नि.21 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 37/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.30/07/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.15/10/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या 1. श्री.अरुण विठ्ठल ओक 2. श्री.ऋषिकेश रविंद्र साबळे 3. श्री.रविंद्र वासुदेव कुलकर्णी 4. श्री.प्रकाश दत्तात्रय वेल्हाळ 5. श्री.प्रभाकर जयराम कामतेकर 6. श्री.श्रीकांत केशव सरदेसाई 7. श्री.आनंदा रामचंद्र निडुरे 8. श्री.नंदकुमार यशवंत जोशी 9. श्री.प्रकाश वसंत निमकर 10. श्री.प्रशांत शंकर पवार 11. सौ.राजश्री राजाराम रहाटे 12. श्री.चंद्रकांत रामजी भुवड 13. श्री.रामा बाबुराव जाधव 14. सौ.अंजली अरविंद वहाळकर 15. श्री.रोहिदास अर्जुन तुळसणकर 16. स्वानंद 1 सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. करीता अध्यक्ष श्री.चंद्रकांत रामजी भुवड सर्व क्र.1 ते 16 रा.स्वानंद पागमळा, मु.पो.ता.चिपळूण, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. श्री.प्रकाश मोरेश्वर आठले रा.4/98, विजयनगर को ऑप. हाऊ. सोसायटी, सहार रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई. 2. श्री.विलास मुकुंद रानडे रा.रणछोडदास टेरेस, 4/21, एस.बी.नारायणन रोड, माटुंगा सेंट्रल रेल्वे, मुंबई. 3. निलिमा सुभाष रानडे रा.व्दारा मुकुंद किराणा स्टोअर्स, पाग, चिपळूण, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी. 4. श्री.मंदार सुभाष रानडे रा.2/201, निलांबरी अपार्टमेंट, पोर्तुगीज चर्चसमोर, गोखले रोड, दादर (प.), मुंबई – 28. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.पटवर्धन सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.महाजनी -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार व सामनेवाला यांनी हजर होवून नि.16 वर तडजोड पुरशीस दाखल केली. तक्रारदार क्र.1 ते 11 व 13 ते 15 यांनी याकामी तडजोड करणेसाठी तक्रारदार क्र.12 यांना अधिकार दिल्याबाबतचे अधिकारपत्र नि.13 वर दाखल आहे. तक्रारदार क्र.16 ही सोसायटी असून तक्रारदार क्र.12 हे सदरच्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी सदर कामी तडजोड करण्यासाठी सामनेवाला क्र.4 यांना दिलेले अधिकारपत्र नि.14 वर दाखल आहे. तक्रारदार व सामनेवाला यांनी नि.16 वर आपली तडजोड पुरशीस दाखल केलेली आहे. ब) सदर तडजोड पुरशीसमधील मुद्दे खालीलप्रमाणेः- - सामनेवाला क्रमांक 4 (विकासक) याने तक्रारदार राहातात त्या स्वानंद या इमारतीबाबत ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, कंप्लीशन सर्टिफिकेट तसेच इमारतीच्या सद्यस्थितीतील बांधकामाबरहुकूम रिव्हाइज्ड बिल्डिंग प्लॅन, स्वानंद इमारतीकडे जाणारा ऍप्रोच रोड दर्शवणारा साईट प्लॅन चिपळूण नगर परिषदेकडून मंजूर करुन घ्यावयाचा असून त्यासाठी आवश्यक ती नाहरकत तक्रारदार संस्थेने (तक्रारदार क्र.16) यांनी द्यावयाची आहे.
- सामनेवाला क्रमांक 4 यांनी वरील प्रमाणे पूर्तता करुन तीन महिन्यांत म्हणजेच 31 (एकतीस) डिसेंबर 2010 पर्यंत तक्रारदार क्रमांक 16 संस्थेचे नावे कन्व्हेन्स डीड करुन द्यावयाचे आहे. त्याचवेळी या कन्व्हेन्स डीडचे माध्यमातून स्वानंद इमारतीतील सदनिकांच्या क्रमांकांची वस्तुस्थितीनुरुप नोंद करुन द्यावयाची आहे. या कन्व्हेन्स डीडचा मसुदा हा तक्रारदार संस्थेने तयार करावयाचा असून त्यास सामनेवाला याने मान्यता द्यावयाची आहे.
- स्वानंद इमारतीच्या रहिवाशांसाठी सद्यस्थितीत असलेली ड्रेनेजची टाकी ही प्लॉट एरीयाच्या बाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर ड्रेनेजची टाकी योग्य त्या प्रमाणबध्द लांबी रुंदीच्या खोलीच्या मापाने सामनेवाला क्र.4 याने स्वानंद इमारतीच्या प्लॉटमध्ये स्वखर्चाने बांधून द्यावयाची आहे. सदरचे काम आजपासून तीन महिन्यांचे आंत पूर्ण करावयाचे आहे.
- स्वानंद इमारतीतील रहिवाशांसाठी स्वानंद इमारत उभी असलेल्या प्लॉट एरियात स्वतंत्र बोअरवेल सामनेवाला क्रमांक 4 यांनी पाडून घेवून व बांधून द्यावयाची आहे. ही बोअरवेल तयार करताना सद्यस्थितीत उपलब्ध असलेली बोअरवेल सामनेवाला क्रमांक 4 यांनी बुजवून टाकावयाची आहे.
- स्वानंद इमारतीच्या प्लॉट एरियामधून श्री.रेडीज व श्री.गांगण यांना जाण्या-येण्याच्या रस्त्यासाठी सामनेवाला क्रमांक 4 यांनी एकतर्फा तथाकथितरित्या दिलेली परवानगी सामनेवाला क्रमांक 4 यांनी रद्द करावयाचे मान्य केले आहे.
