनाचे वतीने प्रशासकाची नियुक्ती संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी केल्या जाते परंतु संस्थेच्या अनियमितते बद्दल वा गैरव्यवहारा बद्दल प्रशासकाची जबाबदारी येते असे होत नाही. संस्थेवर प्रशासक नेमला
म्हणून संस्थेची दायीत्वाची जबाबदारी संपली असे म्हणता येणार नाही, संस्थेच्या दायीत्वाची जबाबदारी ही संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचेवरच आहे. आम्ही मंचाचे आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष संस्थे कडून होण्यासाठी प्रशासकाने योग्य ते सहकार्य करावे एवढया पुरतीच प्रशासकाची जबाबदारी निश्चीत करतो असे आदेशित करतो. मंचाचे आदेशाचे अनुपालनाची सर्वस्वी जबाबदारी ही विरुध्दपक्ष सहकारी संस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांचीच येते.
09. या ठिकाणी आणखी एक बाब महत्वाची नमुद करणे आवश्यक आहे की, विरुध्दपक्ष संस्थे तर्फे तक्रारकर्तीचे नावे जी मुदती ठेव पावती निर्गमित केलेली आहे, त्यामधील मुदती ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्याचा कालावधी नमुद केलेला नाही तसेच देय व्याजाचा दर 13% दर्शविलेला असून त्या प्रमाणे हिशोब केला असता येणारी रक्कम आणि मुदतीठेव पावतीवर परिपक्वता तिथी नंतर मिळणारी देय नमुद केलेली रक्कम या दोन्ही रकमां मध्ये ताळमेळ खात नसून त्यामध्ये फरक दिसून येतो. परंतु तक्रारकर्तीने ज्या कालावधीत म्हणजे सन-2005 मध्ये मुदती ठेवी मध्ये रक्कम गुंतविली त्या कालावधीत साधारणतः केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातील मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम साधारणतः 05 वर्ष आणि 06 महिने कालावधी नंतर दामदुप्पट होत होती, आम्ही हा हिशोब लक्षात घेऊन मुदतीठेवीच्या पावती वर विरुध्दपक्ष संस्थे तर्फे परिपक्वता तिथी नंतर नमुद केलेली देय होणारी रक्कम हिशोबात घेत आहोत.
10. या ठिकाणी आणखी एक महत्वाची बाब नमुद कराविशी वाटते की, या तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.पुष्पा शरद रायपूरकर, व्यवस्थापक यांना प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्यवस्थापक हे पद सहकारी संस्थे मध्ये पदाधिकारी पद नसून ते नौकरीतील पद आहे आणि विरुध्दपक्ष संस्थेच्या “Employee” ला या तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष संस्थेच्या कारभारा करीता जबाबदार धरता येत नाही त्यामुळे
आम्ही विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.पुष्पा शरद रायपुकर, व्यवस्थापक यांना या तक्रारी मधून मुक्त करीत आहोत.
11. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, दर्शन कॉलिनी, नागपूर ही सहकारी संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येतात.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासक, भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार ही औपचारीकरित्या (Formal) म्हणजे विरुध्दपक्ष सहकारी पत संस्थे कडून मंचाचे आदेशाचे अनुपालन, विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांचे मार्फतीने होईल एवढया मुद्दा पुरती मंजूर करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, दर्शन कॉलिनी, नागपूर ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्तीने मुदती ठेव मध्ये गुंतवलेली आणि त्याचे परिपक्वता तिथीस देय होणारी रक्कम, परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीस परत करावी.
(04) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) आणि तक्रारखर्च रुपये-750/- (अक्षरी रुपये सातशे पन्नास फक्त) विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, नागपूर ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांनी तक्रारकर्तीस द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, नागपूर ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासकाने मंचाचे आदेशाचे अनुपालन त्यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष भवानीमाता अर्बन को-ऑप.सोसायटी मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C./519/95, नागपूर ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांचे कडून होईल असे पहावे.
(06) विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.पुष्पा शरद रायपूरकर हया विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये व्यवस्थापक म्हणून नौकरीत असल्याने व त्या संस्थेच्या पदाधिकारी नसल्याने त्यांना या तक्रारी मधून मुक्त करण्यात येते.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.