तक्रार क्र. - 372/2009 दाखल दिनांक - 04/06/2009 निकालपञ दिनांक - 13/07/2010 कालावधी - 01 वर्ष 01 महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.वामन नारायण दळवी 'यमुना' को.ऑ.हौ.सोसायटी, बि विंग/308 तिसरा मजला, रिव्हर पार्क, रावळ पाडा, शिववल्लभ रोड, दहिसर (पूर्व), मुंबई 400 068. .. अर्जदार विरूध्द श्री. प्रेमचंद अशोक कांबळे(युनिक ट्रॅव्हल्स कं. चे मालक) 306, अनंत लक्ष्मी चेंबद, 3रा मजला, दादा पाटील वाडी, नौपाडा, ठाणे(पश्चिम). .. गैरअर्जदार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य उभय पक्षकार गैरहजर आदेश (दिः 13/07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण आज रोजी सुनावणीस आले असता उभय पक्षकारांचा तीन वेळा पुकारा करण्यात आला, ते अथवा त्यांचे वतिने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की दि.09/09/2009, दि.04/11/2009, दि.20/01/2010, दि.23/02/2010 दि.18/05/2010 व दि.13/07/2010 या तारखांना अर्जदार सातत्याने गैरहजर आहेत. त्यामुळे अर्जदार सदर प्रकरण चालविण्यास इच्छुक नाही असे स्पष्ट होते. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.अर्जदार यांच्या सततच्या गैरहजेरीच्या कारणाखातर तक्रार खारीज करण्यात येते. 2.न्यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्वतः करावे.
दिनांक – 13/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|