KUNAL M. THAKRAR filed a consumer case on 06 Jun 2013 against PREETI SLIM CLINIC in the Mumbai(Suburban) Consumer Court. The case no is CC/11/587 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
| |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
कारण मिमांसा तक्रारदारानी सामनेवाले यांच्या 1 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी करण्याच्या योजनेमध्ये रु.14,000/- भरुन दिनांक 01/09/2011 पासून भाग घेतला. परंतू 26 दिवसांच्या कालावधीत तक्रारदाराचे वजन केवळ 3-4 किलो एवढेच कमी झाले. त्यामुळे सामनेवाले यांनी हमी दिल्याप्रमाणे 1 महिन्याच्या कालावधीत आवश्यक ते 8 किलो वजन घट झाले नसल्याने,आपण भरलेली रक्कम पूर्णतः रु 14,000/- व्याजासहीत परत मिळण्याची मागणी केली आहे. शिवाय सामनेवाले यांनी त्यांना देऊ केलेली 5,175/- क्रेडिट नोटही घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. या संदर्भात प्रस्तुत मंचाने सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदारानी 26 दिवस सामनेवाले यांची सेवा उपभोगली आहे हे त्यांनी मान्य केले आहे. शिवाय या कालावधीत त्यांचे 3-4 किलो वजन कमी झाल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे सामनेवाले यांच्या योजनेचा त्यांना किमान 40 ते 42 टक्के फायदा झाल्याचे उघडपणे दिसते. सामनेवाले यांनी जरी 8 किलो वजन घटविण्याची खात्री दिली असली तरी,तक्रारदारांना त्याचा अंशतः का होईना फायदाच झाला आहे. शिवाय सामनेवाले यांनी आपण 100 टक्के परिणाम न देऊ शकल्याबददल तक्रारदाराना रु.5,175/- इतका 4 (तक्रार क्र 587/11) परतावा देण्याचे लिखीत नोंद केली आहे. तथापि तक्रारदारानी आपल्याला रु.14,000/- परत मिळावेत असा अटटाहास धरलेला दिसतो. वास्तविकतः तक्रारदार यांनी जवळजवळ 1 महिना सामनेवाले यांची सेवा स्विकारली आहे. व त्यांना 40 टक्क्यांच्यावर फायदाही झालेला आहे. ही बाब विचारात घेणे आवश्यक वाटते. वरील चर्चेनुरुप सामनेवाले यांनी हमी दिल्यानुसार 1 महिन्यामध्ये आवश्यक ते वजन घटविण्यात त्यांना आलेले अपयश ही त्यांची सदोष सेवा आहे हे तक्रारदार सिध्द करतात. त्यानुसार खालील आदेश करण्यात येतो. -आदेश- 1) तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. 2) सामनेवाले हयांनी तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कसूर केली आहे हे जाहिर करण्यात येते. 3) सामनेवाले यांनी हमी दिल्याप्रमाणे 8 किलो वजन घटविणे अनिवार्य असतांना केवळ 3-4 किलो वजन घटविण्यात यश आल्याने,उर्वरीत न घटलेल्या 4-6 किलो वजनाबाबत तक्रारदारांना उर्वरीत रक्कम रु.8,100/- दिनांक 27/09/2011 पासून 9 टक्के व्याजासहित आठ आठवडयाच्या आंत अदा करावेत तसेच तक्रारीच्या खर्चासाठी रु.500/- अदा करावेत. 4) निकालाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात |
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande] |
PRESIDENT |
[HON'ABLE MR. N. D. KADAM] |
MEMBER |
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.