रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र. 5/2008. तक्रार निकाली दि.16-6-2008. 1. श्री.बाबुराव भगवान परब. 2. सौ.स्मितांगिनी बाबुराव परब, रा. फ्लॅट क्र.सी/310, तिसरा मजला, न्यू जैन दर्शन बिल्डिंग, केबीन रोड, भाईंदर (पूर्व) ता. व जि.ठाणे. ... तक्रारदार.
विरुध्द मे.प्रवीण कन्स्ट्रक्शन्सकरिता मालक- श्री.कैलाश एस. शिंदे, घरचा पत्ता- केंद्रीय विहार, ए/7, सेक्टर-2 खारघर, ता.पनवेल, जि.रायगड.
कार्यालय- दुकान क्र.22, ओशियन व्हयू, प्लाट नं.बी/110, सेक्टर-12, खारघर, ता.पनवेल, जि. रायगड. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. मा.सौ.ज्योती अभय मांधळे,सदस्या.
-ः आदेश ः-
1. सदरील तक्रार तक्रारदारांनी सामनेवालेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीअंतर्गत दाखल केली आहे. त्यांनी सामनेवालेंकडून बी.व्ही.डी.पी. स्कीम मधील प्लॉट क्र.जी-35, सबप्लॉट क्र.24, टाईप एस.एस.आय.सी., प्लॉट एरिया 32 चौ.मी. सेक्टर 12, या मिळकतीचा त्यावर बांधण्यात आलेल्या घराचा ताबा मिळण्यासाठी व इतर मागण्यांची पूर्तता मेमोरेंडम ऑफ असोसिएशन प्रमाणे होऊन मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केली होती. या कामी सामनेवाले हजर झाले. त्यानंतर तक्रारदार व सामनेवालेंनी नि.12 अन्वये मंचाकडे तडजोड सादर करुन मंचाला असे कळविले की, सामनेवालेंनी मिळकतीचा ताबा दि.13-6-08 रोजी दिला आहे. सामनेवाले राहिलेली इतर कामे व ऑक्युपन्सी सर्टिफिकेट तसेच वीजमीटर हे तक्रारदारांचे नावे दोन महिन्यात करुन देणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी ही कामे दोन महिन्यात न केल्यास तक्रारीचे पुन्हा नुतनीकरण करण्यासाठी परवानगी दयावी या अटीवर तक्रार निकाली काढण्यात यावी असे मंचाला कळविले. 2. उभय पक्षकारांनी तडजोड झाली असल्याचे लिहून दिले आहे, व त्यावर त्यांच्या स्वाक्ष-या आहेत. तसेच उभय पक्षकारांनी ही तक्रार निकाली करण्यासाठी मंचाला कळविले असून नि.12 वर तक्रारदार व सामनेवालेंनी ही तडजोड दाखल केली आहे. या तडजोडीच्या अधीन राहून सदर तक्रार अंतिमतः निकाली करण्यात येत आहे.
3. तक्रारदार व सामनेवालेंना सदर आदेशाच्या सत्यप्रती पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड- अलिबाग. दिनांक- 16-6-2008.
(आर.डी.म्हेत्रस) (ज्योती अभय मांधळे) अध्यक्ष सदस्या रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. |