मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर दरखास्त अर्ज क्रमांक : 28/2009 (कलम 27) मूळ तक्रार अर्ज क्र.36/2008 दरखास्त अर्ज दाखल झाल्याचा दि.08/10/2009 दरखास्त अर्ज निकाली झाल्याचा दि.17/01/2011 श्री.एम.एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.अनिल रामचंद्र झोरे रा.मु.पो.तांबेडी, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटेक कार्पोरेशन लि., करिता अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक, श्री.जयकृष्ण सिंह राणा रजि.ऑफिसः- औरंगाबाद-आग्रा रोड, मथुरा (उत्तर प्रदेश) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.ए.शिंदे सामनेवालेतर्फे: गैरहजर -: नि.1 वरील आदेश :- 1. मंचाने मूळ तक्रार अर्ज क्र.36/2008 मध्ये पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष कल्पतरु बायोटेक कार्पोरेशन लि., यांनी न केलेमुळे सदरचे दरखास्त (फौजदारी) प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 27 अंतर्गत दाखल करणेत आले आहे. 2. मंचाने तक्रारदाराच्या दरखास्त अर्जावर आदेश पारीत करुन विरुध्द पक्षास नोटीस बजावणी करणेचे आदेश पारीत केले, परंतु विरुध्द पक्ष/आरोपी हे मंचासमोर हजर झाले नाहीत त्यामुळे विरुध्द पक्ष/आरोपी यांचेविरुध्द मंचाने जामीनपात्र वॉरंट काढणेचे हुकूम पारीत केले, परंतु सदर जमानती वॉरंट बजावणी होवूनदेखील आरोपी मंचासमोर हजर झाले नाहीत. 3. दरम्यान आज मंचासमोर तक्रारदाराचे वकिल श्री.ए.ए.शिंदे हजर झाले व त्यांनी मंचासमोर नि.38 वर अर्ज दाखल केला. मंचाने निकालपत्रात केलेल्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणी विरुध्द पक्षाने धनादेशाव्दारे रु.7,000/- अदा करुन केली असल्याचे म्हणणे तक्रारदारने त्याच्या नि.38 वरील अर्जात मांडले व हे प्रकरण निकाली काढावे अशी विनंती केली. 4. आज तक्रारदार प्रत्यक्षात मंचासमोर हजर नाहीत, परंतु त्यांचे वकिल श्री.ए.ए.शिंदे यांनी मंचासमोर हजर होवून तक्रारदाराने नि.38 वर केलेली सही त्यांचे समक्ष केली असलेचे मंचासमोर स्पष्ट केले व प्रकरण निकाली काढणेत यावे असे मंचासमोर स्पष्ट केले. त्यामुळे आम्ही प्रकरण निकाली काढणेचे दृष्टीने खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. मूळ तक्रार अर्ज क्र.38/2008 मधील आदेशाची पूर्ण अंमलबजावणी विरुध्द पक्षाने केलेचे व तक्राररदारास रक्कम रु.7,000/- (रु.सात हजार मात्र) चा धनादेश प्राप्त झालेचे तक्रारदार व त्यांचे वकिलांनी नि.38 वरील अर्जाने स्पष्ट केलेने सदरचे प्रकरण निकाली काढणेत येते. 2. आरोपीचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात. 3. प्रकरण नस्तीबध्द करणेत येते. रत्नागिरी दिनांक : 17/01/2011 (एम.एम.गोस्वामी) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |