तक्रारकर्ता : मोती पैकू निंबोने वय- अंदाजे 44 वर्ष, धंदा-व्यवसाय, राहणार- नयाकुंड, पोस्ट नयाकुंड, तहसिल पारशिवनी, जिल्हा नागपूर ::विरुध्द:: विरुध्दपक्ष : 1) अध्यक्ष, पानोरमीक गट कंपनी 2) प्राधिकृत हस्ताक्षरकर्ता, पानोरमीक गट कंपनी पत्ता-पेन कॉर्ड क्लबज (केंद्रीय संस्थापक वि धी संस्थापित कंपनी, पंजीकृत क्रं-11/105363), कार्यालय-111/113, कालीदास उद्योग भवनी, सेन्चुरी बाजार जवळ, प्रभादेवी, मुंबई-25 3) व्यवस्थापक, दि न्यु इंडीया इन्शोरन्स कंपनी लिमिटेड, न्यु इंडीया इन्शोरन्स बिल्डींग, 87, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-400001 4) शाखा व्यवस्थापक, पेनकार्ड क्लबज लिमिटेड, एस.टी.स्टॅन्ड, गणेशपेठ, नागपूर-18 5) व्यवस्थापक, दि ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनी लि. मार्फत- क्षेत्रीय कार्यालय, डॉ.आंबेडकर भवन, एम.ई.सी.एल.परिसर, 4 था माळा, हाई लॅण्ड ड्राईव, सेमीनरी हिल्स, नागपूर-06 6) व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्शोरन्स कं.लि. रमन हाऊस, एच.टी.पारेख मार्ग, 169, बॅक-बे, रिक्लेमेशन, मुंबई-20 ***** गणपूर्ती :– 1) श्री अमोघ श्यामकांत कलोती - मा.अध्यक्ष 2) श्री नितीन माणिकराव घरडे - मा.सदस्य. ***** त.क.तर्फे अधिवक्ता- श्री आर.डी.ठाकूर वि.प.क्रं 1,2 व 4तर्फे- अधिवक्ता श्री प्रसाद अभ्यंकर. वि.प.क्रं 3 तर्फे अधिवक्ता- श्री एस.एम.पाळधीकर वि.प.क्रं 5 तर्फे अधिवक्ता- श्रीमती मृणाल नाईक वि.प.क्रं 6 तर्फे अधिवक्ता- श्री सी.बी.पांडे ::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक –25 जुलै, 2013 ) 1. तक्रारकर्त्याने त्याचे आईचे मृत्यू संबधाने विमा रक्कम मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
तक्रारकर्त्याची आई विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब कंपनीची सभासद असून, विरुध्दपक्ष क्रं 3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने सदर कंपनीचे सभासदांचा विमा उतरविलेला होता. तक्रारकर्त्याच्या आईचा आकस्मीक अपघात होऊन दि.07.11.2011 रोजी तब्येत बिघडल्यामुळे हितेच हॉस्पीटल, लाला लोहिया मार्ग, कामठी या दवाखान्यात भर्ती करावे लागले आणि दि.14.11.2011 पर्यंत वैद्यकीय उपचार करुनही दि.14.11.2011 रोजी सकाळी 1.30 वाजता दवाखान्यात मृत्यू झाला. तक्रारकर्त्याचे आईचे नावे व्यक्तीगत अपघात मृत्यू पॉलिसी क्रं-110800/42/08/03/00003805 दि.18.05.2009 द्वारे रु.-5,00,000/-व वैद्यकीय पॉलिसी क्रं-110800/34/08/87/00016756 दि.26.05.2009 द्वारे रक्कम रुपये-1,05,000/-चा विमा असतानाही विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा हा विमा पॉलिसीचे कक्षेत बसत नाही असे कळविले.
तक्रारकर्त्याने अधिवक्ता मार्फतीने दि.29.12.2011 रोजी नोंदणीकृत डाकेने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांना नोटीस पाठवून विमा रकमेची मागणी केली. सदर नोटीसला विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 यांनी संयुक्तिक उत्तर पाठवून विमा दावा रकमेची मागणी नाकारली.
म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याद्वारे त्यांची मृतक आई दामीया पैकू निंबोने यांचे नावे असलेली व्यक्तीगत अपघात पॉलिसी क्रं-110800/42/08/03/00003805 अनुसार रुपये 5,00,000/- व त्यावरील व्याजासह विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या मिळावेत व इतर अनुषंगीक मागण्या केल्यात. 3. प्रस्तुत न्यायमंचा तर्फे यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. सदर न्यायमंचाची नोटीस संबधित वि.प.क्रं 1 ते 4 यांना प्राप्त झाल्या बद्यल रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहेत. 4. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकॉर्ड क्लब लिमिटेड यांनी संयुक्तरित्या आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष सादर केले. त्यांनी आपले लेखी उत्तरामध्ये नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 हे भारतातील विविध हॉटेल्स, क्लब, रेस्टारेन्ट मध्ये आरक्षण व इतर निगडीत व्यवसाय करतात. ते कोणत्याही प्रकारे इन्शुरन्स/विम्याचे काम करीत नाही. 5. वि.प. क्रं 1,2 व 4 यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याची आई श्रीमती निंबोने हया या पॅनकॉर्ड क्लब लिमिटेड या कंपनीच्या सभासद आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नसल्यामुळे, ग्राहक या शब्दाच्या परिभाषेत तक्रारकर्ता बसत नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष चालू शकत नसल्याने ती खारीज होण्यास पात्र आहे. 6. वैयक्तिक अपघात विमा व वैद्यकीय विमा हा अतिरिक्त लाभ न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे देण्यात येतो व वि.प.क्रं 1,2 व 4 हे विमा कंपनीचे कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधी किंवा दलाल/एजंट नाहीत. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 हे फक्त आपल्या सभासदानां विम्याचे व विमा दाव्याचे पुर्तते बाबत मध्यस्थी व मदतगार म्हणून कार्य करतात व या करीता ते प्रत्यक्ष्य वा अप्रत्यक्ष्य रित्या कोणतीही रक्कम आकारत नाही त्यामुळे वि.प.क्रं 1, 2 व 4 चे सेवेत कोणत्याही प्रकारची त्रृटी नसल्याने तक्रार खारीज व्हावी.
7. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकॉर्ड क्लब लिमिटेड नोंदणीकृत असून तिचे मुख्य कार्यालय मुंबई आणि शाखा कार्यालय नागपूर येथे आहे आणि या तक्रारीतील संपूर्ण व्यवहार हा नागपूर शहर येथे झाला असल्याने त्यामुळे वि.मंचास या प्रकरणात स्थानिक अधिकारक्षेत्र येत नसल्याचे नमुद केले. 8. विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 पॅनकॉर्ड क्लब लिमिटेड यांनी पुढे असे नमुद केले की, त्यांचे कंपनीने सभासदां करीता, विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून ग्रुप इन्शुरन्स काढला होता व विम्याच्या अटी व शर्ती नुसार सभासदानां विम्याचा लाभ मिळू शकतो. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 हे सभासदां कडून कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता किंवा अतिरिक्त भार न लादता एक अतिरिक्त लाभ म्हणून विमा संरक्षण सेवा पुरवितात. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 यांनी स्वतः विमा हप्ता रक्कम भरुन ग्रुप व्यक्तीगत अपघाती विमा व ग्रुप वैद्यकीय विमा विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून सभासदां करीता उतरविला होता. याच प्रकारचा विमे हे त्यानंतर ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून व्यक्तीगत अपघाती मृत्यू करीता व एच.डी.एफ.सी. एस्गो कंपनी कडून वैद्यकीय विमा रिन्यू करण्यात आले आहेत. तक्रारकर्ता किंवा तक्रारकर्त्याच्या आईने विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 कडे किंवा विमा कंपनीकडे विम्या संबधाने कोणत्याही प्रकारचे रकमेचा हप्ता भरणा केला नव्हता. तक्रारकर्त्याचे आईला दि.18 मे, 2009 पासून व्यक्तीगत अपघाती मृत्यू विमा व दि.26 मे, 2009 पासून वैद्यकीय विमा लाभ पुरविण्यात आले होते आणि या करीता तक्रारकर्ता किंवा त्यांच्या आई कडून कोणत्याही प्रकारे पैसे किंवा भार आकारण्यात आलेला नव्हता.
9. विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याचे आईचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. मृत्यू अगोदर त्यांचेवर हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरु असताना दि.14.11.2011 रोजी वयोवृध्द असल्या कारणाने त्या नैसर्गिक मृत्यू पावल्यात. करीता तक्रारकर्त्याची तक्रार विमा लाभाच्या सज्ञेत बसत नाही. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी विषयी कोणतेही दस्तऐवज विरुध्दपक्षाकडे सादर केली नाहीत, जे तक्रारकर्त्याच्या आईचे मृत्यू नंतर 30 दिवसांचे आत सादर करणे बंधनकारक होते परंतु तक्रारकर्त्याने अशी कोणतीही पुर्तता केली नाही. करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 पॅनकॉर्ड क्लब लिमिटेड तर्फे करण्यात आली. 10. विरुध्दपक्ष क्रं -3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष लेखी उत्तर सादर करण्यात आले. त्यांनी आपल्या लेखी उत्तराद्वारे, विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 मार्फतीने, विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून तक्रारकर्त्याचे आईचा विमा काढला होता ही बाब विशेषत्वाने नाकारली. त्याच बरोबर तक्रारकर्त्याची आई ही वि.प.क्रं 1,2 व 4 ची सभासद होती ही बाब माहिती अभावी नाकबुल केली. तक्रारकर्त्याचे आईचा सभासद अवधी दि.21.04.2009 ते 21.04.2019 हया 10 वर्षाचे कालावधीचा होता ही बाब माहिती अभावी नाकबुल केली. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 यांनी विरुध्दपक्ष क्रं 3 विमा कंपनी कडून 10 वर्षाच्या दिर्घ कालावधी करीता अपघात विमा पॉलिसी व वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती ही बाब चुकीची असल्यामुळे नाकबुल केली.
11. विरुध्दपक्ष क्रं -3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, विरुध्दपक्ष क्रं 4 पॅनकार्ड क्लब लिमिटेड यांनी तक्रारीत नमुद पॉलिसीज केवळ 01 वर्षासाठी घेतल्या होत्या त्याचा कालावधी खालील प्रमाणे- 1) ग्रुप मेडीक्लेम पॉलिसी क्रं-110800/34/08/87/00016756 (कालावधी-26.12.2008 ते 25.12.2009) 2) वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्रं-110800/42/08/03/00003803 (कालावधी-18.03.2009 ते 17.03.2010) 12. उपरोक्त नमुद दोन्ही पॉलिसीचा कालावधी हा केवळ 01 वर्षाचा असल्यामुळे केवळ त्या कालावधीत घडलेल्या घटनानां विमा संरक्षण होते परंतु यातील तक्रारकर्त्याचे आईचा अपघात हा दि.07.11.2011 रोजी होऊन त्यांचा मृत्यू दि.14.11.2011रोजी झालेल्या असल्यामुळे वर निर्देशित पॉलिसीचे कक्षेत वरील घटना येत नसल्याने विमा संरक्षण नाही.
13. विरुध्दपक्ष क्रं 3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने आपले विशेष कथनामध्ये नमुद केले की, त्यांनी विमाकर्त्या कंपनीस दि.04.05.2011 चे पत्रान्वये पॉलिसी समाप्ती नंतर पुर्नजीवीत (Renew) न केल्या बद्दल सतर्क केले आहे व त्याचे परिणामांची कल्पना देखील दिली आहे. वि.प.क्रं 3 यांचे असेही लक्षात आले आहे की, विमाकर्ते पॅनकार्ड क्लब लिमिटेड हयांनी नविन विमा मे.ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनीकडून काढलेला आहे, त्याचा पॉलिसी क्रं-121700/48/2011/11015 असून त्याचा कालावधी हा दि.18.03.2011 ते 17.03.2012 असा आहे, ते सदर पॉलिसीची प्रत सादर करीत आहे. क्रारकर्त्याचा विमा दावा संदर्भीत पॉलिसी मध्ये बसत असल्यामुळे ते योग्य कारवाई करु शकतात. करीता विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे करण्यात आली.
14. विरुध्दपक्ष क्रं 3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे लेखी उत्तरा नंतर तक्रारकर्त्याने दि.06.06.2012 रोजी न्यायमंचा समक्ष लेखी अर्ज सादर करुन त्याद्वारे विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 पॅन क्लब कार्ड कंपनीने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून आपल्या 2280899 सभासदां करीता पॉलिसी क्रं- 121700/48/2011/11015 कालावधी दि.18.03.2011 ते 17.03.2012 पर्यंत काढला होता तसेच एच.डी.एफ.सी इरगो कंपनी लिमिटेड यांचे कडून सभासदां करीता ग्रुप मेडीक्लेम इन्शोरन्स पॉलिसी कालावधी दि.25.12.2010 ते दि.24.12.2011 पर्यंत काढली असल्याने आणि तक्रारकर्त्याचे आईचा अपघाती मृत्यू हा दि.14.11.2011 रोजी झालेला असल्यामुळे सदर तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्रं 5 म्हणून व्यवस्थापक, दि ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनी लिमिटेड क्षेत्रीय कार्यालय नागपूर यांचे नाव आणि विरुध्दपक्ष क्रं 6 म्हणून व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्शोरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांना प्रतिपक्ष म्हणून समाविष्ठ करण्याची परवानगी मागितली. सदर अर्ज मंचाने त्याच दिवशी दि.06.06.2012 रोजी मंजूर केल्या नंतर तक्रारकर्त्याने मूळ तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्रं 5 म्हणून व्यवस्थापक, दि ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनी लिमिटेड क्षेत्रीय कार्यालय नागपूर यांचे नाव आणि विरुध्दपक्ष क्रं 6 म्हणून व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी. इरगो जनरल इन्शोरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांना प्रतिपक्ष केले. 15. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 यांना मूळ तक्रारीमध्ये प्रतिपक्ष केल्या नंतर वि.प. क्रं 5 व क्रं 6 चे नावे नोंदणीकृत डाकेने मंचा तर्फे नोटीस जारी करण्यात आली.
16. विरुध्दपक्ष क्रं 5 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष सादर केले. त्यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये प्रार्थमिक आक्षेपात विरुध्दपक्ष क्रं 5 यांचेशी तक्रारकर्त्याचा कसा संबध आहे हे (तक्रारीत) दाव्यात कोठेही नमुद केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 5 ला दाव्यात (तक्रारीत) कोणत्या आधारे प्रतिपक्ष केले हे देखील नमुद नाही. तक्रारीतील विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं 2, 3 व 4 यांचे संबधात केलेला आहे यातील (तक्रारीतील) प्रार्थना कलमात केलेली मागणी सुध्दा वि.प. क्रं 1 ते 4 विरुध्द मागीतलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 5 यांचे विरुध्द तक्रारीचे कारण कसे आणि केंव्हा उदभवले हे सुध्दा तक्रारीत नमुद केलेले नाही. तसेच पॉलिसी क्रमांक, अवधी व विमा रक्कम या बद्यल तक्रारीत नमुद नाही व त्या अनुषंगाने कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तक्रारकर्ता हा वि.प.क्रं 5 चा ग्राहक असल्या बद्यल त.क.दर्शवू शकला नाही. वि.प.क्रं 5 विमा कंपनीने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही व तसे तक्रारीत सुध्दा नमुद केलेले नाही. आवश्यक कथना अभावी सदर तक्रार वि.प.क्रं 5 विमा कंपनी विरुध्द चालू शकत नाही.
17. वि.प.क्रं 5 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने पुढे असे नमुद केले की, वि.प.क्रं 1 ते 4 व तक्रारकर्ता यापैकी कोणीही वि.प.क्रं 5 यांचेकडे कुठलाही विमा क्लेम केलेला नाही, त्यामुळे विमा क्लेम देण्यास वि.प.क्रं 5 बाध्य नाही. वरील बाबींची पुर्तता केल्या शिवाय तक्रारकर्त्यास वि.प.क्रं 5 विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कुठलेही कारण (Cause of Action) घडलेले नाही. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारकर्त्याने दि.18.05.2009 व 26.05.2009 या कालावधीत विमा पॉलिसी व वैद्यकीय पॉलिसी वि.प.क्रं 5 कडून घेतली होती हे दर्शविणारी पॉलिसी दाखल केली नाही. तसेच तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 5 विमा कंपनीकडे विमा दावा केला होता व त्यांनी तो नाकारला होता असे तक्रारकर्त्याचे कथन आणि दस्तऐवज तक्रारकर्त्याने दाखल केले नाही म्हणून आवश्यक दस्तऐवजां अभावी तक्रारकर्ता, वि.प.क्रं 5 विरुध्द मंचा समक्ष तक्रार दाखल करु शकत नाही. परिच्छेद निहाय उत्तर देताना तक्रारकर्त्याची संपूर्ण विधाने नाकबुल केलीत. त्यांनी दिलेल्या सेवेमध्ये कोणतीही त्रृटी नसल्यामुळे आणि तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं 5 विरुध्द कोणतीही मागणी नसल्यामुळे तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.क्रं 5 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे करण्यात आली. 18. विरुध्दपक्ष क्रं -6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीने लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांनी आपले लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्त्याचे दस्तऐवजा वरुन विरुध्दपक्ष क्रं 6 यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब दिसून येत नाही. त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे तक्रार खारीज व्हावी. पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार ते विमा क्लेम देण्यास बाध्य आहेत. 19. वि.प.क्रं 6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 6 यांचेकडे कुठलाही विमा क्लेम केलेला नाही, सुचना दिली नाही वा कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे विमा क्लेम देण्यास वि.प.क्रं 6 बाध्य नाही. तक्रारकर्त्यास वि.प.क्रं 6 विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कुठलेही कारण (Cause of Action) घडलेले नाही. त्यामुळे वि.प.क्रं 6 विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती वि.प. क्रं 6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीने केली. 20. तक्रारकर्त्याने आपले तक्रारी सोबत निशाणी क्रं-2 वरील यादी नुसार एकूण 10 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 तर्फे विमा पॉलिसी संबधीचा दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्रं-3 विमा कंपनीचे विमा अटी व शर्तीचा दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्रं-1,2 व 4 तर्फे मृतक तक्रारकर्त्याचे आईचे ओळखपत्र, मृतकाचे मृत्यू प्रमाणपत्र, मृतकाचे वैद्यकीय चाचणी इत्यादी दस्तऐवज, हि टेक हॉस्पीटल कामठी यांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र, वैद्यकीय उपचाराचे हि टेक हॉस्पीटलचे बिल, ग्राम पंचायत मृत्यू प्रमाणपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1,2,4 आणि वि.प.क्रं 3 ला तक्रारकर्त्याचे अधिवक्त्याने पाठविलेली रजिस्टर नोटीस, पोस्टाच्या पावत्या, पोच पावत्या, विरुध्दपक्ष क्रं-1,2,4 यांचे अधिवक्त्यांचे नोटीसला दिलेले उत्तर इत्यादी दस्तऐवजांचे प्रतिचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1,2,4 आणि क्रं-3 यांनी सादर केलेल्या लेखी उत्तरास प्रतिज्ञालेखावरील प्रतीउत्तर आणि विरुध्दपक्ष क्रं-5 ते 4 यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तरास प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर सादर केले. 21. विरुध्दपक्ष क्रं-1,2 आणि क्रं 4 पॅनकार्ड क्लब कंपनीने एकूण 04 दस्तऐवजांच्या प्रती ज्यामध्ये अधिकारपत्र, पॅनकार्ड क्लब लिमिटेड तर्फे त.क.चे आईचा नोंदणी फॉर्म व अटी व शर्तीचा दस्तऐवज, दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे पॉलिसी कव्हर नोट, एच.डी.एफ.सी. इरगो कंपनीची पॉलिसी इत्यादी दस्तऐवजांच्या प्रतींचा समावेश आहे. विरुध्दपक्ष क्रं-1,2 आणि क्रं 4 पॅनकार्ड क्लब कंपनीने लेखी युक्तीवाद दाखल केला. 22. विरुध्दपक्ष क्रं-3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने ग्रुप मेडीक्लेम पॉलिसी, वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी आणि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी पॉलिसी इत्यादी दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. 23. विरुध्दपक्ष क्रं-5 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी युक्तीवाद सादर करण्यात आला. 24. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ता, वि.प.क्रं 1, 2 व 4 तसेच विरुध्दपक्ष क्रं 3, विरुध्दपक्ष क्रं 5 आणि विरुध्दपक्ष क्रं 6 या सर्वां तर्फे त्यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 25. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब तसेच वि.प.क्रं 3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तसेच वि.प.क्रं 5 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि वि.प.क्रं 6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी यांची प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तरे आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत. मुद्दा उत्तर
(1) विरुध्दपक्षकाराने, त.क.ला दिलेल्या सेवेत कमतरता सिध्द होते काय? ………………नाही (2) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? ………………........................नाही (3) काय आदेश? ………………………………….... अंतीम आदेशा प्रमाणे
:: कारण मीमांसा :: मुद्दा क्रं-1 व 2 :- 26. यातील विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 हे पॅनकार्ड क्लब, केंद्रीय सरकार विधी संस्थापित कंपनी, मुंबई या कंपनीशी संबधित आहेत. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब कंपनीने आपले प्रतिज्ञालेखावरील उत्तरात सदर पॅनकार्ड क्लबचे शाखा कार्यालय हे नागपूर शहरात असून, तक्रारकर्त्यांची आई ही पॅनकार्ड क्लब या संस्थेची सभासद असल्याचे मान्य केले व या बद्यल कोणताही विवाद नाही. विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब या कंपनीने आपल्या सभासदां करीता कोणताही मोबदला न आकारता जास्तीचा लाभ म्हणून प्रथमतः यातील विरुध्दपक्ष क्रं 3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांचे कडून ग्रुप इन्शुरन्स अंतर्गत विमा उतरविला व त्याचे प्रिमियमची रक्कम आपले सभासदांचे वतीने विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब या कंपनीने भरली होती असे विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब यांनी आपले लेखी उत्तरात नमुद केले. 27. उपरोक्त नमुद बाब तक्रारकर्त्याने आपले प्रतीउत्तरात फक्त माहिती अभावी नाकबुल केली, या संबधाने विमा प्रिमियमची रक्कम तक्रारकर्त्याचे आईने स्वतः भरल्या बाबतचा कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं- 1,2 व 4 पॅनकॉर्ड क्लबने आपले सभासदां करीता कोणत्याही रकमेची आकारणी न करता स्वतःहून विमा काढला होता, हे विरुध्दपक्ष क्रं 1,2 व 4 पॅनकार्ड क्लब कंपनीचे विधान मंच स्विकारते. 28. विरुध्दपक्ष क्रं 1, 2 व 4 यांचे लेखी उत्तरा नुसार सदर विम्या अंतर्गत पॅनकार्ड क्लब सभासदांचे अपघाती निधन झाल्यास नुकसान भरपाई म्हणून विमा रकमेची जोखीम संबधित विमा कंपनीने स्विकारलेली होती. तसेच वैद्यकीय विम्याची सुध्दा सोय करण्यात आली होती, या मुद्या बाबत सदर प्रकरणात उभय पक्षांमध्ये कोणताही विवाद नाही.
