Maharashtra

DCF, South Mumbai

MA/21/8

MR CHRISTOPHER P FERNANDES - Complainant(s)

Versus

PRAKHHYAT RESIDENCY LLP THROUGH PARTNER MR SANDEEP SURAJPRAKASH BAGLA - Opp.Party(s)

UDAY B WAVIKAR

15 Feb 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/21/8
( Date of Filing : 06 Jan 2021 )
In
Complaint Case No. CC/21/7
 
1. MR CHRISTOPHER P FERNANDES
509 B WING 5TH FLOOR SHRADDHA SABURI CHS LTD TARDEO MUMBAI 400 034
MUMBAI
MHA
2. MRS SONALI C FERNANDES
509 B WING 5TH FLOOR SHRADDHA SABURI CHS LTD TARDEO MUMBAI 400034
MUMBAI
...........Appellant(s)
Versus
1. PRAKHHYAT RESIDENCY LLP THROUGH PARTNER MR SANDEEP SURAJPRAKASH BAGLA
ROOM NO 12 1ST FLOOR 7 11 CHUNAWALA BUILDING COLSA STREET PYDHONIE MUMBAI 400 009
2. MR SUMEET RAJENDRAPRASAD BHALOTIA PARTNER OF THE PRAKHHAT RESIDENCY LLP
ROOM NO 12 1ST FLOOR 7 11 CHUNAWALA BUILDING COLSA STREET PYDHONIE MUMBAI 400 009
3. INDIABULLS HOUSING FINANCE LTD
OFFICE NO 302 3RD FLOOR PUSHPMANGAL COMPLEX LBS MARG NEAR BABU BHAI PETROL PUMP UTHALSAR NAKA THANE 400 602
THANE
4. GROUP GRAM PANCHAYAT AWARE SARPANCH HEAD OF THE PANCHAYAT
AT POST AWARE TEHSIL SHAHAPUR THANE 421601
THANE
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Feb 2022
Final Order / Judgement

द्वारा-श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

   तक्रारदारातर्फे वकील श्रीमती. सुप्रिया पाटील हजर. सामनेवाले 1 व 2 तर्फे वकील श्री. ए.के. तरटे   हजर. सामनेवाले 3 तर्फे वकील श्री. इंद्रजित हिंगणे हजर. सामनेवाले 4 पुकारले असता गैरहजर. सदर प्रकरणामध्‍ये आजरोजी सामनेवाले 1 व 2 यांच्‍या वकीलांनी, तक्रारदारांनी दि. 09/07/2021 रोजी तक्रारीमध्‍ये काही आवश्‍यक दुरुस्‍त्‍या करणेकामी दिलेल्‍या अर्जावर त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले, प्रत तक्रारदाराच्‍या वकीलांना देण्‍यात आली. तक्रारदारांनी सदर दुरुस्‍ती ही केवळ  सामनेवाले 1 व 2 यांच्‍याविरुध्‍द मागितली असल्‍याने सदर अर्जावर सामनेवाले 3 यांनी  म्‍हणणे दाखल केलेले नाही असे निवेदन सामनेवाले 3 यांच्‍या प्रतिनिधी वकीलांनी केले. सामनेवाले 1 व 2 यांच्‍या वकीलांनी आजरोजी सदर अर्जावर दाखल केलेले त्‍यांचे म्‍हणणे हाच त्‍यांचा सदर अर्जावरील तोंडी युक्तिवाद समजण्‍यात यावा असे तोंडी निवेदन केले.  तक्रारदाराच्‍या वकीलांचा सदर अर्जावर युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदारांनी तक्रारीच्‍या प्रार्थना कलमात प्रार्थना कलम 9-सी मध्‍ये रक्‍कम रु.11,08,835/- यावर द.सा.द.शे. 24% व्‍याजदराने व्‍याजाची मागणी केली असून, सदर व्‍याज हे सामनेवाले 1 व 2 यांचेकडून तक्रारदारांना तक्रारीत नमूद सदनिकेचा ताबा देण्‍यास झालेल्‍या विलंबापोटी तक्रारदारांनी केली असल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी दि. 09/07/2021 रोजी दिलेल्‍या अर्जामध्‍ये अनुक्रमांक 2 मध्‍ये सामनेवाले 1 व 2 यांचेकडून तक्रारदारांना सदनिकेचा ताबा न मिळाल्‍यास, तक्रारदारांनी सामनेवाले  1 व 2 यांना अदा केलेली रक्‍कम सामनेवाले 1 व 2 यांनी तक्रारदारांना 24% व्‍याजासह सदर अर्जात नमूद केल्‍यानुसार परत करावी असे प्रार्थना कलमामध्‍ये समाविष्‍ट करण्‍याकामी तक्रारदारांना परवानगी दयावी असे सदर अर्जात नमूद आहे.  त्‍यामुळे सामनेवाले 1 व 2 यांनी घेतलेल्‍या आक्षेपानुसार तक्रारदारांच्‍या मुळ प्रार्थना कलमामधील प्रार्थना तसेच दुरुस्‍ती अर्जामध्‍ये नमूद केलेली प्रार्थना ही सारखी नाही. सबब प्रस्‍तूत प्रकरण उभय पक्षाचे म्‍हणणे ऐकून गुणवत्‍तेवर निकाली काढणे संयुक्तिक असल्‍याने सध्‍यस्थितीला तक्रारदारांनी दिलेला दि.09/07/2021 रोजीचा तक्रारीच्‍या प्रार्थना कलमामध्‍ये सदर अर्जात नमूद केल्‍यानुसार दुरुस्‍ती करण्‍याकामीचा अर्ज हा तांत्रिक स्‍वरुपाचा असून त्‍यामुळे तक्रारीच्‍या स्‍वरुपात बदल होत नसल्‍याने न्‍यायहिताच्‍या दृष्‍टीने दृष्‍टीने मंजूर करण्‍यात येतो.  तक्रारदारांनी त्‍यानुसार तक्रारीत दुरुस्‍ती करुन सामनेवाले 1 ते 4 यांना दुरुस्‍ती तक्रारीचा संच दयावा. अर्ज निकाली.

        सदर प्रकरणामध्‍ये तक्रारदाराच्‍या अंतरिम अर्जावर आदेश पारीत करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. सदर आदेशामध्‍ये तक्रार गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍याकामी लागणारा कालावधी विचारात घेऊन पुढील आदेशापर्यंत तक्रारदारांची तक्रारीत नमूद सदनिका सामनेवाले 1 व 2 यांनी अन्‍य त्रयस्‍थ व्‍यक्तिस विक्री करु नये किंवा त्‍यावर अन्‍य त्रयस्‍थ व्‍यक्तिचा हक्‍क प्रस्‍थापित करु नये असे नमूद करण्‍यात आले आहे. सदर आदेश हे तक्रारीच्‍या अंतिम आदेशापर्यंत कायम ठेवण्‍यात येतात व तक्रारदारांनी दाखल केलेला अंतरिम अर्ज क्रमांक एम.ए./21/8 निकाली काढण्‍यात येतो. तक्रारदाराच्‍या पुराव्‍याकामी पु.ने.ता. 19/04/2022.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.