Maharashtra

Nagpur

CC/743/2018

PRAKASH RAMAJI BAVANGADE - Complainant(s)

Versus

PRESIDENT SOU. NANDINI SHAILESH DHOBLE, AADARSH DHANLAXMI URBAN CREDIT CO-OPERATIVE SOCIETY MARYADIT - Opp.Party(s)

02 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/743/2018
( Date of Filing : 19 Dec 2018 )
 
1. PRAKASH RAMAJI BAVANGADE
JUNA BAGADGANG, GANGABAI GHAT, BHANDARA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. PRESIDENT SOU. NANDINI SHAILESH DHOBLE, AADARSH DHANLAXMI URBAN CREDIT CO-OPERATIVE SOCIETY MARYADIT
CORPORATION COLONY, PLOT NO 6A, NORTH ABAZHARI ROAD, NEAR DAGA LAYOUT , AMBAZHARI , NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. DEPUTY PRESIDENT, AADARSH DHANLAXMI URBAN CREDIT CO-OPERATIE SOCIETY MARYADIT
JUNA BAGADGANJ, BEHIND VAISHNODEVI APARTMENT, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. SECRATARY, AADARSH DHANLAXMI URBAN CREDIT CO-OPERATIE SOCIETY MARYADIT
JUNA BAGADGANJ, BEHIND VAISHNODEVI APARTMENT, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. JOINT SECRETARY AADARSH DHANLAXMI URBAN CREDIT CO-OPERATIE SOCIETY MARYADIT
JUNA BAGADGANJ, BEHIND VAISHNODEVI APARTMENT, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
5. KOSHADHAKSHA AADARSH DHANLAXMI URBAN CREDIT CO-OPERATIE SOCIETY MARYADIT
JUNA BAGADGANJ, BEHIND VAISHNODEVI APARTMENT, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 02 Aug 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे सोसायटी मध्‍ये मुदती ठेवी मध्‍ये दिनांक २३/१२/२०१५ रोजी रुपये ९,०००/- ६ टक्‍के दराने ६ (चुकीने १२) महिण्‍याकरिता ठेवले होते. सदरहू मुदती ठेव दिनांक २३/६/२०१६ रोजी परिपक्‍व झाली असून विरुध्‍द पक्षाने आजपावेतो तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम रुपये ९,७२०/- अदा केली नाही. तक्रारकर्ता मुदती ठेवीतील रक्‍कम मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाचे सोसायटीला दिनांक २४/६/२०१६ रोजी गेला होता परंतु विरध्‍द पक्षाने येन-केन कारण सांगून तक्रारकर्त्‍याला परत पाठविले व मुदती ठेवीतील परिपक्‍वता रक्‍कम रुपये ९,२७०/- अदा केली नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या सोसायटीला अनेकवेळा सहयोगी सोबत भेट दिली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीतील रक्‍कम व्‍याजासह अदा केली नाही.
  3. तक्रारकर्त्‍याला त्‍याचे मुदती ठेवीतील रक्‍कम अदा न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत  दिनांक ३/९/२०१८ ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसचे उत्‍तर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने तक्रारकर्त्‍याला दिनांक २८/११/२०१८ रोजी दिले. विरुध्‍द पक्षाने त्‍याचे नोटीस उत्‍तरात मुदती ठेवीतील रक्‍कम तत्‍कालीन अध्‍यक्ष श्री रविंद्र दिवटे व तत्‍कालीन सचिव श्री सुनिल ईटनकर यांच्‍यावर थोपवण्‍याचा प्रयत्‍न करुन पैसे देण्‍यास रितसर टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचात प्रकरण दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश  देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीमधील परिपक्‍वता रक्‍कम १२ टक्‍के दराने अदा करावी.
  2. मानसिक, शारीरिक ञासाकरिता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करण्‍यात यावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांचा लेखी जबाब- विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांनी त्‍यांचे अधिकचे उत्‍तरात  नमूद केले की, विरुध्‍द पक्ष ही नागपूर येथील आदर्श धनलक्ष्‍मी अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी र.नं सी.आर.५३८/९६ जुना बगडगंज वैष्‍णोदेवी अपार्टमेंट चे मागे नागपूर या सोसायटीची दिनांक २१/१/२०१७ रोजी झालेल्‍या निवडणूकी नंतर दिनांक ५/२/२०१७ रोजीपदाधिकारी/अध्‍यक्षनेमण्‍यात आली. त्‍यापूर्वी झालेल्‍या व्‍यवहाराशी यांचेशी गैरअर्जदार क्रमांक १ चे काही संबंध येत नाही म्‍हणून अमान्‍य. गैरअर्जदार क्रमांक १ यांनी गर्जवसूली ची कार्यवाही सुरु केलेली आहे. गैरअर्जदार हिला दिनांक २८/५/२०१८ पासून कलम १५६ खाली कर्ज वसूलीचे अधिकार प्राप्‍त झालेले असून त्‍या अनुषंगाने कर्ज वसूली च्‍या कार्याला प्रारंभ केलेला आहे. आपण तक्रार- कर्ता यांनी ठेवी जमा केल्‍या तेव्‍हा जे संचालक मंडळ कार्यरत होते, त्‍यांनी अवास्‍तव व अवाजवी कर्जवाटप केल्‍यामुळे, संस्‍था बंद पडण्‍याच्‍या स्थितीत होती. सदरहू कर्जवसुली ची कार्यवाही गैरअर्जदार क्रमांक १ करीत असून गैरअर्जदार क्रमांक १ ही आदर्श धनलक्ष्‍मी अर्बन क्रेडीट को. ऑपरेटीव्‍ह सोसायटी र. नंसी. आर./५३८/९६ जुना बगडगंज वैष्‍णोदेवी अपार्टमेंटचे मागे नागपूर या सोसायटीची दिनांक २१/१/२०१७ रोजी झालेल्‍या निवडणूकी नंतर दिनांक ५/२/२०१७ रोजी पदाधिकारी/अध्‍यक्ष नेमण्‍यात आली.
  2. तक्रारकर्ता यांनी संस्‍थेत एफ.डी. आर. मुदत ठेव दिनांक २३/१२/२०१५ रोजी ठेवली होती. या कालावधीत गैरअर्जदार क्रमांक १ ही संस्‍थेत अधिकारी किंवा अध्‍यक्ष अशा कुठल्‍याही पदावर कार्यरत नव्‍हती. तक्रारकर्ता यांनी गैरअर्जदार क्रमांक १ विरुध्‍द खोटी तक्रार दाखल केलेली आहे.
  3. तक्रारकर्ता यांच्‍या या संस्‍थेत एफ.डी.आर. मुदत ठेवी करिता त्‍यावेळचे अध्‍यक्ष व संस्‍थेचे संस्‍थापक श्री रवीन्‍द्र दिवटे व संस्‍थेचे सचिव सुनील इटनकर हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत. कारण दिनांक ५/२/२०१७ रोजी जेव्‍हा संस्‍था गैरअर्जदार क्रमांक १ जवळ आली तेव्‍हा संस्‍थेचे सर्व कामकाज ठप्‍प झालेले होते व संस्‍था बंद पडण्‍याचे स्थितीत होती. परत संस्‍थेचे कामकाज सुरळीत करण्‍याकरिता गैरअर्जदार क्रमांक १ प्रयत्‍नरत असून पूर्वीच्‍या संचालकांनी, अध्‍यक्षांनी व संस्‍थेचे संस्‍थापक श्री रवीन्‍द्र दिवटे व संस्‍थेचे सचिव सुनील इटनकर यांनी अवास्‍तव कर्ज वाटप केल्‍यामुळै संस्‍थेचे नुकसान केलेले आहे व कर्जदारांकडून आवश्‍यक ते कागदपञ न घेता कर्ज वाटप केलेले आहे, असा शेरा लेखापरीक्षकाने आपल्‍या दिनांक १/४/२०१३ ते ३१ मार्च २०१५ पर्यंतच्‍या लेखापरीक्षण अहवालात दिलेला आहे.
  4. कर्जवसूलीच्‍या कामाची सुरवात गैरअर्जदार क्रमांक १ ने केलेली आहे व त्‍या नंतर जसजशी वसूली होईल तसतशे थोडे-थोडे करुन सद्य संस्‍थेची परिस्थिती लक्षात घेवून रक्‍कम देता येईल आणि तक्रारकर्ता ची रक्‍कम, जसजशी वसुली होईल त्‍याप्रमाणे कायद्यानुसार देण्‍यात येईल त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाविरुध्‍दची तक्रार रद्द करण्‍यात यावी.
  5. उभयपक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेज, प्रतिउत्‍तर व लेखी युक्तिवाद व तक्रारकर्त्‍याचा तोंडी युक्तिवाद ऐकूण घेतल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?

तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय ?              होय

  1. काय आदेश ?                                                                          अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे सोसायटी मध्‍ये मुदती ठेवी मध्‍ये दिनांक २३/१२/२०१५ रोजी रुपये ९,०००/- ६ टक्‍के दराने ६ महिण्‍याकरिता गुंतविले होते. तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीतील रक्‍कम परिपक्‍वता तारीख दिनांक २२/६/२०१६ रोजी रुपये ९,२७०/- मिळणार होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष सोसायटीला अनेक वेळा विनंती करुनही विरुध्‍द पक्ष सोसायटीने तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीतील परिपक्‍वता रक्‍कम रुपये ९,२७०/- अदा केली नाही, ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रति ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांनी वैयक्तिक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीतील परिपक्‍वता रक्‍कम रुपये ९,२७०/- दिनांक २३/६/२०१६ पासून १० टक्‍के दराने तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम व्‍याजासह अदा होईस्‍तोवर अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ५ यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरिता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.