Maharashtra

Bhandara

CC/15/93

Ashok Dadurao Randive - Complainant(s)

Versus

President, Bahujan Hitaya Akrushak Sahakari Pat Sanstha Maryadit, Chichala - Opp.Party(s)

Adv. R.C.Pashine

12 Jan 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/15/93
 
1. Ashok Dadurao Randive
R/o. Lakhandur, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. President, Bahujan Hitaya Akrushak Sahakari Pat Sanstha Maryadit, Chichala
Chichala/ Barva, Tah. Lakhandur, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Manager, Bahujan Hitaya Akrushak Sahakari Pat Sanstha Maryadit, Chichala
Chichala/ Barva, Tah. Lakhandur, Dist. Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:Adv. R.C.Pashine, Advocate
For the Opp. Party:
Dated : 12 Jan 2017
Final Order / Judgement

श्री. हेमंतकुमार पटेरीया, सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये.

 

 

-आदेश-

  (पारित दिनांक :   12 जानेवारी, 2017)

 

1.          तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारकर्त्‍यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की,  वि.प. क्र. 1 ही वित्‍तीय व्‍यवहार करणारी संस्‍था असून ग्राहकांकडून ठेवी स्विकारुन त्‍यावर आकर्षक व्‍याज देते. तक्रारकर्त्‍याने वि.प. संस्‍थेत मुदत ठेवींतर्गत रकमा गुंतविल्‍या होत्‍या. तक्रारकर्त्‍याचे बचत खाते वि.प.कडे होते. मुदत ठेवींची परिपक्‍वता रक्‍कम व बचत खात्‍यातील रक्‍कम यांचा त्‍यांचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

योजनेचे नाव

रक्‍कम गुंतविल्‍याचा दिनांक

गुंतविलेली रक्‍कम

कालावधी

परिपक्‍वता रक्‍कम

परिपक्‍वता दिनांक

1.

मुदत ठेव

12.11.2010

रु.1,00,000/-

2 वर्षे

रु.1,18,970/-

12.11.2012

2.

बचत ठेव खाते क्र.72

20.09.2010

रु.1,19,015/-

-

-

-

 

 

तक्रारकर्त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर मुदत ठेव जेव्‍हा परिपक्‍व झाली, तेव्‍हा त्‍यांनी रकमेची मागणी वि.प.संस्‍थेकडे केली. परंतू वि.प. संस्‍थेने त्‍यांना रक्‍कम परत केली नाही. तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत न केल्‍याने, तक्रारकर्त्‍याला मंचासमोर तक्रार दाखल करण्‍याशिवाय पर्याय नव्‍हता, म्‍हणून मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन मुदत ठेवीची एकूण परिपक्‍वता रक्‍कम रु.1,18,970/- द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह परत करावी. तसेच बचत खाते क्र. 72 मध्‍ये शिल्‍लक असलेली रक्‍कम रु.1,19,015/- द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी,  तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशा मागण्‍या केल्‍या. आपल्‍या तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने मुदत ठेवीची पावती, बचत खाते पुस्तिका, नोटीस, पोचपावती व पोस्‍टाची पावती दाखल केलेली आहेत.

 

2.          सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 यांना पाठविण्‍यात आली असता,  वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही, ते मंचासमोर हजर झाले नाही व लेखी उत्‍तरही दाखल केले नाही. म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.12.08.2016 रोजी पारित केला.

 

3.          प्रकरण युक्‍तीवादाकरीता आले असता तक्रारकर्त्‍यांच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. मंचाने सदर प्रकरण दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.

 

-निष्‍कर्ष-

 

4.          तक्रारकर्त्‍याने वि.प.संस्‍थेकडे मुदत ठेव गुंतविली असल्‍याने व सदर बाब मुदत ठेवीचे प्रमाणपत्र व बचत ठेवीच्‍या पासबुकवरील प्रतीवरुन स्‍पष्‍ट होत असल्‍याने, तो वि.प.चा ग्राहक आहे. मंचाने सदर प्रकरणी दाखल पृ. क्र. 8 ते 10 वरील मुदत ठेवीच्‍या पावतीच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता, सदर मुदत ठेव या सन 12.11.2012 ला परिपक्‍व झालेली आहेत व त्‍यांचे परिपक्‍वता मुल्‍य रु.1,18,970/- आणि बचत खात्‍यामध्‍ये दि.30.09.2014 पासून शिल्‍लक रक्‍कम रु.1,19,105/- असल्‍याचे निदर्शनास येते. सदर प्रकरण दाखल झाल्‍यावर मंचाची नोटीस प्रकाशित होऊनही वि.प.ने मंचासमोर येऊन सदर तक्रार दस्‍तऐवजासह नाकारलेली नाही. तक्रार दाखल करण्‍यापूर्वी तक्रारकर्त्‍याने वि.प.ला त्‍यांचे अधिवक्‍ता आर.सी.पशिने यांचेमार्फत दि.13.04.2015 ला रकमेची मागणी करणारी कायदेशीर नोटीस पाठविली. वि.प.ने त्‍यास प्रतिसाद न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. यावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीची परीपक्‍वता रक्‍कम व बचत खात्‍यातील रक्‍कम ही वि.प.संस्‍थेकडे असल्‍याचे निष्‍पन्‍न होते व अद्यापही ती तक्रारकर्त्‍याला प्राप्‍त न झाल्‍याने वि.प.च्‍या सेवेतील त्रुटी निदर्शनास येते.

 

5.          तक्रारकर्त्‍याची तक्रार ही शपथपत्रावर असल्‍याने व त्‍यादाखल त्‍यांनी दस्‍तऐवज दाखल केले असल्‍याने व वि.प.ने तक्रारीतील कथन प्रतिज्ञापत्रावर नाकारले नसल्‍याने, तक्रारकर्त्‍याची तक्रार दाद मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

 

6.          तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याला झालेल्‍या आर्थीक, शारीरिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्‍याला रक्‍कम न मिळाल्‍यामुळे त्‍याला काही प्रमाणात शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला, याकरीता त्‍याला नुकसान भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- द्यावयास पाहिजे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. करीता मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

-आदेश-

 

1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मान्‍य करण्‍यांत येते.

2.    वि.प. यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास आदेशातील परिच्‍छेद क्र.    1 मध्‍ये नमूद केलेल्‍या मुदत ठेवींची परिपक्‍वता रक्‍कम रु.1,18,970/- ती रक्कम      ज्‍या तारखेस मुदत ठेव परीपक्‍व झाली त्‍या तारखेपासून (12.11.2012) प्रत्‍यक्ष रक्‍कम    मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्‍याजासह द्यावी. तसेच वि.प.यांनी बचत खात्‍यामध्‍ये    तक्रारकर्त्‍याची       शिल्‍लक असलेली रक्‍कम रु.1,19,015/- तक्रारकर्त्‍याला       दि.30.09.2014 पासून प्रत्‍यक्ष रकमेच्‍या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 6% व्‍याजासह अदा करावी. 

3.    वि.प. यांनी तक्रारकर्त्‍यांना शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासाकरीता नुकसान भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- द्यावे.

4.    सदर आदेशाचे पालन वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तरीत्‍या किंवा वैयक्‍तीकरीत्‍या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.

      

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.