Maharashtra

Pune

EA/12/84

Mr.Madhukar Samant - Complainant(s)

Versus

Prashant Travels Pvt.Ltd - Opp.Party(s)

-

08 Feb 2013

ORDER

 
Execution Application No. EA/12/84
 
1. Mr.Madhukar Samant
Ganesh Khiind road,Pune07
Pune
Maha
...........Appellant(s)
Versus
1. Prashant Travels Pvt.Ltd
Pune
Pune
Maha
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S. M. KUMBHAR MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा- श्री. व्‍ही. पी. उत्‍पात, मा. अध्‍यक्ष यांचेनुसार,
 
 
                        :- निशाणी 1 खाली आदेश :-
                           दिनांक 08/फेब्रुवारी/2013
 
                                               
प्रस्‍तुतची दरखास्‍त मुळ तक्रारदारांनी तक्रार क्र. पीडीएफ/36/2004 च्‍या दिनांक 10/11/2010 रोजीच्‍या निकालाच्‍या अंमलबजावणीसाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 27 प्रमाणे दाखल केलेली आहे. या प्रकरणातील जाबदेणार यांच्‍या विरुध्‍द त्‍यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रुपये 3000/- दोन महिन्‍यांच्‍या आत दयावेत व सदरची रक्‍कम दोन महिन्‍यात दिली नाही तर सदरची रक्‍कम फिटेपर्यन्‍त त्‍यावर द.सा.द.शे 9 टक्‍के दराने व्‍याज दयावे असा आदेश दिलेला होता. सदरच्‍या आदेशाविरुध्‍द जाबदेणार यांनी विलंब माफीच्‍या अर्जासह मा. राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई येथे फर्स्‍ट अपील क्र. A/11/320  दाखल केले. सदरच्‍या अपीलाचा निर्णय दिनांक 07/09/2011 रोजी झालेला आहे. सदरचे अपील नामंजुर करण्‍यात आले व जाबदेणार यांच्‍या विरुध्‍द रुपये 1000/- खर्च दयावा असा आदेश करण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची दरखास्‍त या मंचासमोर दाखल केली व व्‍याजासह रक्‍कम रुपये 5637/- ची मागणी केली. जाबदेणार यांनी आज हजर राहून सदरच्‍या रकमेचा चेक दाखल केला. त्‍याचप्रमाणे चेकच्‍या तारखेनंतर आजतागायत या कालावधीचे द.सा.द.शे 9 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम रुपये 300/- तक्रारदार यांना अदा केली. या प्रकरणी तक्रारदार यांनी त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासाबद्यल व दरखास्‍त खर्चाबद्यलच्‍या रकमेची मागणी केली. परंतु सदर ग्राहक मंचास मुळ तक्रारीत दिलेल्‍या निर्णयापेक्षा अधिक रक्‍कम देता येणार नाही. जाबदेणार यांनी मुदतीत रक्‍कम न दिल्‍यामुळे त्‍यावर द.सा.द.शे 9 टक्‍के दराने व्‍याजाची आकारणी करुन त्‍यांना दंड बसवलेला आहे. अशा परिस्थितीत वेगळा खर्चाचा अथवा दंडाचा हुकूम करणे न्‍याय होणार नाही. सबब खालील आदेश पारीत करण्‍यात येत आहे-
        :- आदेश :-
1.     या प्रकरणात ग्राहक मंचाने दिनांक 10/11/2010 रोजी केलेल्‍या आदेशाची पूर्ण पुर्तता झालेली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना आदेशानुसार संपूर्ण रक्‍कम अदा केलेली आहे. सदरचे प्रकरण ‘पूर्णफेड’ या सदरात निकाली काढण्‍यात येत आहे.
      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S. M. KUMBHAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.