Maharashtra

Kolhapur

CC/09/753

Abhay Arun Shaha. - Complainant(s)

Versus

Prakash Maladkar. - Opp.Party(s)

In Persons

03 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/753
1. Abhay Arun Shaha.Shastrinagar Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Prakash Maladkar.Gokul Shirgaon.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :In Persons, Advocate for Complainant

Dated : 03 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.03/08/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्‍या)

 

(1)        प्रस्‍तुत प्रकरणी दि.26/07/2010 रोजी सकाळचे सत्रात तक्रारदाराचा युक्‍तीवाद ऐकणेत आला, सामनेवाला व तर्फे वकील गैरहजर होते. प्रस्‍तुतचे काम निकालावर ठेवणेत आले.दुपारचे सत्रात सामनेवाला तर्फे वकील हजर झाले त्‍यांनी पुरावा व युक्‍तीवादाकरिता संधी मिळणेबाबतचा अर्ज दाखल केला. सदरचा अर्ज नामंजूर करणेत आला व प्रस्‍तुतचे प्रकरण पुन्‍हा पूर्ववत निकालावर ठेवणेत आले.  

 

(2)        तक्रारीची थोडक्‍यात हकीगत अशी की- यातील तक्रारदार हे घरगुती स्‍वरुपात खादयपदार्थ तयार करुन लागणा-या यंत्रसामुग्रीचे उत्‍पादन करणा-या अ‍ॅफको हिटींग सिस्‍टीम्‍स या कंपनीचे मालक असून सामनेवाला क्र.2हे त्‍यांचे मॅनेजर आहेत.तक्ररदार यांना एका ओव्‍हनची आवश्‍यकता होती व सामनेवाला क्र.1हे बेकरी ओव्‍हन्‍सचे उत्‍पादन करतात असे कळल्‍यावरुन त्‍यांनी आपल्‍याला आवश्‍यक असणा-यास ओव्‍हनचे डिटेल्‍स देऊन सामनेवालाकडून सदर ओव्‍हनचे दि.28/07/2009 रोजी कोटेशन घेतले. त्‍यानंतर सामनेवालाने दिलेल्‍यसा ओव्‍हनच्‍या चांगला दर्जा योग्‍य किंमत व विक्री पश्‍चात उत्‍तम सेवेच्‍या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून दि.01/08/2009 रोजी एकूण रक्‍कम रु.40,000/- पैकी रु.20,000/-रक्‍कमेचा अडव्‍हान्‍स सामनेवाला यांना देऊन परचेस ऑर्डर दिली.त्‍यानंतर दि.24/09/2009रोजी बॅलन्‍स रक्‍कम रु.20,000/- सामनेवाला यांना देऊन सामनेवालांकडून ओव्‍हन ताब्‍यात घेतला.

 

(3)        तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, ओव्‍हन ताब्‍यात मिळण्‍या पूर्वीच तक्रारदार यांनी ओव्‍हनसाठी लागणा-या विद्यूत वायरींगचे काम करुन घेतले होते. दि.26/09/2009 रोजी कंपनीची माणसे येवून ओव्‍हन जोडून देऊन गेली. त्‍यावेळी तक्रारदार यांनी त्‍यांना ट्रायल टेस्‍टसाठी थांबण्‍यास सांगितले. पण त्‍यांनी काही काळजी करु नका तुम्‍ही ट्रायल घ्‍या असे सांगून निघून गेले. आम्‍ही ट्रायल टेस्‍ट घेवून बघितल्‍यानंतर आम्‍हाला असे निदर्शनास आले की ओव्‍हन व्‍यवस्थित काम करीत नाही. त्‍यातील काही माल करपतो तर काही माल कच्‍चा राहतो त्‍याची तक्रार दि.27/09/2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांना फोन करुन तक्रारदाराने सांगितली आणि त्‍यांनी मॅकेनिक पाठवून व्‍यवस्थित करुन देतो असे सांगितले. परंतु दि.03/10/2009 पर्यंत कोणीही आले नाही. दरम्‍यान आम्‍ही दि.03/10/2009 रोजी आणखी एक ट्रायल टेस्‍ट घेतली पण त्‍याचा रिझल्‍टसुध्‍दा पहिल्‍या ट्रायल टेस्‍टसारखाच झाला. परत मी सामनेवाला क्र.2 यांना फोनवर तक्रार सांगून मॅकेनिक पाठवून ओव्‍हन व्‍यवस्थित करुन देण्‍याची विनंती केली. तरी दि.10/10/2009 पर्यंत कोणीच आले नाही. दि.10/10/2009 रोजी कंपनीचे दोन मॅकेनिक आले व मला सहा ट्रे व फॅन दुरुस्‍त करुन आणून देतो असे सांगितले. त्‍यावेळी तक्रारदारांनी त्‍यांना फॅन व व्‍हॅट टयूब गंजलेले असल्‍याचे सांगितले. त्‍यांनी त्‍याचे फोटोदेखील काढले. दि.15/10/2009 रोजी कंपनीचे मेकॅनिक ट्रे व फॅन देवून ट्रायल टेस्‍ट घेवून पहा आता सर्व व्‍यवस्थित केले आहे असे सांगून निघून गेले. तक्रारदार यांनी दि.16/10/2009 रोजी ट्रायल टेस्‍ट घेतली पण त्‍याचाही रिझल्‍ट तोच आला. त्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांना ब-याच वेळा तोंडी, प्रत्‍यक्ष भेटून ओव्‍हन दुरुस्‍त करुन देण्‍याविषयी विनंती केली. पण मला ओव्‍हन दुरुस्‍त करुन मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्‍तव तक्रारदारांना लेखी स्‍वरुपातील तक्रारपत्र कंपनीस देणे भाग पडले. दि.29/10/2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी ओव्‍हन दुरुस्‍त करुन देतो असे सांगितले व दि.29/10/2009 रोजी त्‍यांचे मेकॅनिक ओवहन घेवून गेले व त्‍याची पोचपावती देवून गेले. अनेकवेळा लेखी, तोंडी विनंती करुनही सामनेवाला तक्रारदाराचा ओव्‍हन दुरुस्‍त करुन ताब्‍यात देईनात. म्‍हणून दि.16/11/2009 रोजी तक्रारदाराने सामनेवालांना स्‍मरणपत्र पाठवले. पण तरीही अदयापपर्यंत सामनेवाला यांनी तक्रारदारांचा ओव्‍हन सुस्थितीत करुन तक्रारदाराच्‍या ताब्‍यात दिला नाही.म्‍हणून अखेर सामनेवालाने प्रस्‍तुत मंचाकडे तक्रार केली आहे. आपला ओव्‍हन व्‍यवस्थित दुरुस्‍त करुन मिळावा, नुकसान भरपाई म्‍हणून दि.24/09/2009 पासून ओव्‍हनसाठी भरलेली रक्‍कम रु.40,000/- वर 18 टक्‍के व्‍याज मिळावे व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.

(4)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे कोटेशन, परचेस ऑर्डर, अडव्‍हान्‍स रक्‍कमेची पोचपावती, परफॉर्मा इन्‍व्‍हाइस नं.006, टॅक्‍स इन्‍व्‍हाईल्‍स नं.19, उर्वरित रक्‍कमेची पोचपावती, कंपनीस पाठविलेले पत्र, त्‍याची रजि.ए.डी.ची पोचपावती, सामनेवाला यांनी ओव्‍हन नेलेल्‍याची पोचपावती, सामनेवाला यांना पाठविलेले स्‍मरणपत्र, त्‍याची पोचपावती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेत तक्रारदाराने आपल्‍याकडून ओव्‍हन घेतल्‍याचे मान्‍य केले ओह. परंतु इतर सर्व कथनाला आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, सामनेवाला सदर ओव्‍हनची ट्रायल टेस्‍ट तक्रारदारांना दिली होती व ती समाधानकारक असल्‍यामुळेच तक्रारदाराने ओव्‍हन ठेवून घेतला होता. सामनेवालाने वेळोवेळी तक्रारदारास विक्री पश्‍चात सेवा दिली आहे. त्‍यानंतर दि;29/10/2009 रोजी सामनेवालाने तक्रारदार जे काही सांगत त्‍या सर्व तक्रारींचे निराकरण करण्‍यासाठी ओव्‍हन ताब्‍यात घेतला. सामनेवाला यांनी तक्रारदारास ओव्‍हन सुस्थितीत असून घेऊन जाण्‍याबद्उदल कळवले तरीही तक्रारदाराने त्‍यास नकार दिला. ओव्‍हन पूर्णपणे कार्यक्षम असूनही तक्रारदारास तो वापरण्‍याबद्दल पुरेसे ज्ञान नाही. त्‍यामुळे आपल्‍या चुकीचा भार ते सामनेवालांवर टाकायला पहात आहेत. तक्रारदार हा मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आला नाही म्‍हणून तक्रारदाराची सदरची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी तसेच सामनेवाला यांना झालेल्‍या नाहक त्रासामुळे रु.5,000/- कॉस्‍ट तक्रारदारास लावावी अशी मागणी सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.

(6)        सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणणेच्‍या पुष्‍टयथ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.

(7)        या मंचाने दोन्‍ही बाजूंनी दाखल केलेले कागदपत्र तपासले. अंतिम युक्‍तीवादाच्‍या दिवशी सामनेवालाचे वकील उशिरा आल्‍याने त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकूण घेणेत आला नाही.

 

(8)        तक्रारदाराने रु.40,000/- देऊन ओव्‍हन खरेदी केल्‍याने सामनेवालाने आपल्‍या कथनात मान्‍य केले आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे.आता पुढील दोन बाबींचा या मंचास विचार करावयचा आहे.

1) सामनेवालाच्‍या सेवेत त्रुटी आहे काय ?                               ---- होय.

2) सामनेवाला तक्रारदारास नुकसानभरपाई देय आहे काय ? ---- होय.   

 

(9)        सामनेवाला यांनी आपल्‍या कथनात तक्रारदारास ओव्‍हनची डिलीव्‍हरी दिल्‍यावर ट्रायल टेस्‍ट दिली असे म्‍हटले आहे. तसेच वेळोवेळी आपला मेकॅनिक तक्रारदाराकडे जाऊन त्‍यांच्‍या अडचणींचे निवारण करीत होता असे म्‍हटले आहे. परंतु सदर ट्रायल टेस्‍ट दिली व तक्रारदाराने ओव्‍हन कार्यक्षम असल्‍याबद्दल ओ.के.रिपोर्ट दिला.याबद्दल कुठलाही पुरावा दिला नाही तसेच सामनेवालाचे मेकॅनिक तक्रारदाराकडे जाऊन अडचणींचे निवारण करीत होते असे सामनेवालाने म्‍हटले आहे.परंतु त्‍याबद्दल जॉबशिट किंवा अन्‍य कुठलाही पुरावा दिला नाही. त्‍यामुळे सामनेवालाचे याबाबतीतले म्‍हणणे हे मंच ग्राहय धरु शकत नाही.

 

(10)       तक्रारदाराने दाखल केलेल्‍या निशानी क्र.2 वरील दि.29/10/2009 वरील सामनेवालाने दिलेल्‍या ओव्‍हन मिळाल्‍याच्‍या रिसीटवर सामनेवालाने स्‍पष्‍टपणे " We have received the oven and six trays on 29/10/09 and need 5 days to repair the faulty construction and reinstall it to your place at our cost."  असे मान्‍य केले आहे. त्‍यामुळे सामनेवालाने तक्रारदारांना विकलेला ओव्‍हन सदोष होता तसेच सामनेवालाने तो अल्‍प अवधीत दुरुस्‍त करुन देण्‍याचे आपले आश्‍वासनही पाळलेले दिसून येत नाही. ग्राहकांना आकर्षक जाहीरात करुन व आश्‍वासने देऊन भुलवायचे व विक्रीनंतर सेवा दयायची नाही ही सामनेवालांची अनुचित व्‍यापारी प्रथा व सेवेतील गभीर त्रुटी आहे अशा सुस्‍पष्‍ट निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदाराने आपले रोज रु.1,000/- चे नुकसान होत असल्‍याचे म्‍हटले आहे परंतु त्‍याबद्दल कोणताही पुरावा सदर मंचासमोर दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांचे याबाबतचे कथन ग्राहय धरता येत नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 

 

                                आदेश

 

1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते.

               

2) सामनेवालाने विनाविलंब तक्रारदाराचा ओव्‍हन खात्रीलायकपणे सक्षम करुन दयावा. किंवा त्‍याच किंमतीचा दर्जेदार ओव्‍हन तक्रारदारांना दयावा.

                     किंवा

   सामनेवालांनी तक्रारदाराने त्‍यांना दिलेले रु.40,000/- दि.26/09/2009 पासून संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत 9 % व्‍याजास दयावे.

 

3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त)

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER