Maharashtra

Akola

CC/15/280

Moumir Shahajad Jahagir Khan - Complainant(s)

Versus

Pravin Jain - Opp.Party(s)

Abhay Thorat

12 Jan 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/15/280
 
1. Moumir Shahajad Jahagir Khan
R/o.Islampura, ward No.2, Balapur, Tq.Balapur
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Pravin Jain
Jain Auto Finance, Office-257,Parvati Apartment,Balirampeth, Jalgaon (Khandesh)
Jalgaon Khandesh
Maharashtra
2. Raman Ramchandra Chandak
Infront of Shivaji Highschool,Jaidurga Complex,Deshmukh fail,Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 12/01/2016 )

आदरणीय अध्‍यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार

1.        ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …

     तक्रारकर्ता सुशिक्षीत बेरोजगार असून, तक्रारकर्त्याचे मालकीचा ट्रक क्र. एम.एच. 30 एल 2620 आहे व तक्रारकर्ता सदर ट्रक स्वत: चालवितो व कुटूंबाची उपजिवीका करतो.  तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 2 मार्फत अकोला येथील कार्यालयातून दि. 4/6/2009 रोजी रु. 1,50,000/- चे अर्थसहाय्य / कर्ज घेतले होते,  सदरहू कर्जाची परतफेड तक्रारकर्त्याला रु. 12,000/- प्रतिमाह प्रमाणे करावयाची होती,  त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दि. 13/7/2009 ते 16/7/2011 पर्यंत रु. 12,000/- प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2  यांच्याकडे एकूण 16 हप्त्यांचा भरणा केलेला आहे.  नोव्हेंबर 2011 मध्ये विरुध्दपक्ष यांनी तकारकर्त्याला रु. 90,000/- ओव्हर ड्युची रक्कम भरण्यास सांगितली,  त्यापैकी रु. 51,000/- तक्रारकर्त्याने भरले व उर्वरित रक्कम रु. 39,000/- तक्रारकर्ता भरण्यास तयार होता,  परंतु तक्रारकर्त्याला असे समजले की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे अकोला येथील कार्यालय बंद झालेले आहे.  विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला कुठलीही नोटीस न देता तक्रारकर्त्याचा ट्रक दि. 6/8/2015 रोजी घेवून गेले.  त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे.  त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 11/8/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून, तक्रारकर्ता हा रु. 39,000/- भरण्यास तयार असल्याचे विरुध्दपक्षास कळविले,  परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 1,80,000/- भरण्याबाबत बेकायदेशिरपणे कळविले व ट्रक विकण्याची धमकी दिली.  तक्रारकर्ता आज देखील वास्तविक येणारी रक्कम भरण्यास तयार आहे.  अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी व न्युनता दर्शविलेली आहे.  तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्याचा ट्रक क्र. एम.एच. 30 एल 2620 परत द्यावा तसेच तक्रारकर्त्याला आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 55,200/- व कोर्ट खर्च रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.

            सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर  23 दस्‍तऐवज पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

 

 विरुध्‍दपक्ष क्र. 1  व 2 यांचा लेखीजवाब :-

2.             विरुध्दपक्ष क्र. 1 यांना सदर प्रकरणाची नोटीस योग्य रित्या बजावणी झाल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 1 प्रकरणात गैरहजर असल्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 च्या विरुध्द “एकतर्फी” चालविण्याचा आदेश दि. 30/11/2015 रोजी पारीत करण्यात आला

             विरुध्दपक्ष क्र. 2  यांना सदर प्रकरणाची नोटीस बजावणी झाल्यानंतर देखील विरुध्दपक्ष क्र. 2 सदर प्रकरणात गैरहजर असल्यामुळे, प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 च्या विरुध्द “ एकतर्फी” चालविण्याचा आदेश दि. 30/11/2015 रोजी पारीत करण्यात आला.

3.      त्यानंतर  तक्रारकर्त्यातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.       या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल केलेले सर्व दस्तऐवज,   तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला, कारण विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना मंचाची नोटीस बजाविल्यानंतर देखील ते गैरहजर राहील्यामुळे प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द “एकतर्फी” चालविण्याचे आदेश मंचाने पारीत केले होते.

  तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या पावत्यांवरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे वाहन क्र. एम.एच. 30 एल 2620 च्या  Hire Purchase Transaction  नुसार रक्कम भरल्याचे दिसते.  या बद्दल तक्रारकर्ते यांचे असे कथन आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 2 मार्फत दि. 4/6/2009 रोजी रु. 1,50,000/- अर्थसहाय्य, त्यांच्या वरील वाहनासाठी घेतले होते व त्याची परतफेड रु. 12,000/-  प्रतिमाह प्रमाणे करावयाची होती.  त्या प्रमाणे तक्रारकर्ते यांनी दि. 13/7/2009 पासून दि. 16/7/2011 पर्यंत विरुध्दपक्षाकडे एकूण  16 हप्ते ( रुपये 1,78,500/-) चा भरणा केला आहे.  विरुध्दपक्षाने नोव्हेंबर 2011 मध्ये रु. 90,000/- ओव्हरडयुची रक्कम तक्रारकर्त्याला भरण्यास सांगितली होती,  परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तक्रारकर्त्याने रु. 51,000/- भरले व उर्वरित रक्कम रु. 39,000/- तक्रारकर्ता भरण्यास तयार होता,  परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा पुर्व सुचना न देता तक्रारकर्त्याचा ट्रक दि. 6/8/2015 रोजी जप्त केला, ही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ची सेवा न्युनता आहे.

     तक्रारकर्ते यांच्या या युक्तीवादाला नकारार्थी युक्तीवाद विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे रेकॉर्डवर दाखल नाही.  तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या दस्तात तक्रारकर्त्याच्या नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी पाठविलेले उत्तर दाखल आहे,  त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 चे असे म्हणणे दिसते की, “ तक्रारकर्ते यांनी कर्ज हे रु. 2,00,000/- या रकमेचे घेतले होते व दि. 3/7/2015 पर्यंत अनियमितपणे 16 मासिक हप्त्यांची परतफेड केली व रु. 1,78,500/- चा भरणा केला आहे,  परंतु सदर वाहनावर पुन्हा तक्रारकर्त्याने नवीन करारनामा करुन रक्कम रु. 1,50,000/- चे कर्ज घेतले होते,  त्यामधील रु. 45,000/- चा भरणा केला असून, अजुन रक्कम रु. 1,80,000/- बाकी आहे.  उर्वरित रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगून स्वखुशीने तक्रारकर्त्याने वाहन विरुध्दपक्षाच्या ताब्यात दिले ”  परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 च्या या कथनाप्रमाणे त्यांनी मंचात हजर राहून कोणताही कागदोपत्री पुरावा जोडलेला नाही,  त्यामुळे तक्रारकर्त्याच्या कथनात मंचाला तथ्य आढळते.  तक्रारकर्ते काही रक्कम भरण्यास तयार आहेत,  परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ते यांचे वाहन कायदेशिर तत्वानुसार ताब्यात घेतले नाही,  त्यामुळे तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडे अर्थसहाय्याची रक्कम रु. 40,000/- भरावी व त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचे वाहन त्यांच्या ताब्यात द्यावे, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईपोटी, या प्रकरणाच्या खर्चासह रक्कम रु. 7,000/- दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.  सबब अंतीम आदेश पारीत केला.

                              :::अं ति   दे :::

  1. तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
  2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ते यांचा ट्रक क्र. एम.एच. 30 एल-2620 हा, तक्रारकर्त्याने रक्कम रु. 40,000/- ( रुपये चाळीस हजार ) चा भरणा केल्यानंतर, त्यांना परत द्यावा, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी, या प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रु. 7000/- ( रुपये सात हजार ) इतकी रक्कम द्यावी.
  3. सदर आदेशाचे पालन, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.

सदर आदेशाच्‍या प्रती संबंधीतांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.