Maharashtra

Nagpur

CC/10/429

SOMESHCHANDRA NAGORAOJI DIGHARE, - Complainant(s)

Versus

PRAMOD AGRAWAL, - Opp.Party(s)

RAKESH I.AGRAWAL

21 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/429
1. SOMESHCHANDRA NAGORAOJI DIGHARE,NEAR GANESH MANDIR,KAMTEENAGPURMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. PRAMOD AGRAWAL, KALAMNA MARKET URBAN CO-OP SOCIETY LTD, ASHIRWAD BHAON, 1ST FLOOR, C.A.ROAD, OPP. HOTEL JANAK, GANDHIBAG, NAGPUR NAGPURMAHARASHTRA2. MANAGER, KALAMNA CREDIT CO.OP. SOCITY LTD.C/o Administrator Coopertive Socity, Bhande Plot Squre, Near Vishal Mega Mart, Sakkardara, Umred Road, Nagpur.NAGPURMAHARASHTRA3. Regional Joint Administrator, Co-op. SocityDhanwate Chamber, Near Janki Takies, Sita buldi, NagpurNAGPUR MAHARASHTRA4. Coopertive Commissioner,Commissioner & Administrative Building, PunePUNEMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 21 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
तक्रार दाखल दिनांकः 02/08/2010
आदेश पारित दिनांकः 21/07/2011
 
 
 
मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 21/07/2011)
 
 
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. सदर प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हातारपणासाठी व मुलांच्‍या लग्‍नासाठी नोकरीमधून जमा केलेल्‍या पैश्‍यामधून रु.1,00,000/- दि.30.03.2007 ते 31.03.2010 या कालावधीसाठी ऑरेंज सिटी, कळमना मार्केट अर्बन को-ऑप. सोसायटी मस्‍कासाथ नागपूर शाखा येथे तिन वर्षासाठी 13 टक्‍के व्‍याज दराने, तसेच रु.50,000/- दि.30.03.2007 ते 31.03.2013 या कालावधीकीता 13 टक्‍के वार्षिक व्‍याज दराने गैरअर्जदारांच्‍या योजनांमध्‍ये गुंतविली होती.
 
            त्‍यापैकी पहिल्‍या मुदत ठेवीची मुदत संपल्‍यामुळे, तसेच मुलिच्‍या लग्‍नाच्‍या कारणासाठी दुस-या मुदत ठेवीच्‍या रकमेची आवश्‍यकता असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दुस-या मुदत ठेव रकमेची मागणी मुदत पूर्व केली, परंतू गैरअर्जदार यांनी सदर मुदत ठेव रकमा देय व्‍याजासह परत केल्‍या नाही. ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल करुन मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह मिळावी, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदारांच्‍या कथनानुसार सदर तक्रार सोसायटीला पार्टी न करता दाखल केलेली आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याने रकमा गैरअर्जदार क्र. 1 कडे गुंतविल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे मान्‍य केलेले असून इतर आरोप अमान्‍य केले आहे. गैरअर्जदार यांच्‍या कथनानुसार तक्रारकर्त्‍याने स्‍वच्‍छेने सदर रक्‍कम त्‍याच्‍या योजनेमध्‍ये गुंतविलेली आहे. तसेच दुस-या मुदत ठेवीची मागणी ही मुदतपूर्व केल्‍यामुळे देय नाही. एवढेच नव्‍हे तर आयकर विभाग व सहकारी विभाग यांची संबंधितावर चौकशी सुरु आहे. आयकर विभागाने संस्‍थेचे सर्व बँक खाती जप्‍त केलेली असल्‍याने आयकर विभाग व भारतीय रीझर्व्‍ह बँक यांचा पुढील आदेश प्राप्‍त होईपर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या रकमा परत करण्‍यास गैरअर्जदार असमर्थ आहे. सदर आदेश प्राप्‍त झाल्‍यावर पुढील कार्यवाही करण्‍यात येईल. वरील बाबी लक्षात घेता तक्रारकर्त्‍याची तक्रार परत करण्‍यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 , 3 व 4 चे उत्‍तरातील जवळपास सारखेच आहेत.
 
3.          सदर प्रकरण मंचासमोर युक्‍तीवादाकरीता आल्‍यानंतर तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या मुदत ठेवींच्‍या प्रमाणपत्रावरुन तक्रारकर्ता निर्विवादपणे गैरअर्जदार क्र. 1 यांचा ग्राहक आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांच्‍या योजनेत त्‍यांनी रु.1,00,000/- दि.30.03.2007 ते 31.03.2010 या कालावधीसाठी व रु.50,000/- दि.30.03.2007 ते 31.03.2013 या कालावधीकीता 13 टक्‍के वार्षिक व्‍याज दराने गुंतविले होते हे स्‍पष्‍ट होते. सदर बाब गैरअर्जदारांनी देखील आपल्‍या लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली दिसून येते. परंतू सदर मुदत ठेव रकमेची देय व्‍याजासह वारंवार मागणी करुनही गैरअर्जदार यांनी सदरच्‍या रकमा देय व्‍याजासह परत न करणे ही गैरअर्जदार यांची कृती निश्चितच तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या सेवेतील कमतरता आहे.
 
 
5.          तक्रारकर्त्‍याच्‍या मुलीच्‍या लग्‍नासाठी म्‍हणून दुस-या मुदत ठेवीची रक्‍कम मागणी मुदतपूर्व केलेली दिसून येते. यात काही गैर आहे असे म्‍हणता येणार नाही. आयकर विभागाने, तसेच इतर सरकारी विभागांनी केलेल्‍या कारवाईमुळे गैरअर्जदार यांची संपत्‍ती जप्‍त झालेली आहे. त्‍यामळे तक्रारकर्त्‍यांना त्‍यांची लाभार्थी रक्‍कम परत देता येणार नाही असे गैरअर्जदारांचे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही. तसेच त्‍या आधारावर तक्रारकर्त्‍याची रक्‍कम परत न करणे न्‍यायोचित होणार नाही.
 
6.          वरील वस्‍तुस्थिती व परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍यांकडून रक्‍कम स्विकारुन मुदत ठेवीची व व्‍याजाची देय रक्‍कम परत न करणे ही गैरअर्जदार क्र. 1 यांचे सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांचा ग्राहक नसल्‍यामुळे त्‍यांना तक्रारकर्त्‍याचे नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. मात्र ते प्रशासक म्‍हणून नेमणूक झाल्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 चे संपत्‍तीमधून तक्रारकर्त्‍यास रक्‍कम देण्‍याची त्‍यांची जबाबदारी आहे. या सर्व बाबींचा विचार करता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍यांना रु.1,46,780/- ही रक्‍कम दि.31.03.2010       पासून तर संपूर्ण रक्‍कमेच्‍या अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह द्यावी. रु.50,000/- या ठेव रकमेवर, ही रक्‍कम मुदतपूर्व ठेवीवर बँकेच्‍या नियमानुसार      होणारे व्‍याज दराने दि.30.03.2007 पासून तर ते रक्‍कम मिळेंपर्यंत द्यावे.
3)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.
4)    गैरअर्जदार क्र. 2 ते 4 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
5)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 
     

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT