जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 445/2010. तक्रार दाखल दिनांक : 27/07/2010. आदेश पारीत दिनांक : 23/02/2011 इब्राहीम दगडू तांबोळी, वय 49 वर्षे, व्यवसाय : ड्रायव्हर, रा. एस.टी. स्टॅन्डसमोर, पंढरपूर रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. प्रशासक, माढा तालुका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 2. श्री. सज्जन विठ्ठल नवले, वय सज्ञान, चेअरमन, माढा तालुका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. श्री. संतोष जनार्दन नवले, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. 4. श्री. दत्तात्रय चुर्तभूज नवले, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. 5. बाळासाहेब अनंतराव मोरे, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. 6. श्री. अंकुश दगडू गुंजाळ, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. 7. श्री. औदुंबर पोपट पाटील, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर. 8. संदिपान लक्ष्मण बागल, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 9. श्री. वामन त्रिबंक बरडे, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. बिटरगाव, ता. माढा, जि. सोलापूर. 10. विलास महादेव व्यवहारे, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. तडवळे (म.), ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 11. श्री. रावसाहेब कृष्णा इंगळे, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. ढवळस रोडवरील वस्ती, ता. माढा, जि. सोलापूर. 12. श्री. शांतीलाल रतनशी पटेल, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. कुर्डुवाडी एस.टी. स्टॅन्डजवळ, लाकडी वखारशेजारी, कुर्डुवाडी, जि. सोलापूर. 13. श्री. बजरंग दगडू शेलार, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. 14. श्री. संतोष कर्ण अनुभूले, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. ढवळस, ता. माढा, जि. सोलापूर. 15. श्री राहूल भारत पुरवत, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. रा. शिवाजी चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 16. सौ. छाया सदाशिव नवले, वय सज्ञान, संचालक, माढा तालुका ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : श्री. आर.एफ. सोनिमिंडे विरुध्द पक्ष गैरहजर/एकतर्फा
आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचा मुलगा मुबारक इब्राहीम तांबोळी (संक्षिप्त रुपामध्ये 'मयत मुबारक') हा विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेचा सभासद होता. मयत मुबारक यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेकडून दि.24/2/2005 रोजी रु.8,000/- कर्ज घेतलेले होते. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी मयत मुबारक यांचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे विमा उतरविला होता. मयत मुबारक दि.21/5/2008 रोजी विहीर कोसळून मृत्यू पावले आहेत. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमार्फत विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला आणि तो मंजूर होऊन रु.1,00,000/- विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे जमा करण्यात आले. विरुध्द पक्ष यांनी मयत मुबारक यांच्या कर्जखात्यावरील येणे रक्कम रु.3,244/- वसूल करुन उर्वरीत रक्कम मिळावी, अशी तक्रारदार यांनी विनंती केली असता टाळाटाळ केली. तसेच त्यांना सदर रकमेचे देण्यात आलेले धनादेश न वटता परत आले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत रक्कम दाखल करुन रु.96,756/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही त्यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., पुणे यांच्याकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करुन मिळविलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल केलेली आहेत. त्यानुसार मयत मुबारक यांचा विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडे विमा उतरविल्याचे व मयत मुबारक यांच्या मृत्यूनंतर रु.1,00,000/- धनादेश क्र.72518, दि.17/10/2008 अन्वये अदा केल्याचे निदर्शनास येते. 5. निर्विवादपणे, मयत मुबारक यांच्या मृत्युनंतर देय विमा रक्कम तक्रारदार यांना प्राप्त होणे आवश्यक होते व आहे. परंतु विमा पॉलिसीवर विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे नांव असल्यामुळे त्यांचे नांवे धनादेश दिला असल्याचे निदर्शनास येते. विमा रक्कम प्राप्त होताच विमा कंपनीने विमा लाभार्थी म्हणजेच तक्रारदार यांना अदा करणे क्रमप्राप्त होते. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेने विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली आणि तक्रारदार यांना अनुक्रमे रु.40,000/- व रु.56,756/- चे दिलेले धनादेश पुरेसा निधी नसल्यामुळे न वटता परत आल्याचे रेकॉर्डवरुन दिसून येते. वरील विवेचनावरुन मयत मुबारक यांच्या मृत्यूनंतर प्राप्त विमा रक्कम तक्रारदार यांना अदा न करुन विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेने त्रुटी केल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष क्र.2 ते 16 हे संचालक असल्यामुळे पतसंस्थेसह देय रक्कम देण्याकरिता तेही वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. तसेच देय रक्कम. रु.96,756/- विमा कंपनीकडून रक्कम प्राप्त झाल्याचा दिल्याचा दि.17/10/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास तक्रारदार पात्र आहेत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रु.96,756/- दि.17/10/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त आदेशाची विहीत मुदतीत न केल्यास विरुध्द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना एकूण देय रक्कम मुदतीनंतर 12 टक्के दराने अदा करावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/17211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |