1 अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे 1986 चे कलम 12 अन्वये तक्रार अर्ज दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे आहे. 2 अर्जदार चंद्रपूर येथिल रहिवासी आहे. गै.अ. यांच्याकडे खाता क्रं. 527 नुसार रक्कम जमा केली आहे. करीता अर्जदार हे गै.अ. यांचे ग्राहक आहेत. 3 अर्जदाराने दि. 20/5/2009 रोजी गै.अ. कडे खाते क्रं. 527 अन्वये बचत खाते सुरु केले. त्यामध्ये 20/5/2009 पासुन 20/5/2010 पर्यत रु.18,575/- खात्यामध्ये जमा आहे. गै.अ यांनी अर्जदाराकडून खाते पुस्तक दि. 2/5/11 ला चेक क्र. 944480 हया रकमेचा हयाच तारखेचा अर्जदाराला दिला. अर्जदाराने गै.अ यास दि.23/3/11 व दि. 25/4/11 रोजी लेखीपञ पाठवून खात्यातील रक्क्म देण्याची मागणी केली. परंतु गै.अ यांनी अर्जदाराची रक्क्म देण्यास टाळाटाळ करीत आहे. गै.अ यांनी अर्जदाराची रक्कम वेळेवर न देणे, वारंवार चकरा मारायला लावणे ही बाब गै.अ च्या सेवेतील न्युनता आहे व अनुचित प्रथा आहे. गै.अ यांनी दिलेल्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास ञास झाला आहे. यामुळे अर्जदारास शारीरीक, मानसीक ञास सुध्दा झाला आहे. गै.अ यांनी अर्जदाराची रक्कम वेळेवर न देवून विश्वासघात केला आहे. आणि विनाकारण अर्जदाराची रक्कम अडकवून ठेवीत आहे. अर्जदाराने या शिवाय कुठल्याही न्यायालयामध्ये या स्वरुपाची तक्रार दाखल केली नाही. गै.अ याने अर्जदाराच्या खात्यातील रक्कम न दिल्यामुळे तक्रार दाखल करावी लागली.. अर्जदाराने बचत खाते क्र. 527 मध्ये जमा असलेली रक्क्म रु. 18,575/- 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. मानसीक, शारीरीक ञासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु. 5,000/- दयावा अशी मागणी अर्जदाराने गै.अ कडून केली आहे. 4 तक्रार नोंदणी करुन गै.अ यास नोटीस काढण्यात आले. अर्जदाराने तक्रारीसोबत नि. 5 नुसार 5 झेरॉक्स व अस्सल दस्तऐवज दाखल केले. गै.अ हजर होवून नि. 12 नुसार लेखीउत्तर दाखल केला आहे. गै.अ याने अर्जदार चंद्रपूर येथील जरी रहिवासी आहे तरी, त्यांनी गै.अ कडे बचत खाते उघडून रक्कम जमा केली आहे. हे म्हणणे खोटे असून अमान्य आहे की, अर्जदार हे गै.अ चे ग्राहक आहेत. अर्जदाराने प्रस्तुत मामल्यात परिच्छेद क्र. 2 मधील मजकुर अंशतः खोटा व अंशतः बरोबर आहे. अर्जदराला या बद्दल माहिती नाही की, अर्जदाराचे खाते क्र. 527 मध्ये 18575/- रु गै.अ कडे जमा आहेत. अर्जदार हे गै.अ चे ग्राहक झाले नसल्यामुळे न्युनता पूर्ण सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदार यांनी केलेल्या सर्व मागण्या चुकीच्या खोटया असून गै.अ ला मान्य नाही. सबब अर्जदाराचा अर्ज, गै.अ च्या खर्चासह रद्द करण्यात यावा. 5 गै.अ यांनी लेखीबयानातील अतिरिक्त बयानात असे कथन केले की, अर्जदार हे दैनिक बचत ठेव अभिकर्ता उज्वल नारलावार अभिकर्ता संकेत क्र. 5 हयाचे मार्फत गै.अ चे संस्थेत तथाकथित खाते क्र. 527 मध्ये रक्क्म जमा केली होती. अभिकर्ता म्हणून श्री उज्वल नारलावार याची नेमणूक अटी व शर्ती नुसार करण्यात आली. त्याचे मार्फत जमा करण्यात आलेली व त्याचे मार्फत जमा करण्यात येणा-या रक्कमेची व उचल केलेल्या रक्कमेची सर्वस्वी जबाबदारी त्याची स्वतःची होती. 