Maharashtra

Dhule

CC/13/86

Shakir Ahmad Shaikh Kadar - Complainant(s)

Versus

Prashasak, Agrasen Nag Sahkari Patsanstha, - Opp.Party(s)

S Shimpi

26 Feb 2014

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/13/86
 
1. Shakir Ahmad Shaikh Kadar
Kamgar Nagar, Chalisgaon Road,
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Prashasak, Agrasen Nag Sahkari Patsanstha,
Purti building,In Front of Rajkamal Talkies, Agra road Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.


 

 


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –   ८६/२०१३


 

                                  तक्रार दाखल दिनांक – ०१/१०/२०१३


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २६/०२/२०१४


 

   श्री. शाकिर अहमद शेख कादर


 

   उ.वय ५२ वर्ष, कामधंदा – नोकरी


 

   रा. कामगार नगर, चाळीसगांव रोड, धुळे.             …........ तक्रारदार


 

    


 

      विरुध्‍द


 

 


 

१.    श्री. अग्रसेन नागरी सह. पतपेढी मर्या., धुळे.


 

(नोटीसची बजावणी प्रशासक यांच्‍यावर करावी)


 

प्रशासक


 

निरज चौधरी


 

श्री. अग्रसेन नागरी सह. पतपेढी मर्या., धुळे


 

पुर्ती बिल्‍डींग राजकमल टॉकीज समोर, आग्रा रोड, धुळे ......... जाबदेणार  


 

  


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एस.वाय. शिंपी)


 

(जाबदेणार तर्फे – एकतर्फा)


 

 


 

निकालपत्र


 


 (द्वाराः मा.सदस्‍य – श्री. एस.एस. जोशी)


 

१.     तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.


 

२. तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार श्री. अग्रसेन नागरी सह. पतपेढी मर्या., धुळे’  या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावतीत रक्‍कम गुंतविली होती. त्‍याचा तपशीलखालील प्रमाणे.


 



































































अ.क्र.

पा.

क्रमांक

ठेव दिनांक

देय दिनांक

व्‍याज दर

ठेव रक्‍कम

देय

रक्‍कम

१.

१६८

२९/०५/२०००

२८/०२/०९

११%

,२१,८४०

,५१,३७२/-

२.

१५८१

११/०३/२००३

११/०९/०८

१३%

५०,०००

,००,०००/-

३.

१५८२

११/०३/२००३

११/०९/०८

१३%

४०,००

८०,०००/-

४.

१७३४

२८/०४/२००३

२५/११/०७

१३%

,००,०००

,७०,२४४/-

५.

१९६६७

२२/०१/२००५

२४/०४/०८

११%

७५,०००

९३,९४८/-

६.

२७५४०

२५/०९/१९९९

२१/०४/०९

११%

,२६,२८७

,,१३५/-

७.

५५४२५

२९/०४/२००२

२६/११/०७

१३%

६४,०००/-

,०३,६८४/-


 

                             अशी एकूण रक्‍कम रूपये ९,८०,३८३/-


 

                             + रक्‍कम मिळे पर्यंतचे व्‍याज


 

 


 

३.   तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडून मुदत ठेव पावतींमधील मुदतीअंती देय रक्‍कम रूपये ९,८०,३८३/- व त्‍यावर देय दिनांकापासून रक्‍कम मिळेपर्यंतचे व्‍याज. तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १०,०००/- आणि अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये ५,०००/- जाबदेणार यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 


 

 


 

४.  तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ मुदत ठेव पावतींच्‍या छायांकित प्रती नि.७ ते नि.१३ वर दाखल केलेल्‍या आहेत.   


 

 


 

५.  जाबदेणार यांना मे. मंचाच्‍या नोटीसची बजावणी होवूनही ते मुदतीत हजर झाले नाहीत व त्‍यांनी खुलासा दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्‍यात आला आहे.


 

 


 

६.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे  उपस्थित होतात. त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण देत आहोत.


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

अ.  तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय


 

ब.     जाबदेणार  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

 कसूर केली आहे काय ?                                                      होय


 

क.  तक्रारदार हे जाबदेणार यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

 व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

ड.      तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून मानसिक


 

 त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई


 

 मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

ई. अंतिम आदेश ?                                 खालीलप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

 


 

७.   मुद्दा -  तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतींच्‍या छायांकित प्रती नि. ७ ते नि.१३ वर दाखल केलेल्‍या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतींमधील रक्‍कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतींमधील रक्‍कमेचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

८. मुद्दा - तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

९. मुद्दा - तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदतठेव पावतींमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार  यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्‍था श्री. अग्रसेन नागरी सह. पतपेढी मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावतींमधील मुदतीअंती एकूण देय रक्‍कम रूपये ९,८०,३८३/- व त्‍यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याजासह, अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१०. मुद्दा तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार यांच्‍याकडून परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्‍था श्री. अग्रसेन नागरी सह. पतपेढी मर्या., धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार  हे  जाबदेणार यांच्‍या  कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘ड’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

 


 

११. मुद्दा - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२. जाबदेणार श्री. अग्रसेन नागरी सह. पतपेढी मर्या., धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(अ)                 मुदतठेव पावती क्रमांक १६८ मधील देय रक्‍कम रूपये १,५१,३७२/- व त्‍यावर दि.२८/०२/२००९ पासून ६ टक्‍के व्‍याज, पावती क्रमांक     १५८१ मधील देय रक्‍कम रूपये १,००,०००/- व त्‍यावर दि.११/०९/२००८ पासून ६ टक्‍के व्‍याज, पावती क्रमांक १५८२ मधील देय रक्‍कम रूपये ८०,०००/- व त्‍यावर दि.११/०९/२००८ पासून ६ टक्‍के व्‍याज, पावती  क्रमांक १७३४ मधील देय रक्‍कम रूपये १,७०,२४४/- व त्‍यावर दि.२५/११/२००७ पासून ६ टक्‍के व्‍याज, पावती क्रमांक १९६६७ मधील देय रक्‍कम रूपये ९३,९४८/- व त्‍यावर दि.२४/०४/२००८ पासून ६ टक्‍के व्‍याज, पावती क्रमांक २७५४० मधील देय रक्‍कम रूपये २,८१,१३५/- व त्‍यावर दि.२१/०४/२००९ पासून ६ टक्‍के व्‍याज, पावती क्रमांक ५५४२५ मधील देय रक्‍कम रूपये १,०३,६८४/- व त्‍यावर दि.२६/११/२००७ पासून ६ टक्‍के व्‍याज संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत दयावे.


 

 


 

    (ब) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार            मात्र) व  अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र)


 

       दयावेत.


 

 


 

३.  वर नमूद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/अवसायक)      यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी      करावी.  तसेच आदेश २(अ) मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज     दिले असल्‍यास, कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

धुळे.


 

दि.२६/०२/२०१४.


 

 


 

             (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                    सदस्‍य            अध्‍यक्षा


 

              जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.