जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच धुळे ग्राहक तक्रार केस क्र.05/2010 दाखल ता.02/01/2010 निकाल ता.18/05/2010 श्री.अमोल विलास कुलकर्णी, रा.सुदर्शन कॉलनी, देवपूर-धुळे. तक्रारदार विरुध्द 1) प्रशासक, श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव (महा.राज्य) शाखा, देवपूर-धुळे. 2) श्री.चंद्रकांत हरी बढे, चेअरमन, रा.बढेवाडा, वरणगाव, जि.जळगाव. 3) श्री.अशोक हरी बढे, चेअरमन, विभागीय चेअरमन, श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव (महा.राज्य) शाखा, देवपूर-धुळे. रा.लक्ष्मीनगर, धुळे. 4) श्री. अरविंद शामराव चौधरी, रा.शामप्रसाद बिल्डींग, धुळे. 5) श्री. नरेंद्र तुकाराम पाटील, 54,इंदिरा हौसिंग सोसायटी, देवपूर-धुळे. 6) श्री.मनोज चिमणराव कोल्हे, संचालक, द्वारा-12,निरंजन, स्टेशनरोड, धुळे., 7) श्री.संदिप शंकरलाल संचेती, संचालक, रा.5, चाळीसगाव रोड,धुळे. 8) श्री.योगीराज शिवाजी मराठे, संचालक, एन.सी.सी.ऑफीसमागे, देवपूर-धुळे. 9) श्री.रमेश लक्ष्मण चौधरी, संचालक, रा.2380, ग.क्र.6 धुळे. 10) श्री.राजेंद्र आनंदराव बोंडे, संचालक, 62, दत्त कॉलनी, देवपूर-धुळे. 11) श्री.कमलेश धिरजलाल गांधी, संचालक, नित्यानंदनगर,जलारामबाप्पा मंदिराजवळ,धुळे. 12) श्री.जयंत सुदाम कुलकर्णी, संचालक, द्वारा.श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव (महा.राज्य) शाखा, देवपूर-धुळे 13) श्री.विनोद पांडुरग कांदोले, शाखा व्यवस्थापक, द्वारा.श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसा.लि.वरणगाव, जि.जळगाव (महा.राज्य) शाखा, देवपूर-धुळे विरुध्द पक्ष तक्रारदार तर्फेः-अड.आर.एन.शिंदे विरुध्दपक्षातर्फेः- अड.सौ.रसिका निकुंभ कोरमः-श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष, अड.चंद्रकांत येशीराव, सदस्य,
निकालपत्र श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत ठेवलेली रक्कम परत दिली नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार यांनी विरुध्द श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसा.लि.वरणगाव,(संक्षीप्ततेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत खालीलप्रमाणे ठेवपावतीत रक्कम गुंतवली होती. अ.नं. | ठेवपावती क्रमांक | ठेव रक्कम | देय रक्कम | 1 | 558607 | 20,000 | व्याजासह | 2 | 558613 | 20,000 | व्याजासह | 3 | 558619 | 20,000 | व्याजासह | 4 | 558625 | 20,000 | व्याजासह | 5 | 558631 | 20,000 | व्याजासह |
3. तक्रारदार यांनी गुंतविलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून ठेवपावत्याची व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे. 4. न्यायमंचाच्या नोटीसा लागून विरुध्द पक्ष हजर झाले. त्यांनी त्यांचे एकत्रीत म्हणणे पान क्र.25 वर दाखल केलेले आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्षाचे म्हणणे यांचा विचार होता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. अ) तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ?- होय. ब) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?-होय. क) अंतीम आदेश- अंतीम आदेशात नमूद केल्याप्रमाणे विवेचन 6. तक्रारदार यांनी पान क्र.15 ते 19 वर ठेवपावतीच्या झेरॉक्स प्रती सादर केलेल्या आहेत. 7. विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या म्हणण्यात कर्ज घेणारे कर्जदार वेळेवर रकमा अदा करीत नाहीत त्यामुळे संस्थेची परिस्थिती बिकट झालेली आहे. जसजसे पैसे वसूल होतील तसतसे पैसे देण्यात येतील परंतु पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक झालेली असल्याने त्यांच्या आदेशाप्रमाणे पैसे देण्यात येतील असे म्हटलेले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र.3 यांनी दि.19/04/2007 रोजी, विरुध्दपक्ष क्र.4 व 9 यांनी दि.2/8/2007, विरुध्दपक्ष क्र.6 यांनी दि.31/8/2007 रोजी, विरुध्दपक्ष क्र.10 यांनी दि.31/8/2007 रोजी राजीनामे दिलेले असल्याने तसेच विरुध्दपक्ष क्र.11 हे संस्थेच्या मिटींगला हजर राहात नसल्याने त्यांना दि.3/11/2006 रोजी ठरावाने काढून टाकले असल्याने त्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. सदरचे राजीनामा पत्रे पान क्र. 29, 31, 33, 36, 38 सादर आहेत. सबब तक्रार रद्द करण्यात यावी असे म्हटलेले आहे. वर नमूद म्हणणे बाबत विचार करता जसजशी कर्ज वसुली होत आहे तसतशी रक्कम दिल्याबाबतचा तपशील दाखल करणे आवश्यक होते तसा तपशील दाखल केलेला नाही त्यामुळे सदरचे म्हणणे मान्य करता येत नाही. तसेच विरुध्दपक्ष क्र.3,4,6,9,10 यांचे पान क्र.29, 31, 33, 36, 38 वर दाखल असलेल्या राजीनामापत्राचे अवलोकन करता त्यांचा राजीनामा झालेला असल्याने तसेच पान क्र.41 वर दाखल असलेल्या प्रोसिडींग वरुन विरुध्दपक्ष क्र.11 यांना संचालक पदावरुन कमी केलेले असल्याने विरुध्दपक्ष क्र.3,4,6,9,10,11 यांचेविरुध्दची तक्रार रद्द करणे योग्य होईल असे आम्हास वाटते. 8. विरुध्दपक्ष क्र.1,2,5,7,8,12,13 यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदार पतसंस्थेतील ठेव रक्कम नाकारलेली नाही. तक्रारीतील ठेवपावत्या व त्यातील रकमेचा विचार करता तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 1,2,5,7,8,12,13 यांचे ग्राहक आहेत असे आम्हास वाटते. 9. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पहाता त्यांनी पतसंस्थेत रकमा गुंतविल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षाकडे वारंवार रकमेची मागणी करुनसुध्दा पतसंस्थेने तक्रारदार यांना रकमा अदा केल्या नाहीत. वास्तविक ठेवीदारांना वेळेवर रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्दपक्षाची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे आम्हास वाटते. 10. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ठेवपावत्यातील व्याजासह होणारी रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत असे आम्हास वाटते. 11. रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना विरुध्दपक्षाविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. सबब तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र.1,2,5,7,8,12,13 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीक रित्या मानसिक त्रासापोटी रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु.1000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. 12. तक्रारीचे समर्थनार्थ न्यायमंच पुढील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे. अ) 2009 सी.टी.जे. राष्ट्रीय आयोग, पान क्र.20, आशिष रमेशचंद्र बिर्ला, विरुध्द मुरलीधर राजधर पाटील ब) मा.राज्य आयोग, मुंबई, औरंगाबाद खंडपीठ, प्रथम अपील क्र.652/2008 निकाल ता.14/11/08 चिंतामणी नागरी सह.पतसंस्था धुळे विरुध्द सौ.शकुंतला नेमिचंद वर्मा 13. सबब न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आ दे श अ. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. आ. विरुध्दपक्ष क्र.1,2,5,7,8,12,13 यांनी तक्रारदार यांना ठेवपावती क्र.558607, 558613, 558619, 558625, 558631 मधील मुदतीअंती देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटेपावेतो ठेवपावतीत नमूद दराने व्याज अशी एकूण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु.1000/- हा आदेश प्राप्तीपासून एक महिन्याच्या आत तक्रारदार यांना अदा करावेत. इ. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी पतसंस्था(संचालक मंडळ/प्रशासक/अवसायक /यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पहात असतील) आणि विरुध्द पक्ष यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या अदा करावी. ई. विरुध्दपक्ष क्र.3,4,6,9,10,11 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येत आहे. उ. वर नमूद आदेशातील ठेवीच्या रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास अगर त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी. (अड.चंद्रकांत येशीराव) (डी.डी.मडके) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच धुळे (महाराष्ट्र राज्य) भपंवा/
| HONABLE MR. Shri. C.M. Yeshirao, Member | HONABLE MR. D. D. Madake, PRESIDENT | , | |