Maharashtra

Nagpur

CC/635/2016

SOU. DEVASHRI ASHOK MANGRULKAR - Complainant(s)

Versus

PRERNA BHARDWAJ - Opp.Party(s)

RENUKA PADHYE

16 Jan 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/635/2016
 
1. SOU. DEVASHRI ASHOK MANGRULKAR
R/O. 881, PARAMEDIX SERGICALS, KHARE TOWN, DHARMPETH, NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. PRERNA BHARDWAJ
R/O. SHIV VIHAR PODDAR, SSG-A, 2ND FLOOR, GANDHINAGAR, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 16 Jan 2018
Final Order / Judgement

निकालपत्र     

आदेश पारित दिनांक 16.01.2018

मा. सदस्‍य, श्री. नितीन माणिकराव घरडे यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप असे आहे की, मे. प्रेरणा भारद्वाज यांनी What’s App Sell द्वारा स्‍त्रीयांचे दागीने व विविध वस्‍तु विक्रीचा व्‍यवसाय करतो. तक्रारकर्ती यांना फोटोमध्‍ये दिसत असल्‍यामुळे एका पांढ-या रंगाची साडी, किंमत रुपये 2500/- मध्‍ये घेण्‍याचे तक्रारकर्तीने ठरवले व त्‍याप्रमाणे गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या ICICI Bank  चे खाते क्रं. 624301546636  मध्‍ये रक्‍कम जमा केली व साडी ही मटेरीयल- जॉर्पीट, रंग– पांढरा, दिनांक 07.07.2016 रोजी ऑर्डर व रक्‍कम जमा झाली. त्‍याप्रमाणे 5 ते 6 दिवसात म्‍हणजे दि. 12.07.2016 रोजी कुरीअर द्वारे साडीचे पार्सल प्राप्‍त झाले. परंतु जी साडी तक्रारकर्तीने ऑर्डर केली होती त्‍याएैवजी गैरअर्जदाराने हलक्‍या दर्जाची व वेगळी पाठविल्‍याचीबाब लक्षात आली. तक्रारकर्तीने ताबडतोब दुस-याच दिवशी गैरअर्जदाराला याबाबत कळविले व साडी परत घेऊन, पैसे परत करण्‍यास सांगितले. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराला ब-याच वेळा फोन करुन पैसे परत करण्‍याबाबत विनंती केली परंतु विरुध्‍द पक्ष पैसे देण्‍यास टाळाटाळ करीत राहिला, सरते शेवटी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला दि.09.08.2016 रोजी कायदेशीर नोटीस पाठवला, तो घेण्‍यास नकार या शे-यासह दि.11.08.2016 रोजी परत आला. त्‍यामुळे तक्रारकर्तीने शेवटी सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.  

1 विरुध्‍द पक्षाला आदेशीत करावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीने दिलेली साडीची किंमत रुपये 2500/- 12 % व्‍याजासह दिनांक 12.07.2016 पासून परत करावी.

                        2    तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देण्‍याचा आदेश द्यावा.

           

  1.       तक्रारकर्तीच्‍या तक्रारी वरुन विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस बजाविण्‍यात आली. विरुध्‍द पक्षाला पाठविलेली नोटीस  ‘नोटीस घेण्‍यास नकार’  या शे-यासह परत आली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षा विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 03.07.2017 रोजी पारित करण्‍यात आला.
  2.       तक्रारकर्तीने सदरच्‍या तक्रारीत 1 ते 7 दस्‍ताऐवज दाखल केले . त्‍यात प्रामुख्‍याने व्‍हॉटस अप वरील संभाषणाची प्रत, फोटोग्राफ मुळ प्रत, बँक रसीद, नोटीस व नोटीस परत आल्‍याबाबतचा लिफाफा इत्‍यादी दाखल केले.
  3.       सदरच्‍या प्रकरणात मंचासमक्ष तक्रारकर्तीच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला असता मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात येऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रं.

मुद्दे

उत्‍तर

1

तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक होते काय ?

होय

2

विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला सेवेत त्रुटी व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे दिसून येते काय ?

होय.

                कारणमिमांसा

  1.       सदर प्रकरणात दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ती व विरुध्‍द पक्ष यांच्‍यात साडी विक्री व घेण्‍याबाबतचा व्‍यवहार झाला व विरुध्‍द पक्षाने साडीची किंमत स्‍वीकारल्‍याबाबतचे दिसून येते. त्‍याबाबत तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा केल्‍याबाबतची पावती अभिलेखावर दाखल केली आहे. यावरुन हे सिध्‍द होते की, तक्रारकर्ती ही   विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे.
  2.       तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला पाठविलेली साडी ही विभिन्‍न प्रकारची होती, याबाबतचे छायाचित्र अभिलेखावर दाखल आहे. तसेच विरुध्‍द पक्षाला पाठविलेली नोटीस घेण्‍यास नकार या शे-यासह परत आलेला लिफाफा अभिलेखावर दाखल, तसेच मंचा मार्फत पाठविलेली नोटीस सुध्‍दा घेण्‍यास नकार या शे-यासह परत.
  3.       यावरुन हे सिध्‍द होते की, विरुध्‍द पक्षाने जाणूनबुजून तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे. म्‍हणून तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाकडून साडी साठी दिलेली किंमत व्‍याजासह परत घेण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

                          सबब मंचाद्वारे खालीलप्रमाणे आदेश पारित.

आदेश

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते. 

2.     विरुध्‍द पक्षाला आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ती तर्फे स्‍वीकारलेली

      साडीची किंमत रुपये 2500/- दि.12.07.2016 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम

      तक्रारकर्तीच्‍या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्‍के दराने व्‍याजासह द्यावी.

3     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये     

      2500/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5000/- द्यावे.

4     उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क देण्‍यांत यावी.

5     तक्रारकर्तीला प्रकरणाची 'ब'  व 'क'  प्रत परत करावी.                 

     

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.