Maharashtra

Nagpur

CC/167/2024

PRAKASH MAHADEORAO SUNE - Complainant(s)

Versus

PRATIK POTA, MD & CEO, EUREKA FORBES - Opp.Party(s)

24 Oct 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/167/2024
( Date of Filing : 01 Mar 2024 )
 
1. PRAKASH MAHADEORAO SUNE
22, CENTRAL EXCISE LAYOUT, KHAMLA, NAGPUR - 440025
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. PRATIK POTA, MD & CEO, EUREKA FORBES
B1/B2, 701, 7TH FLOOR, MARATHON INNOVA MARATHON NEXTGEN, OFF GANPATRAO KADAM MARG LOWER PAREL, MUMBAI - 400 013
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:
 ADV. PUSHKAR A. DESHPANDE, Advocate for the Opp. Party 0
Dated : 24 Oct 2024
Final Order / Judgement

 

आ दे श

मा. अध्‍यक्ष श्री. सचिन शिंपी यांचे आदेशान्‍वये.

  1. तकारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 अंतर्गत दाखल केली असुन तक्रारीतील कथन पूढील प्रमाणे....
  2. तकारदाराने दिनांक 11.9.2023 रोजी वि.प.यांचे हेल्पलाईनवर संपर्क करुन वॉटर प्युरिफायर बाबत चौकशी केली असता वि.प. यांचे प्रतीनीधी यांनी तक्रारदाराचे घरी त्याचदिवशी भेट दिली. तक्रारदाराने वि.प. यांना रुपये 12,700/- अदा केले असता वि.प. यांनी दिनांक 12.9.2023 रोजी वॉटर प्युरिफायरचे मशीन बसवून देण्‍याचे आश्‍वासन दिले परंतु प्रत्यक्षात वॉटर प्युरिफायर मशीन दिनांक 19.9.2023 रोजी  तक्रारदाराचे घरी लावुन दिले. सदर वॉटर प्युरिफायर मशीन लावुन दिल्यानंतर त्यातुन येणारे पाणी स्वच्‍छ नसल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने लगेच त्याबाबत वि.प. यांचे हेल्पलाईनवर कळविले व सदर वॉटर प्युरिफायर मशीन तक्रारदाराचे मागणी प्रमाणे नसल्याने त्याबाबत वि.प. यांना ई-मेल व प्रत्यक्ष संपर्क करुन देखिल वि.प. यांनी सदरचे वॉटर प्युरिफायर मशीन बदलवून दिले नाही. सदरची बाब ही वि.प.चे सेवेतील कमतरता असल्याने तक्रारदाराने सदर तक्रार या आयोगासमक्ष दाखल करुन वॉटर प्युरिफायरची किंमत रुपये 12,700/- व तक्रारदारास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
  3. वि.प.यांनी आपले लेखी उत्तरात असा बचाव घेतला की, वि.प.चे कंपनी मार्फत दर्जेदार व चांगल्या प्रतीचे वॉटर प्युरिफायर मशीन बनविले जातात.  तसेच वि.प. ही एक नामांकीत कंपनी असुन विक्रीपश्‍चात योग्य ती सेवा कंपनी मार्फत दिली जाते. तक्रारदाराने मशीन लावतेवेळी मशीनीबाबत कोणतीही तक्रार केली नाही.  त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 16.9.2023 रोजी संपर्क केल्यानंर वि.प.यांचे टेक्नीशियन तक्रारदाराकडे चौकशीकरिता गेले असता मशीनची सव्हीसिंग करण्‍यास नकार देऊन दुस-या मशीन बाबत चौकशी केली. वि.प. ने विक्री केलेल्या मशीन मध्‍ये कोणताही दोष नसतांना तक्रारदाराने सदरची खोटी व बनावट तक्रार दाखल केली असल्याने ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  4. तक्रारदाराने जेष्‍ठ नागरिक असल्याने दिनांक 30.8.2024 रोजी सदर तक्रार तातडीने चालविण्‍याचा अर्ज दिला व वॉटर प्युरिफायरमधुन येणारे पाणी सदोष असल्याबाबत महाराष्‍ट्र शासनाचे प्रादेशिक आरोग्य प्रयोग शाळा नागपूर यांचेकडुन प्युरिफायरमधुन येणा-या पाणी तपासणी अहवाल सादर केला आहे. तसेच तक्रारदाराने  वि.प. यांचेकडे दिनांक 27.8.2024 रोजी कुरिअर मार्फत विवादीत मशीन परत पाठविल्याबाबत पावती दाखल केली आहे.
  5. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकण्‍यात आला. वि.प. युक्तीवादाकरिता गैरहजर असल्याने सदर तक्रार वि.प.चे युक्तीवादाशिवाय न्यायनिर्णयाकरिता ठेवण्‍यात आले.

 

 मुद्दे                             उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सदोष वॉटर प्युरिफायर

मशीन दिली आहे काय ?                              होय

  1. काय आदेश ?                              अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने दिनांक 11.9.2023 रोजी वि.प.यांना रुपये 12,700/- अदा करुन वॉटर प्युरिफायर विकत घेतली ही बाब नि.क्रं.2 सोबत दाखल पावती वरुन स्पष्‍ट होते परिणामी तक्रारदार हा वि.प.चा ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होते.
  2. वि.प. यांनी त्यांचे जवाबात वॉटर प्युरिफायर मशीन मध्‍ये कोणताही दोष नसल्याबाबत नमुद केले आहे. तर तक्रारदाराने सदरचे मशीन सदोष असल्याबाबत वि.प यांचेकडे केलेल्या तक्रार, ई-मेल याबाबतचे दस्तऐवज नि.क्र.2 सोबत दाखल केले आहे.
  3. वि.प.यांनी विक्री केलेल्या वॉटर प्युरिफायर मशीन मध्‍ये दोष असुन त्यामधुन येणारे पाणी पिण्‍यासाठी योग्य नाही ही बाब शाबीत करण्‍याकरिता तक्रारदाराने दिनांक 2.8.2024 रोजीचा महाराष्‍ट्र शासनाचे प्रादेशिक आरोग्य प्रयोग शाळा नागपूर यांचा पाणी तपासणी अहवाल अभिलेखावर दाखल केला असुन ते पाणी पिण्‍यास योग्य नाही असा स्पष्‍ट अहवालात नमुद आहे. सदर अहवाल शासकीय प्रयोगशाळेचा असुन भारतीय पुरावा कायद्यातील तरतुदीप्रमाणे तो अहवाल पब्लीक डाक्युमेंट असुन तो सिध्‍द करण्‍यासाठी वेगळया पूराव्याची गरज नाही. वि.प. यांनी विक्री केलेल्या वॉटर प्युरिफायर मशीन मध्‍ये दोष असल्यामूळे ती मशीन वि.प. यांना कुरियर मार्फत दिनांक 27.8.2024 रोजी  वि.प. यांना परत पाठविल्याबाबत कुरिअरची पावती अभिलेखावर दाखल आहे. परिणामी तक्रारदार यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या पूराव्यांवरुन ही बाब शाबीत होते की, वि.प. यांनी तक्रारदारास सदोष वॉटर प्युरिफायर मशीनची विक्री केली व ती मशीन वि.प. यांना परत पाठविल्यानंतर देखिल वि.प. यांनी त्या मशीनची किंमत तक्रारदारांना परत केली नाही. वि.प.ची सदरची कृती ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असुन सेवेतील कमतरता दर्शविते. परिणामी तक्रारदार यांचे मागणी प्रमाणे वॉटर प्युरिफायर मशीनची किंमत रुपये 12,700/- दिनांक 11.9.2023 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम तक्रारदारास परत करावी. तसेच विरुध्‍द पक्षाने  तक्रारदाराला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- अदा करावे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.

सबब आदेश खालील प्रमाणे .....

आदेश

  1. तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष वॉटर प्युरिफायर मशीनच्या  किंमतीपोटी रुपये 12,700/-, व सदर रक्कमेवर  दिनांक 11.9.2023 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह प्रत्यक्ष अदायगी पावेतो येणारी रक्कम तक्रारदारास परत करावी.
  3. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- अदा करावे.
  4. सदर आदेशाची पूर्तता  वि. प. यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाचे आत  करावी.
  5. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.