Maharashtra

Chandrapur

CC/16/95

Shri Sunil Namdeo Bhurase At Vyhad - Complainant(s)

Versus

President Shalutai Sudhakar Wereddywar Pawan Gramin bigar Sheti Sahakari Pat santha Ltd Vayhad tah S - Opp.Party(s)

N.R.Khobragade

31 Jul 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/16/95
 
1. Shri Sunil Namdeo Bhurase At Vyhad
At vayhad Tah Saoli
chandrapur
maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. President Shalutai Sudhakar Wereddywar Pawan Gramin bigar Sheti Sahakari Pat santha Ltd Vayhad tah Saoli
At vayhad kurd
chandrapur
mahrashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya) MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 31 Jul 2017
Final Order / Judgement
 

::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये,  उमेश वि. जावळीकर  मा. अध्‍यक्ष

१.         सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.         तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ यांच्‍याकडे दिनांक १५.०७.२०१३ ते ३०.०६.२०१४ पर्यंत एकूण रक्कम रु. ७०,७८५/- सामनेवाले क्र.१ यांच्‍या दैनिक ठेव या गुंतवणुक योजनेमध्‍ये जमा केले. सदर रक्कम तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ यांच्‍याकडे मागितली असता सामनेवाले क्र. १ यांनी सदर रक्कम सामनेवाले क्र. २ यांच्‍याकडून प्राप्त करावी असे सांगितले. तसेच सामनेवाले क्र. २  यांच्‍याकडे बचत खाते क्र. २० मध्ये जमा असलेली रक्कम रु. ७२,०००/-  सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारास अदा केली नाही. सदर रक्कम जमा असल्याबाबत खाते पासबुक सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस दिले. त्याप्रमाणे सदर रक्कम सामनेवाले क्र. १ व २ तक्रारदारांस देण्‍यांस अटी व शर्तीप्रमाणे पात्र होते. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस वेळोवेळी सदर योजनेत गुंतवणूक केल्‍याबद्दल पावती दिली. सामनेवाले यांच्‍या योजनेच्‍या अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाले क्र. १ व २ तक्रारदारांस सदर रक्कम अदा करतील, असे माहितीपत्रिकेत नमूद आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्रांची पाहणी केली असता. सामनेवाले क्र. १ व २ यांच्‍या  माहितीपत्रकात नमूद प्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ व २ यांच्‍याकडे जमा केलेली रक्‍कम सामनेवाले क्र. १ व २ यांनी मुदतीत परत न करून तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ व २ यांना दिनांक २४.०२.२०१६ व दिनांक १८.०३.२०१६ रोजी स्वत: व दिनांक २७.०५.२०१६ रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून करारातील अटींची पुर्तता करणेंस लेखी कळविले. सदर नोटीस सामनेवाले क्र. १ व २ यांनी स्विकारली. त्‍यानंतरही सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह परत न दिल्‍याने, तक्रारदाराने प्रस्‍तूत तक्रार, गुंतवणूक रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारांस सामनेवाले क्र. १ व २ यांनी अदा करावी, तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्‍मक रक्‍कम सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस अदा करावी, अशी विनंती केली आहे. 

३.         सामनेवाले क्र. १ व २ यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले क्र. १ व २ यांना नोटीस प्राप्त होऊनदेखील हजर न राहिल्याने  सामनेवाले क्र. १ व २ यांच्‍याविरूध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍यांत यावी, असा विनंती अर्ज तक्रारदाराने दिला. न्‍यायाच्‍या दृष्‍टीने अर्ज मंजूर करण्‍यांत आला. सदर आदेश आज रोजी अबाधीत आहेत.

४.         तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्राबाबतची पुरसीस, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्‍यांत येतात. 

           मुद्दे                                                      निष्‍कर्ष 

 

१.    सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारास

     कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची

     बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ?                          होय    

२.      सामनेवाले क्र. १ व २ तक्रारदारास नुकसानभरपाई

     अदा करण्यास पात्र आहेत काय ?                    होय

३.    आदेश ?                                                                अंशतः मान्‍य

 

                       

 

 

कारण मिमांसा

मुद्दा क्र. १ व २ :

५.          तक्रारदार यांनी दिनांक १५.०७.२०१३ ते ३०.०६.२०१४ पर्यंत एकूण रक्कम रु. ७०,७८५/- सामनेवाले क्र. १ यांच्‍या दैनिक ठेव या गुंतवणुक योजनेमध्‍ये जमा केले. तसेच सामनेवाले क्र. २ यांच्याकडे  बचत खाते क्र. २० मध्ये रक्कम रु. ७२,०००/- जमा केले. सदर दोन्ही रक्कमा जमा असल्याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल आहे. सामनेवाले क्र २ यांनी तक्रारदारास दिनांक १७.१०.२०१५ रोजी पत्र पाठवून जमा रकमेबाबतचा वादाचे निराकरण करावे असे कळविले. परंतु त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत सामनेवाले क्र २ यांनी स्पष्टीकरण न दिल्याने तक्रारदार यांची वाद्कथने सत्यापित असल्याची बाब सिद्ध होते. सामनेवाले क्र. १ यांच्याकडे जमा केलेल्या रकमेबाबत वाद असल्यास सामनेवाले क्र. १ यांनी मंचासमक्ष सांगणे आवश्यक होते. या बाबीची पूर्तता सामनेवाले यांनी केली नाही. तसेच बचत खाते करारातील अटी व शर्तीचा भंग झाल्याने न्यायोचीत कारणाशिवाय तक्रारदार यांची जमा रक्कम अदा न केल्याची बाब सिद्ध होते.  सामनेवाले क्र. १ व २ यांनी, न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याची बाब तक्रारदार यांनी सिद्ध केली आहे. सामनेवाले क्र. १ व २ यांनी जमा रक्कम अदा न केल्याने तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारास बचत खाते रक्कम सेवेबाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन, अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्ध होते. तक्रारदारानी लेखी आक्षेप सादर करूनही सामनेवाले यांनी बचत खाते रक्कम अदा करण्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्‍यावरून सिध्‍द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्‍वये “सेवा” या संज्ञेची व्‍याप्‍ती पाहता वैध बचत खाते रक्कम करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्‍यायतत्‍व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्‍कर्षावरून, तक्रारदारांनी सदर तक्रार बचत खाते करार सेवेबाबत दाखल केल्‍याने व ही बाब कागदोपत्री पुराव्‍याने सिध्‍द झाल्‍याने, सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारास बचत खाते रक्कम कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब सिध्‍द झाल्‍याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्‍द झाल्‍याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

मुद्दा क्र. ३ : 

६.          मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

आदेश

 

१.   ग्राहक तक्रार क्र. ९५/२०१६ अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

२.   सामनेवाले क्र. १ व २ यांनी, तक्रारदार यांना बचत खाते रक्कम        कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार,           सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केल्‍याची बाब जाहीर करण्यात येते.

३.   सामनेवाले क्र.१ यांचे व्यवहार सामनेवाले क्र, २ यांनी        स्विकारल्याने सामनेवाले क्र. १ यांचेकडील तक्रारदार यांचे बचत           खाते क्र. १३७ मधील रक्कम आज रोजी सामनेवाले क्र. २           यांचेकडील तक्रारदार यांचे बचत खाते क्र. २० मध्ये जमा             असलेली रक्कम रु. ७२,०००/- सामनेवाले क्र १ व २ यांनी                वैयक्तिक व संयुक्तीकपणे दिनांक ३१.०३.२०१५ पासून अदा             करेपर्यंत द.सा.द.से. १२% व्याजासह तक्रारदार यांना                  अदा करावी.

४.   सामनेवाले क्र.१ व २ यांनी बचत खाते रक्कम कराराबाबत             सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर करुन तक्रारदार यांना मानसिक,                शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.      २०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना        अदा करावे.

५.  उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी.

 

 

 

 श्रीमती. कल्‍पना जांगडे  श्री. उमेश वि. जावळीकर   श्रीमती. किर्ती गाडगीळ          

       (सदस्‍या)          (अध्‍यक्ष)                (सदस्‍या)   

                             

 

 

 

 

 
 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya)]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.