निकालपत्र :-(दि.01.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारदारांचे मुळ गांव वेंगरुळ, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर या गांवी तक्रारदारांचे जुने घर होते. सदर जुने घर पाडून नविन आर.सी.सी.बांधकाम करणेचे तक्रारदारांनी ठरविले. त्याप्रमाणे श्री.संजय देसाई, कन्स्लटींग् इंजिनिअर यांचे देखरेखीखाली बांधकाम नकाशा तयार करुन सामनेवाला यांनी सदर बांधकाम करुन देणेचे ठरविले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.31.01.2008 रोजी रुपये 50,000/-, दि.02.03.2008 रोजी रुपये 50,000/-, तसेच तक्रारदारांचे नातेवाईक असलेले भिकाजी पंडित यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा मडूर, ता.भुदरगड यांचे बँक खातेवरील चेकने दि.08.04.2008 रोजी रुपये 25,000/-. तसेच, दि.09.04.2008 रोजी रक्कम रुपये 20,000/-, दि.23.04.2008 रोजी रक्कम रुपये 40,000/- अशी एकूण रक्कम रुपये 1,50,000/- सामनेवाला यांना दिलेली आहे. सदर घराचे बांधकाम दि.31.05.2008 रोजीपूर्वी पूर्ण करणेचे ठरले. रक्कम मिळूनही सामनेवाला यांनी बांधकाम अपूरे ठेवले व झालेले काम निकृष्ट दर्जाचे काम केले. याबाबत तक्रारदार त्यांचे इंजिनिअर, श्री.देसाई व सामनेवाले यांचेमध्ये एक मिटींग झाली. त्यावेळेस सामनेवाला यांनी बांधकाम वेळेत पूर्ण करणेस असमर्थता दर्शविली. त्यावेळेस श्री.देसाई यांनी उर्वरित बांधकाम स्वत:चे जबाबदारीवर पूर्ण करुन देणेचे मान्य केले. समानेवाला यांचेकडून तक्रारदारांकडून स्विकारलेली रक्कम व प्रत्यक्ष कामाची श्री.देसाई व सामनेवालांनी केलेल्या हिशेबाप्रमाणे कामापेक्षा जादा रक्कम गेल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे ठरले हिशेबाअंती प्रत्यक्ष कामाची किंमत रुपये 1,14,262/- निश्चित झाली व उर्वरित रक्कम रुपये 35,738/- सामनेवाला हे देणे लागत आहेत. त्यावेळेस सामनेवाला यांनी ते सचिव म्हणून काम करीत असलेल्या विठ्ठलाई सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, पाचर्डे या संस्थेचे को.जि.मं.सहकारी बँक लि., शाखा करडवाडी या बँकेचे प्रत्येकी रुपये 10,000/- चे तीन चेक दि.15.10.2008 रोजी रक्कम रुपये 35,738/- या रक्कमेच्या फेडीपोटी दिले. परंतु, सदर तिन्ही चेकवर सामनेवाला यांची सचिव म्हणून व संस्थेचे चेअरमन यांच्या सहया आहेत. तक्रारदार व सदर संस्था यांचा काहीही संबंध नाही अगर कोणतेही व्यवहार नाहीत. सामनेवाला यांनी वेयक्तिक कारणास्तव संस्थेचे चेक दिलेने सदर चेकचा भरणा तक्रारदारांनी केला नाही. याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांना नोटीस पाठविली असता त्यास उत्तर दिले नाही. सबब, सामनेवाला यांचेकडून येणे असणारी रक्कम रुपये 35,738/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा. मानसिक त्रासपोटी रुपये 20,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 10,000/-, नोटीस खर्च रुपये 2,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांना त्यांच्या म्हणण्यासोबत दि.02.04.2009 रोजी वकिलामार्फत दिलेली नोटीस, दि.31.01.2008, दि.02.03.2008 ची पावती, खाते नं.2373 चे बँक पासबुक, दि.26.09.2008 रोजीचे कामकाजाचे बिल व रककम दिलेबाबत, दि.15.10.08 रोजीचे चेक्स, दि.25.10.2008 रोजी विठ्ठलाई संस्थेकडे चेकबाबत दिलेले पत्र, दि.12.12.2008 रोजीचे विठ्ठलाई संस्थेचे पत्र इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी दाखल केलेल्या पावत्यावरील सहया या बनावट आहेत. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये बांधकामाचे मोजमापे, दर याबाबत कोणताही कागद झालेला नाही. तक्रारदारांचे घराचे बांधकाम रक्कम रुपये 2 लाखापर्यन्त प्रत्यक्षात केले आहे व सामनेवाला यांना रोख रुपये 85,000/- दिलेले आहेत. उर्वरित रक्कम बुडविणेच्या हेतूने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे; सामनेवाला यांनी तक्रारदारांना भितीपोटी सदरचे तीन चेक दिलेले आहेत. तक्रारदारांना कोणतीही रक्कम देय लागत नसून तक्रारदार हे सामनेवाला हे रुपये 1,50,000/- देय लागतात. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला बांधकाम कंत्राटदारांना रक्कम रुपये 1,50,000/- दिले असलेचे दिसून येते. त्या अनुषंगाने बँके ऑफ इंडिया, शाखा मडूर या बँकेत तक्रारदारांचे नातेवाईक असलेले श्री.पंडित यांच्या खात्याच्या पासबुकाचा उता-याचे अवलोकन केले असता सामनेवाला यांना रक्कम रुपये 40,000/- चा चेक दिलेला आहे. त्या अनुषंगाने श्री.पंडित यांनी शपथपत्र दाखल केले आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी रक्कमा स्विकारलेबाबत सामनेवाला यांनी लेखी पावत्या दिलेल्या आहेत. सदरचे बांधकाम सामनेवाला यांनी अपूर्ण ठेवले आहे व केलेल्या कामाचे व्हॅल्युएशन तक्रारदारांचे सिव्हील इंजिनिअर, श्री.देसाई यांनी केलेले आहे व त्या अनुषंगाने सदर देसाई यांनी शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी प्रत्यक्ष काम रुपये 1,14,262/- इतके केले आहे. एकूण देय रक्कम रुपये 1,50,000/- वजाजाता रुपये 35,738/- इतकी रक्कम सामनेवाला हे तक्रारदारांना देय लागतात अशा आशयाचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी ते सचिव असलेल्या सहकार संस्थेमध्ये तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे रुपये 10,000/- प्रमाणे प्रत्यकी तीन चेक तक्रारदारांना दिलेले आहेत. त्यांच्या झेरॉक्स प्रती प्रस्तूत कामी दाखल आहेत. सदरचे चेक हे वैयक्तिक देणेपोटी संस्थेचे चेक दिले असल्याने तक्रारदारांनी ते वटविलेले नाही. उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेता सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला यांनी तक्रारदारांना उर्वरित देय रक्कम रुपये 35,738/- (रुपये पस्तीस हजार सातशे अडतीस फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर दि.20.09.2008 रोजीपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत. (4) सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |