जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –120/2010 तक्रार दाखल तारीख –12/07/2010
काकासाहेब पि. बालासाहेब चव्हाण
वय 32 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.नांदगांव ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. प्रो.प्रा.प्रयोग कृषी सेवा केंद्र
स्टेशन रोड, पानगांव ता.रेणापुर जि.लातूर .
2. मुख्य कार्यालय,
झुआरी इंडस्ट्रीज लि.,जयकिसान भवन
झुआरी नगर, गोवा -403726 ..सामनेवाला
3. विभागीय कार्यालय,
झुआरी इंडस्ट्रीज लि.
हर्षवर्धन बिल्डींग, अदालत रोड,
पहिला मजला, औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एन.एम.कुलकर्णी
सामनेवाले क्र.1 ते 3 तर्फे :- अँड ए.के.जवळकर
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची एकत्रित कूटूंबाची मौजे नांदगांव शिवारात गट नंबर 139 असून क्षेत्र 1 हेक्टर 93 आर शेत जमिन आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर सुध्दा जमिन त्यांची आई श्रीमती पुष्पावती यांचे नांवे करण्यात आली. वास्तविक सदर शेत जमिन तक्रारदार ही एकत्रित कूटूंबासाठी वहिती करीत आहेत.
तक्रारदारांनी मागील हंगामात वरील शेत जमिनतील 3 एकर क्षेत्रात ऊस लागवड केली होती. सदरील पिकामध्ये मोठयाप्रमाणावर तण निर्मीती झाली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.28.01.2010 रोजी सामनेवालाकडून ऊस पिकातील तण नष्ट करण्यासाठी तण नाशकाची मागणी केली. तणनाशका बाबत तक्रारदारांना काही माहीती नव्हती. सामनेवाला यांनी तक्रारदारांना ग्लायसन जे.के.कंपनीचे व बॅच नंबर 35 चे औषध दिले. औषध फवारल्यानंतर ऊसाचे पिकातील तण नष्ट होण्याची हमी दिली. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने औषधाच्या दोन बाटल्या रक्कम रु.620/- देऊन खरेदी केल्या. त्याबाबत पावती नंबर 11894 सामनेवाले यांनी दिलेली आहे.
त्यानंतर तक्रारदारांनी वरील औषध सामनेवाला यांनी दिलेल्या सुचनेनुसार तणावर फवारले. मात्र चार दिवसांने शेतातील ऊस पिवळा पडला असल्याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. त्यानंतर 1-2 दिवसात ऊस संपूर्ण गळून गेला. तक्रारदाराचे प्रचंड आर्थिक नूकसान झाले. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ऊसाची किंमत पैशाचे स्वरुपात करता येणे शक्य नाही.
वरील घटनची माहीती तक्रारदारांनी सामनेवाला यांनादिली असता त्यांनी कसल्याही प्रकारचे सहकार्य करण्यास असमर्थता दर्शवली. तक्रारदारांना यांना अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर काढले.
तक्रारदाराची ऊसाचे नूकसानी बाबत मंडळ अधिकारी बर्दापूर व इतर महसूल कर्मचारी व गावातील प्रतिष्ठीत इतर लोकासमक्ष पिकाच्या नूकसानीची पाहणी केली.पंचनामा सर्वासमोर केला.
सामनेवाला निष्काळजीपणाने निकृष्ट स्वरुपाचे अतिशय घातक औषध देऊन तक्रारदाराची फसवणूक केली. तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रूटी असल्याचे दिसून येते. सामनेवाला यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. सदर औषधा मुळे तक्रारदाराची ऊसाचे पिकाची भविष्यातील अंदाजे रक्कम रु.2,50,000/- चे नूकसान झाले. त्यांस सामनेवाले जबाबदार आहेत. दि.10.05.2010 रोजी तक्रारदारांनी रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठवून नूकसान भरपाईची मागणी केली. सामनेवाला यांनी नुकसान भरपाई दिली नाही.
विनती की, ऊसाचे पिकाचे झालेल्या नूकसानीची रक्कम रु.2,50,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारास देण्या बाबत आदेश व्हावेत. सदर रक्कमेवर 18 टक्के व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा नि.8 दि.08.11.2010 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदार ऊसाचे पिक हे पैसे कमविण्याच्या उददेशाने घेतलेले आहे त्यामुळे तो ग्राहक होत नाही. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार दाखल करण्यासाठी बिड हे कार्यक्षेत्र तक्रारदारास प्राप्त होत नाही.
ग्लायसन औषधामुळे ऊस करपून गेला, औषध खराब होते आणि खराब औषधामुळे ऊस करपुन गेला यांचा कोणताही तज्ञ पुरावा दाखल केला नाही. तक्रार काल्पनिक आहे. तक्रार दाखल करण्यास तक्रारदारांना अधिकार नाही. तक्रारदारांनी तहसील अधिका-यांना हाताशी धरुन खोटा पंचनामा तयार करुन घेतला.पंचनामा तयार करीत असताना सामनेवाला यांना बोलावले नाही. पंचनामा सामनेवाला यांचे उपरोक्ष करुन घेतला त्यामुळे तो मान्य नाही.
सामनेवाला क्र.1 फक्त विक्रेता व झुआरी इंडस्ट्रीजचा डिलर आहे. झुआरी इंडस्ट्रीज तयार झालेले ग्लायसन व इतर शेतीसाठी लागणारे औषधे विक्री करतो. सदरची औषधे सामनेवाला यांनी तयार केलेले नाहीत. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी झुआरी इंडस्ट्रीज लि. जयकिसान भवन झुआरी नगर गोवा या मुख्य कार्यालयास झुआरी इंडस्ट्रीज लि. हर्षवर्धन बिल्डींग अदालत रोड पहिला मजला औरंगाबाद या विभागीय कार्यालयास सामनेवाला करणे आवश्यक होते. तक्रारदारांनी त्यांना समाविष्ट न केल्यास आवश्यक ती पार्टी न केल्याने तक्रार खारीज करण्यात यावी. तक्रारदाराचे रक्कम रु.2,50,000/- भविष्यातील नूकसानी बाबतचा हिशोबाचा कोणताही खुलासा नाही.
नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला व त्यांचे मित्र श्री.दिलीपराव नामदेवराव चव्हाण तक्रारदाराचे घरी गेला असता तक्रारदार शेताकडे गेले आहेत असे घरच्यानी सांगितले. सामनेवाला व त्यांचा मित्र तक्रारदाराचे शेतीत गेले तेथे सामनेवाला व मित्रास दिसून आले की, तक्रारदाराचे शेतात ऊस हिरवागार दिसून आला. तक्रारदाराने सामनेवाला व त्यांचे मित्रास शेतात पाहिल्यानंतर पहिल्यादा चपापले व तुम्ही घराकडे चला म्हणून घरी घेऊन आले. सामनेवाला यांनी तक्रारदारास नोटीस कशासाठी पाठविली, ऊस तर हिरवागार आहे. तेव्हा तक्रारदारास काहीच बोलता आले नाही. नोटीस खोटी असल्याने तिचे उत्तर दिले नाही. तक्रारदारांनी औषध लातूर जिल्हयात खरेदी केल्याने सामनेवाला लातूर जिल्हयातील रहिवासी आहे व व्यवसाय करित असल्याने सदरची तक्रार या जिल्हा मंचात चालू शकत नाही. तक्रार खर्च रु.10,000/- सह खारीत करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचा एकत्रित खुलासा नि.25 दि.29.03.2011 रोजी दाखल केला. सदरचा खुलासा हा सामनेवाला क्र.1 च्या खुलाशा सारखाच आहे. त्यांनी तक्रारीतील त्यांचे विरुध्दची सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रार रु.10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचे साक्षीदार श्री. गोंविद भाऊसाहेब चव्हाण यांचे शपथपत्र नि.13, श्री.भाऊसाहेब माधवराव गायकवाड यांचे शपथपत्र नि.14, व श्री. रामकिशन चंद्रभान चव्हाण यांचे शपथपत्र नि.15 तसेच तक्रारदाराचे मित्र श्री.दिलीपराव नामदेवराव चव्हाण यांचे शपथपत्र नि.10 दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.2 व3 यांचा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी एकत्रित कूटूंबातील शेत जमिनीची वहीती करतात या बबात संबंधीत कूटूंबातील व्यक्तीचा पुरावा यांचे शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी त्या बाबत जोरदार हरकत घेतली आहे. तसेच पान अनुक्रमांक 19 वर्ष 2009-10 या हंगामात सोयाबिन, कापूस, मका, ज्वारी इत्यादी पिकाची लागवड केल्याचे दिसते. त्यात ऊस लागवडीचा उल्लेख नाही.
तक्रारदारांनी ऊस पिकातील तण वाढत असल्याने तण नाशकासाठी सामनेवालाकडून ग्लायसन हे सामनेवाला क्र.2 कंपनीने उत्पादीत केलेले विकत घेतले आहे. ते सामनेवाला क्र.1 नांदगांव ता.रेणापूर जिल्हा लातूर कडून विकत घेतले आहे.
या संदर्भात सामनेवाला क्र.1 ते 3 चे अधिकार क्षेत्रा संदर्भात अशी हरकत आहे की, सदरचे प्रकरण हे या जिल्हा मंचात चालू शकत नाही. या संदर्भात तक्रारदाराची शेत जमिन ही बीड जिल्हातील तालुका अंबाजोगाई मौजे नांदगांव शिवारात असल्याचे 7/12 उता-यावरुन दिसते. तक्रारदाराने जरी सदरचे औषधी नांदगाव येथून विकत घेतली नाही तरी सदरचे औषधीचा उपयोग नांदगांव शेतातील शेत जमिनीवर तणनाशाकासाठी केलेला आहे व तणनाशकाचे औषधामुळे त्यांचे ऊसाचे पिकाचे नूकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांना तक्रारीत कारण ग्राहक सरंक्षण कायदा 1986 दूरुस्त कायदा 2003 चे कलम 2(सी) प्रमाणे बीड जिल्हयात घडलेले असल्यामुळे सामनेवाला यांची सदरची हरकत ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
प्रथमतः तक्रारदारांनी औषधी विक्रेता यांस पार्टी केले होते व सामनेवाला यांचा खुलासानंतर सामनेवाला क्र. 2 व 3 यांना पार्टी केलेले आहे. त्यामुळे आवश्यक ती पार्टी न केल्याचे तत्वाने तक्रार निकाली काढण्याची हरकत शिल्लक राहत नाही.
तक्रारदारांनी ऊसाचे संदर्भात ऊसाचे बियाणे विकत घेतल्या बाबत ऊसाची लागवड शेतात कधी केली या बाबतचा तक्रारदाराच्या तक्रारीत उल्लेख नाही. तक्रारदारांनी झेरॉक्स फोटा कॉपी दाखल केलेल्या आहेत. कायदयानुसार सदरची झेरॉक्स प्रति पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही.
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या संदर्भात वरील साक्षीदार दिलेले आहेत. पंरतु सदर साक्षीदाराचे शपथपत्र विचारात घेता सदरचे साक्षीदार तक्रारदाराचे गोविंद भाऊसाहेब चव्हाण हे नातेवाईक आहेत. मुळ तक्रार आणि तिघाचे शपथपत्रात तक्रारदारांनी तण नाशकाची फवारणी तक्रारदारांनी कधी केली या बाबतचा उल्लेख नाही. फवारणी केल्या बाबतचा उल्लेख नाही. श्री.गोविंद चव्हाण व भाऊसाहेब गायकवाड यांचे शपथपत्रात जानेवारी 2010 मध्ये फवारणी केल्याचे मोघम उल्लेख आहे परंतु मुळ तक्रारीत त्या बाबतचा उल्लेख नाही.
तक्रारदारांनी रक्कम भविष्यातील रु.2,50,000/- नूकसानीची मागणी केली आहे परंतु या संदर्भात ऊसाची लागवड केल्याचे 7/12 उता-यात नमूद नाही. ऊस जळून गेल्या बाबत तक्रारदाराच्या आणि तिन साक्षीदाराच्या शपथपत्राशिवाय इतर कोणताही पूरावा नाही. याउलट सामनेवाला यांनी त्यांचे खुलाशात नमूद केले आहे की, तक्रारदाराचे शेतातील ऊस हा हिरवागार होता व त्यांची पाहणी नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला क्र.1 आणि त्याचं साक्षीदार दिलीप चव्हाण यांनी केलेली आहे. या संदर्भात तक्रारदारांनी सदरची विधाने त्यांचे शपथपत्रात नाकारलेली नाहीत. उलट दि.08.06.2011 रोजीच्या शपथपत्रात नविन माहीती उघड केली आहे. घातक औषधामुळे झालेल्या नुकसानीनंतर उर्वरित ऊसाचे पिकास पाणी देऊन पिक तक्रारदाराने गंगाखेड शुगर अँण्ड एनर्जी लि.विजय नगर माखणी ता.गंगाखेड जि. परभणी या कारखान्यास घातला. तक्रारदाराचे भाऊ हे लालासाहेब बालासाहेब चव्हाण कडे सदरील कारखान्याचे शेअर्स असल्याने तक्रारदाराची ऊस तोड लवकर मिळाल्याने ऊस त्यांचे नांवाने घातलेला आहे. तक्रारदाराचे वादग्रस्त तिन एकर शेतात फक्त 50 टन ऊस उत्पन्न झालेले आहे. ते एकरी 50 टन याप्रमाणे तक्रारदारास तिन एकरामध्ये 150 टन ऊस उत्पादन होते. किमान 100 टन ऊसाचे नूकसान झालेले आहे. तक्रारदार यांनी 50 टन ऊसाचे रु.1600/- क्विंटल याप्रमाणे रु.80,000/- बिलापोटी मिळाले ओत. त्यांचे बिल शपथपत्रासोबत दाखल करण्यात येत आहे. नूकसान भरपाई रु.2,65,000/- पैकी रु.80,000/- वजा करुन रु.1,85,000/- मागणी तक्रारदार करीत आहेत.
भविष्यातील नूकसानी बाबतची मागणी तक्रारदारांनी कमी केलेली आहे व सत्य परिस्थिती सदरचे शपथपत्रात नमूद केलेली आहे. असे गृहीत धरल्यास त्या सोबतच्या पावत्या शपथपत्रासोबत दाखल केलेल्या नाहीत. तथापि तक्रारदारांनी नूकसान भरपाईचे 100 टन ऊसाची मागणी केलेली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला यांनी ऊसाचे पिक हिरवेगार असल्याचे तक्रारदाराचे शेतात सामनेवाला आणि त्यांचे साक्षीदार यांना दिसले. त्यानंतर तक्रारदारांनी सदरचे शपथपत्र दाखल केलेले आहे. या सर्वाचा साखल्यांने विचार करता तक्रारदाराचे नूकसान भरपाईचे संदर्भात रु.1,85,000/- चे किंवा 50 टन प्रति एकरी उत्पादनाचे संदर्भात तक्रारदाराचा पुरावा नाही. वरील तक्रारदाराची विधाने लक्षात घेतला तण नाशकाचे औषधाने ऊस जळून गेला. ऊस किती वयाचा होता या बाबतचा वर उल्लेख केल्याप्रमाणे तक्रारीत उल्लेख नाही. त्यामुळे अधिक माहीती नुसार विचार करता तक्रारदारांनी मागणी कमी केली असली तरी सदरची मागणी नुसार रक्कमेच्या शाबीती बाबत पुरावा देण्याची तक्रारदाराची जबाबदारी असताना तक्रारदारांनी त्या बाबतचा योग्य तो पुरावा दिलेला नाही. त्यामुळे औषध फवारणीमुळे ऊस जळाला या बाबतचा तज्ञाचा अहवाल नाही म्हणून सामनेवाला यांनी दोषयुक्त औषध दिल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले ही बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.