1 अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे 1986 चे कलम 12 अन्वये तक्रार अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे आहे. 2 अर्जदार चंद्रपूर येथील रहिवासी आहे. गै.अ. यांच्याकडे खाता क्रं. 33 नुसार रक्क्म जमा केली आहे. म्हणून अर्जदार हा गै.अ. चा ग्राहक आहे. 3 अर्जदाराने दि. 24/10/2008 रोजी गै.अ. कडे खाते क्रं.33 अन्वये बचत खाते सुरु केले. त्यामध्ये 24/10/2008 पासुन 24/05/2010 पर्यत रु.12,555/- खात्यामध्ये जमा आहे. अर्जदाराने गै.अ. च्या कार्यालयामध्ये जाऊन रु 12,555/ची मागणी दि. 23/12/2010 ला केली. गै.अ. यांनी तपासणी करण्याचे कारण सांगून व आर्थिक परिस्थिती बरी नसल्याची सांगून अर्जदारास परत पाठविले गै.अ. यांनी पञ येईल असे सांगीतले परंतु आजपावेतो रक्कम घेण्यासाठी लेखीपञ आले नाही. बराच कालावधी लोटल्यानंतर दि.28/03/2011 व दि.25/04/2011 ला लेखीपञ पाठवून खात्यामधील रक्कमेची मागणी केली, परंतु गै.अ. यांनी रक्कम न देता खोटया स्वरुपाचे पञ पतसंस्थेकडून पाठविण्यात आले. गै.अ. रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. गै.अ. कडे जमा असलेली रक्कम वेळेवर न देणे, चकरा मारायला लावणे ही बाब सेवेतील न्युनता आहे व अनुचित प्रथा सुध्दा आहे. गै.अ. यांच्या न्युनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारास ञास झाला आहे. मानसीक, शारीरीक ञास सुध्दा झाला आहे. अर्जदाराने बचत ठेव खाते उघडून ठेव ठेवली गै.अ. यांनी रक्कम वेळेवर न देवून अर्जदाराचा विश्वासघात केला. गै.अ. विनाकारणाचे कारण सांगून रक्कम अडवून ठेवली आहे. त्यामुळे अर्जदाराची रक्कम रु. 12,555/- 12 टक्के व्याजासह आणि शारीरीक, मानसिक ञासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु. 5,000/- अशी सर्व रक्कम गै.अ. यांनी अर्जदारास दयावी असा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे. 4 अर्जदाराने तक्रारीसोबत नि. 5 नुसार 7 झेरॉक्स व अस्सल दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आले. गै.अ. यांनी नि. 14 नुसार लेखीउत्तर दाखल केले. 5 गै.अ. यांनी तक्रार क्र. 151/11 व 152/11 चे लेखी उत्तर सामायीक पणे दाखल केले आहे. अर्जदार हा गै.अ.चा ग्राहक असल्याचे, गै.अ. ला मान्य नाही. अर्जदाराने दि. 25/3/09 रोजी बचत खाते क्र. 43 सुरु केले व दि. 26/2/11 पर्यंत एक लाख बारा हजार नऊशे एकोनअंशी जमा केले हे खोटे आहे. गै.अ. ने कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. अर्जदाराने केलेली मागणी ही गै.अ. ला मान्य नाही. अर्जदाराने स्वतः गै.अ. पतसंस्थेची फसवणूक करुन लुबाडले आहे. व अशा व्यक्तीने गै.अ.वर विश्वासघात केल्याचा आरोप लावणे हास्यासपद आहे. अर्जदार हा गै.अ. चा ग्राहक नसल्यामुळे तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. अर्जदाराची मागणी खोटी, चुकीची बेकायदेशीर व नियमबाहय असुन अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी. 6 गै.अ. यांनी नि. 14 नुसार दाखल केलेल्या लेखीबयानात अतिरिक्त कथन केलें आहे की, गै.अ. ने जुन्या संचालक मंडळाकडून सप्टेंबर 2010 मध्ये पदभार हाती घेतला. गै.अ. ने ताळेबंद व संगणका वरील अभिलेख तपासुन पाहीला त्यावेळी खात्यातील हिशोब जुन्या संचालक मंडळांनी व त्यांच्या कर्मचा-यांनी ठेवलेल्या खात्यात व हिशोबात विसंगती व अनियमितता असल्याचे दिसुन आले. विशेष करुन दैनिक आवर्त जमा खाते, बचत खाते यात जास्त अनियमितता व विसंगती आहेत. 7 प्रस्तुत मामल्यातील अर्जदार अवंती ऑप्टिकल आणि ग्राहक तक्रार क्र.152/11 मधील अर्जदार श्री. गणेश खुशालदास जोशी हे दोन्ही एकच व्यक्ति असुन त्यांनी दोन्ही नावांनी प्रत्येकी एक चालु खाते क्र. 43 आणि 33 सुरु केले. वरील दोन्ही खात्याचे नविन संचालक मंडळाने निरिक्षण व तपासणी केले असता असे लक्षात आले की, दि. 3/11/2010 पासुन चालु खाते क्र. 43 जो अवंती ऑप्टिकल नावाने आहे तो नियमित रित्या चालविण्यात आलेला आहे. पण चालु खाते क्र. 33 जो गणेश जोशी यांनी त्याचे नावाने दि. 24/10/2008 रोजी रक्कम रु. 500 जमा करुन उघडले. सदर खात्याला सुरुवातीपासुन जास्तीचे रक्कम काढणे सुरु ठेवले. विशेष म्हणजे ही रक्कम काढतांना त्याच्या वरील खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नव्हती. 24 ऑक्टोंबर 2008 रोजी उघडलेल्या चालु खात्या क्र. 33 मध्ये ऑगस्ट 2009 पर्यंत अंदाजे 10 महिन्याचे काळात एकूण 12 वेळा अनाधिकृत रित्या रु. 4,25,641/- अग्रीम उचल घेण्यात आली. या कालावधीत कोणतीही रक्कम शिल्लक नव्हती. शिवाय वरील काढलेल्या रक्कमेवर कोणतेही व्याज लावण्यात आले नाही. खाता क्र. 33 व 43 ची सखोल चौकशी केले असता लक्षात आले की, चालु खाते क्र. 43 मध्ये रक्कम उपलब्ध असुन सुध्दा त्याने त्याचे चालु खाते क्र. 33 मधुन उचल केल्या. अर्जदाराने गै.अ ची आर्थिक रित्या नुकसान करण्याच्या हेतुने बुध्दीपुरस्पर लबाडी करुन फसवणूक केली आहे. अर्जदार हा गै.अ च्या रक्कमेची प्रबंधक श्री.मोहन जिवतोडे यांचेशी संगणमत करुन क्रेडीट फॅसिलिटी नसतांना सुध्दा रक्कम काढून घेत होता. गै.अ चे माजी अध्यक्ष श्री गोपाल मंडल यांचे लक्षात दि. 7/9/09 ला आल्यानंतर त्यांनी दैनिक जमा आवर्त खाता क्र. डिआरडी 5/430 मध्ये उपलब्ध रक्कम चालु खाते क्र. 33 मध्ये स्थानातरण करुन वसूल करण्यात येणा-या रक्कमेपोटी समायोजित केले. दि. 11/10/2011 रोजी लेखापरिक्षक यांनी दिलेल्या अहवाला प्रमाणे गै.अ च्या अनाधिकृत रित्या खाते क्र. 33 मधून काढून दुरुपयोग केल्याचे स्पष्ट केले. अर्जदारावर व्याजाची रक्कम रु. 9,062.60/- व्याज व दंड आकारण्याचे प्रस्तावित केले. अर्जदाराने केलेल्या अफरातफर व अपहारानंतर सुध्दा अर्जदाराच्या घरी त्याचे मुलाचे लग्न असल्याचे कारणा वरुन फेब्रुवारी मध्ये रु. 40,000/- उचल करण्याची परवानगी देण्यात आली. माणुसकीच्या नात्याने अर्जदाराला केलेल्या मदतीचा गैरफायदा घेऊन गै.अ वर दडपण आणण्याकरीता दोन्ही तक्रारी दाखल केल्या आहेत. अर्जदाराने अतिशय जास्त महत्वाचा व होणा-या आदेशावर प्रत्यक्ष रित्या परिणाम करणा-या बाबींना हेतुपुरस्पर व जाणूनबुजून लपवून ठेवले. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा अर्ज खारीज करीत असतांना परिस्थिती व वस्तुस्थितीला नजरे समोर ठेवून अर्जदारावर नुकसान भरपाई म्हणून रु. 1,00,000/- गै.अ ला देण्याचा आदेश व्हावा. तसेच गै.अ आलेल्या शारीरीक व मानसीक ञासापोटी रु. 25,000/- व मामल्याचा खर्च रु. 10,000/- अर्जदाराने गै.अ ला दयावा असा आदेश व्हावा. 8 गै.अ याने लेखी उत्तरासोबत नि. 15 नुसार 7 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले. लेखीबयानाच्या कथना पृष्ठार्थ नि. 17 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. अर्जदार यानी तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ, पुरावा शपथपञ नि. 18 नुसार दाखल केला आहे. अर्जदार व गै.अ यांनी दाखल केलेले दस्तऐवज आणि उभय पक्षाच्या वतीने केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 9 अर्जदार यांनी गै.अ सहयोग नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर र.नं. 384 (यापुढे संक्षिप्त पतसंस्था) यांचे कडे दि. 24/10/2008 रोजी रु. 500/- जमा करुन बचत खाता क्र. 33 काढला. अर्जदाराने अ- 1 वर बचत खात्याची पासबुकाची झेरॉक्स दाखल केली आहे. सदर पासबुकाचे अवलोकन केले असता. 24/10/08 ला रु. 500/- जमा करुन खाता काढला आणि दुसरे दिवशी रु. 39,857/- विड़्रॉल करण्यात आले. जेव्हा की, त्याचे खात्यात विड्रॉल करण्याजोगी रक्कम नव्हती व नाही. अर्जदार यांचे बचत खाता क्र. 33 मध्ये शिल्लक नसतांनाही विड्रॉल केले आहेत. गै.अ पतसंस्थेची रक्कम एकमुस्त उचल करुन ती रक्कम थोडी थोडी खात्यात जमा करण्यात आली आणि त्यावर कोणताही व्याज पतसंस्थेला देण्यात आलेला दिसुन येत नाही. वास्तविक बचत खात्याच्या पासबुकात जी रक्कम जमा असेल तीच रक्कम विड्रॉल करता येतो. प्रस्तुत प्रकरणात नि.5 अ-1 बचत खाता क्र. 33 च्या पासबुकातील नोंदी खालील प्रमाणे. तारीख Date | तपशिल Particulars | चेक क्र. Cheque No. | रक्क्म ठेवली Deposit | रक्कम काढली Withdrawl | शिल्लक Balance | सही Sign. | 24/10/08 | By Cash | | 500 | | -- | | 500 | | अस्पष्ट | 24/10/08 | To Cash | | | | 39,857 | | 39,357 | | अस्पष्ट | 27/10/08 | To Cash | | 4,000 | | -- | | 35,357 | | अस्पष्ट | 30/10/08 | By Cash | | 4,000 | | -- | | 31,357 | | अस्पष्ट | 31/10/08 | By Cash | | 6,000 | | -- | | 25,357 | | अस्पष्ट |
वरील प्रमाणे पासबुकामधील नोंदी घेतलेल्या आहे या नोंदी वरुन एक स्पष्ट होते की, जमा केलेली रककम शिल्लक रक्कमेतुन कमी झालेली आहे. जेव्हा की, प्रचलित बचत खात्याच्या नोंदीनुसार जमा केलेली रक्कम ही शिल्लक रक्कमेला जोडून वाढ झालेली असते. प्रस्तुत प्रकरणात खाता क्रं.33 हा कॅश क्रेडीट खाता नाही. अर्जदाराने तक्रारी मध्ये असे कुठेही नमुद केलें नाही की, गै.अ पतसंस्थेने सीसी लिमीट खाता उघडला होता. यावरुन अर्जदाराने पतसंस्थेची एकमुस्त रक्कम उचल करुन ती रक्कम आपले सोयी प्रमाणे परत केली. गै.अ पतसंस्थेच्या प्रमाणित लेखापरिक्षकाने खात्याची चौकशी केली असता, अर्जदार यानी हेतुपुरस्परपणे लबाडीने खात्यात शिल्लक नसतांनाही रक्कम उचल केली हे अर्जदाराचे कृत्य न्यायसंगत नाही. गै.अ पतसंस्थेने जेव्हा प्रमाणित लेखापरिक्षक श्री.एम.ए.रशिद यांनी ऑडीट रिपोर्ट मध्ये ही बाब निर्दशनात आणून दिली, तेव्हा पतसंस्थेची रक्कम अनाधिकृतपणे वापरल्याने रु. 9,062.60/- ची आकारणी केली यात काहीही गैर नाही.
10 अर्जदार यानी या तक्रारी सोबत दुसरी तक्रार क्र. 151/11 दाखल केली आहे. सदर तक्रार बचत खाता क्र. 43 चे संदर्भात आहे. अर्जदाराचे खाता क्र. 43 मध्ये रक्कम शिल्लक असतांनाही तिथुन विड्रॉल न करता खाता क्र. 33 मध्ये शिल्लक नसतांनाही विड्रॉल केलेले आहे. गै.अ यांनी लेखीउत्तरात घेतलेला आक्षेप आणि केलेले कथन योग्य असुन, ग्राहय धरण्यास पाञ आहे. गै.अ यांनी खाता क्र. 33 ची रक्कम उचल करु दिली नाही किंवा बचत खात क्र. 33 च्या व्यवहारा करीता खाता क्र. 43 ची रक्कम गोठवून ठेवली यात गै.अ पतसंस्थेने सदस्याच्या हिताचे दृष्टीने कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही. गै.अ पतसंस्थेने अर्जदारास खात्यातील रककम उचल करु दिली नाही म्हणून सेंवा देण्यास न्युनता केली हे सिध्द होत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही. 11 अर्जदार यांने शपथपञात असे कथन केले की, लेझर बुकात खातेदारांच्या खात्याची कशाप्रमाणे नोंदी ठेवली याचेशी अर्जदाराचा तिळमाञ ही संबंध नाही. या अर्जदाराच्या कथनात काहीही तथ्य नाही. अर्जदाराने पासबुकात असलेल्या नोंदी वरुन शिल्लक असलेली रक्कमेची मागणी करुनही गै.अ पतसंस्थेने दिली नाही. म्हणून दाखल केली आहे. अर्जदाराकडे असलेल्या पासबुकात खात्यात शिल्लक नाही हे माहीत असुनही पतसंस्थेतुन रक्कमेची उचल केली.यात अर्जदाराला सर्व जाणीव असुनही त्याचे सोबत तिळमाञ संबंध नाही म्हणणे न्यायसंगत नाही. एकंदरीत उपलब्ध रेकॉर्ड वरुन गै.अ पतसंस्थेने अर्जदारास सेवा देण्यास कोणतीही न्युनता केलेली नाही असाच निष्कर्ष निघतो.
12 गै.अ यांनी लेखीबयानात बचत खाता क्र. 43 व 33 ची सखोल चौकशी केल्यानंतर संचालक मंडळाने सभा घेऊन, त्यावर चर्चा करुन शिल्लक असलेली रक्कम त्यांना देंण्यात येईल असे कथन केले आहे त्याप्रमाणे गै.अ पतसंस्थेने योग्य निर्णय घ्यावा.
13 गै.अ पतसंस्थेनी लेखी उत्तरात अर्जदाराची तक्रार रु.1,00,000/- नुकसान भरपाई मानसीक ञासापोटी 25,000/- आणि मामल्याचा खर्च 10,000/- अर्जदाराकडून मागणी केली आहे. गै.अ पतसंस्थेची ही मागणी मान्य करण्यास पाञ नाही. गै.अ चे मॅनेजर मोहन जिवतोडे यांचेशी संगणत करुन उचल केल्याचा आक्षेप केला आहे. परंतु पतसंस्थेचे त्याच्या मॅनेजर वर नियंञण नाही, असेच दाखल रेकॉर्ड वरुन दिसुन येतो. गै.अ यांनी अर्जदार ग्राहक नसल्याचा आक्षेप घेतला आहे. परंतु अतिरिक्त बयानात हे मान्य केले आहे की, अर्जदाराच्या नावाने पतसंस्थेत खाता क्र. 33 व 43 असल्याचे मान्य केले आहे. यावरुन अर्जदार व गै.अ यांचे ग्राहकी संबंध आहेत हे सिध्द होतो. 14 एकंदरीत उपलब्ध रेकॉर्ड वरुन आणि गै.अ पतसंस्थेने दाखल केलेल्या लेखी बयानातील घेतलेल्या आक्षेपा वरुन गै.अ पतसंस्थेने अर्जदारास सेवा देण्यास न्युनता केली नाही या निर्णया प्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार नामंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गै.अ यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) अर्जदार व गै.अ यांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 13/01/2012 |