(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 23.11.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रार पडताळणी करुन प्राथमिक सुनावणीसाठी ठेवण्यात आले. पडताळणी मध्ये तक्रार मुदतीत नसल्याचा मुद्दा दिसून आला. अर्जदार यांनी दि.4.7.1989 रोजी स्टॅम्प पेपरवर विक्रीपञ मथुराबाई वासुदेव वसाडकर यांचेकडून करुन घेतला, तेंव्हापासून अर्जदार याचे मालकी हक्क आहे. अर्जदाराचे तक्रारीचे अवलोकन केले असता, तक्रार पूर्णपणे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 (ए) नुसार मुदतबाह्य आहे. अर्जदाराने, मथुराबाई वसाडकर कडून सन 1989 मध्ये प्लॉट घेतला तेंव्हापासून कोणतीही कार्यवाही केली नाही, आणि आता वादास कारण घडले म्हणून तक्रार दाखल केली आहे. वास्तविक, वादास कारण हे मथुराबाई वसाडकर कडून स्टॅम्प पेपरवर विक्रीपञ करुन घेतले, तेंव्हापासून घडले आहे. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार ही पूर्णतः मुदतबाह्य असल्याने प्राथमिक सुनावणीतच तक्रार स्विकारण्यास पाञ नाही. मा.सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी, Kandimalla Raghavaiah & Co.-Vs.- National Insurance Co. Ltd. And another, 2009 CTJ 951 (Supreme Court)(CP), या प्रकरणात दिलेला रेशो या तक्रारीला लागू पडते. अर्जदाराने सन 1989 पासून 2011 पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही, आणि मुदत संपल्यानंतर ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे, तसेच पडताळणीमध्ये मुदतीत नसल्याचा आक्षेप घेतला असतांनाही, विलंब माफीचा अर्ज सुध्दा दाखल केला नाही. मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी तक्रार क्र.132/2010 मध्ये पारीत केलेल्या आदेशात वादास कारण घडल्याबाबत रेशो दिलेला आहे. त्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे. Along with Complaint there is no delay condonation application and/or a prayer in the complaint coupled with explanation of delay is also not made. That means either the complainant could have made composite complaint along with delay application or separate delay condonation application could have been filed. None of the course is follo0wed by the complaint for the best reasons known to them. Hence, we do not find any merit in complaint so as to admit it. It is therefore rejected. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी वरील प्रकरणात दिलेल्या मता नुसार आणि मा.राज्य आयोग, मुंबई यांनी दिलेल्या मतानुसार अर्जदाराची तक्रार ही पूर्णपणे ग्राहक संरक्षण कायद्याच्या 24 (ए) नुसार वादास कारण घडल्यापासून तक्रार मुदतबाह्य आहे. अर्जदाराने, कोणताही विलंब माफीचा अर्ज जोडला नाही. त्यामुळे, तक्रार प्राथमिक सुनावणीत स्विकारण्यास पाञ नाही. सबब, तक्रार प्राथमिक सुनावणीत अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदाराने मुळ दस्ताऐवज दाखल केले असल्यास झेरॉक्स प्रत रेकॉर्डवर ठेवून परत करण्यात यावे. तसेच, सदस्य संच परत करण्यांत यावे. (3) अर्जदारास आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :23/11/2011. |