29. यातील विरुध्दपक्ष क्रं-3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तरात नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 4 पॅनकार्ड क्लब लिमिटेड यांनी आपल्या सभासदां करीता ग्रुप मेडीक्लेम पॉलिसी कालावधी दि.26.12.2008 ते 25.12.2009 आणि वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी कालावधी दि.18.03.2009 ते 17.03.2010 घेतल्या होत्या. सदर दोन्ही पॉलिसीज फक्त 01 वर्षा करीता अस्तित्वात होत्या.परंतु यातील तक्रारकर्त्याचे आईचा अपघात हा दि.07.11.2011 रोजी होऊन त्यांचा मृत्यू दि.14.11.2011 रोजी झालेल्या असल्यामुळे सदर पॉलिसीचे कक्षेत वरील घटना येत नसल्याने विमा संरक्षण नसल्याचे नमुद केले. वि.प.क्रं 3 यांनी असेही नमुद केले की, विमाकर्ते पॅनकार्ड क्लब लिमिटेड हयांनी नविन विमा मे.ओरिएन्टल इन्शोरन्स कंपनी कडून काढलेला असल्याचे नमुद केले. त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, असे नमुद केले. 30. विरुध्दपक्ष क्रं-3 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे लेखी उत्तरा नंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 5 म्हणून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-6 म्हणून एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई यांना प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष करण्याची परवानगी मंचा समक्ष अर्ज करुन मागितली, मंचाने सदर अर्ज मंजूर केल्या नंतर तक्रारकर्त्याचे वकीलांनी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, नागपूर यांना विरुध्दपक्ष क्रं-5 व एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई यांना विरुध्दपक्ष क्रं -6 म्हणून मूळ तक्रारीत प्रतिपक्ष केले. 31. विरुध्दपक्ष क्रं 5 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्त्याचे तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्रं-5 विरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही तसेच तक्रारकर्त्याने दि.18.05.2009 व 26.05.2009 या कालावधीत विमा पॉलिसी व वैद्यकीय पॉलिसी वि.प.क्रं 5 कडून घेतली होती हे दर्शविणारी पॉलिसी दाखल केली नाही आवश्यक कथना अभावी सदर तक्रार वि.प.क्रं 5 विमा कंपनी विरुध्द चालू शकत नाही. वि.प.क्रं 1 ते 4 व तक्रारकर्ता यापैकी कोणीही वि.प.क्रं 5 यांचेकडे कुठलाही विमा क्लेम केलेला नाही, त्यामुळे विमा क्लेम देण्यास वि.प.क्रं 5 बाध्य नाही. त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. वरील बाबींची पुर्तता केल्या शिवाय तक्रारकर्त्यास वि.प.क्रं 5 विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कुठलेही कारण (Cause of Action) घडलेले नाही.. त्यांनी दिलेल्या सेवेमध्ये कोणतीही त्रृटी नसल्याचे नमुद केले. 32. विरुध्दपक्ष क्रं -6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीने प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तरामध्ये पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार ते विमा क्लेम देण्यास बाध्य आहेत. परंतु तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 6 यांचेकडे कुठलाही विमा क्लेम केलेला नाही, सुचना दिली नाही वा कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे विमा क्लेम देण्यास वि.प.क्रं 6 बाध्य नाही त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे तक्रार खारीज व्हावी. तक्रारकर्त्यास वि.प.क्रं 6 विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कुठलेही कारण (Cause of Action) घडलेले नाही. त्यामुळे वि.प.क्रं 6 विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.क्रं 6 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीने केली. 33. मंचास विरुध्दपक्ष क्रं-5 व वि.प.क्रं-6 चे लेखी उत्तरामध्ये तथ्य वाटते. कारण एक तर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-5 आणि क्रं-6 चे नाव मूळ तक्रारीमध्ये प्रतिपक्ष करण्यास मंचास परवानगी मागणारा जो अर्ज मंचा समक्ष दिनांक-06/06/2012 रोजी केला, तोच मूळात अपूर्ण केला, त्यामध्ये मूळ तक्रारीत योग्य ती दुरुस्ती बदलासह सुधारीत तक्रारअर्ज सादर करण्याची परवानगीच मागितलेली नाही व मूळ तक्रारीत विरुध्दपक्ष क्रं-5 व विरुध्दपक्ष क्रं-6 विरुध्द तक्रारकर्त्याने कोणतीही मागणी केलेली नाही केवळ प्रतिपक्ष म्हणून त्यांना मूळ तक्रारीत समाविष्ठ केले. विरुध्दपक्ष क्रं-5 आणि विरुध्दपक्ष क्रं-6 यांचेकडे तक्रारकर्त्याचे आईशी संबधित विमा क्लेम विरुध्दपक्ष क्रं-1,2 आणि 4 पॅनक्लब मार्फतीने आवश्यक त्या दस्तऐवजांसह सादर केला असता आणि विरुध्दपक्ष क्रं-5 आणि विरुध्दपक्ष क्रं-6 यांनी विमा क्लेम नाकारला असता तर त्या स्थितीत तक्रारकर्त्याने वि.मंचा समक्ष तक्रार दाखल केली असती तर ते योग्य झाले असते परंतु तक्रारकर्त्याने तसे केलेले नाही. मूळातच तक्रारकर्त्याची तक्रार ही अपरिपक्व स्वरुपाची (Premature) आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 34. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार त्याचे आईचा आकस्मीक अपघात होऊन दि.07.11.2011 रोजी तब्येत बिघडल्यामुळे हितेच हॉस्पीटल, लाला लोहिया मार्ग, कामठी या दवाखान्यात भर्ती करावे लागले आणि दि.14.11.2011 पर्यंत वैद्यकीय उपचार करुनही दि.14.11.2011 रोजी सकाळी 1.30 वाजता दवाखान्यात मृत्यू झाला.म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याद्वारे त्यांची मृतक आई दामीया पैकू निंबोने यांचे नावे असलेली व्यक्तीगत अपघात पॉलिसी क्रं -110800/42/08/03/ 00003805 अनुसार रक्कम रुपये 5,00,000/-व त्यावरील व्याजासह विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या मिळावेत व इतर अनुषंगीक मागण्या यासह प्रस्तुत तक्रार वि.मंचा समक्ष दाखल केलेली आहे. मुद्दा क्रं-3 :- 35. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे परिस्थिती पाहता, मूळातच तक्रारकर्त्याची तक्रार ही अपरिपक्व स्वरुपाची (Premature) असल्यामुळे सकृतदर्शनी (Prima-facie) खारीज होण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याचे आईचा मृत्यू अपघाती नसून वृध्दपकाळामुळे नैसर्गिक निधन झाले व त्यामुळेही विमा क्लेम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही व त्याच बरोबर मृत आईचे निधनामुळे विमा क्लेम मिळण्यास तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-5 आणि वि.प.क्रं-6 विरुध्दची मागणी सुध्दा नाही वा तसा विमा क्लेमही तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-5 आणि वि.प.क्रं-6 कडे केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे त्यामुळे प्रकरणातील अन्य कोणत्याही विवादीत मुद्यानां स्पर्श न करता आम्ही प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-1 ते 6 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |