(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 2/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचे पतसंस्थेमध्ये दैानिक बचत ठेव खाते आहे. सदर खाते क्रं. 1/14/01 नुसार जानेवारी 2011 ला रक्कम 1,700/-, फरवरी 2011 – 2,800/- मार्च – 2011 ला 3,000/- एप्रिल 2011 -3,000/- मे 2011 ला 770/- जून 2011 ला 540/- जुलै – 2011 480/- ऑगस्ट 2011ला 3,350/- सप्टेंबर-2011 3,500/-, ऑक्टो.2011 4,400/-, नोव्हेंबर-2011 4,800/-, डिसेंबर-2011 ला रुपये 7500/- असे एकूण रु. 36,900/- गैरअर्जदाराकडे जमा केले आहे. सदर खाते पुस्तीकावर गैरअर्जदार यांचे व्यवस्थापकाची सही आहे. अर्जदाराने पुढे कथन केले कि, गैरअर्जदाराकडे जमा केलेली रक्कम दि. 15/2/12 नंतर पूर्ण लाभासह देण्याचे गैरअर्जदारानी मान्य केले आहे. परंतु देयक तारखे नंतर मागणी करुनही रककम अर्जदाराला दिलेली नाही. म्हणून अर्जदाराने मा. सहा. निबंधक सहकारी पतसंस्था, बल्लारपूर दि. 30/6/12, 7/2/13 व दि. 13/2/13 ला तक्रार अर्ज व गैरअर्जदारांना पञ दिले. अर्जदाराने पुढे कथन केले कि, सहा. निबंधक सहकारी पतसंस्था, बल्लारपूर यांनी गैरअर्जदाराना पञ पाठवून पैसे देण्यास कळविले. तसेच 20/2/13 रोजी त्यासदंर्भात पञ सुध्दा पाठविले. अर्जदार गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये दि. 26/2/13 रोजी रक्कम घेण्यासाठी गेला परंतु गैरअर्जदारानी अर्जदाराला रक्कम दिली नाही. तसेच अर्जदाराने दि. 30/4/13 रोजी गैरअर्जदारास रक्कम मिळण्याबाबत लेखीपञ दिले तरी सुध्दा गैरअर्जदार हे रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे व अर्जदारास रक्कम वेळेवर न मिळाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली कि, अर्जदाराचे बचत खातेक्रं. 01/14/01 मध्ये जमा असलेली रक्कम 36,900/- दि. 15/2/12 पासून 18 टक्के व्याजासह तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 13 वर आपले लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत केलेले सर्व आरोप खोटे असून ते नाकबुल केले आहे. गैरअर्जदाराने आपल्या विशेष कथनात असे कथन केले आहे कि, बचत ठेव याजने अंतर्गत रककम ठेव घेण्याचे काम अभिकर्ते करतात व सदर अभिकर्ते हे बचत ठेविदाराचे परिचीत व स्थानिक व्यक्ती असतात. सदर दैनिक ठेव ही रक्कम पतसंस्थेत जमा झाल्यानंतर ती रक्कम त्या व्यक्तीच्या हातात जमा होते. काही अभिकर्ते यांनी रक्कम जमा न करता परस्पर उपयोगाकरीता वापरुन संस्थेच्या खात्यात जमा केली नाही. तसेच संस्थेकडून कर्ज वाटप केल्यानंतर कर्जाची वसुली न झाल्याने गैरअर्जदाराची आर्थिक स्थिती बिघडली. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले कि, गैरअर्जदार ही प्रामाणिक असून ग्राहकांना त्यांच्या ठेवीची रक्कम देण्यास तयार आहे. तसेच संस्थेचे लेखा पुस्तक पडताळणी केल्यानंतरच देण्यात येत असते. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले कि, अर्जदाराच्या रकमेसंबंधी आपले पासबुक मधील नोंदी तपासणीस उपलब्ध करुन दयाव्या जेणे करुन अर्जदाराची मागणी किती योग्य आहे आणि वास्तविक रक्कम किती जमा केली आहे व त्यावर व्याज किती टक्के द्यायचे आहे हे ठरविणे शक्य होईल. गैरअर्जदार पतसंस्था ही काही अभिकर्त्यामुळे अडचणित आली व वसुली न झाल्याने सध्या अर्जदाराची रक्कम देण्यास असमर्थ आहे. परंतु अर्जदाराला त्याची जमा असलेली रक्कम योग्य व्याजदाराने देण्यात येईल. अर्जदाराने गैरअर्जदाराला कागदपञ उपलब्ध न करुन देवून सदर तक्रार दाखल केली. सबब अर्जदाराची तक्रार व मागणी बेकायदेशिर असल्याने खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ?: होय.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा : होय.
अवलंब केला आहे काय ?
(4) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचे पतसंस्थेमध्ये दैनिक बचत ठेव खाते आहे. सदर खाते क्रं. 1/14/01 नुसार जानेवारी 2011 ला रक्कम 1,700/-, फरवरी 2011 – 2,800/- मार्च – 2011 ला 3,000/- एप्रिल 2011 -3,000/- मे 2011 ला 770/- जून 2011 ला 540/- जुलै – 2011 480/- ऑगस्ट 2011 ला 3,350/- सप्टेंबर 2011 ला 3,500/-, ऑक्टो.2011 ला 4,400/-, नोव्हेंबर-2011 ला 4,800/-, डिसेंबर-2011ला रुपये 7500/- असे एकूण रु. 36,900/- गैरअर्जदाराकडे जमा केले आहे. सदर खाते पुस्तीकावर गैरअर्जदार यांचे व्यवस्थापकाची सही आहे, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदार यांचे गैरअर्जदार यांच्या पतसंस्थेमध्ये दैानिक बचत ठेव खाते आहे. सदर खाते क्रं. 1/14/01 नुसार जानेवारी 2011 ला रक्कम 1,700/-, फरवरी 2011 – 2,800/- मार्च – 2011 ला 3,000/- एप्रिल 2011 -3,000/- मे 2011 ला 770/- जून 2011 ला 540/- जुलै – 2011 480/- ऑगस्ट 2011ला 3,350/- सप्टेंबर 3,500/- ऑक्टो. 4,400/- नोव्हेंबर 4,400/- असे एकूण रु. 36,900/- गैरअर्जदाराकडे जमा केले आहे. सदर खाते पुस्तीकावर गैरअर्जदार यांचे व्यवस्थापकाची सही आहे. गैरअर्जदाराकडे जमा केलेली रक्कम दि. 15/2/12 नंतर पूर्ण लाभासह देण्याचे गैरअर्जदारानी मान्य केले आहे. परंतु देयक तारखे नंतर मागणी करुनही रककम अर्जदाराला दिलेली नाही. म्हणून अर्जदाराने मा. सहा. निबंधक सहकारी पतसंस्था, बल्लारपूर दि. 30/6/12, 7/2/13 व दि. 13/2/13 ला तक्रार अर्ज व गैरअर्जदारांना पञ दिले, ही बाब गैरअर्जदारांना मान्य आहे. परंतु, गैरअर्जदार संस्थेने ब-याच लोकांना कर्ज दिले असून त्या कर्जाची नियमीत वसुली न झाल्यामुळे गैरअर्जदाराची आर्थीक स्थिती बिघडली आहे, त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराची रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली आहे. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदार संस्थेने अर्जदाराची जमा ठेव रक्कम नियमाप्रमाणे अर्जदाराला परत केली नाही व गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतापूर्ण सेवा दर्शवून अनुचीत व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराचे बचत खातेमध्ये जमा असलेली रक्कम रुपये 36,900/- ही दि.15.2.2012 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत द्यावी.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 5,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करुन द्यावी.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 2/12/2014