6 गै.अ संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य सप्टेंबर 2010 मध्ये बदलले व नविन कार्यकारणी मंडळ अस्तित्वात आले. त्यांनी दि. 8/9/2010 ला सोसायटीचे काम अंशतः आणि दि. 3/11/2010 पासुन पूर्णतः हाती घेतले. नवीन संचालक मंडळाने काम सुरु केल्या नंतर असे लक्षात आले की, अभिलेखात, खात्यात दैनिक आवर्त जमा खाते, बचत खात्या मध्ये अतिशय जास्त अनियमितता व विसंगती आढळून आली. टाळेबंदातील शिल्लक मध्ये फरक होता. नविन संचालक मंडळाने श्री एम..ए. रशिद प्रमाणित लेखाधिकारी म्हणून नियुक्ति करुन खाते तपासण्यात आले. लेखापरिक्षणात फरक व विसंगती आढळून आले असल्याने रक्क्म देवू नये असे कळविले. 7 लेखापरिक्षक श्री एम..ए. रशिद यांनी दिलेल्या अहवालावरुन अर्जदाराचे अभिकर्ता उज्वल नारलावार हयाच्या खात्यात रक्क्म रु. 33,797/- चा तोटा आहे. अर्जदार याच्या ताब्यातील पासबुकात अभिकर्त्याने रक्क्म रु. 18,150/- जमा दाखविली आहे. अर्जदारा सारखे इतर 7 खातेदार याच्या ताब्यातील व अभिकर्ता श्री उज्वल नारलावार यांचे खाते क्र. 5 मध्ये उपलब्ध शिल्लक यामध्ये भयंकर तफावत आहे. अर्जदाराचे अभिकर्ता उज्वल नारलावार यांनी 50257/- ची अफरातफर करुन अपहार केला आहे. व ही रक्क्म देण्यास अभिकर्ता स्वतः जबाबदार आहे व राहील. अभिकर्ता याने रु. 50257/- एवढया रक्कमेची भरपाई करुन दिल्यास अर्जदार व अर्जदारा सारखे इतर 7 ठेवीदाराच्या बाबतीत जबाबदार राहील.
8 अर्जदाराने मुद्दामून खरी व सत्य परिस्थिती लपवून ठेवून व त्याला त्याबद्दल पूर्ण माहीती असून हेतुपुरस्पर व जाणूनबुझून उज्वल नारलावार यांना पक्ष केलेले नाही. अर्जदार स्वतः जबाबदार आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार बिनबुडाची दिशाभूल करणारी असुन तथ्यहिन आहे. गै.अ च्या झालेल्या बदनामी बद्दल जबाबदार ठरवून त्याचे कडून नुकसान भरपाई म्हणून रु. 20,000/- देण्याचे आदेश परीत व्हावे. 9 अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ नि. 17 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. गै.अ यांनी लेखी बयानासोबत दस्तऐवज दाखल केले. गै.अ यांनी नि. 16 नुसार शपथपञ दाखल केला आहे. अर्जदार व गै.अ यांनी दाखल केलेले दस्तऐवज व शपथपञ आणि दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1) अर्जदार हा गै.अ चा ग्राहक होतो काय ? होय. 2) अर्जदाराने योग्य पक्ष केले आहे काय ? होय. 3) अर्जदार दैनिक बचत खात्याची रक्कम रु.18,575/- मिळण्यास पाञ आहे काय ? होय. 4) गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली आहे काय ? होय. 5) तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे काय ? होय. 6) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशा प्रमाणे // कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 : 10 गै.अ यांनी लेखी उत्तरात अर्जदार हा ग्राहक असल्याचे नाकारले आहे. परंतु गै.अ पतसंस्थेमध्ये दैनिक बचत खाता क्र. 527 होता हे मान्य केले आहे. अर्जदार यांनी श्री उज्वल नारलावार यांचे मार्फत दैनिक बचत खाता काढला होता हे मान्य केले. यावरुन अर्जदाराचा दैनिक बचत खाता गै.अ पतसंस्थेत होता हे दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होतो त्यामुळे अर्जदार हा गै.अ चा ग्राहक होतो व आहे असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. अर्जदार हा गै.अ चा ग्राहक असल्याने तक्रार मंचाला चालविण्याचा अधिकार आहे. या निर्णया प्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 2 : 11 गै.अ याने दुसरा आक्षेप असा घेतला आहे की, अभिकर्ता उज्वल नारलावार याला पक्ष केले नाही अर्जदाराला सर्व परिस्थिती माहित असुन सुध्दा तथ्यहिन तक्रार दाखल केली आहे. गै.अ याने लेखीबयानासोबत उज्वल ज्ञानेश्वर नारलावार, रा. बालाजी वार्ड, चंद्रपूर यास दि. 10/6/2006 रोजी दैनिक बचत ठेव योजना अभिकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे पञ दाखल केले आहे. नविन संचालक मंडळ यांनी सप्टेंबर 2010 ला पदभार स्विकारल्यानंतर अभिकर्ता याने अपहार केल्यामुळे त्याला तक्रारीत पक्ष केले नाही असा आक्षेप घेतलेला आहे. परंतु गै.अ यांनी घेतलेला आक्षेप संयुक्तिक नाही. कायदयाच्या दृष्टिकोणतुन सेवक (Servant) यांनी केलेल्या कार्याकरीता मालक (Master) जबाबदार आहे.(Vicarious liability) प्रस्तुत प्रकरणात गै.अ पतसंस्थेच्या वतीने अभिकर्ता हा दैनिक बचत ठेव खात्याच्या रकमा गै.अ. पतसंस्थेसाठी गोळा करीत होता. परंतु त्याला पक्ष केले नाही म्हणून तक्रार खारीज होण्यास पाञ नाही. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 3 ते 5 : 12 अर्जदार यांनी गै.अ पतसंस्थेत दैनिक बचत खाते उघडले होते त्याचा खाता क्रं 527 होता. अर्जदाराचे बचत खाते दि. 30/5/2009 ते दि. 30/4/2010 पर्यंत चालु होते. अर्जदार यांनी बचत खात्याची रक्क्म मागणी केली. गै.अ यांनी अर्जदारास धनादेश दि. 20/5/2010 ला चेक क्र. 944480 प्रमाणे देण्यात आला. अर्जदाराने तो धनादेश बॅक ऑफ इंडिया येथे जमा केला परंतु धनादेशा प्रमाणे रक्क्म मिळाली नाही. व धनादेश बाऊन्स होवून परत आला. गै.अ पतसंस्थेची कार्यकारणी सप्टेंबर 2010 मध्ये बदलून नविन कार्यकारणी अस्तित्वात आली व जुन्या कार्यकारणीच्या काळातील अभिलेखात विसंगती असल्यामुळे खातेदाराच्या रकमा दिल्या नाहीत. प्रस्तुत प्रकरणात गै.अ पतसंस्थेत जुन्या संचालक मंडळाचे अध्यक्ष व सचिवाचे सहीचा धनादेश देण्यात आला. धनादेश बाऊन्स झाला त्यांचे विरुध्द परक्राम्य अभिलेख अधिनियम 1881 (Negotiosle Instrument Act 1881) अंतर्गत कार्यवाही अर्जदाराने केली नाही. तसेच गै.अ पतसंस्थेविरुध्द कार्यवाही प्रलंबित असल्याचे काही सांगीतले नाही. गै.अ पतसंस्थेने अभिकर्ता उज्वल नारलावार याने अफरातफर केल्यामुळे रक्क्म देवू शकत नाही जो पर्यंत रु. 50,270/- त्यांचे कडून भरपाई होत नाही. गै.अ यांचे हे कथन उचित नाही. गै.अ याच्या कर्मचारी/एजंट/अभिकर्ता यांनी केलेल्या अफारातफरी करीता व पैशाच्या अपहाराकरीता खातेदाराची रक्क्म गोठवून ठेवता येणार नाही. गै.अ याने अभिकर्ता व पूर्वीचे संचालक मंडळ यांचे विरुध्द फौजदारी कार्यवाही केल्या बाबत काही पुरावा नाही. या कारणावरुन अर्जदाराचे दैनिक खात्याची रक्क्म परत करण्यास टाळाटाळ करणे ही गै.अ च्या सेवेतील न्युनता सिध्द होते. 13 गै.अ यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्त्याने अफारातफर केली किंवा बँक व्यवस्थापकाने योग्य नोदी घेतल्या नाही. याकारणाने अर्जदाराच्या खात्यातील रक्क्म परत न करणे उचित नाही. गै.अ याने नि. 13 नुसार दस्त दाखल केला आहे. सदर दस्ताऐवज दैनिक बचत खात्याचे रक्कम व्याजासह 18575 चा पेमेंट केले आहे असे दाखविले आहे, असे सदर पञात मान्य केले आहे. म्हणजेच अर्जदारास चेक व्दारे रक्कम दिल्या गेली परंतु तो धनादेश न वटल्यामुळे मिळाली नाही आणि आता अभिलेखात विसंगती आहे म्हणून देण्यास टाळाटाळ करणे न्युनतापूर्ण सेवा आहे. मा. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी HARIYANA GRAMIN BANK (EARLIER KNOWN AS AMBATA KURUKESHTRA GRAMIN BANK) & ANR. Vs. JASWINDER & ANR IV(2010) CPJ 210 (NC) या प्रकरणातील न्यायनिवाडयात पॅरा 6 व 7 मध्ये असा रेषो घेतला आहे की, कर्मचारी एजंट याने अपहार, अफरातफर, धोखाधडी केली असल्यास त्याकरिता मालक जबाबदार असतो असे मत दिले आहे. त्यात दिलेला रेषो या प्रकरणाला तंतोतंत लागु पडतो. पॅरा 7 मधील भाग खालील प्रमाणे. Therefore, as the fraud and embezzlement was committed by the employees of the OP-Bank in the course of employment, the State Commission has very rightly held that the OP/petitioner was vicariously liable for the action of its employees. 14 गै.अ पतसंस्थेनी लेखी उत्तरात असे कथन केले की अभिकर्ता एजंट यांनी 50,257/- रु. अफरातफर केलेली रक्कम त्यांनी जमा केल्यास गै.अ संस्था अर्जदार व त्या सारखे इतर 7 ठेवीदाराच्या बाबतीत जबाबदार राहील. गै.अ यांचे वरील कथन ग्राहय धरण्यास पाञ नाही. वरील न्ययानिवाडयात दिलेल्या मतानुसार अर्जदार यांनी पतसंस्थेत पैसे जमा केले. अर्जदाराकडून पतसंस्थेत जमा करण्याच्या नावाने रक्कम स्विकारण्यात आली यामुळे गै.अ पतसंस्था दैनिक बचत खात्याचे रक्कमे करीता दिलेल्या चेक ची रक्कम रु. 18,575/- अर्जदारास दिलेल्या चेकच्या दिनांका पासुन म्हणजेच (दस्त अ-1) दि. 20/5/2010 पासुन 9 टक्के व्याजाने देण्यास जबाबदार आहे. यावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र. 3 ते 5 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र. 6 15 वरील मुददा क्र. 1 ते 5 च्या विवेचना वरुन तक्रार अंशतः मंजुर करण्यास पाञ आहे या निर्णया प्रत हे न्यायमंच असले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गै.अ यांनी अर्जदाराचे दैनिक बचत खाता क्र. 527 करीता दिलेल्या चेक क्र. 944480 दि.20/5/2010 ची रक्कम रु.18575/- दि.20/5/2010 पासुन 9 टक्के व्याजाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (2) गै.अ यांनी अर्जदारास मानसीक, शारीरीक ञासापोटी 1,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत दयावे. (3) गै.अ यांनी मुद्दा 1 चे पालन विहीत मुदतीत न केल्यास वरील रक्कमेवर 12 टक्के व्याज रक्कम अर्जदाराच्या हातात पडे पर्यंत देय राहील. (4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 13/01/2012. |