Maharashtra

Nanded

CC/10/5

Nanda Tatojirao Uke - Complainant(s)

Versus

Precedent, Z.P. Arogya Sahakari Patsanstha - Opp.Party(s)

ADV. M.T. Pund

19 Apr 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/5
1. Nanda Tatojirao Uke Vadgao, Tq & Dist. Yavatmal.YavatmalMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Precedent, Z.P. Arogya Sahakari Patsanstha Nanded.NandedMaharastra2. Kishanrao JogdandPrecedent,Z.P.Office Nanded NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 19 Apr 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2010/05
 
                    प्रकरण दाखल तारीख -   04/01/2010     
                    प्रकरण निकाल तारीख    19/04/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.एस.आर.देशमुख.          -   सदस्‍या
                मा.श्री.सतीश सामते.               - सदस्‍य
 
श्रीमती.नंदा पि.तातोबाजी उर्फ तातोजीराव उके,
वय वर्षे 42, व्‍यवसाय नौकरी,                                 अर्जदार.
रा.प्राथमीक आरोग्‍य केंद्र वडगांव (पो.स्‍टे),
ता.जि.यवतमाळ.
 
      विरुध्‍द.
 
1.   जि.प.आरोग्‍य कर्मचारी सहकारी पतसंस्‍था,             गैरअर्जदार.
     मर्यादित,जि.नांदेड. मार्फत अध्‍यक्ष,
2.   कीशनराव जोगदंड,
अध्‍यक्ष,जिल्‍हा परीषद आरोग्‍य कर्मचारी सहकारी,
पतसंस्‍था, मर्यादीत जि.नांदेड.
कार्यालय- जिल्‍हा परीषद परीसर नांदेड.
3.   अशोक सोनकांबळे,
सचिव, जि.प. आरोग्‍य कर्मचारी सहकारी पतसंस्‍था,
मर्यादीत जि.नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील            - अड.एस.एम.पुंड.
गैरअर्जदारा 1 ते 3तर्फे वकील      - अड.व्‍ही.एम.पवार.
 
 निकालपत्र
 (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख,सदस्‍या)
 
          अर्जदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी की, गैरअर्जदार क्र.1 ही जिल्‍हा परीषद नांदेड आरोग्‍य विभाग अंतर्गत काम करणा-या कर्मचा-यांची पतसंस्‍था आहे. अर्जदार ही आरोग्‍य विभागामध्‍ये ए.एन.एम. महणुन नौकरीस होती ती गैरअर्जदार क्र. 1 संस्‍थेची सदस्‍या होती. अर्जदाराचे गैरअर्जदार क्र. 1 संस्‍थेकडे भाग भांडवल जमा आहेत. त्‍या भागभांडवलामधून गैरअर्जदार संस्‍था अर्जदारास आणि संस्‍थेच्‍या इतर सभासदांना कर्ज देते. कर्जावर व्‍याजाच्‍या रुपाने झालेल्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये हिस्‍साही देते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सहकार न्‍यायालय येथे सी.सी.क्र.366/05 दाखल केले. श्री.दत्‍ता दगडु खरोडे हे त्‍यांचे कर्जदार आहेत आणि वर उल्‍लेख केलेले इतर सर्व पाच जण त्‍या कर्जास जामीनदार आहेत. सहकार न्‍यायाल नांदेड यांनी दि.23/01/2008 रोजी अर्ज मान्‍य करुन त्‍या दाव्‍यातील प्रवितादी क्र. 1 श्री दत्‍ता दगडु खरोडे यांनी संस्‍थेस कर्जाची रक्‍कम व्‍याजासह परतफेउ करावी असे निर्देश दिले. इतर प्रतिवादीच्‍या विरुध्‍दचा दावा न्‍यायालयाने नामंजुर केला. गैरअर्जदार क्र. 1 संस्‍थेकडे अर्जदाराची रु.22,228/- एवढी रक्‍कम भागभांडवल आणि इतर ठेवीपोटी जमा आहे. अर्जदाराची जिल्‍हा परीषद यवतमाळ आरोग्‍य विभाग अंतर्गत अंतरजिल्‍हा बदली जाने 2007 मध्‍ये झाली आहे. म्‍हणुन अर्जदाराने तिचे सदस्‍यत्‍व रद्य करुन ती सर्व रक्‍कम परत दिली नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास तिची जमा असलेली रक्‍कम परत न देता तिला दि.01/12/2008 रोजीच्‍या नोटीसद्वारे मा.सहकारी न्‍यायालय नांदेड यांचे प्रकरण सी.सी.सन.क्र.366/05 मधील निकालानुसार कर्ज रक्‍कमेचा भरणा करण्‍याची सुचना केली. ती नोटीस सहकारी न्‍यायाचे निकालाचे विपरीत गैरअर्जदारांनी पाठविली आहे. ती नोटीस मिळाल्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारांना दि.12/01/2009 रोजी लेखी अर्ज देऊन रक्‍कमेची मागणी केली. पण गैरअर्जदारांनी रक्‍कम परत न करता मा.सहकार न्‍यायालय नांदेड यांचे प्रकरण क्र.366/05 मधील निकालानुसार अर्जदाराची गैरअर्जदाराकडे जमा असलेली रक्‍कम रु.22,228/- गैरअर्जदारांनी श्री.खरोडे यांच्‍या कर्ज खात्‍यात जमा करुन अर्जदाराचे खाते बंद केले आहे असे दि.22/01/2009 रोजीच्‍या नोटीसद्वारे सुचित केले. त्‍यांनी पुढे असेही सुचीत केले की, ती नोटीस मिळाल्‍यानंतर पंधरा दिवसाच्‍या आंत कर्जाची उर्वरीत रक्‍कम रु.22,772/- संस्‍थेकडे त्‍वरीत भरणा करावी, अन्‍यथा जप्‍तीची कार्यवाही करण्‍यात येईल. अर्जदाराने पुन्‍हा तीन चार वेळा गैरअर्जदारांची भेट घेऊन त्‍यांना मा.सहकार न्‍यायालयाचे निकालचा अर्थ समजावुन सांगीतला आणि रक्‍कम परत देण्‍याची विनंती केली. पण गैरअर्जदारांनी ती रक्‍कम परत देण्‍यास नकार दिला. म्‍हणुन अर्जदाराने दि.09/03/2009 रोजी गैरअर्जदारांन नोटीस पाठवुन रक्‍कमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्‍यांची जमा असलेली रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी केली म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे, त्‍यांची जमा असलेली रक्‍कम रु.22,228/- माहे जानेवारी 2007 पासुन द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह सर्व गैरअर्जदारांनी एकत्रित पण अथवा वैयक्तिकरित्‍या अर्जदारास द्यावे. तसेच मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- अर्जदारास देण्‍यात यावे अशी मागणी केली आहे.
 
          गैरअर्जदार यांना नोटीस देण्‍यात आली त्‍यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदार व गैरअर्जदार यांचे सभासद व संस्‍था असे नाते असल्‍यामुळे दोघांनाही सहकार कायद्यातील तरतुदी लागु असल्‍यामुळे जर सभासद व संस्‍था त्‍यांच्‍यात , त्‍यांच्‍या हक्‍कासंबंधी वाद निर्माण झाल्‍यास महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थाचा कायदा 1960 चे कलम 91 प्रमाणे तो वाद चालविण्‍याचा अधिकार फक्‍त सहकार न्‍यायालय नांदेड या कोर्टालाच असल्‍यामुळे व वादातील विषय हा सभासदाच्‍या भाग व ठेवी संस्‍थेकडे कर्ज उभारतांना ठेवलेले असल्‍यामुळे अर्जदार ही कर्जदाराची जमानतदार असल्‍यामुळे ते ग्राहक होऊ शकत नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 संस्‍थेचे पदाधिकारी असून, संस्‍थेच्‍या संचालक मंडळाच्‍या निर्णयानुसार ठरावानुसार व आदेशा नुसार कार्य करतात ते वैयक्तिक अधिकारात संस्‍थेचा काणेताही कारभार करत नाहीत, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना तक्रारी अर्जामध्‍ये वैयक्तिक नांवाने व वैयक्तिक अधिकारात संस्‍थेचा व्‍यवहार पाहण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना सदरील तक्रारी अर्जात वैयक्तिक नांवाने पार्टी केल्‍यामुळे ते मिस-जॉईंडर ऑफ पार्टी या सी.पी.सी.मधील तत्‍वाप्रमाणे सदरची तक्रार चालवीणे योग्‍य नसल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्‍द फेटाळण्‍यात यावी. गैरअर्जदार क्र. 1 चा व्‍यवहार हा संस्‍थेच्‍या स्‍वभांडवलावर चालत नसुन गैरअर्जदार क्र. 1 ही नां.जि.म.स. बँकेकडुन कर्ज घेऊन आपल्‍या सभासदांना संस्‍थेमार्फत दोन ते तीन टक्‍के व्‍याजदराचा फरक्‍ ठेवुन सभासदांना बँकेकडुन घेतलेल्‍या कर्जातुन वाटप करते. त्‍यामुळे संस्‍थेचा आर्थीक व्‍यवहार हा बॅकेकडुन कर्ज घेऊनच चालतो तो सभासदांच्‍या भागभांडवलावर अथवा स्‍वभांडवलावर चालत नाही. त्‍या कर्जातुन वाटप केलेल्‍या रक्‍कमेतुन संस्‍थेला उत्‍पन्‍न होत नाही. कर्जावरील व्‍याज बँकेकडे भरणा करते. वसुल झालेल्‍या रककमेतुन कुठल्‍याही प्रकारचा हिस्‍सा उत्‍पन्‍न झाले म्‍हणुन सभासदांना वाटप करीत नाही. अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक होऊ शकत नाही. गैरअर्जदार क्र. 1 संस्‍थेचे सभासद दत्‍ता दगडु खरोडे यांनी गैरअर्जदार संस्‍थेकडुन रु.13,000/- व रु.12,000/- चे कर्ज दि.23/09/1993 व 07/03/1993 रोजी घेतले होते व त्‍यांनी घेतलेलया कर्ज रु.13,000/- अर्जदार ही जामीनदार म्‍हणुन संस्‍थेच्‍या हक्‍कात दत्‍ता खरोडे यांच्‍या कर्जास जमानातनामा लिहून दिला आहे. अर्जदार ही जमानतदार असल्‍यामुळे व दत्‍ता खरोडे यांनी कर्जाची परत फेड केली नसल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 संस्‍थेने सहकार न्‍यायालयात दावा क्र.366/05 कर्जदार दत्‍ता व त्‍याचे जामीनदार रामभाऊ,दिवाकर व नंदा तातोबाजी व डी.एस.कदम या जामीनदारा विरुध्‍द दाखल केला होता व सदरील दावा तांत्रिक बाबीवरुन कोर्टाने दत्‍ता विरुध्‍द मंजुर करुन जामीनदार व पगार करणार अधीकारी यांच्‍या विरुध्‍द फेटाळला. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 संस्‍थेन सहकार न्‍यायालच्‍या दि.23/01/2008 रोजी च्‍या निकालाच्‍या नाराजीने मा.सदस्‍य महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी अपीलेंट कोर्ट, खंडपीठ औरंगाबाद येथे अपील दाखल केली असून त्‍या अपीलातील किरकोळ अर्ज क्र.30/09 ना.जि.प.आ.कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या नांदेउ विरुध्‍द दत्‍ता दगडु खरोडे, रामभाऊ जोशी, दिवाकर,अर्जदार नंदा उके, कदम आणि वैद्यकिय अधिकारी यांना सदरील अपीलात प्रतीवादी करण्‍यात आले. अपीलाचा निकाल लागेपर्यंत अर्जदाराचे सभासदत्‍व रद्य करता येत नाही व जोपर्यंत सभासदत्‍व रद्य होणार नाही व कर्जदाराकडील व जामीनदाराकडुन कर्जाची रक्‍कम व्‍याजासह वसुल होणार नाही. अर्जदार अपीलाचा निकाल लागेपर्यंत सदरील रक्‍कम मागण्‍यास पात्र नाही. महाराष्‍ट्र सहकार संस्‍थाचा कायदा व नियम व संस्‍थेचे पोटनियमातील तरतुदी या सभासद व अर्जदार व जमानतदार यांच्‍यावर बंधनकारक आहेत. सदरीचा वाद हा सहकार कायद्यातील कलम 91 प्रमाणे चालविण्‍याचा अधिकार फक्‍त सहकार न्‍यायालयास आहे. त्‍यामुळे सदरील तक्रार या न्‍यायमंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नसल्‍यामुळे ती चालविण्‍या योग्‍य नाही. म्‍हणुन सदरची तक्रार गैरअर्जदार क्र. 1 ते 3 विरुध्‍द फेटाळण्‍यात यावी.
 
          अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
 
1.   अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?      होय.
2.   गैरअर्जदार हे अर्जदाराने मागणी केलेली रक्‍कम
देण्‍यास जबाबदार आहेत काय ?                                           होय.
3.   काय आदेश ?                                            अंतीम आदेशा प्रमाणे.
 
 
                      कारणे.
मुद्या क्र. 1 चे उत्‍तर -
 
        अर्जदार ही जिल्‍हा परीषद नांदेड आरोग्‍य विभागामध्‍ये ए.एन.एम. म्‍हणुन नौकरीस होती व जिल्‍हा परीषद आरोग्‍य कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्यादित नांदेड म्‍हणजेच गैरअर्जदार क्र.1 संस्‍थेचे सभासद होती. गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे अर्जदार हिचे भागभांडवल व डिपोजिट जमा होते म्‍हणुन अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे.
 
मुद्या क्र. 2 चे उत्‍तर -
 
       गैरअर्जदार संस्‍था जिल्‍हा परीषद आरोग्‍य कर्मचारी सहकारी पतसंस्‍था ही स्‍वतःकडे असलेले भागभांडवलमधुन संस्‍थेच्‍या सभासदांना कर्ज देते व त्‍या कर्जाला व्‍याज आकारणी करते. तसेच भागभांडवलमधुन दिलेल्‍या कर्जावर व्‍याजाच्‍या रुपाने उत्‍पन्‍न घेते व हिस्‍सा देते. गैरअर्जदार क्र. 2 हे संस्‍थेचे अधक्ष आहेत व गैरअर्जदार क्र. 3 हे संस्‍थेचे सचिव आहेत. दि.09/01/1994 रोजी दत्‍ता खरोडे यांना रु.12,000/- खाजगी कामासाठी म्‍हणुन गैरअर्जदार यांनी कर्ज रक्‍कम दिलेले होते त्‍या कर्ज रक्‍कमेसाठी अर्जदार  रामभाऊ पांडुरंग जोशी, दिवाकर गोळेगांवकर, डी.एस.कदम,आरोग्‍य अधिकारी, प्रा.आ.केंद्र रामगड,  व स्‍वतः खरोडे हे जामीनदार होते. सदरील कर्ज हे श्री. दत्‍ता खरोडे यांनी भरले नाही म्‍हणुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी सहकार न्‍यायालयामध्‍ये त्‍यांच्‍या विरुध्‍द दावा दाखल केला. त्‍यामध्‍ये रामभाऊ जोशी, दत्‍ता खरोडे, गोळेगांवकर,टी.एन.ओके, डी.एस.कदम मेडिकल ऑफिसर, यांना प्रतिवादी म्‍हणुन त्‍याच्‍यावर दावा केला. दावा क्र.366/05 या अंतर्गत दावा केला. दरम्‍यानच्‍या कालावधीत गैरअर्जदार यांचेकडे अर्जदाराचे रु.22,228/- एवढी रक्‍कम भागभांडवल व इतर ठेवी पोटी जमा होती. अर्जदाराची जिल्‍हा परीषद यवतमाळ जिल्‍हा अंतर बदली जानेवारी 2007 मध्‍ये झाली. अर्जदाराने तीचे गैरअर्जदार यांचे संस्‍थेतील सदस्‍यत्‍व रद्य करुन रक्‍कम व्‍याजासह परत मिळावी म्‍हणुन गैरअर्जदार यांना कळविले परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील रक्‍कम परत केली नाही . ब-याच वेळेस अर्जदाराने रक्‍कमेची मागणी केली परंतु सदरील रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार यांनी टोलवाटोलवी केली. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील रक्‍कम दिली तर नाहीच या उलट 366/05 हे प्रकरण मा.सहकार न्‍यायालय यांच्‍या न्‍यायालयात दावा दाखल केला. सदरील केसचा निकाल दि.23/01/2008 रोजी लागला व त्‍यामध्‍ये कर्ज घेतलेली व्‍यक्ति दत्‍ता खरोडे यांनी सदरील पुर्ण कर्ज रक्‍कम बॅकेमध्‍ये भरावे असा आदेश देण्‍यात आला व गैरअर्जदार क्र. 2 ते 6 यांना या प्रकरणातुन वगळण्‍यात आले असे असतांना देखील दि.01/12/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 1 सचिव व अध्‍यक्ष यांनी यांचे सहीने अर्जदारास एक पत्र देण्‍यात आले कर्जदार खरोडे डी.डी. यांचेकडील कर्ज वसुलीचा सहकार न्‍यायालयाने वसुली दावा क्र.366/05 दाखल केलेला होता सदर दावाचा निकाल दि.23/09/2008 रोजी लागला असून सदर निकालात संबंधीत कर्जदार व त्‍यांचे जामीनदाराकडुन संयुक्‍तीकपणे किंवा स्‍वतंत्रपणे रक्‍कम वसुल करावे असे स्‍पष्‍ट आदेश देण्‍यात आले पण सदरील कर्जाचे जामीनदार असल्‍याने संबंधीताचे येणे असलेली रक्‍कम मुद्यल रक्‍कम रु.25,000/- व त्‍या कर्जावरील व्‍याज रु.53,950/- व कोर्ट खर्च रु.11,050/- असे एकुण रु.90,000/-  न्‍यायालयाच्‍या निकालाप्रमाणे अर्जदारास पंन्‍नास टक्‍के रक्‍कम म्‍हणजेच रु.45,000/- एवढी रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे. आपली संस्‍थेत जमा असलेली रक्‍कम रु.20,600/- वजा जाता रु.24,400/- एवढी रक्‍कम संस्‍थेत भरणा करणे आवश्‍यक आहे. तरी आपणांस या नोटीसीद्वारे सुचीत करण्‍यात येते की, हि नोटीस मिळाल्‍यापासुन पंधरा दिवसाचे आंत रु.24,400/- एवढी रक्‍कम संस्‍थेत भरणा करावे मुदतीत रक्‍कम भरणा न केल्‍यास न्‍यायालयाचे निकालानुसार आपणा विरुध्‍द जप्‍तीची कार्यवाही करण्‍यात येईल, अशा आशयाचे दुसरे एक पत्र दि.22/01/2009 रोजी गैरअर्जदाराने पुन्‍हा अर्जदारास पाठविला. मा.सहकार न्‍यायालय नांदेड यांचे गैरअर्जदार यांनी दाखल केलेले निकाल पहाता त्‍यामध्‍ये आदेश केलेले आहे की, गैरअर्जदार क्र. 1 म्‍हणजे कर्जदार दत्‍ता खरोडे यांनी सर्व रक्‍कम रु.62,500/- व्‍याजासह भरण्‍याचे आदेश दिलेले आहे व अर्जदाराच्‍या सदरील केसमध्‍ये कर्ज भरणा करावा असे कुठेही आदेश नाही असे असतांना देखील गैरअर्जदारांनी अर्जदारास दि.01/12/2008 रोजी व दि.22/01/2009 रोजी पत्र पाठवून अर्जदारास मानसिक त्रास दिला हे सिध्‍द होते व ही सेवेतील त्रुटी मंचासमोर अर्जदाराने सिध्‍द केली आहे. म्‍हणुन गैरअर्जदार यांच्‍याकडुन अर्जदारास त्रुटीयुक्‍त सेवा मिळाली आहे या निर्णयापर्यंत हे मंचा आलेले आहे. म्‍हणुन जानेवारी 2007 पासुन अर्जदारास गैरअर्जदार संस्‍था यांनी संस्‍थेकडे अर्जदाराचे असलेली रक्‍कम रु.22,228/- ही रककम दरमहा 9 टक्‍के व्‍याजाने एका महिन्‍याचे आत द्यावे हा निर्णय मंचाने घेतले आहे.
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत
करीत आहोत.
                              आदेश
 
1.   अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्‍यात येतो.
2.   गैरअर्जदार जिल्‍हा परीषद आरोग्‍य कर्मचारी सहकारी पतसंस्‍था(अध्‍यक्ष व सचिव) यांनी अर्जदारास रु.22,228/-  सदर रक्‍कमेवर जानेवारी 2007 पासुन 9 टक्‍के व्‍याज दराने एक महिन्‍याचे आंत द्यावी. एक महिन्‍यानंतर दिल्‍यास वरील रक्‍कम रु.22,228/- व आजपर्यंतचे 9 टक्‍के व्‍याज यानंतर सर्व रक्‍कमेवर 12 टक्‍के व्‍याज दाराने रक्‍कम फिटेपर्यंत रक्‍कम अर्जदारास द्यावी.
3.   मानसिक त्रासाबद्यल गैरअर्जदारांनी अर्जदारास रु.3,000/- व दावा खर्च म्‍हणुन रु.2,000/- द्यावे.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                                    (श्रीमती.सुवर्णा.देशमुख)                                        (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                                                 सदस्‍या                                                               सदस्‍य
 
गो.प.निलमवार.लघूलेखक