सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.12/1999
श्री बंडू नारायण मुसळे
धंदा- व्यवसाय, रा.परबवाडी, ओरोस,
ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) भारतीय जीवन विमा निगम करीता
अध्यक्ष, भारतीय जीवन विमा निगम
योगक्षेम जीवन विमा मार्ग,
पोस्ट बॉक्स नं.19953, मुंबई – 21
2) झोनल व्यवस्थापक,
भारतीय जीवन विमा निगम, कोल्हापूर झोन,
पहिला मजला, सेंटर पॉईंट कॉम्प्लेक्स, 511,
क/1- ए, ई- वॉर्ड, स्टेशन रोड, कोल्हापूर- 416 001
3) वरिष्ठ शाखाधिकारी,
भारतीय जीवन विमा निगम, शाखा चिपळूण,
मु.पो.चिपळूण, शिवाजी नगर, ता.चिपळूण,
जिल्हा रत्नागिरी.
4) वरिष्ठ शाखाधिकारी,
भारतीय जीवन विमा निगम, शाखा- 194 क्यु,
शिवाजी चौक, कणकवली, ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री बी.एम. दळवी.
आदेश निशाणी 1 वर
(दि.30/06/2010)
1) मंचाने मुळ तक्रार क्र.50/1997 मध्ये पारीत केलेल्या आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाच्या भारतीय जीवन विमा निगमने न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) मंचाने पारीत केलेल्या निकालपत्राच्या विरुध्द, विरुध्द पक्ष हे मा.राज्य आयोग, मुंबई यांचेकडे अपिलात जाऊन अपिल क्र.167/1999 अन्वये अपिल दाखल केली व सदरच्या दरखास्तीस स्थगनादेश घेतला असल्यामुळे, सदरचे प्रकरण स्थगन अवस्थेत ठेवण्यात आले होते.
3) दरम्यान मा.राज्य आयोगाने अपिल क्र.167/1999 मध्ये आदेश पारीत करुन मंचाने पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेश अंशतः रद्दबातल ठरविल्याचे मंचासमोर विरुध्द पक्षाने स्पष्ट केले व मा.राज्य आयोगाच्या आदेशाची प्रत प्रकरणात दाखल केली. तसेच मा.राज्य आयोगाने दिलेल्या अपिलातील निर्देशानुसार तक्रारदारास रु.8879/-(रुपये आठ हजार आठशे एकोनऐंशी मात्र) चा धनादेश दिल्याचे आज स्पष्ट केले.
4) आज मंचासमोर तक्रारदार व विरुध्द पक्षाचे प्रतिनिधी हजर झाले असून मा.राज्य आयोगाने पारीत केलेल्या आदेशाची पुर्तता केल्याचे अर्ज विरुध्द पक्षाने दाखल केले. तर तक्रारदाराने देखील दरखास्तीचे कामकाज रद्द करण्यासाठीचा अर्ज आज मंचासमोर दाखल केला व आपणांस विरुध्द पक्षाकडून आदेशित रक्कम प्राप्त झाल्याचे मान्य केले. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) मा.राज्य आयोगाने पारीत केलेल्या आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षाच्या विमा कंपनीने केली असल्यामुळे तक्रारदाराचे विनंती अर्जानुसार सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/06/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-