- स्वानंद इमारत उभी असलेला प्लॉट हा सात/बारा सदरी बारा गुंठे दर्शविलेला आहे मात्र या प्लॉटमधून सावंत नावाच्या आसामीला जाण्या-येण्यासाठी रस्ता देण्यात आलेला आहे. सावंत यांनी रस्त्यासाठी अतिरिक्त जागा घेतली आहे त्यामुळे त्याठिकाणी सदनिका धारकांचे सातत्याने वाद होत आलेले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेवून स्वानंद इमारत असलेल्या प्लॉट एरियाची मोजणी करुन घेवून मोजणीअंती स्वानंद इमारतीच्या प्लॉट एरियाची निष्पन्न होणारी जागा कन्व्हेन्स डीडचे माध्यमातून तक्रारदार क्रमांक 16 या संस्थेच्या नावे करुन द्यावयाची आहे. तसेच स्वानंद इमारतीच्या प्रवेशव्दारानजीकच स्वानंद इमारतीमध्ये एक गाळयाच्या आकाराचे क्षेत्र तयार झालेले आहे. हे क्षेत्रही सामनेवाला क्रमांक 4 यांनी तक्रारदार क्र.16 संस्थेच्या नावे कन्व्हेन्स डीडचे माध्यमातून कायमस्वरुपी विनामोबदला देणेचे मान्य केले आहे. सदर जागेचा उपयोग आवश्यक त्या परवानग्या घेवून तक्रारदार यांनी तक्रारदार क्रमांक 16 संस्थेच्या हितासाठी करावयाचा आहे. कन्व्हेन्स डीडचा खर्च तक्रारदार यांनी करावयाचा आहे.
- तक्रारदार यांनी सामनेवाला क्रमांक 4 यांचेविरुध्द चिपळूण येथील मे.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कोर्टात वेळेत कन्व्हेन्स डीड करुन न दिल्याबद्दल दाखल केलेली फौजदारी केस तक्रारदार यांनी मागे घ्यावयाची आहे.
- स्वानंद इमारतीचे टेरेसवर वॉटरप्रुफींगचे काम करावयाचे आहे त्यासाठी सुमारे रु.25,000/- मात्र (रु.पंचवीस हजार मात्र) खर्च येईल. तसेच सदनिकाधारकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनचे प्लंबींगचे काम करावयाचे आहे. त्यासाठी सुमारे रु.6,500/- मात्र (रु.सहा हजार पाचशे मात्र) खर्च येणारा आहे. तसेच स्वानंद इमारतीतील सदनिकाधारक श्री.नामजोशी यांच्या सदनिकेकडे येण्या-जाण्यासाठीचा मार्ग नीट करणे आवश्यक आहे. यासाठी सुमारे रु.2,000/- मात्र (रु.दोन हजार मात्र) खर्च येणारा आहे. यासाठी सामनेवाला क्रमांक 4 याने आज दि.13/09/2010 रोजी स्टेट बॅंक ऑफ इंडिया चिपळूण शाखेवरील रक्कम रु.33,500/- मात्र (रुपये तेहत्तीस हजार पाचशे मात्र) चा चेक क्रमांक 059199 हा तक्रारदार क्रमांक 16 या संस्थेच्या नावे दिलेला आहे. या रकमेतून तक्रारदार यांनी सदरची कामे करुन घ्यावयाची आहेत. यास्तव आता या तक्रारीबाबत सामनेवाला क्रमांक 4 यांचा संबंध रहावयाचा नाही.
- वर नमूद केल्याप्रमाणे सर्व गोष्टी सामनेवाला क्रमांक 4 याने दि.31 डिसेंबर 2010 पर्यंत पूर्ण करुन द्यावयाच्या आहेत. याप्रमाणे सामनेवाला क्रमांक 4 यांने पूर्तता करुन न दिल्यास तक्रारदार यांना कंझुमर प्रोटेक्शन ऍक्टमधील तरतूदीनुसार अंमलबजावणीचे (execution) प्रकरण सामनेवाला क्रमांक 4 विरुध्द दाखल करण्याची मुभा राहील व त्यास सामनेवाला क्रमांक 4 याची पूर्ण मान्यता आहे.
- याप्रमाणे उभयपक्षी परस्पर सामंजस्याने तडजोड करण्यात आली आहे व त्याप्रमाणे ही तडजोड पुरशिस आज रोजी दाखल करण्यात येत आहे.
क) सदर तडजोड पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदार संस्थेतर्फे अध्यक्ष चंद्रकांत भुवड व सामनेवाला 4 समक्ष उपस्थित. तडजोड पूरशिसमधील मजकूर मान्य व कबूल करतात. तडजोड पूरशिस मध्ये नमूद मुद्दा क्र.5 चा उल्लेख या तक्रार अर्जामध्ये नमूद नाही. तसेच सदर व्यक्ती या कामी सामील नाहीत त्यामुळे सदरचा मुद्दा अमान्य करणेत येतो तसेच मुद्दा क्र.7 चे अनुषंगाने फौजदारी केसबाबतचा कोणताही तपशिल नमूद नसलेने सदरचा मुद्दा अमान्य करणेत येतो. मुद्दा क्र.6 बाबत रस्ता व जागेबाबत तडजोडीनंतरही वाद उपस्थित झालेस सदरचा वाद हा दिवाणी न्यायालयातून सोडवून घेणेची सूचना करुन त्याबाबतची तडजोड करणेस मंजूरी देणेत येते.’’ सदर तडजोड पुरशिस व त्यावर करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदरचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. रत्नागिरी दिनांक : 15/10/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |