जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
तक्रार क्रमांक –138/2012 तक्रार दाखल तारीख –11/06/2012
सतिष पि.गणपतराव म्हेत्रे
वय 33 वर्षे,धंदा- नोकरी
रा.रंगार चौक,गेवराई ता.गेवराई जि. बीड ...तक्रारदार
विरुध्द
अध्यक्ष व सचिव,
जयप्रकाश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गेवराई
ता.गेवराई जि.बीड. ...सामनेवाला
को र म - अजय भोसरेकर, प्र.अध्यक्ष
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाले तर्फे :- कोणीही हजर नाही.
नि.1 वरील आदेश
तक्रारदार हजर राहून तक्रारदाराने स्वतःची तक्रार सामनेवाला यांचे विरुध्द चालवावयाची नाही असा अर्ज दिला. त्यावरुन तक्रारदाराची तक्रार बंद करणे योग्य आहे, परंतु ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 14 ची पालन करणे सद्य परिस्थितीत शक्य नाही. कारण मा.सदस्या गैरहजर असल्यामुळे व तक्रारदाराच्या दिलेल्या अर्जानुसार तक्रारदाराचे सदर प्रकरण बंद करणे योग्य होईल असे माझे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
पुरशीस प्रमाणे तक्रार बंद करण्यात येते.
(अजय भोसरेकर)
प्र. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड