Maharashtra

Bhandara

CC/18/88

USHATAI PURUSHOTTAM KESALKAR PRO. AJINKYA BUILDCOM - Complainant(s)

Versus

PRASHANT PUNDALIK NIKHADE - Opp.Party(s)

MR. JAYESH M. BORKAR

21 Jun 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/88
( Date of Filing : 24 Dec 2018 )
 
1. USHATAI PURUSHOTTAM KESALKAR PRO. AJINKYA BUILDCOM
R/O. SHASTRINAGAR. GURUNANAK WARD. BHANDARA TA.DISST. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. PRASHANT PUNDALIK NIKHADE
R/O. GANESHPUR. TA.DISTT. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. ROSHAN DAMODHAR KHATE. PARTNER. AJINKYA BUILDCOM
R/O. KESALWADA. TA.DISTT.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. JAYESH M. BORKAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 21 Jun 2019
Final Order / Judgement

     

             (पारीत व्‍दारा- श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्‍या)

                                                                   (पारीत दिनांक– 21 जून, 2019)   

01.  तक्रारकर्ती यांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष बिल्‍डर्स फर्म तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 अनुक्रमे प्रोप्रायटर व भागीदार यांचे विरुध्‍द करारा प्रमाणे सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून मिळण्‍यासाठी तसेच सदनीकेमध्‍ये योग्‍य त्‍या सोयीसुविधा आणि त्‍यांचे कडून जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती हया एक सेवानिवृत्‍त कर्मचारी आहेत तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 हे बांधकाम व्‍यवसायिक आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 हे अजिंक्‍य बिल्‍डकॉम फर्मचे प्रोप्रायटर आहेत तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे सदर फर्मचे भागीदार आहेत. तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्षां तर्फे शास्‍त्रीनगर, गुरुनानक वार्ड, भडारा येथील तलाठी साझा क्रं 16, गट क्रं 583/1 व 584 या भूखंडावर बांधलेल्‍या श्री साई अपार्टमेंट-1 मधील फ्लॅट क्रं 404 एकूण किम्‍मत रुपये-12,51,000/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा सौदा दिनांक-27.02.2012 रोजी (तक्रारीमध्‍ये सदर करार दिनांक चुकीचा नमुद केल्‍याचे दिसून येते प्रत्‍यक्ष करारनाम्‍याचे प्रतीवरुन उभय पक्षांमधील सदर करार दिनांक-27.02.2013 असल्‍याचे दिसून येतो, त्‍यामुळे करार दिनांक-27.02.2013 रोजी झाल्‍याचे मंचा तर्फे मान्‍य करण्‍यात येते) विरुध्‍दपक्षां सोबत केला. तक्रारकर्ती यांनी कराराचे  दिनांक-27.02.2013 रोजी बयानादाखल रुपये-5,00,000/- विरुध्‍दपक्षांना दिले व उर्वरीत रक्‍कम रुपये’-7,51,000/- पैकी रुपये-5,00,000/- एवढी रक्‍कम जून-2013 पर्यंत देण्‍याचे ठरले होते आणि उर्वरीत रक्‍कम रुपये-2,51,000/- सदनीकेचा ताबा देते वेळी म्‍हणजेच नोटरी केल्‍या नंतर देण्‍याचे करारा प्रमाणे ठरले होते. उभय                                पक्षां मध्‍ये झालेल्‍या करारा मध्‍ये सदनीकेचा ताबा 1 जुलै, 2013 पर्यंत देण्‍याचे

नमुद आहे परंतु असा ताबा देण्‍यास उशिर झाल्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 तक्रारकर्ती यांनी सदनीकेपोटी जमा केलेल्‍या रकमेवर बँकेच्‍या व्‍याज दरा प्रमाणे व्‍याज देतील असेही करारा मध्‍ये नमुद आहे.

      तक्रारकर्ती यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी उभय पक्षां मधील करारा नुसार दिनांक-27.02.2013 रोजी रुपये-5,00,000/- नगदी दिलेत व ते प्राप्‍त झाल्‍याचे विरुध्‍दपक्षांनी करारात मान्‍य केले तसेच दिनांक-15.07.2013 रोजी रुपये-2,00,000/- मिळाल्‍याचे कराराचे खाली नमुद करुन त्‍यावर रोशन दामोदर खोत यांनी सही केलेली आहे. त्‍याच प्रमाणे दिनांक-02.08.2013 रोजी रुपये-2,75,000/- नगदी मिळाल्‍या बाबत कराराखाली विरुध्‍दपक्ष रोशन दामोदर खोत यांनी सही केलेली आहे आणि दिनांक-30.08.2013 रोजी रुपये-25,000/- असे एकूण रुपये-10,00,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना दिले, त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी सदनीकेचे नोटरी समोरील विक्रीपत्र दिनांक-15.03.2017 रोजी तक्रारकर्ती यांचे नावे नोंदवून दिले व त्‍याच दिवशी सदनीकेचा ताबा तक्रारकर्ती यांना दिला. तक्रारकर्ती यांनी पुढे असेही नमुद केले की, त्‍यांनी नोटरी विक्रीपत्राचे दिवशी  दि अर्बन को-ऑप.बँक शाखा- जिल्‍हा परिषद चौक, भंडारा शाखेचा धनादेश क्रं-007738, दिनांक-15.03.2017 रोजीचा रक्‍कम रुपये-1,00,000/- चा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना दिला. अशारितीने तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना सदनीकेपोटी एकूण रुपये-11,00,000/- अदा केलेत. करारामध्‍ये ठरल्‍याप्रमाणे सदनीकेच्‍या एकूण किम्‍मती पैकी राहिलेली उर्वरीत रक्‍कम रुपये-1,51,000/- ही सदनीकेची रंगरंगोटी, दरवाजे, नळ, सदनीके मधील संपूर्ण विद्दुतीकरणाची कामे व लिफ्ट लागल्‍यानंतर तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून दिल्‍यानंतर देण्‍याचे नोटरी समोरील विक्रीपत्र करते वेळी उभय पक्षांमध्‍ये ठरले होते.

                    तक्रारकर्ती यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी सदनीकेचा ताबा घेतल्‍या नंतर त्‍यांना विरुध्‍दपक्षांनी केलेल्‍या बांधकामामध्‍ये ब-याच त्रृटी आढळून आल्‍यात, ज्‍यामध्‍ये सदनीकेच्‍या स्‍लॅब मधून पाणी गळत होते तसेच खिडक्‍याची पुटींग करुन दिलेली नव्‍हती, नळाला तोटया लावून दिलेल्‍या नव्‍हत्‍या, संडासा मध्‍ये फुटलेली सिट लावलेली होती, टाईल्‍स तुटलेल्‍या होत्‍या, कुमोट पाईप, कुमोटचा नळ, कव्‍हर, दरवाजाची फीनिशींग, दाराचे कट इत्‍यादी कामकाज दोषपूर्ण होते व सदर त्रृटी दुर करण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना वेळोवेळी विनंती करुनही त्‍यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्‍याच प्रमाणे सदर ईमारती मध्‍ये लिफ्ट स्‍थापित करुन दिलेली नाही, ईमारतीला बाहेरुन पेंट करुन दिलेला नाही, सुरक्षा रक्षकाची खोली बांधलेली नाही, जिन्‍याच्‍या खिडक्‍या, गेट जवळील कॉंक्रीट व मीटर तसोच जिन्‍या जवळील कॉक्रींटचे काम अद्दाप पर्यंत पूर्ण करुन दिलेले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी ईमारत आणि सदनीकेचे कामकाज हे निकृष्‍ट दर्जाचे केले तसेच सदनीकेचे करारा प्रमाणे संपूर्ण कामकाज योग्‍य त्‍या सोयी व सुविधांसह करुन दिलेले नाही.

     तक्रारकर्ती यांनी पुढे असेही नमुद केले की, करारा प्रमाणे सदनीकेचा ताबा दिनांक-01/07/2013 पर्यंत देणे विरुध्‍दपक्षांवर बंधनकारक असताना त्‍यांनी अनेकदा विरुध्‍दपक्षांना विनंती केल्‍याने शेवटी दिनांक-15/03/2017 रोजी सदनीकेचा ताबा देण्‍यात आला. सदनीकेचा ताबा उशिरा दिल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदनीकेपोटी जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-10,00,000/- वर ताबा देण्‍यास उशिर झालेल्‍या कालावधी करीता म्‍हणजे दिनांक-02.07.2013 पासून ते दिनांक-15.03.2017 पर्यंत वार्षिक-18 टक्‍के व्‍याज दराने रुपये-6,60,000/- विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ती यांना देण्‍याचा आदेश व्‍हावा असेही नमुद केले.  करारामध्‍ये तक्रारकर्ती यांचे कडून डी.पी.घेण्‍या करीता पैसे घेण्‍याची कोणतीही तरतुद नसताना देखील विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्ती यांचे कडून बळजबरीने रुपये-25,000/- वसूल केले असल्‍यामुळे ही रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षांना आदेश देण्‍याचे नमुद केले. त्‍याच प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी विहित मुदतीत सदनीकेचा ताबा आणि नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे करुन दिले नसल्‍याने तक्रारकर्ती या जी.एस.टी.ची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही मात्र त्‍या विक्रीपत्रासाठी लागणारे ईतर शुल्‍क व खर्च देण्‍यास तयार असल्‍याचे नमुद केले.

    तक्रारकर्ती यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी सदनीकेतील त्रृटी विरुध्‍दपक्षांनी दुर कराव्‍यात तसेच सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून मिळण्यासाठी  विरुध्‍दपक्षांकडे वेळोवेळी विनंती करुनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्‍यामुळे त्‍यांनी दिनांक-26.11.2018 रोजी वकीला मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना कायदेशीर नोटीस पाठविली परंतु अशी नोटीस मिळूनही विरुध्‍दपक्षांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्ती यांना दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. त्‍याचप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 हे सदनीकेचे विद्दुत मीटर मधील विद्दुत प्रवाह खंडीत करण्‍याची वेळोवेळी धमकी देत होते, विरुध्‍दपक्षांचे एकंदरीत
 

       वागणूकीमुळे त्‍यांना अतिशय मोठया प्रमाणावर शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून त्‍यांनी ग्राहक मंचा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत-

(01)  करारा प्रमाणे विरुध्‍दपक्षांनी सदनीकेचा ताबा तक्रारकर्ती यांना उशिरा दिल्‍यामुळे त्‍यांनी सदनीकेपोटी विरुध्‍दपक्षांकडे जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-10,00,000/- वर ताबा देण्‍यास उशिर झालेल्‍या कालावधी करीता दिनांक-02.07.2013 पासून ते दिनांक-15.03.2017 पर्यंत वार्षिक-18 टक्‍के व्‍याज दराने रुपये-6,60,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी, तक्रारकर्ती यांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(02) करारा मध्‍ये तक्रारकर्ती यांचे कडून डी.पी.घेण्‍या करीता पैसे घेण्‍याची कोणतीही तरतुद नसताना देखील विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी त्‍यांचे कडून डी.पी.पोटी वसुल केलेली रक्‍कम रुपये-25,000/- दिनांक-15.03.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना आदेशित व्‍हावे.

(03)  तक्रारकर्ती यांनी सदनीकेच्‍या कामावर स्‍वतः रुपये-10,000/- खर्च केले असल्‍याने सदरचा खर्च विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी त्‍यांना परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(04)  करारा प्रमाणे सदनीकचे रजिसटर्ड विक्रीपत्र तक्रारकर्ती यांचे नावे नोंदवून देण्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना आदेशित व्‍हावे व त्‍यांनी रजिस्‍टर्ड विक्रीपत्र नोंदवून न दिल्‍यास ग्राहक मंचाचे मार्फतीने तक्रारकर्ती यांचे नावे सदनीकेचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(05)  तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 4 मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे सर्व सदनीकेची कामे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी करुन देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(06)  तक्रारकर्ती यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच नोटीस खर्च रुपये-2000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-20,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(07)  या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्ती यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 यांना या न्‍यायमंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता ती त्‍यांना मिळाल्‍या बाबत पोस्‍ट विभागाचा ट्रॅक रिपोर्ट अनुक्रमे पान क्रं 31 व 32 वर दाखल आहे, त्‍यानुसार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना अनुक्रमे दिनांक-19.01.2019 व दिनांक-28.01.2019 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे दिसून येते परंतु अशी नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 हे न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्‍यांनी कोणतेही लेखी निवेदन दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाव्‍दारे दिनांक-12.03.2019 रोजी पारीत करण्‍यात आला.

04.    तक्रारकर्ती यांनी तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ठ क्रं- 14 नुसार एकूण-06 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये उभय पक्षांमध्‍ये सदनीका विक्री संबधात झालेला करारनामा, विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ती यांचे नावे करुन दिलेले नोटरी विक्रीपत्र, तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस, रजि.पोस्‍टाच्‍या पावत्‍या व पोच  अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्ती यांनी पान क्रं 33 ते 36 वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 37 वर तक्रारीलाच लेखी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा अशी पुरसिस दाखल केली.

05.  तक्रारकर्ती यांचे तर्फे वकील श्री जयेश बोरकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे विरुध्‍द यापूर्वीच एकतर्फी आदेश पारीत झालेला आहे.

06.   तक्रारकर्ती यांची तक्रार, शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच  तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्ती यांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचा समक्ष खालील मुद्ये उपस्थित होतात आणि उपस्थित मुद्यांवर मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे. 

                                         :: निष्‍कर्ष ::

अक्रं

मुद्या

उत्‍तर

 

01

तक्रारकर्ती हया वि.प.क्रं 1 व 2 यांच्‍या ग्राहक होतात काय?

होय

02

वि.प.क्रं 1 व 2 यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची तसेच अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

होय.

03

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

 मुद्दा क्रं-1 बाबत-

07.    तक्रारकर्ती यांनी अभिलेखावरील पान क्रं-15 ते 17 वर सदनीका विक्री संबधात जो रुपये-500/-च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर उभय पक्षांमध्‍ये करारनामा दिनांक-27.02.2013 रोजी करण्‍यात आला, त्‍याची प्रत पुराव्‍यार्थ अभिलेखावर दाखल केली, त्‍याचे मंचाव्‍दारे अवलोकन केले असता, तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्ष बिल्‍डरफर्म मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम, भंडारा तर्फे शास्‍त्री नगर, गुरु नानक वार्ड, भंडारा येथील तलाठी साझा क्रं 16 मधील गट क्रं-583/1 आणि गट क्रं-584/1 या भूखंडावर श्री साई अपार्टमेंट-1 मधील सदनीका क्रं-404 एकूण रुपये-12,51,000/- एवढया किमती मध्‍ये मध्‍ये खरेदी करण्‍याचा सौदा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 सोबत केला होता. सदर स्‍टॅम्‍प पेपरवर विरुध्‍दपक्ष फर्म मे. अजिंक्‍य बिल्‍डकॉम भंडारा तर्फे प्रोप्रायटर म्‍हणून श्री प्रशांत पुंडलीक निखाडे यांची सही आहे तर साक्षीदार क्रं 2 म्‍हणून रोशन दामोदर खोत यांची स्‍वाक्षरी आहे. उभय पक्षां मधील सदनीका विक्री करारात कराराचा दिनांक-27.02.2013 रोजी रुपये-5,00,000/- तक्रारकर्ती यांनी नगदी दिल्‍याचे विरुध्‍दपक्षांनी मान्‍य केलेले आहे, सदनीकेची उर्वरीत रक्‍कम रुपये-7,51,000/- पैकी रुपये-5,00,000/- जून-2013 पर्यंत देण्‍याचे करारात नमुद असून उर्वरीत रुपये-2,51,000/- सदनीकेचा ताबा देतेवेळी नोटरी केल्‍या नंतर देण्‍याचे ठरले. सदर करारनाम्‍याचे खाली दिनांक-15.07.2013 रोजी रुपये-2,00,000/- मिळाल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 2 रोशन दामोदर खोत यांनी सही केलेली आहे. तसेच दिनांक-02.08.2013 रोजी नगदी रुपये-2,75,000/- मिळाल्‍या बाबत करारनाम्‍याचे खाली विरुध्‍दपक्ष क्रं 2 रोशन दामोदर खोत यांनी सही केलेली आहे. अशाप्रकारे सदर करारनाम्‍याचे प्रतीवरुन तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्ष यांना सदनीका क्रं 404 पोटी वर नमुद केल्‍या प्रमाणे रकमा दिल्‍याची बाब सिध्‍द होते. विरुध्‍दपक्ष यांनी करारा प्रमाणे योग्‍य त्‍या मोबदल्‍यात  सर्व सोयी व सुविधांसह सदनीकेची विक्री तक्रारकर्ती यांचे नावे करुन देण्‍याचे मान्‍य केल्‍यामुळे आणि काही रक्‍कम विरुध्‍दपक्ष यांना प्राप्‍त झाल्‍यामुळे तक्रारकर्ती हया विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 बिल्‍डर यांच्‍या ग्राहक होतात आणि त्‍यांच्‍यामध्‍ये अनुक्रमे “ग्राहक आणि सेवा पुरविणारे” असे संबध निर्माण होत असल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्रं 2 बाबत-

08.   उभय पक्षां मध्‍ये दिनांक-27.02.2013 रोजी स्‍टॅम्‍प पेपरवर सदनीका क्रं 404 संबधाने जो विक्री करार झालेला आहे त्‍या  करारा मध्‍ये सदनीकेचा ताबा 1 जुलै, 2013 पर्यंत देण्‍याचे विरुध्‍दपक्षांनी मान्‍य केलेले आहे तसेच असा ताबा देण्‍यास उशिर झाल्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 तक्रारकर्ती यांनी सदनीकेपोटी जमा केलेल्‍या रकमेवर बँकेच्‍या व्‍याज दरा प्रमाणे व्‍याज देतील असेही करारा मध्‍ये मान्‍य  केलेले आहे. उभय पक्षां मधील स्‍टॅम्‍प पेपरवरील करारा मध्‍ये पुढे असेही नमुद केलेले आहे की, सदनीके करीता विद्दुत मीटर, रजिस्‍ट्रेशन चॉर्जेस आणि रजिस्‍ट्रेशन करीता लागणारे इतर कर तसेच लागणारा खर्च लिहून घेणार यांना करावा लागेल.

09.   सदनीका विक्री संबधात उभय पक्षांमध्‍ये जो दिनांक-27.02.2013 रोजी करारनामा झाला त्‍यामध्‍ये खालील सोयी व सुविधा देण्‍याचे विरुध्‍दपक्ष यांनी मान्‍य केलेले आहे, त्‍याचे विवरण परिशिष्‍ट– अ” प्रमाणे उदधृत करण्‍यात येते-

परिशिष्‍ट– “अ”

अक्रं

मान्‍य केलेल्‍या सोयी व सुविधा

1

सिमेंट-एसीसी, अल्‍ट्राटेक किंवा अंबुजा या नामांकीत कंपनीचे राहिल.

2

स्‍टील-प्रकाश टीएमटी किंवा कामधेनू टीएमटी कंपनीचे राहिल.

3

विद्युत उपकरणे-अॅन्‍कर किंवा हॅवेल्‍स या नामांकीत कंपनीचे असतील

4

टाईल्‍स-आयएसओ कंपनीच्‍याच टाईल्‍स अपार्टमेंट मध्‍ये वापरण्‍यात येतील.

5

नळ फीटींग्‍स–हिंदवेअर किंवा सेरा या नामांकित कंपनीचेच राहतील

6

पेन्‍टींग व पुटींग-बिर्ला पुटींग आणि एशियन किंवा नॅरोलॅक कंपनीचे पेंट राहिल.

7

प्रत्‍येक सदनीके करीता बोअरवेल व्‍दारे पाण्‍याची व्‍यवस्‍था केली जाईल. तसेच प्रत्‍येक सदनीकेसाठी पार्कींग व्‍यवस्‍था, अपार्टमेंट मध्‍ये नामांकित कंपनीची लिफ्ट 24 तास बॅकअपसह राहणार असून नामांकित कंपनीचे जरनेटर देण्‍यात येईल

10.    दिनांक-27.02.2013 रोजीचे उभय पक्षां मधील स्‍टॅम्‍प पेपरवरील करारा मध्‍ये सदनीकेचे संपूर्ण विवरण या सदरा खाली खालील प्रमाणे नमुद केलेले आहे त्‍याचे विवरण परिशिष्‍ट–ब” प्रमाणे उदधृत करण्‍यात येते –

 परिशिष्‍ट–“ब”

अक्रं

मान्‍य केलेल्‍या सोयी व सुविधा

1

सदनीकेत दोन बेडरुम, एक हॉल, एक किचन आणि दोन संडास व बाथरुम असून एका बेडरुमला एक बाल्‍कनी आणि किचन करीता वॉश एरीया असेल

2

सदनीकेतील प्रत्‍येक रुम मध्‍ये Vitrified Tiles लावण्‍यात येतील

3

संडास-बाथरुम मध्‍ये 7 फुट उंची पर्यंत Glazed  Tiles लावण्‍यात येतील.

 

4

किचन मध्‍ये Granite ओटा आणि  Stainless Steel Sink लावण्‍यात येईल आणि त्‍यावर 2 फुट उंचीपर्यंत किचन Tiles लावण्‍यात येतील.

5

मुख्‍य दरवाजा लाकडी फ्रेम मध्‍ये लावून दिला जाईल. बाकी रुमचे दरवाजे RCC Frame  चे राहतील.

6

मुख्‍य दार सुबक आणि लाकडी राहणार असून इतर Flush Doors राहतील

7

सर्व खिडक्‍या MS Grill मध्‍ये  Aluminum Frame च्‍या राहतील यासह आवश्‍यक तसे ईलेक्ट्रिक आणि नळ फीटींग लावून दिले जाईल.

   

11.    तक्रारकर्ती यांनी अभिलेखावरील पान क्रं 18 ते 20 वर नोटरी समोर सदनीका विक्री संबधाने जो करारनामा दिनांक-15 मार्च, 2017 रोजी करण्‍यात आला त्‍याची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केली. त्‍या नोटरी समोरील करारावर तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रोप्रायटर प्रशांत पुंडलीकराव निखाडे आणि भागीदार रोशन दामोधर खोत यांची छायाचित्रे व सहया आहेत. तसेच साक्षदार म्‍हणून श्री पराग केसलकर आणि  श्री हितेश आ.गभने यांच्‍या सहया आहेत. सदर करारनाम्‍यात दोन्‍ही विरुध्‍दपक्षांनी सदनीका क्रं 404 ची एकूण किम्‍मत रुपये-12,51,000/- पैकी तक्रारकर्ती यांचे कडून त्‍यांना आज पर्यंत रुपये-10,00,000/- मिळाल्‍याची बाब मान्‍य केलेली आहे. या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्ती यांचे कडून उर्वरीत रकमे पैकी (उर्वरीत रक्‍कम रुपये-2,51,000/- पैकी) रुपये-1,00,000/- चा धनादेश क्रं-007738 अर्बन बँक भंडारा जिल्‍हा परिषद चौक शाखा भंडारा दिनांक-15.03.2017 रोजीचा मिळाल्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी मान्‍य केलेले आहे, अशाप्रकारे तक्रारकर्ती यांचे कडून करारातील सदनीकेपोटी रुपये-11,00,000/- मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी नोटरी समोरील विक्री करारात मान्‍य केलेली असल्‍याने तक्रारकर्ती यांनी सदनीकेपोटी एकूण रुपये-11,00,000/-विरुध्‍दपक्षांना दिल्‍याची बाब पुराव्‍यानिशी  सिध्‍द होते. नोटरी समोरील करारात पुढे असेही नमुद आहे की, उर्वरीत रुपये-1,51,000/- सदनीकेची रंगरंगोटी, दरवाजे आणि नळ तसेच ईलेक्ट्रिकलची संपूर्ण कामे आणि लिफ्ट लागल्‍या नंतर देण्‍यात येईल.ईमारतीला सर्व शासकीय मंजू-या प्राप्‍त  झाल्‍या नंतर दुय्यम निबंधक यांचे समोरील विक्रीपत्र विरुध्‍दपक्ष हे नोंदवून देतील परंतु विक्रीपत्रास लागणारे नोंदणी व मुद्रांक शुल्‍क, नोंदणी फी, सर्व्‍हीस व व्‍हॅट टॅक्‍स आणि इतर खर्च हा खरेदीदार यांना करावा लागेल. या शिवाय इलेक्ट्रिक ट्रॉन्‍सफॉर्मरच्‍या खर्चापोटी रुपये-25,000/- मिळाल्‍याचे सुध्‍दा विरुध्‍दपक्षांनी मान्‍य केलेले आहे. सदर नोटरी समोरील विक्री करारात विरुध्‍दपक्षांनी सदनीकेच्‍या विक्रीपोटी तक्रारकर्ती यांचे कडून रुपये-11,00,000/- आणि ट्रॉन्‍सफॉर्मरच्‍या खर्चापोटी रुपये-25,000/- असे मिळून एकूण रुपये-11,25,000/- मिळाल्‍याची बाब कबुल केलेली आहे, त्‍यामुळे तक्रारकर्तीचे तक्रारीतील विधानांना बळकटी प्राप्‍त होते.

12.    दिनांक-27.02.2013 रोजीचे उभय पक्षां मधील स्‍टॅम्‍प पेपरवरील करारा मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी या निकालपत्रात वर नमुद केल्‍या प्रमाणे परिशिष्‍ट व परिशिष्‍ट– मध्‍ये नमुद केलेल्‍या सर्व सोयी व सुविधा देण्‍याचे मान्‍य केलेले केले परंतु सोयी व सुविधा बाबत वेळोवेळी विनंती करुन तसेच कायदेशीर नोटीस देऊन सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी अद्दाप पर्यंत  त्‍या सोयी व सुविधा पुरविल्‍या नसल्‍याची तक्रारकर्ती यांची मुख्‍य तक्रार आहे.

13.    तक्रारकर्ती यांनी सदनीकेचा ताबा मिळाल्‍या नंतर त्‍यांना सदनीकेमध्‍ये विरुध्‍दपक्षां कडून पुरविलेल्‍या सोई सुविधा निकृष्‍ट दर्जाच्‍या आढळून आल्‍यात त्‍याचे विवरण येथे परिशिष्‍ट- प्रमाणे उदधृत करण्‍यात येते-

परिशिष्‍ट-

       तक्रारकर्ती यांनी जेंव्‍हा सदनीकेचा ताबा घेतला त्‍यावेळी सदनीकेच्‍या स्‍लॅब मधून पाणी गळत होते तसेच खिडक्‍याची पुटींग करुन दिलेली नव्‍हती, नळाला तोटया लावून दिलेल्‍या नव्‍हत्‍या, संडासा मध्‍ये फुटलेली सिट लावलेली होती, टाईल्‍स तुटलेल्‍या होत्‍या, कुमोट पाईप, कुमोटचा नळ, कव्‍हर, दरव्‍याजाची फीनिशींग, दाराचे कट इत्‍यादी कामकाज दोषपूर्ण असल्‍याचे त्‍यांना आढळून आले व सदर त्रृटी दुर करण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना वेळोवेळी विनंती करुनही त्‍यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्‍याचे तक्रारीत नमुद केले. त्‍याच प्रमाणे सदर ईमारती मध्‍ये लिफ्ट स्‍थापित करुन दिलेली नाही, ईमारतीला बाहेरुन पेंट करुन दिलेला नाही, सुरक्षा रक्षकाची खोली बांधलेली नाही, जिन्‍याच्‍या खिडक्‍या, गेट जवळील कॉंक्रीट व मीटर तसेच जिन्‍या जवळील कॉक्रींटचे काम अद्दाप पर्यंत पूर्ण करुन दिलेले नाही.

14.    अपार्टमेंट व तक्रारकर्ती यांचे सदनीके मध्‍ये विरुध्‍दपक्षांनी सोयी व सुविधा न पुरविल्‍या बाबत-

       सदनीका विक्री संबधात उभय पक्षांमध्‍ये जो दिनांक-27.02.2013 रोजी करारनामा झाला त्‍यामध्‍ये प्रस्‍तुत निकालपत्रातील परिशिष्‍ट-अ” व परिशिष्‍ट– “ब” मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे सोयी व सुविधा देण्‍याचे विरुध्‍दपक्ष यांनी मान्‍य केलेले आहे. तसेच या निकालपत्रातील परिशिष्‍ट-क” मध्‍ये नमुद केल्‍या  प्रमाणे तक्रारकर्ती यांना सदनीकेचा ताबा मिळाल्‍या नंतर बरेच काम हे निकृष्‍ट दर्जाचे आढळून आल्‍याचे म्‍हणणे आहे. तक्रारकर्ती यांचे प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांना ग्राहक मंचाची नोटीस मिळाल्‍या बाबत पोस्‍टाचा ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही ते मंचा समोर उपस्थित झाले नाहीत वा त्‍यांनी आपले लेखी निवेदन ग्राहक मंचा समक्ष सादर केले नाही वा तक्रारकर्ती यांनी त्‍यांचे विरुध्‍द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. याउलट तक्रारकर्ती यांनी आपले तक्रारीचे समर्थनार्थ दस्‍तऐवजी पुरावा तसेच पान क्रं 33 ते 36 वर  पुराव्‍याचे स्‍वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे, यावरुन तक्रारकर्तीची विरुध्‍दपक्षां विरुध्‍दची तक्रार सिध्‍द होते असे मंचाचे मत आहे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी करारात मान्‍य केल्‍या प्रमाणे परिशिष्‍ट-अ” व परिशिष्‍ट– “ब”  प्रमाणे सोयी व सुविधा देण्‍यास बांधील आहेत त्‍याच बरोबर परिशिष्‍ट-क” मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्षांनी सदनीकेच्‍या बांधकामात ज्‍या त्रृटी ठेवल्‍यात त्‍या सर्व त्रृटी दुर करुन देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

15.   ट्रॉन्‍सफॉर्मरची रक्‍कम तक्रारकर्ती यांचे कडून वसुल केल्‍या बाबत-

      तक्रारकर्ती यांचा आणखी एक मुख्‍य विवाद असा आहे की, त्‍यांचे कडून ट्रॉन्‍सफॉर्मरच्‍या खर्चापोटी रुपये-25,000/-  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वसुल केलेले आहे व अशी रक्‍कम तक्रारकर्ती यांचे कडून मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षांनी नोटरी समोरील करारनामा दिनांक-15 मार्च, 2017 मध्‍ये मान्‍य केलेली आहे. सर्वसाधारण व्‍यवहारात मोक्‍यावर ट्रान्‍स्‍फॉर्मर लावण्‍याची जबाबदारी ही संबधित बिल्‍डरची असते. सदनीका खरेदीदार यांना फक्‍त विद्दुत मीटर तसेच पाणी मीटर संबधाने जे शासकीय शुल्‍क आहे ते देण्‍याची जबाबदारी असते परंतु तक्रारकर्ती यांचे प्रकरणात विरुध्‍दपक्ष यांनी ट्रॉन्‍सफॉर्मरपोटी रुपये-25,000/- तक्रारकर्ती यांचे कडून वसुल केल्‍याची बाब  सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्ती या सदर रक्‍कम व्‍याजासह विरुध्‍दपक्ष यांचे कडून मिळण्‍यास पात्र असल्‍याचे मंचाचे मत आहे.

16.  अपार्टमेंट मध्‍ये लिफ्ट स्‍थापीत न करुन दिल्‍या बाबत-

    तक्रारकर्ती यांचे तक्रारी प्रमाणे विरुध्‍दपक्षांनी आज पर्यंत करारामध्‍येमान्‍य करुनही अपार्टमेंट मध्‍ये लिफ्ट स्‍थापीत करुन दिलेली नाही. तक्रारकर्ती यांचे सदर विधान विरुध्‍दपक्षांनी खोडून काढलेले नाही, इतकेच नव्‍हे तर, तक्रारकर्ती यांचे प्रकरणात न्‍यायमंचाची नोटीस मिळूनही उभय विरुध्‍दपक्ष मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्‍यांनी सदर विधान खोडून काढलेले नाही,  त्‍यामुळे तक्रारकर्ती यांचे विधानाला बळकटी प्राप्‍त होत असल्‍याने विरुध्‍दपक्षांनी करारात नमुद केल्‍या प्रमाणे अपार्टमेंट मध्‍ये नामांकित कंपनीची लिफ्ट 24 तास बॅकअपसह जनरेटरसह पुरवावी असे मंचा तर्फे आदेशित करण्‍यात येते.

17.    सदनीका विक्री करारामध्‍ये नमुद केलेल्‍या विहित दिनांकास सदनीकेचा ताबा न देता उशिराने ताबा दिल्‍या बाबत नुकसान भरपाई म्‍हणून व्‍याज मिळणे बाबत-

     उभय पक्षां मध्‍ये दिनांक-27.02.2013 रोजी स्‍टॅम्‍प पेपरवर सदनीका क्रं 404 संबधाने जो विक्री करार झालेला आहे, त्‍या  करारा मध्‍ये सदनीकेचा ताबा 1 जुलै, 2013 पर्यंत देण्‍याचे विरुध्‍दपक्षांनी मान्‍य केलेले आहे तसेच असा ताबा देण्‍यास उशिर झाल्‍यास, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 हे, तक्रारकर्ती यांनी सदनीकेपोटी जमा केलेल्‍या रकमेवर बँकेच्‍या व्‍याज दरा प्रमाणे व्‍याज देतील असे देखील करारा मध्‍ये मान्‍य केलेले आहे. तक्रारकर्ती यांचे तक्रारी प्रमाणे त्‍यांना सदनीकेचा ताबा दिनांक-15/03/2017 रोजी देण्‍यात आला. करारा प्रमाणे सदनीकेचा ताबा हा दिनांक-1 जुलै, 2013 रोजी देणे क्रमप्राप्‍त असताना प्रत्‍यक्षात ताबा दिनांक-15 मार्च, 2017 रोजी दिलेला आहे म्‍हणजेच सदनीकेचा ताबा हा 03 वर्ष, 08 महिने, 14 दिवस एवढया उशिराने दिलेला आहे. तक्रारकर्ती यांनी ताबा देण्‍यास उशिर झालेल्‍या कालावधी करीता म्‍हणजे दिनांक-01.07.2013 पासून ते दिनांक-15.03.2017 पर्यंत वार्षिक-18 टक्‍के व्‍याज दराने व्‍याजाची रक्‍कम रुपये-6,60,000/- विरुध्‍दपक्षां कडून मिळण्‍याची देण्‍याची मागणी केलेली आहे परंतु करारा मध्‍ये सदनीकेचा ताबा देण्‍यास उशिर झाल्‍यास बँक दराने विरुध्‍दपक्ष जमा केलेल्‍या रकमेवर व्‍याज देतील असे नमुद  केलेले आहे. तक्रारकर्ती यांनी सदनीकेचा ताबा मिळाल्‍याचे तारखे पर्यंत विरुध्‍दपक्ष यांचे कडे एकूण रुपये-10,00,000/- जमा केलेले आहेत आणि सर्वसाधारण राष्‍ट्रीयकृत बँके मध्‍ये ठेवीवरील व्‍याजदर हा सद्य कालावधीत जास्‍तीत जास्‍त वार्षिक-9 टक्‍के एवढा आहे, त्‍यामुळे राष्‍ट्रीयकृत बँके मधील सदर व्‍याजदर लक्षात घेता, तक्रारकर्ती हया सदनीकेचा ताबा मिळण्‍यास उशिर झाल्‍यामुळे विरुध्‍दपक्षांकडून एकूण रुपये-10,00,000/- एवढया रकमेवर दिनांक-01.07.2013 पासून ते दिनांक-15.03.2017 पर्यंतचे कालावधीकरीता वार्षिक-9 टक्‍के दरा प्रमाणे व्‍याज मिळण्‍यास पात्र असल्‍याचे मंचाचे मत आहे.   

18.    दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक शुल्‍क यांचे समोर उभय पक्षां मधील करारा प्रमाणे तक्रारकर्ती यांचे नावे सदनीका क्रं 404 चे नोंदणीकृत विक्रीपत्र विरुध्‍दपक्षांनी नोंदवून देण्‍या बाबत-

     उभय पक्षां मध्‍ये नोटरी समोर सदनीका विक्री संबधात करारनामा दिनांक-15 मार्च, 2017 रोजी करण्‍यात आला त्‍याची प्रत पुराव्‍यार्थ अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्‍या नोटरी समोरील करारात तक्रारकर्ती यांचे कडून सदनीकेपोटी एकूण रुपये-11,00,000/- विरुध्‍दपक्षांना मिळाल्‍याची कबुली विरुध्‍दपक्षांनी दिलेली आहे. नोटरी समोरील करारात पुढे असेही नमुद आहे की, उर्वरीत रक्‍कम रुपये-1,51,000/- सदनीकेची रंगरंगोटी, दरवाजे आणि नळ तसेच ईलेक्ट्रिकलची संपूर्ण कामे आणि लिफ्ट लागल्‍या नंतर देण्‍यात येईल. ईमारतीला सर्व शासकीय मंजू-या प्राप्‍त  झाल्‍या नंतर दुय्यम निबंधक यांचे समोरील विक्रीपत्र विरुध्‍दपक्ष हे नोंदवून देतील परंतु विक्रीपत्रास लागणारे नोंदणी व मुद्रांक शुल्‍क, नोंदणी फी, सर्व्‍हीस व व्‍हॅट टॅक्‍स आणि इतर खर्च हा खरेदीदार यांना करावा लागेल. त्‍यामुळे तक्रारकर्तीचे सदनीकेमध्‍ये करारा प्रमाणे सर्व सोयी व सुविधा पूर्ण केल्‍या नंतर व करारा प्रमाणे तक्रारकर्ती यांचे कडून सदनीकेच्‍या मोबदल्‍याची संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्तीचे नावे सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून द्दावे व असे विक्रीपत्र नोंदविण्‍यासाठी लागणारे मुद्रांकशुल्‍क, नोंदणी फी ईत्‍यादीचा खर्च तक्रारकर्ती यांनी स्‍वतः सहन करावा असे मंचाचे मत आहे.

19.   अशाप्रकारे निकालपत्रात वर नमुद केल्‍या प्रमाणे दोन्‍ही विरुध्‍दपक्षांनी अपार्टमेंट व तक्रारकर्ती यांचे सदनीके मध्‍ये परिशिष्‍ट – व परिशिष्‍ट- मध्‍ये नमुद केल्‍या नुसार सोयी व सुविधा देण्‍याचे करारात मान्‍य केलेले असूनही तशा सोयी व सुविधा पुरविलेल्‍या नाहीत तसेच तक्रारकर्ती यांनी सदनीकेचा ताबा घेतल्‍या नंतर परिशिष्‍ट मध्‍ये नमुद केल्‍या नुसार सदनीकेतील कामकाज निकृष्‍ट दर्जाचे आढळून आले तसेच बहुतांश रक्‍कम प्राप्‍त करुनही अद्दाप पर्यंत विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ती यांचे नावे सदनीकेचे विक्रीपत्र दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक शुल्‍क विभाग यांचे समोर उर्वरीत रक्‍कम प्राप्‍त करुन नोंदवून दिलेले नाही तसेच ट्रॉन्‍सफॉर्मरपोटी करारात तरतुद नसतानाही तक्रारकर्ती यांचे कडून रुपये-25,000/- वसुल केलेत आणि सदनीकेचा ताबा 03 वर्ष, 08 महिने, 14 दिवस उशिराने दिलेला आहे या सर्व बाबी सिध्‍द झालेल्‍या असल्‍याने विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ती यांना दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.

20.   तक्रारकर्ती यांनी त्‍या राहत असलेल्‍या सदनीके वर रुपये-10,000/- जास्‍तीची रक्‍कम खर्च केल्‍या बाबत-

   तक्रारकर्ती यांनी सदनीकेवर रुपये-10,000/- जास्‍तीची रक्‍कम खर्च केल्‍या बाबत कोणताही पुरावा ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेला नसल्‍याने ही मागणी नामंजूर करण्‍यात येते.

मुद्दा क्रं 3 बाबत-

21.    मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदविले असल्‍याने तक्रारकर्ती यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विरुध्‍द अंशतः मंजूर होण्‍यास पात्र असून मुद्दा क्रं 3 संबधात प्रस्‍तुत निकालपत्रात मंचाव्‍दारे खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो.

                      :: आदेश ::

(01)  तक्रारकर्ती यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम भंडारा आणि सदर फर्मचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रोप्रायटर श्री प्रशांत पुंडलिक निखाडे आणि विरुध्‍दपक्ष  क्रं 2 भागीदार श्री रोशन दामोधर खोत यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम भंडारा आणि सदर फर्मचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रोप्रायटर आणि विरुध्‍दपक्ष  क्रं 2 भागीदार यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या दिनांक-27.02.2013 आणि दिनांक-15 मार्च, 2017 मधील करारा प्रमाणे तक्रारकर्ती राहत असलेल्‍या श्री साई अपार्टमेंट आणि सदनीका क्रं 404 मध्‍ये नमुद केलेल्‍या सर्व सोयी सुविधा (या निकालपत्रात परिशिष्‍ट-अ” व “ब” मध्‍ये नमुद केल्‍यानुसार) पुरवाव्‍यात. तसेच तक्रारकर्ती राहत असलेल्‍या सदनीका क्रं-404 मध्‍ये या निकालपत्रातील परिशिष्‍ट- क” मध्‍ये नमुद केलेल्‍या सर्व बांधकामातील त्रृटी दुर कराव्‍यात. तसेच साई अपार्टमेंट मध्‍ये करारात मान्‍य केल्‍यानुसार नामांकित कंपनीची लिफ्ट 24 तास बॅकअप जनरेटरसह पुरवावी.

(03) विरुध्‍दपक्ष मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम भंडारा आणि सदर फर्मचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रोप्रायटर आणि विरुध्‍दपक्ष  क्रं 2 भागीदार यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी दोन्‍ही करारा प्रमाणे तक्रारकर्ती राहत असलेल्‍या साई अपार्टमेंट आणि सदनीका क्रं 404 मध्‍ये सर्व सोयी व सुविधा पुरविल्‍या नंतर करारा प्रमाणे तक्रारकर्ती यांचे कडून सदनीकेपोटी घेणे असलेली उर्वरीत रक्‍कम रुपये-1,51,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष एक्‍कावन्‍न हजार फक्‍त) प्राप्‍त करुन  सदनीका क्रं 404 चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक शुल्‍क यांचे कार्यालयात नोंदवून द्दावे. करारा प्रमाणे सदनीका विक्रीपत्र नोंदविण्‍यासाठी लागणारी नोंदणी फी, मुद्रांक शुल्‍क आणि ईतर लागणारा कर इत्‍यादीचा खर्च तक्रारकर्ती यांनी स्‍वतः सहन करावा.

(04) विरुध्‍दपक्ष मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम भंडारा आणि सदर फर्मचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रोप्रायटर आणि विरुध्‍दपक्ष  क्रं 2 भागीदार यांना आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्ती हयांना सदनीकेचा ताबा देण्‍यास उशिर केल्‍यामुळे ताबा देण्‍याचे तारखे पर्यंत तक्रारकर्ती यांनी सदनीकेपोटी विरुध्‍दपक्षां कडे जमा केलेली एकूण रुपये-10,00,000/- एवढया रकमेवर दिनांक-01.07.2013 पासून ते दिनांक-15.03.2017 पर्यंतचे कालावधीकरीता वार्षिक-9 टक्‍के दरा प्रमाणे येणारे व्‍याज तक्रारकर्ती यांना अदा करावे.

(05) विरुध्‍दपक्ष मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम भंडारा आणि सदर फर्मचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 प्रोप्रायटर आणि विरुध्‍दपक्ष  क्रं 2 भागीदार यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ती यांचे कडून दिनांक-15 मार्च, 2017 ट्रॉन्‍सफॉर्मरपोटी रुपये-25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार फक्‍त)  वसुल केलेली रक्‍कम दिनांक-15 मार्च, 2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्ती यांना अदा करावी.

(06) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 व 2 यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ती यांना झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-30,000/-(अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 यांनी, तक्रारकर्ती यांना द्यावेत.

(07)  तक्रारकर्ती यांच्‍या अन्‍य मागण्‍या योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी नामंजूर करण्‍यात येतात.

(08)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष मे.अजिंक्‍य बिल्‍डकॉम फर्म आणि तिचे प्रोप्रायटर व भागीदार अनुक्रमे विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(04) आणि मुद्या क्रं-(05) मध्‍ये नमुद केलेल्‍या तक्रारकर्ती यांना देय असलेल्‍या रकमा मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्ती यांना देण्‍यास विरुध्‍दपक्ष फर्म आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे तिचे प्रोप्रायटर आणि भागीदार हे जबाबदार राहतील.

(09) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

(10)  तक्रारकर्ती यांना  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.