तक्रार दाखल ता.08/08/2013
तक्रार निकाल ता.21/11/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तर वि.प.क्र.1 हे न्युरॉलॉजिस्ट असून कोल्हापूर येथील राजारामपूरी 6 वी गल्ली येथे प्रकृती क्लिनीक नावाने दवाखाना सुरु आहे. तक्रारदारांना त्यांचे उजव्या पायाच्या गुडघ्याखालील घोटयापर्यंत बाहेरील बाजूस वेदना होत असलेने उपचारासाठी तक्रारदार वि.प.यांचेकडे दि.22.05.2012 चे दरम्यान गेले होते. त्यावेळी वि.प.यांनी तक्रारदाराला त्यांचे गुडघ्यावर शस्त्रक्रिया करुन निदान करुन आजार पूर्ण बरा होईल असे सांगितले होते व तशी हमी वि.प.ने तक्रारदाराला दिलेने तक्रारदार वि.प.यांचे दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले होते. तक्रारदाराने वि.प.यांना प्रथमत: आजाराबाबत पूर्ण माहिती दिली असता, वि.प.यांनी तक्रारदाराचे आजाराबाबत पूर्ण चौकशी करुन तक्रारदाराचे पायाची नस मणक्याखाली दबलेली आहे व ऑपरेशन करुन नस मोकळी करुन सुरळीत करावी लागेल असे सांगितले व अॅपल हॉस्पीटलमधून एम.आर.आय.रिपोर्ट आणणेस सांगितले. तदनंतर तक्रारदाराने अॅपल हॉस्पीटलमधून एम.आर.आय.करुन दि.23.05.2012 रोजी वि.प.यांना सदर रिपोर्ट दाखवला असून वि.प.ने सदर रिपोर्टची पाहणी करुन तक्रारदाराला शस्त्रक्रियेसाठी दाखल होण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार हे वि.प.चे सल्ल्यानुसार, वि.प.यांचेकडे दि.28.05.2015 रोजी दाखल झाले व लगेच दुस-या दिवशी म्हणजे दि.29.05.2012 रोजी वि.प.ने तक्रारदारावर शस्त्रक्रिया पूर्ण करुन तक्रारदाराला दि.31.05.2012 रोजी डिसचार्ज दिला. वि.प.ने तक्रारदारावर शस्त्रक्रिया केलेनंतर तक्रारदाराचे उजव्या पायातील वेदना कमी झाल्या परंतु तक्रारदाराचे उजव्या पायाच्या गुडघ्याखालील भाग पुर्वीप्रमाणे काम करत नव्हता. तो पूर्णपणे निर्जीव व चेतनारहीत – लकवा मारल्याप्रमाणे झालेला होता. सदर बाबत तक्रारदाराने वि.प.यांना सांगितले असता, वि.प.यांनी तक्रारदारांना फिजीओथेरपी करुन घ्या सर्व काही व्यवस्थित होईल घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. तक्रारदाराने वि.प.चे सांगणेवरुन वि.प.यांचे शस्त्रक्रियेचे बील रक्कम रु.75,000/- व औषधांचा खर्च रक्कम रु.40,000/- भागवून तक्रारदार घरी निघून गेले. तसेच वि.प.चे सल्यावरुन डॉ.धामाणे यांचेकडे जवळजवळ पाच ते सहा महिने फिजीओथेरेपी उपचार करुन घेतले. त्यासाठी रक्कम रु.45,000/- खर्च झाले. परंतु तक्रारदाराचे पायामध्ये कोणताही फरक पडला नाही. त्यावेळी डॉ.धामाणे यांनी डॉ.औरंगाबादकर यांचेकडे नस तपासणी करुन घेणेस सांगितलेवरुन दि.29.11.2012 रोजी तक्रारदाराने डॉ.औरंगाबादकर यांचेकडे नस तपासणी करुन घेतली असता, डॉ.औरंगाबादकर यांनी पूर्ण नस निर्जीव झालेचे सांगून तसा रिपोर्ट तक्रारदाराला दिला. त्यापूर्वीही तक्रारदाराने दि.02.11.2012 रोजी मुंबई येथील डॉ.शेट्टी यांचेकडून एम.आर.आय.स्कॅन रिपोर्ट करुन घेतला होता. त्यांनीही उपचार केलेली नस पूर्णपणे निर्जीव व निष्क्रीय झालेचे सांगून ती पुन्हा क्रियाशील होणार नाही असे सांगितले. सदर रिपोर्टमुळे तक्रारदाराला विश्वास बसला नाही. तक्रारदाराने वि.प.यांचेकडे शस्त्रक्रिया करुन घेऊन देखील तक्रारदाराचा पाय शस्त्रक्रियेपूर्वीसारखाही क्रियाशील होत नाही. तक्रारदाराने वि.प.चे सल्यानुसार उपचार घेतले. त्यासाठी रक्कम रु.5,00,000/- खर्च केला आहे. इतका भरमसाठ खर्च करुनही तक्रारदारावर यशस्वी उपचार झाले नाहीत याची खंत असून वि.प.यांनी केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तक्रारदाराच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील भागास कायमचे अपंगत्व आलेले आहे. तक्रारदारचा सदर पाय क्रियाशील नसून तक्रारदाराला चालता येत नाही, उभे राहता येत नाही, तक्रारदारावर वि.प.ने केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तक्रारदाराचे उजव्या पायाखालील भागास कायमचे अपंगत्व आलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे व तक्रारदाराला जगण्याची उमेद राहीली नाही अशा प्रकारे वि.प.ने तक्रारदार यांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला चुकीची शस्त्रक्रिया केलेने तक्रारदार यांना कायमस्वरुपी अपंगत्व प्राप्त झाले आहे. सबब, तक्रारदाराने वि.प.यांना वकीलांमार्फत नोटीस पाठवून वि.प.चे सल्यानुसार केले शस्त्रक्रियेचा खर्च रक्कम रु.5,00,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/- व तक्रारदाराला आले अपंगत्वासाठी रक्कम रु.10,00,000/- मागणी वि.प.यांचेकडे केली असता, सदरची नोटीस वि.प.यांना मिळूनही वि.प.ने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सबब, वि.प.यांचेकडून वर नमुद रक्कम रु.17,05,000/- वसुल होऊन मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मे.मंचात दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी, वि.प.यांचेकडून वि.प.चे सल्यानुसार केले शस्त्रक्रियेचा खर्च रक्कम रु.5,00,000/-, तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/-, वि.प.चे गैरकृत्यामुळे व सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराचे उजव्या पायास आलेल्या अपंगत्वाचे नुकसानीपोटी रक्कम रु.10,00,000/- व वि.प.ला पाठविले नोटीसचा खर्च रक्कम रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.17,05,000/- वि.प.यांचेकडून दि.28.05.2012 पासून द.सा.द.शे.18टक्के व्याजाने वसुल होऊन मिळावी, अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत कामी केली आहे.
4. तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफीडेव्हीट, वि.प.यांचेकडील मेडीकल पेपर्स व वि.प.यांनी तक्रारदाराला लिहून दिलेली औषधे, डिसचार्ज सर्टीफिकेट, अॅपल हॉस्पीटलमधील एम.आर. आय.रिपोर्ट, डॉ.औरंगाबादकर यांचेकडील रिपोर्ट, डॉ.दिलीप कुलकर्णी यांचेकडील रिपोर्ट, व्यंकटेश क्लिनीक यांचेकडील रिपोर्ट, श्रध्दा पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांचेकडील रिपोर्ट, डॉ.धामाणे यांचेकडील पत्र, पिनॅकल इमेजिंग सेंटर मुंबई यांचेकडील रिपोर्ट, वि.प.यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीस लागू झालेची पोस्टाची पाहोचपावती, तक्रारदाराची खर्चाची बिले, पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, लेखी युक्तीवाद, मे.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केले आहेत.
5. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांनी म्हणणे/कैफियत, विमा पॉलीसी, वि.प.ने तक्रारदाराला दिलेले डिसचार्ज पेपर्स, तक्रारदाराने वि.प.यांना शस्त्रक्रिया करणेबाबत दिलेले संमतीपत्र, तक्रारदार व वि.प.यांचे हॉस्पीटलमध्ये ऑपरेशनकरीता दाखल झालेपासूनचे ट्रीटमेंट केसपेपर्स, वि.प.ने तक्रारदाराच्या केलेल्या तपासण्या, अॅपल हॉस्पीटल, कोल्हापूर यांनी तक्रारदारांना दिलेला रेडिओग्राम अहवाल, व्यंकटेश क्लिनीक यांनी तक्रारदार यांची केलेली तपासणी अहवाल, अॅपल हॉस्पीटल यांनी तक्रारदार यांच्या Lumber Spine बाबत केलेला एम.आर.आय.अहवाल, वि.प.ने तक्रारदाराला दिलेले डिस्चार्ज समरी कार्ड, पिनॅकल इमेजींग यांनी तक्रारदाराचा केलेला एम.आर.आय.अहवाल, वि.प.ने तक्रारदाराचे ऑपरेशन करताना केलेले Video Recording Copy, वि.प.क्र.1 यांचे पुराव्याचे शपथपत्र, वि.प.क्र.2 ला स्वतंत्रपणे जादा पुरावा देणेचा नाही म्हणून पुरशिस, वि.प.क्र.1 व 2 यांचे लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केली आहेत. तसेच Endoscopic Spine Surgery-Destandau’s Technique हे माहितीपुस्तक व मे.राष्ट्रीय आयोग यांचा न्यायनिवाडा, वगैरे कागदपत्रे या कामी वि.प.यांनी दाखल केली आहेत.
6. प्रस्तुत कामी, वि.प.यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
[1] तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथन मान्य व कबूल नाही.
[2] वि.प.हे नामांकित डॉक्टर आहेत. एवढाच मजकूर सर्वसाधारणपणे बरोबर आहे. तसेच तक्रारदार व वि.प.यांचे सेवा देणार व सेवा घेणार असे नाते आहे हा कथन केलेला मजकूर वि.प.यांना मान्य नाही.
[3] वास्तविक वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखाद्या गंभीर स्वरुपाचे आजाराबाबत शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यावेळी ती उपचार पध्दती उपलब्ध असलेबाबत सांगितले जाते. तथापि कोणतीही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असलेने कोणीही डॉक्टर आजार पूर्ण बरा होईलच याची हमी देत नाही. त्याप्रमाणे वि.प.ने देखील तक्रारदार यांना कधीही ते कथन करतात. त्याप्रमाणे कधीही हमी दिलेली नव्हती व नाही. वास्तविक कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी संबंधीत पेशंट व त्यांचे नातेवाईक यांचेकडून साक्षीदारांसमक्ष संमतीपत्र घेतले जाते. सदर कामी शस्त्रक्रियेपूर्वी प्रस्तुत तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी वि.प.यांना साक्षीदारासमक्ष संमतीपत्र लिहून दिले होते. यावरुन वि.प.ने तक्रारदाराला कोणत्याही प्रकारची हमी दिली नव्हती हे स्पष्ट होते.
[4] तक्रारदाराने वि.प.यांचे शस्त्रक्रियेचे बील रक्कम रु.75,000/- भरले हे मान्य आहे. परंतु औषधांसाठी फक्त रक्कम रु.3,000/- एवढाचा खर्च झाला होता तो त्यांनी परस्पर भागवला आहे. त्यामुळे औषधाच्या खर्चापोटी रक्कम रु.40,000/- खर्च झाला हे तक्रारदाराचे कथन खोटे आहे.
[5] तक्रारदाराचे नोटीसला वि.प.ने अॅड.जे.पी.नाईक यांचेमार्फत रितसर उत्तर रजि.पोस्टाने पाठवले आहे.
[6] या कामी वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार हे वि.प.यांचेकडे उपचार करणेपूर्वी मुंबई येथील डॉ.श्री.समीर पिळणकर यांचेकडे उपचारासाठी गेले होते. प्रस्तुत डॉ.पिळणकर हे मुंबईतील नामवंत ऑर्थोपेडीक सर्जन असून देखील शस्त्रक्रिया अवघड असलेने व वि.प.यांना त्याबाबतचा जास्त अनुभव असलेने त्यांनी तक्रारदाराला उपचाराकरीता कोल्हापूर येथे वि.प.यांचेकडे पाठवले. डॉ.पिळणकर यांचे सुचनेवरुन तक्रारदार सर्वप्रथम वि.प.यांचेकडे दि.22.05.2012 रोजी Endoscopic surgery उपचाराकरीता आले. त्यावेळी तक्रारदाराचा उजवा पाय 3 ते 4 वर्षापासून दुखत आहे व उभे राहिल्यावर व चालताना डाव्या पायाने लंगडत चालावे लागते असे सांगितले. त्यावेळी वि.प.ने तक्रारदाराची क्लिनीकल तपासणी केली असता, तक्रारदाराचे डाव्या पायातील ताकद कमी होती व उजव्या पायाला चेतना (Sensation) कमी होते असे निदर्शनास आले. तसेच वि.प.यांचेकडे येण्यापूर्वी तक्रारदाराने करुन घेतलेला दि.26.11.2011 रोजीचा एम.आर.आय.अहवाल वि.प.यांना दाखविला. सदर अहवालाप्रमाणे तक्रारदाराचे कमरेच्या मणक्यातील L2-L3, L3-L4, L4-L5, L5-S1 या मणक्यामधील नसा दबलेल्या आहेत असे नमुद आहे व त्यापैकी L4-L5 या मणक्यातील नस जास्त प्रमाणात दबलेली होती. त्यामुळे तक्रारदाराचा उजवा पाय दुखत होता. L4-L5 हे दोन मणके पुढे मागे सरकल्याने L4-L5 ही नस जास्त प्रमाणात दबलेली heavily compressed होती. वरीलप्रमाणे प्राथमिक तपासणी केलेनंतर वि.प.ने तक्रारदाराला नवीन एम.आर.आय. तपासणी करुन घेणेस सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.23.05.2012 रोजी नव्याने एम.आर.आय. तपासणी करुन घेतली असता, त्या अहवालामध्ये पुर्वीप्रमाणेच परिस्थीती दिसून आलेने L4 व L5 ही नस जास्त दबलेली असलेने वेदना कमी होणेकरता ती नस Endoscopic Surgery द्वारे सुट्टी (मोकळी) करुन घेणे गरजेचे आहे असे सांगितले. सदरहू गोष्ट समजलेनंतर तक्रारदार व त्यांच्या पत्नी तसेच इतर नातेवार्इक यांनी त्याबाबत विचारविनीमय करुन Endoscopic Surgery करुन घेणेचा निर्णय घेतला व तसे वि.प.यांना सांगितले व तक्रारदाराने संमतीपत्र लिहून दिलेनंतरच दि.29.05.2012 रोजी ऑपरेशन करणेचे निश्चित झालेने तक्रारदार एक दिवस अगोदर दि.28.05.2012 रोजी वि.प.यांचे हॉस्पीटलमध्ये अॅडमीट झाले. त्यानंतर दि.29.05.2012 रोजी तक्रारदारांचे कमरेच्या 4थ्या व 5व्या मणक्याचे उजव्या बाजूने जाऊन Endoscopic Surgery द्वारा दोन्हीं बाजूची उजव्या व डाव्या L4 व L5 या मणक्यातून जाणारी दबलेली नस सुट्टी (मोकळी) केली. सदर ऑपरेशनचे Video Recording केलेले असून ते या कामी दाखल केले आहे. ऑपरेशनवेळी या नसांना कोणतीही इजा झालेली नाही तसेच कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव, नस फाटणे, तुटणे अशा प्रकारचे Complications झालेले नाहीत व नव्हते हे व्हिडीओ रेकॉर्डींगमध्ये पाहता येते. त्यानंतर दि.30.05.2012 रोजी उजव्या पायाचे अंगठयाची व पायाची ताकद कमी झाली असे वाटल्याने व नसेला सूज असेल असे समजून सदर नसेची सुज कमी होणेचे इंजेक्शन व औषध दिले व त्याचवेळी तक्रारदार यांना फिजीओथेरेपीचे डॉ.धामणे यांना तक्रारदार वि.प.कडे अॅडमीट असतानाच पाचारण केले व तक्रारदार यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांचा पुढील सल्ला घेऊन नंतर दि.10.06.2012 रोजी तक्रारदाराला डिसचार्ज दिला. डिसचार्जनंतर पायाचा योग्य प्रकारे व्यायाम करणे गरजेचे असलेने वि.प. यांनी तक्रारदार यांना डॉ.धामणे, फिजीओथेरेपीस्ट यांचे सल्याप्रमाणे करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे वि.प.यांचेकडे दि.15.06.2012, दि.10.07.2012, दि.17.08.2012 व शेवटी दि.05.09.2012 या तारखांना आले. तसेच तक्रारदार यांनी दि.17.08.2012 रोजी वि.प.यांचेकडून सर्व रिपोर्टस स्वजबाबदारीवर सही करुन स्वत: घेऊन गेलेले आहेत. रिपोर्ट घेऊन गेलेनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून कोणत्याही प्रकारचा सल्ला घेतलेला नाही किंवा दुस-या डॉक्टरनी काय मत दिले, कोणत्या प्रकारचा औषधोपचार केला व काय सल्ला दिला, या विषयी कोणतीही व कसलीही माहिती दिली नाही. यानंतर दि.02.11.2012 रोजी केलेला स्कॅन रिपोर्ट वि.प.यांना दि.19.11.2012 रोजी दाखविला. यावरुन नसांची तपासणी करुन घेणेस सांगितले असता, ती तपासणी डॉ.औरंगाबादकर यांचेकडून करुन घेतली व त्याबाबतचा अहवाल वि.प.यांना दाखवला. सदर रिपोर्टवरुन उजव्या बाजूची L5-S1 या मणक्यामधील नस व डाव्या बाजूची S1 या मणक्याखालील नस कमकुवत असलेचे दिसून आले. यावरुन हे स्पष्ट होते की, वि.प.यांनी L4-L5 मणक्याचे दबलेली नस सुट्टी केली होती व L5-S1 या नसांना सर्जरीमध्ये काहीही केलेले नव्हते हे Video Recording मध्ये स्पष्ट होते.
[7] कोणत्याही शस्त्रक्रियेमध्ये अथवा शस्त्रक्रियेनंतरच्या परिणामामध्ये Complication rate असतोच Spine Surgery मध्ये तो 8.6टक्के असतो. याबाबातची अन्य माहिती व कल्पना तक्रारदाराला सविस्तर देणेत आली होती. मेंदू व त्यापासून निघाणा-या नसा यांचे काम ऑपरेशन नंतर कशा राहतील यावर कोणत्याही Surgeon चा control नसतो. आता जग कितीही पुढे गेले असले तरीही हृदय, मेंदू व नसा यांच्या अनेक गोष्टीं मेडीकल सायन्सला अद्याप माहिती नाहीत. तक्रारदार कथन करतात, त्याप्रमाणे वि.प.यांनी कोणत्याही प्रकारे चुकीची शस्त्रक्रिया केलेली नाही किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. याबाबत तक्रारदाराने केलेले सर्व आक्षेप हे निरर्थक व पोकळ आहेत. त्यामुळे तक्रारदाराची मागणी चुकीची व बेकायदेशीर असून नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.17,05,000/- मागण्याचा तक्रारदार यांना कोणताही अधिकार नाही या कारणास्तव तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर होणेस पात्र आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा व तक्रारदाराने वि.प.यांचेवर खोटी केस दाखल केलेने मानसिक त्रास दिलेबद्दल तक्रारदाराकडून रक्कम रु.25,000/- वसुल होऊन मिळावेत.
[8] अशा प्रकारचे म्हणणे वि.प.क्र.1 यांनी या कामी दाखल केले आहे. वि.प.क्र.2 ने त्यांचे म्हणण्यात कथन केले आहे की, तक्रारदाराने वि.प.क्र.1 ने शस्त्रक्रिया करताना चुक केलेबाबत, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेबाबत कोणताही कागदोपत्री अथवा तोंडी पुरावा या कामी दाखल केलेला नाही किंवा वि.प.क्र.1 ने उपचारात नेमकी कोणती त्रुटी ठेवली हे नेमके स्पष्टपणे सिध्द केलेले नाही. तसेच झालेले नुकसान वि.प.क्र.1 चे निष्काळजीपणाने झालेबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने या कामी दाखल केला नाही. तक्रारदाराचे विनंतीवरुन मागवण्यात आलेला सांगली सिव्हील हॉस्पीटलचे माननीय सिव्हील सर्जन यांनी गठीत केलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या संमतीने दि.06.11.2015 रोजी दिलेला तज्ञांचा अहवाल अत्यंत सुस्पष्ट असून तक्रारदार शस्त्रक्रिया करताना वि.प.या डॉक्टरने कोणताही व काहीही निष्काळजीपणा झालेला नाही असा अहवाल दिला आहे. यावरुनही वि.प.ने कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही ही बाब स्पष्ट होते. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा असे म्हणणे वि.प.क्र.2 ने दिले आहे.
7. वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत का ? | होय |
2 | वि.प.यांनी तक्रारदाराला केलेल्या उपचारामध्ये निष्काळजीपणा, हलगर्जीपणा करुन तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | नाही |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
8. मुद्दा क्र.1:- वर नमुद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देतो कारण तक्रारदार हे त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील घोटयापर्यंत बाहेरील बाजूस वेदना होत असलेने उपचारासाठी वि.प.यांचे हॉस्पीटलमध्ये दि.22.05.2012 चे दरम्यान गेले. वि.प.यांनी प्रथमत: आजाराबाबत पूर्ण माहिती घेतली. सर्व तपासणी केली. नंतर तक्रारदाराचे पायाची नस मणक्याखाली दबली आहे व ऑपरेशन करुन मोकळी करावी लागेल, एम.आर.आय. रिपोर्ट घेणेस सांगून दि.29.05.2015 रोजी वि.प.यांनी तक्रारदारावर शस्त्रक्रिया करुन दबलेली नस मोकळी केली. प्रस्तुत शस्त्रक्रियेसाठी रक्कम रु.75,000/- खर्च झाला व औषधासाठीही खर्च झाला. प्रस्तुत शस्त्रक्रियेचे सर्व बील तक्रारदाराने वि.प.यांना अदा केले आहे. सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
9. मुद्दा क्र.2:- प्रस्तुत कामी मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने वि.प.यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार अर्ज मे.मंचात दाखल केला. यामध्ये वि.प.यांनी तक्रारदार यांचेवर शस्त्रक्रिया केलेनंतर तक्रारदाराचे उजव्या पायाचा गुडघ्या खालील भाग पुर्वीप्रमाणे काम करत नव्हता. तो पूर्णपणे निर्जीव व बिना चेतनायुक्त लकवा मारल्याप्रमाणे झाला होता. सदर बाबत तक्रारदाराने वि.प.यांना सांगितले असता, वि.प.यांनी तक्रारदाराला फिजीओथेरेपी करुन घ्या, सर्व काही व्यवस्थित होईल, भिन्यासारखे कारण नाही असे सांगितलेने वि.प.चे सल्ल्यावरुन डॉ.धामणेकर यांचेकडे फिजीओथेरेपीसाठी तक्रारदार दाखल झाले व त्यासाठी रक्कम रु.45,000/- खर्च करुन डॉ.धामणे यांचेकडून जवळजवळ पाच-सहा महिने फिजीओथेरेपी उपचार करुन घेतले परंतु कोणताही फरक पडला नाही. तसेच डॉ.धामणे यांचे सल्यावरुन डॉ.औरंगाबादकर यांचेकडे तक्रारदाराने तपासणी करुन घेतली असता, तक्रारदाराची पूर्ण नस निर्जीव झालेचे सांगून तसा रिपोर्ट दिला व दि.02.11.2012 रोजी पुन्हा एम.आर.आय.स्कॅन रिपोर्ट घेतला असता, त्यांनीही माझेवर-तक्रारदारावर शस्त्रक्रिया केलेली पूर्ण नस निर्जीव झाली आहे असे सांगून ती पुन्हा क्रियाशील होणार नाही असे सांगितले म्हणजेच वि.प.ने चुकीची शस्त्रक्रिया केलेने तक्रारदाराचा पाय निकामी झाला असे तक्रारदाराने तक्रार अर्जात कथन केले आहे. सबब, वि.प.यांनी तक्रारदाराव शस्त्रक्रिया करताना ती योग्य व बरोबर केली आहे का ? वि.प.ने शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा/हलगर्जीपणा केला आहे काय ? हे स्पष्ट होणेसाठी दाखल सर्व ट्रिटमेंटचे केसपेपर्स, तपासण्या केलेले रिपोर्ट, एम.आर.आय. व वि.प.ने शस्त्रक्रिया करताना व शस्त्रक्रियेनंतर केलेला एम.आर.आय. व व्हिडीओ रेकॉर्डींग/ सी.डी. वगैरे सर्व कागदपत्रांसह जिल्हा शल्य चिकित्सक सांगली, सिव्हील हॉस्पीटल, सांगली यांचेकडे ऑपरेशन पूर्वीचे एम.आर.आय., ऑपरेशन नंतरचे एम.आर. आय.रिपोर्ट या सर्व कागदपत्रासांबत वैद्यकीय तज्ञांचा अहवाल मागणसाठी मे.मंचाने पाठवले होते. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांनी दि.25.09.2014 चे दिले तज्ञांच्या अहवालावरुन असे स्पष्ट होते की, सदर बाबतीत वि.प.ने शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, चुक केली आहे का ? यांची तपासणी करणेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांनी त्यांचे स्वत:चे अधिपत्याखाली वैधानीक मंडळ स्थापन करण्यात आले. यामध्ये पुढील वैद्यकीय तज्ञ सदस्य होते.
[1] डॉ.शिंत्रे - प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थीरोग विभाग, प.व.पा.शा.रुग्णालय, सांगली.
[2] डॉ.एन.एस.ससे - संचालक वानलेस हॉस्पीटल, मिरज [Neurosurgeon]
[3] डॉ.बी.एस.कोळी - निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क) जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली.
सदर समितीने प्रस्तुतची तक्रार व त्या अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे व सी.डी.यांचे अवलोकन करुन अभिप्राय दि.25.09.2014 रोजी सादर केला आहे. तो पुढीलप्रमाणे- माझ्या प्रथमदर्शनी मतानुसार प्रस्तुत कागदपत्रांमध्ये डॉ.एस.एम.रोहीदास यांचा निष्काळजीपणा दिसून येत नाही. परंतू, सदर रुग्णाचे शस्त्रक्रियेनंतरचे एम.आर. आय.च्या फिल्मस जोडल्यास अधिक नेमके मत देता येईल. त्यामुळे मे.मंचाने पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांचेकडे शस्त्रक्रियेनंतरचे व पूर्वीचे एम.आर.आय.सह सर्व कागदपत्रे व शस्त्रक्रियेची व्हिडीओ, सी.डी., वगैरे सर्व कागदपत्रे पुन्हा वैद्यकीय तज्ञांचा अहवालासाठी पाठवली असता, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांचे वर नमुद कमिटीने/ वैधानिक मंडळाने सविस्तर व काळजीपूर्वक अभ्यास करुन Opinion/तज्ञांचा अहवाल मे.मंचाकडे पाठविला आहे. अशाप्रकारे दि.25.09.2014 व दि.06.11.2015 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अधिकाराखाली नेमलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या कमिटीने दोन्हीं वेळा पाठविले अहवालांचे अवलोकन करता, वि.प.यांनी शस्त्रक्रिया करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही असेच मत अहवालात नमुद केलेले आहे. सदरचे दोन्हीं अहवाल अनुक्रमे खालीलप्रमाणे-
[1] Opinion – dated, 25/09/2014.
After Perusal of the documents and CD, the Clinical status as reflected in history and examination finding noted.
M.R.I. findings of 23.05.2012 have been also noticed.
E.M.G. study dated, 29.11.2011 reveals L5-S1 Radiculopathy with ongoing deinnervation. There is sensory neuropathy of both Lower Limbs.
Proper consent after explaining possible complications taken.
“The approach selected and surgery performed is appropriate and justified in clinical scenario”.
However, Foot drop which developed cannot be justified or explained even after M.R.I. OF 02.11.2012.
Looking the facts, the committee says that there is no obvious negligence.
[2] Final Opinion – dated, 06.11.2015.
After perusal of the documents and CD, the clinical status as reflected in history and examination findings noted.
M.R.I.findings of 23.05.2012 have been also noticed.
E.M.G. study, dated, 29.11.2011 reveals L5-S1 Radiculopathy with ongoing deinnervation, there is sensory neuropathy of both lover limbs.
Proper consent after explaining possible complications taken.
“The approach selected and surgery performed is appropriate and justified in clinical scenario”.
However, foot drop which developed cannot be justified or explained even after M.R.I. of 02.11.2012.
Looking at the facts, the committee says that there is no negligence. After observing post operative M.R.I.
वर नमुद दोन्हीं अहवालांचे अवलोकन करता, वि.प.यांनी शस्त्रक्रियेमध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही, वि.प.ने ऑपरेशनपूर्वी तक्रारदाराला शस्त्रक्रियेनंतरचे संभाव्य धोके समजावून सांगितले होते. तसेच शस्त्रक्रियेपूर्वी तक्रारदाराची पूर्व परवानगी/संमती घेतलेली आहे. तसेच सदर शस्त्रक्रियेचा निर्णय योग्य असून वि.प.ने तक्रारदार यांचेवर शस्त्रक्रिया करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही असे नमुद केले आहे. मे.मंचानेही या कामी तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे तसेच ऑपरेशनवेळी केलेली व्हिडीओ, सीडी यांचे अवलोकन केले असता, पुढील नमुद गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
तक्रारदार व वि.प.चे हॉस्पीटलमध्ये अॅडमीट झालेल्या Indoor Paper वर पाठीमागे:- दि.01.06.2012 म्हणजे डिसचार्जचे तारखेदिवशी तक्रारदाराचे पत्नीने पुढील मजकूर नमुद केला आहे.
पेशंटचे नांव - रत्नाकर कुलकर्णी
दि.01.06.2012
“उपनिर्दिष्ट रुग्णालयात दाखल होत असताना आमच्या तक्रारींचे निवारण झाल्यानंतर आम्हीं आमचा पेशंट रत्नाकर कुलकर्णी यांना घरी नेत आहोत. आम्हांला आमचे सर्व रिपोर्टस, फाईल, बीले व पावत्या, इत्यादी मिळाले. आमच्याकडून कोणतीही तक्रार नाही.”
वि.प. डॉक्टरांनी पेशंटचे संमतीपत्र घेताना पेशंटला/ तक्रारदाराला व त्यांचे पत्नीस /नातेवाईक यांना शस्त्रक्रियेनंतर अन्य कोणते त्रास होऊ शकतात याची कल्पना तसेच इतर complications ची सर्व माहिती दिलेली आहे हे संमतीपत्रावरुन स्पष्ट होते. प्रस्तुत संमतीपत्र पेशंट, यांचे नातेवाईक व साक्षीदारांसमक्ष घेतले आहे.
तसेच
Discharge Summery मध्ये,
Examination Findings – Lt EHL & DF Weakness, bilateral SLR 90 RT L4 & L5 dermatome decreased touch. असे नमुद आहे. म्हणजेच तक्रारदाराचे उजव्या पायाला चेतना कमी होत्या व डाव्या पायातील ताकद कमी होती असे क्लिनीकल तपासणीवेळी वि.प.ना लक्षात आले होते. Examination Finding वि.प.ने Discharge Summary मध्ये दिले आहे.
तसेच वि.प.ने तक्रारदाराचे 4थ्या व 5व्या मणक्याचे उजव्या बाजूने जाऊन Endoscopic Surgery द्वारा दोन्हीं बाजूंची उजव्या व डाव्या L4 व L5 मणक्यातून जाणारी दबलेली नस सुट्टी/मोकळी केली आहे. त्यामुळे ऑपरेशनवेळी या नसांना कोणतीही इजा झालेली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव, नस फाटणे-तुटणे, इत्यादीं कॉम्पीकेशन्स झालेले नाहीत व नव्हते हे स्पष्ट झाले आहे.
तक्रारदाराने तक्रार अर्जात म्हटले आहे की, ऑपरेशननंतर तक्रारदाराच्या उजव्या पायातील वेदना कमी झाल्या तसेच तक्रारदाराने ऑपरेशननंतर डॉ.औरंगाबादकर यांच्यातून जी नसांची तपासणी [EMG, NCV] केली व त्यांनी दिलेल्या रिपोर्टप्रमाणे, Deinnervation, sensor Neuropathy, मुळे तक्रारदाराचे उजव्या पायास चेतना (Sensation) कमी होते हे दिसून येत होते. त्यामुळे सुध्दा ऑपरेशननंतर नस काम देत नाही तो दोष मूळचा नसेचा असून वि.प.क्र.1 यांनी केलेल्या ऑपरेशनचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता हे स्पष्ट होते. तसेच या कामी वि.प.ने दाखल केलेल्या,
Technical Note :- The use of Ultrasonic bone curettes in spinal surgery:-
The recent development of high speed drills for use under an operating microscope has improved the technique and results in cranial base surgery as well as spinal surgery. However, utmost attention should be given during the drilling process to prevent a direct and heat injury to surrounding soft tissues including nerves, vessels, spinal cord and durra matter. The Protection of the surrounding soft tissues using cotton is prohibited because of the risk of cotton tangling with the drill. The kicking movement is dangerous, particularly in deep and delicate areas. There is a high risk and serious sequelae particularly during the removal and masses with hand consistently near delicate issues. In addition irrigation with a cooling fluid is required to protect soft tissues from heat injury and surgery may have to be interrupted frequently irrigation and suction.
Complications related to spinal surgery are reported to occur with a frequency of 8.6%(1569/18334 Cases) (11).These include general complications, neurological and meningeal complications vascular complications, infections, bone graft failure mechanical problems and so on. Among these complications that may be injury esophageal perforation, vascular injury, cerebrospinal fluid leak, etc. The iatrogenic complications although rare are serious and are sometimes life threatening injuries to the pharynx and esophagus.
Possible Complications of Spine Surgery:-
Nos. | General Complications | | Nos. | Nerve Complications |
1 | Anesthesia Complications | 1 | Nerve Injury |
2 | Bleeding |
3 | Blood Clots | 2 | Spinal Cord Injury |
4 | Dural Tear |
5 | Lung Problems |
6 | Infections | 3 | Sexual Dysfunctions |
7 | Persistent pain |
परंतु तक्रारदार यांना वर नमुद Complications मधील कोणतेही Complications Operation नंतर उदभवलेले नाहीत.
वरील सर्व बाबींचा व दाखल सर्व कागदपत्रांचा विचार करता, या कामी वि.प. डॉक्टर यांनी तक्रारदार यांचेवर शस्त्रक्रिया करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही ही बाब स्पष्टपणे सिध्द होते.
प्रस्तुत कामी, आम्हीं मे.राष्ट्रीय आयोगाचे खालील नमुद न्यायनिवाडा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi.
First Appeal No.145 of 2015
Rajesh Taneja …Appellant
Versus
Kaisar Hospital & Ors. …Respondent
Head Note:- “In the very nature of medical Profession, skills differ from doctor to doctor and more than one alternative, course of treatment are available, all admissible, Negligence cannot be attributed to a doctor, so long as he is performing his duties to the best of his ability and with due care and caution. Merely, because the doctor chooses one course of action in preference to the other one available he would not be liable, if the course of action chosen by him was acceptable to the medical profession.
It is known that to doctor will assure full recovery or guarantee that result of surgery would be 100% cure. Therefore, on the basis of forgoing discussion keeping reliance upon medical texts and several judgments of Hon’ble Supreme Court, we agree with the well reasonable order of State Commission and dismiss the first appeal”.
प्रस्तुत कामी वि.प.डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही हे सिध्द होते. सबब, तक्रारदार हे वि.प.कडून नुकसानभपाई मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्हीं पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत आला.
2 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य द्याव्यात.