सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्रमांक 67/2010
श्री कृष्णा पांडूरंग राऊळ
वय 55 वर्षे, धंदा – शेती,
रा.आडेली, खुटवळवाडी,
ता.वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) प्राप्ती मार्केटिंग सर्व्हीस प्रा.लि.
हेड ऑफिस, श्री गणेश चेंबर,
तिसरा मजला, यशवंत स्टेडीयमच्या समोर,
धंतोली (Dhantoli) नागपूर – 440 012
2) प्राप्ती मार्केटींग सर्व्हीस प्रा.लि.तर्फे
डायरेक्टर श्री सुभाष उकिरडा पाटील
रा.गजानन प्रसाद, 230, सुरेंद्रनगर, नागपुर
3) श्री विलास भगवान गावडे
रा.वजराट, पिंपळाचीवाडी,
ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
4) श्री संजय रमेश परब
रा.तळवडे गेट, तळवडा,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
आदेश नि.1 वर
1) तक्रारदाराच्या ठेवीची रक्कम मुदत पूर्ण होऊन देखील व्याजासह अदा न केल्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार विदयमान मंचासमोर दाखल केली आहे. सदरची तक्रार मंचाचे नोंद रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येऊन मंचासमोर Admission hearing ला मागील पेशीवर दि.04/11/2010 ला ठेवण्यात आली होती व तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सदरचे प्रकरण आज मंचासमोर ठेवण्यात आले आहे.
2) तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 च्या प्राप्ती मार्केटिंग सर्व्हीसेस प्रा.लि. नागपूर यांचेकडे ठेव रक्कम जमा केल्याचे त्यांने दाखल केलेल्या पावतीवरुन दिसून येते. सदरचा आर्थिक व्यवहार हा दादर शाखेमार्फत झाल्याचे निदर्शनास येत असून पैसे जमा केल्याची रसिद पावती मुंबई कार्यालयाकडून मिळाल्याची दिसून येते. त्यामुळे सदरचा व्यवहार हा सिंधुदुर्ग मंचाच्या स्थळसिमेत झाल्याचे दिसून येत नाही. यासंबंधाने तक्रारदार व त्यांचे वकीलांना मागील पेशी तारखेवर दि.04/11/2010 ला सिंधुदुर्ग मंचाचे स्थळसिमेत आर्थिक व्यवहार झाल्याचे कागदपत्र किंवा रसिद पावती असल्यास ती दाखल करावी किंवा संबंधित एजंटाचे शपथपत्र दाखल करावे अशी सूचना केली; परंतु आज मंचासमोर तक्रारदार किंवा त्यांचे वकील हजर नाहीत व त्यांनी मंचासमोर सिंधुदुर्ग मंचाच्या स्थळसिमेत आर्थिक व्यवहार झाल्याची कागदपत्रे दाखल केली नाहीत.
3) तक्रारदार हे जरी सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवासी असले तरी ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 11 मध्ये नमूद केल्यानुसार तक्रारदार ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण मंचाची स्थळसिमा अर्थात Territorial Jurisdiction समजले जात नाही. तर ज्या ठिकाणी विरुध्द पक्षाचे कार्यालय किंवा त्या कार्यालयाची शाखा असेल व ज्या शाखेमार्फत किंवा ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार झाला असेल त्या ठिकाणच्या मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकार आहेत; परंतु सदर प्रकरणातील प्राप्ती मार्केटिंग संस्था ही धंतोली नागपुर येथे असून तिचे शाखा कार्यालय दादर व मुंबई येथे असल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्हयात या संस्थेचे कोणतेही शाखा कार्यालय नसल्याचे स्वतः तक्रारदाराने मान्य केले आहे. त्यामुळे सदरची तक्रार ही सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे स्थळसिमेत (Territorial Jurisdiction) येत नसल्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार चालविण्याचे Territorial Jurisdiction सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) तक्रारदाराने योग्य त्या Territorial Jurisdiction अंतर्गतच्या मंचात तक्रार दाखल करणेची सूचना करण्यात येते.
3) तक्रारदारास त्यांनी दाखल केलेली मुळ कागदपत्रे परत करणेत यावीत.
4) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 19/11/2010
सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग