Maharashtra

Nagpur

CC/10/642

Vijay Puranlal Shrivastav - Complainant(s)

Versus

Prajwal Traders, Through Prop. and others - Opp.Party(s)

Adv. H.N. Potbhare

17 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/642
 
1. Vijay Puranlal Shrivastav
Joshi Layout, pande Chowk, New Babulkheda, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Prajwal Traders, Through Prop. and others
R-57, Reshimbagh, Sakkardara, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Exide Batteries,
Chhaoni, Sadar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:
 
Adv. Harode, Adv. Dhak.
 
ORDER

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 17/11/2011)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार, गैरअर्जदार क्र. 1 कडून दि.23.10.2008 रोजी मायक्रोटेक इन्‍व्‍हर्टर मॉडेल 850 युपीएस व एक्‍साईड बॅटरी मॉडेल टयुब्‍लर 150 एएन असे एकूण रु.17,500/- मध्‍ये विकत घेतले त्‍याचे बिलही गैरअर्जदार क्र. 1 ने दिले. सदर उपकरणास दोन वर्षाची वारंटी दुरुस्‍ती/बिघाड झाल्‍यास होती व तसे वारंटी/गॅरंटी कार्ड निर्गमित करण्‍यात आले होते. सदर इनव्‍हर्टर देखभाल करण्‍याकरीता कधीही गैरअर्जदारांनी प्रयत्‍न केला नाही. सदर इन्‍व्‍हर्टरमध्‍ये बसविलेल्‍या बॅटरीची देखभाल करण्‍याची तसदी कधीही गैरअर्जदाराने घेतली नाही.
                  इनव्‍हर्टर व बॅटरीमधील विद्युत प्रवाह वारंवार खंडीत होत असल्‍यामुळे इनव्‍हर्टर काम करीत नव्‍हते.  तक्रारकर्त्‍याकडे नेहमी विद्युत पुरवठा खंडीत होत असतो व इनव्‍हर्टर काम करीत नसल्‍याने त्‍याचा उपभोग ते घेऊ शकत नव्‍हते. गैरअर्जदार क्र. 1 यांना याबाबत तक्रार केली असता, त्‍यांनी सदर उपकरण व त्‍यातील उपयोगी सामाने दुरुस्‍ती करण्‍याकरीता त्‍यांचेकडे आणण्‍यास सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍यांनी 22.05.2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 कडे ते पोहोचवून दिले, सोबत गैरअर्जदाराने गॅरंटी कार्डही जमा केले व 7,8 दिवसानंतर येण्‍यास सांगितले. तक्रारकर्ता गेला असता दुरुस्‍ती करण्‍यात आल्‍याचे सांगून परत घेऊन जाण्‍यास सांगितले. परंतू घरी गेल्‍यावर इनव्‍हर्टर व्‍यवस्‍थीतपणे काम करीत नसल्‍याचे आढळून आले. ही पुनरावृत्‍ती 28.07.2010, 16.09.2010 ला झाली व दि.16.09.2010 रोजी झालेल्‍या दुरुस्‍तीपोटी गैरअर्जदारांनी रु.300/- शुल्‍क तक्रारकर्त्‍यावर लावले. वास्‍तविक सदर उपकरण वारंटी व गॅरंटी कालावधीत होते. तक्रारकर्त्‍याने इनव्‍हर्टर व बॅटरी बदलवून देण्‍याबाबत विनंती केली, कारण उपकरण हे गॅरंटी कालावधीत होते. मागणी करुनही सदर उपकरण बदलवून दिले नाही. अशाप्रकारे गैरअर्जदाराने दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍यास दिली. तक्रारकर्त्‍याचे उपकरण हे निकामी झाले असून, निरुपयोगी झालेले आहे. याबाबत वारंवार विनंती व शेवटी कायदेशीर नोटीस पाठविली असता, नोटीसची दखल त्‍यांनी घेतली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल करुन, गैरअर्जदाराने इनव्‍हर्टर व बॅटरी उपकरण बदलवून द्यावे किंवा इनव्‍हर्टरच्‍या दुप्‍पट रकमेची नुकसान भरपाई, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च     मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
2.                सदर तक्रारीची नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याने मायक्रोटेक इन्‍व्‍हर्टर मॉडेल 850 युपीएस व एक्‍साईड बॅटरी मॉडेल टयुब्‍लर 150 एएन असे एकूण रु.17,500/- मध्‍ये विकत घेतले ही बाब मान्‍य करुन, उर्वरित तक्रारकर्त्‍याची संपूर्ण तक्रार नाकारुन, इन्‍व्‍हर्टर व बॅटरीची काळजी घेणे हे तक्रारकर्त्‍याचे कर्तव्‍य होते असे नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याने बॅटरीमध्‍ये पाणी टाकणे व इन्‍व्‍हर्टर वापरल्‍यानंतर बॅटरी चार्ज करणे या गोष्‍टी करणे अनिवार्य होते. तक्रारकर्त्‍याने ही काळजी घेतली नाही. त्‍यामुळे सदर तक्रार खोटी असून ती दंडासह खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
 
3.                गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 हा त्‍यांचा अधिकृत विक्रेता नाही व तो वेगवेगळया कंपनीतून बॅटरी विकत घेतो. त्‍यामुळे त्‍यांचा सदर प्रकरणाशी संबंध नसून तक्रारकर्त्‍याने पाठविलेला नोटीस त्‍यांना प्राप्‍त झाला नाही. तक्रारकर्ता आपल्‍या निष्‍काळजीपणाकरीता त्‍यांना जबाबदार ठरवू शकत नाही असे विधान करुन सदर तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली.
4.                सदर तक्रार युक्‍तीवादाकरीता आली असता, तक्रारकर्त्‍यांनी व गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. गैरअर्जदार क्र. 2 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
5.                निर्विवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून मायक्रोटेक इन्‍व्‍हर्टर मॉडेल 850 युपीएस व एक्‍साईड बॅटरी मॉडेल टयुब्‍लर 150 एएन असे एकूण रु.17,500/- मध्‍ये दि.23.10.2008 रोजी विकत घेतले व त्‍यावर दोन वर्षाची वारंटी होती ही बाब दस्‍तऐवज क्र. 1 वरुन निदर्शनास येते.
 
6.                सदर तक्रारीमध्‍ये महत्‍वाचा मुद्दा हा आहे की, इन्‍व्‍हर्टर व बॅटरी यामध्‍ये उत्‍पादकीय दोष आहे काय ?
                  तक्रारकर्त्‍याच्‍या मते सदर उपकरण हे सदोष आहे व ते दुरुस्‍त करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याला दि.22.05.2009 व दि.28.07.2010, 16.09.2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे न्‍यावे लागले तरी त्‍यातील दोष दूर झाला नाही. सदर दस्‍तऐवज क्र. 2 वरील पावत्‍याचे अवलोकन करता या मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, दि.22.05.2009 रोजी तक्रारकर्त्‍याने सदर बॅटरी सर्व्‍हीस करता नेलेली होती. दि.28.07.2010 रोजी बॅटरी जवळपास पावणे दोन वर्षांनी दुरुस्‍तीकरीता गैरअर्जदार यांचेकडे नेलेली होती (दस्‍तऐवज क्र.3) व त्‍यानंतर दि.16.09.2010 रोजी बॅटरी चार्जींगकरीता गैरअर्जदार यांचेकडे नेली होती. सदर दस्‍तऐवजावरुन सदर उपकरणात उत्‍पादकीय दोष होता असे म्‍हणता येणार नाही. याशिवाय तक्रारकर्त्‍याने सदर उपकरणात उत्‍पादकीय दोष होता याबाबत कुठलाही सबळ पुरावा सादर केला नाही. त्‍यामुळे सदर उपकरणात उत्‍पादकीय दोष होता हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे या मंचाला मान्‍य करता येणार नाही. परंतू सदर बॅटरीमध्‍ये जर दोष असेल तर सदर बॅटरी ही वारंटी कालावधीमध्‍ये असल्‍यामुळे तो दोष विनामुल्‍य दुर करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार यांची आहे. कारण सदर उपकरण बॅटरीसह तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचेकडून खरेदी केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ही उपकरणावर वारंटी असतांना दाखल केलेली आहे. त्‍यामुळे सदर गॅरंटीचा अवधी हा तक्रारीच्‍या कालावधीपुरता काढलेला आहे. गैरअर्जदार यांनी दि.06.09.2010 रोजी सदर बॅटरी वारंटी कालावधीमध्‍ये असतांना बॅटरी चार्जींगकरीता गैरअर्जदार यांचेकडे दिली असता त्‍यांनी चार्जींगबाबत रु.300/- शुल्‍क आकारलेले दिसून येते. गैरअर्जदार यांचे मते बॅटरी चार्ज करणे वारंटीचा भाग नाही, परंतू सुस्‍पष्‍ट पुराव्‍याअभावी गैरअर्जदार यांचे हे म्‍हणणे या मंचाला मान्‍य नाही. त्‍यामुळे गैरअर्जदार यांची ही कृती अयोग्‍य आहे.
 
                  वरील वस्‍तुस्थिती पाहता मंच खालील निर्णयाप्रत येते.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत असून, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडील बॅटरीमध्‍ये काही दोष असेल तर तो गैरअर्जदार यांनी विनामुल्‍य दूर करावा.
2)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍यास रु.300/- परत करावे.
3)    उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे    आत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍थकपणे करावे.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.