(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने गैरअर्जदार सोसायटीमधे रक्कम रु.35,000/- आणि रु.35,000/- दामदुपटीने मुदतठेव स्वरुपात भरले होते. सदर (2) त.क्र.429/10 पतसंस्थेने नमूद रक्कम परत केली. परंतू दि.12.05.2009 रोजी मुदतठेवीची रक्कम रु.38,784/- त्याचे बचत पासबुक अकाऊंट क्र.451 मधे ठेवली. सदर शिल्लक रकमेची वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी रक्कम दिली नाही, आणि त्याची फसवणूक केली. म्हणून तक्रारदाराने त्याचे खात्यातील रक्कम रु.38,784/- व्याजासह आणि मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- गैरअर्जदारांकडून मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदारांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात गैरहजर राहिले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार सहकार मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप. सोसायटी लिमिटेड वरणगाव जि.जळगाव यांचे हडको औरंगाबाद येथील शाखेत बचत पासबुक अकाऊंट क्र.451 काढलेले असल्याचे बचत पासबुकावरुन दिसून येते. सदर पासबुकचे अवलोकन केले असता, त्याचे खात्यामधे दि.12.05.2009 रोजी रक्कम रु.38,784/- शिल्लक असल्याचे स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने त्याला पैशाची गरज भासल्यामुळे वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी शिल्लक रक्कम त्यास दिली नाही. वास्तविक तक्रारदाराचे खात्यामधे रक्कम शिल्लक असतानाही गैरअर्जदारांनी सदर रक्कम न देऊन तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. सदर शिल्लक रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास होणे स्वाभाविक आहे. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारदारास रक्कम रु.38,784/- दि.12.05.2009 पासून द.सा.द.शे. 9% व्याजदराने पूर्ण रक्कम देईपर्यंत निकाल प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत द्यावेत. (3) त.क्र.429/10 3) गैरअर्जदारांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- असे एकूण रु.2,000/- निकाल प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 4) दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |